School Male Cleaner Abuse Girls in Badlapur : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, सत्ताधारी व विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या पक्षांचे मेळावे, पदयात्रा, जाहीर सभा चालू आहेत. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. यासह कोलकाता येथे झालेल्या बलात्कार व खूनप्रकरणी आज (२० ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यासंबंधीच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेल. बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. स्थानिक नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे. नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन केल्यामुळे मुंबई लोकलसह मेल व एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Update, 20 August 2024 : राज्यासह देशभरातील बातम्यांचा आढावा

12:59 (IST) 20 Aug 2024
पालिकेत विकास योजना कक्ष, प्रारूप विकास योजनेसंबंधीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी पुढाकार

पनवेल : पनवेल महापालिकेने ८ ऑगस्ट रोजी महापालिकेचा पहिला प्रारूप विकास आराखडा घोषित केला. ७ सप्टेंबरपर्यंत या विकास आराखड्याबद्दल नागरिक त्यांच्या हरकती व सूचना पालिकेकडे नोंदवू शकतील. नागरिकांच्या मदतीसाठी पालिका आयुक्तांनी एक पाऊल पुढे टाकत सुधारित व एकत्रित प्रारूप विकास योजनेच्या नकाशाबाबत नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पनवेल शहरातील पालिका मुख्यालयाशेजारील अग्निशमन दलाच्या इमारतीच्या ३ मजल्यावर विकास योजना कक्षाची स्थापना केली आहे.

महापालिकेच्या www. panvelcorporation. com या संकेतस्थळावर नागरिकांना प्रारूप विकास आराखडा उपलब्ध करण्यात आला आहे. हे नकाशे अॅन्ड्रॉइड व आय फोनवर अगदी सहज डाऊनलोड करता येऊ शकतील. संबंधित प्रारूप विकास योजनेच्या नकाशाबाबत नागरिकांना समस्या उद्भवल्यास पालिकेच्या अधिकाऱ्यांचे गावनिहाय, मोबाइल नंबर पालिका आयुक्तांनी ग्रामस्थांना दिले आहेत.

अधिकाऱ्यांचे संपर्क

– विठ्ठल धायगुडे, ८१०४७४९९७३ गावाचे नाव : पनवेल, नागझरी, चाळ, घोट, धानसर, धरणगाव, धरणाकॅम्प, तुर्भे, पिसार्वे

– रणजीत कोरे, ९७०४२६७३७ गावाचे नाव : रोहिंजन, बीड, आडवली, तळोजा मजकूर, कोयनावळे, करवले बुद्रुक

– अनिकेत दुर्गवले, ७५०७०२१३६२ गावाचे नाव: कळंबोली-रोडपाली, कामोठे, नवीन पनवेल, आसुडगाव, टेंभोडे, काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचा पाडा, पालेखुर्द

– शुभम गायकवाड, ९४२०६०६६९९गावाचे नाव: पडघे, वळवली, तळोजे पाचनंद, नावडे, तोंडरे, पेंधर, खिडूकपाडा.

12:57 (IST) 20 Aug 2024
मंकीपॉक्सबाबत सरकारला अखेर जाग! ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर आरोग्य विभागाकडून तातडीने मार्गदर्शक सूचना जाहीर

पुणे : जगभरात काही ठिकाणी मंकीपॉक्स या आजाराची साथ दिसून येत आहे. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य संकट घोषित केले. यानंतर मंकीपॉक्स संसर्गाचा वेग लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानेही मंकीपॉक्सबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

वाचा सविस्तर…

12:56 (IST) 20 Aug 2024
श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, अल्पवयीन साथीदार ताब्यात; चार गुन्हे उघड

पुणे : शहरातील वेगवेगळ्या भागातील मंदिरातील दानपेटी उचकटून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्याने अल्पवयीन साथीदाराच्या मदतीन दानपेटी फोडण्याचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्याने पंधरा दिवसांपूर्वी फर्ग्युसन रस्त्यावरील श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडून रोकड चोरल्याचे उघडकीस आले.

वाचा सविस्तर…

12:56 (IST) 20 Aug 2024
डॉक्टरांच्या संघटनांत महिलांना नगण्य स्थान! देशभरातील ४६ पैकी केवळ ९ संघटनांचे अध्यक्षपद

पुणे : देशातील डॉक्टरांची शिखर संघटना म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनकडे (आयएमए) पाहिले जाते. या संघटनेतच महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व आतापर्यंत न मिळाल्याची बाब समोर आली आहे. देशभरात आयएमएच्या अंतर्गत असलेल्या ४६ डॉक्टर संघटनांपैकी केवळ ९ संघटनांचे नेतृत्व सध्या महिला डॉक्टर करीत आहेत. याचवेळी आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आतापर्यंत केवळ एकच महिला डॉक्टर विराजमान होऊ शकली आहे.

वाचा सविस्तर…

12:38 (IST) 20 Aug 2024
“महायुतीत मारामाऱ्या चालू असून जागावाटपाच्या वेळी खूनखराबा होणार”, ठाकरे गटाचा दावा

शिवसेनेच्या ठाकेर गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, महायुतीमधील तीन पक्षांमध्ये एकवाक्यता नाही. महायुती हा गोंडश शब्द असला तरी ती युती नसून त्यांच्यात मोठा संघर्ष चालू आहे, मारामाऱ्या चालू आहेत. त्यांच्यातील संघर्ष दिसत नसला तरी सारं काही आलबेल नाही. महायुतीमधील एक मंत्री सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो, त्याचं थोबाड फोडण्याची भाषा करतो, यावरून तुम्हाला कळेल की हे प्रकरण किती टोकाला गेलं आहे. हे सगळे कशावरून चाललंय? तर, मुंबई-गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलाय, मुंबई, कोकण, नाशिक या भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. ठेकेदार राज्याची लूट करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास खातं शिंदे गटाचे एटीएम मशीन आहेत. लोकांची कामं केली जात नाहीत. केवळ पैसा लुटला जातोय, अपघात होऊन लोक मारले जात आहेत. त्यामुळे महायुतीमधील पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये संघर्ष चालू झाला आहे. हा संघर्ष मारामारीपर्यंत गेला आहे. जागावाटपावरून प्रकरण आणखी तापेल. आगामी काळात या तीन पक्षांचे नेते जागावाटपाच्या चर्चेला बसतील तेव्हा त्यांच्यात खूनखराबा होईल.

11:29 (IST) 20 Aug 2024
मोठी बातमी ! पोर्श अपघात प्रकरणात आणखी दोघांना अटक

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली.

वाचा सविस्तर….

11:28 (IST) 20 Aug 2024
मुलींच्या अत्याचाराप्रकरणी हजारो बदलापुरकर रस्त्यावर, पालक आणि नागरिकांचा ठिय्या, बदलापूर बंदची हाक

बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली.

वाचा सविस्तर…

11:26 (IST) 20 Aug 2024
बदलापुरात आंदोलकांचा रेल रोको, कर्जत-बदलापूर रेल्वे सेवा ठप्प

दोन चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी मंगळवारी आदर्श शाळेसमोर तीव्र आंदोलन केले. यातील काही आंदोलकांनी साडेदहाच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडला.

वाचा सविस्तर…

11:00 (IST) 20 Aug 2024
“नवाब मलिक आता ‘लाडके मलिक’, देवेंद्र फडणवीसांनी मान्य करावं…”, संजय राऊत यांची मागणी

महायुतीत ऑल इज नॉट वेल अशीच परिस्थिती आहे. जागा वाटपाच्या बैठकीत रक्ताचे पाट वाहू शकतात असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तसंच नवाब मलिक हे आत्ता सत्ताधारी पक्षात आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी हे मान्य केलं पाहिजे की त्यांच्यावर खोटे आरोप केले होते. नवाब मलिक यांना अडकवण्यात आलं होतं, आमच्यावर जसे खोटे आरोप केले तसेच खोटे आरोप नवाब मलिकांवर करण्यात आले हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावं अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसंच लवकरच एक चित्रपट येतोय येक नंबर नावाचा. त्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस हे येक नंबर खोटारडे आहेत अशीही बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.

“महायुतीतल्या तीन पक्षांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. ती युती नाही, संघर्ष होतो आहे. रोज त्यांच्या मारामाऱ्या सुरु आहेत त्या दिसत नाहीत. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण टोकाला गेलं आहे हे पाहू शकता. कारण मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनला आहे. ठेकेदारांकडून महाराष्ट्रात लूट सुरु आहे. पाटबंधारे खातं, रस्ते विकास खातं हे सगळी शिंदे गटाची एटीएम मशीन्स झाली आहेत त्यामुळे कामं होत नाहीत अशी स्थिती आहे. सरकार पैशांच्या मागे लागलं आहे. खड्ड्यांमध्ये अपघात होऊन लोकांचे मृत्यू होत आहेत मात्र सरकारचं लक्ष नाही. जागावाटपावरुनही यांच्यात मारामाऱ्या होणार आहेत, खून खराबा होऊ एवढीच आमची इच्छा आहे.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

10:58 (IST) 20 Aug 2024
बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांचा उत्स्फुर्त रेल रोको

10:55 (IST) 20 Aug 2024
बदलापुरात स्थानिकांकडून रेल रोको, लोकल व मेल-एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत

बदलापूर पूर्वेकडील आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापुराकरांनी हजारोच्या संख्येने शाळेबाहेर जमत निदर्शने केली. सकाळी ६.३० वाजल्यापासून पालक व नागरिक शाळेबाहेर जमले होते. यावेळी आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिला. आरोपीला कठोर शिक्षा यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यापाठोपाठ बदलापूरकरांनी रेल्वेस्थानकात रेल रोको आंदोलन केलं. परिणामी मुंबई लोकलसह मेल व एक्सप्रेसची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

संजय राऊत – नवाब मलिक