Maharashtra News Updates, 21 August 2024: एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असतानाच बदलापूरमधील बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आदर्श शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरून आता वातावरण ढवळून निघालं असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून या घटनेवर तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.
Marathi News Update, 21 August 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा…
मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल येथील वाहतूक कोडींचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पॉडटॅक्सीचा पर्याय स्वीकारला आहे. या प्रकल्पाची उभारणी, देखभाल आणि संचलन यासाठी एमएमआरडीएने मागविलेल्या निविदेला दक्षिणेतील दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे.
मुंबई : पवई येथे शंभर रूपयांवरून झालेल्या वादातून ४५ वर्षीय व्यक्तीच्या गळ्यावर कटरने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पवई पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. काही दिवसांपूर्वी तक्रारदाराने आपल्याकडून शंभर रुपये घेतल्याचा दावा आरोपीकडून करण्यात आला.
ठाणे : बदलापुरातील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात तब्बल नऊ ते दहा तास रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली होती. यातील सहभागी आंदोलकांचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का हे तपासण्यात येणार आहे.
नाशिक : जनहितासाठी कार्यरत संजय पांडे विचार मंच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात किमान १० जागा लढणार असल्याची माहिती राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी येथे दिली. राष्ट्रीय जनहित पक्षाच्या नावाने नोंदणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. देवळाली मतदारसंघात शामराव भोसले यांची उमेदवारीही त्यांनी जाहीर केली.
बुलढाणा: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींवर अत्याचाराची घटना घडली असून राज्यभरात या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. बुलढाण्यातही घटनेचे पडसाद उमटले. महाविकास आघाडीतर्फे या घटनेच्या निषेधार्थ निषेध आंदोलन करण्यात आले. गगनभेदी घोषणाबाजी – निदर्शने, अर्थपूर्ण फलक आणि आघाडीच्या एकजुटीने आंदोलन लक्षवेधी ठरले.
नाशिक : देवळाली कॅम्प भागातील बार्न्स स्कूल आणि महाविद्यालयात जलतरण स्पर्धेवेळी शार्दुल पोळ या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मूळचा पुण्यातील विश्रामवाडीचा असणारा शार्दुल या महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता.
२४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद! महाविकासआघाडीचे ठरले – संजय राऊत</p>
https://x.com/rautsanjay61/status/1826175144340918551
पनवेल : बदलापूर घटनेचा पनवेल शहरामध्ये बुधवारी सकाळी महाविकास आघाडीमधील राजकीय घटक पक्षांच्या मूठभर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला.
नागपूर : जगनाडे चौकात मुख्य सिमेंट रोडवरून जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची सर्वाधिक संख्या आहे. याच रस्त्यालगत असलेल्या केशवनगर शाळेचे विद्यार्थी सुसाट जड वाहनांच्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. त्यामुळे पालकवर्गांतही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कल्याण : बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील स्वच्छता गृहाचा वापर केल्यानंतर त्याचे दोन रूपये काळजी वाहकांना न दिल्याने झालेल्या वादातून काळजी वाहक आणि त्याच्या सोबतच्या लहान मुलाने स्वच्छता गृहाचा वापर करणाऱ्या रिक्षा चालकाला शिवागीळ, मारहाण करत त्याच्या चेहऱ्यावर स्वच्छता गृह सफाईचे फिनेल फेकले.
सविस्तर वाचा…
नागपूर : वाघांच्या अधिवासात पर्यटकांनी घुसखोरी सुरू केली. वाघाच ते.. ऐकणार थोडे आणि मग वाघांनीही त्यांच्या अधिवासातील पर्यटकांच्या विश्रामगृहात घुसखोरी केली.
बदलापूर : मी संबंधित महिला पत्रकाराच्या बाबतीत कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत. केवळ आणि केवळ मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी सुरु आहे. मी कोणत्याही प्रकारचे असे अपशब्द वापरलेले नाहीत. पोलिसांनी देखील याबाबत तपास करून निर्णय घ्यावा. माझ्या बाजूने देखील कायदेशीर पद्धतीने उत्तर देण्यात येईल. असे स्पष्टीकरण शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे.
सविस्तर वाचा…
Raj Thackeray Gondia, : मी नेहमी आपल्या संबोधनात सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शासन व्यवस्था कशा प्रकारे कार्य करत असे. आज महाराज असताना अश्या प्रकारे घटना घडल्या असत्या तर गुन्हेगारांच्या पायाखालचे चौरंग काढून घेण्यात आले असते. पण अशा प्रशासनाची अंमलबजावणी कुठेही होताना मला दिसत नाही. मुळात आज प्रशासनाचा धाकच गुन्हेगारांवर राहिलेला नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
पुणे : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीतील त्रुटी दूर करून बदल शिक्षक भरतीच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आला असून, शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने बदल करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत.
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहारा प्रकरणी गेले तीन वर्षे कारागृहात असलेले माजी आमदार अनिल भोसले यांना उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला. मात्र,या गुन्ह्यात पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अटक केल्याने भोसले यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
पुणे : आर्थिक वादातून तरुणाने धावत्या रेल्वेगाडी खाली उडून मारुन आत्महत्या केल्याची घटना खडकी रेल्वे स्थानक परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पाचजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवी मुंबई : नवी मुंबई हे नियोजनबद्धरित्या वसवलेल शहर असून पामबीच मार्गावर दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट बनत चालला आहे. बेलापूर किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पामबीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगरालगताच रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उरण : उरण तालुक्यात विविध ठिकाणी मंगळवारी पहाटे धुके पसरले होते. गेल्या काही दिवसांपासून धुकेसदृश वातावरण निर्माण झाल्याने पावसाने परतीचा मार्ग धरल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच पावसाने दडी मारल्यापासून उरणचा हवा गुणवत्ता निर्देशांक १५० वर पोहोचला.
ठाणे : बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, मंगळवारी ठाण्यात विमान कंपनीमध्ये काम करणाऱ्या २० वर्षीय मुलीचा तिघांनी विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
उरण : बुधवारी उरणच्या गांधी चौकात बदलापूर येथील विद्यार्थ्यांनीच्या लैंगिक अत्याचार घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जनाक्रोश करीत निदर्शने केली. महिलांवरील अत्याचार थांबवा,बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या,एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या, या सरकारच करायचं काय आदी घोषणा देत ही निदर्शने करण्यात आली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ. मनोहर भोईर,पनवेल महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
मुंबई : परीक्षा आणि इतर महत्त्वाचे शैक्षणिक कामकाज सुरू असताना जवळपास दोन हजारांहून अधिक शिक्षकांना मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (‘बीएलओ’) पदाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
नवी मुंबई शहरापेक्षा यंदा मोरबे धरण परिसरात अधिक पाऊस झाला असून मोरबे धरण ९३ टक्के भरले आहे. तर यंदाच्या पावसाळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाऊस झाल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीतील मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून मिळालेल्या घरांच्या किंमती भरमसाठ आहेत. अल्प गटातील घरांसाठी अडीच कोटींहून अधिकचे दर निश्चित करण्यात आले असून यामुळे म्हाडावर टीका होत आहे. तर दुरूस्ती मंडळाकडून मिळालेल्या महागड्या घरांना प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबई : मुंबईसह महानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू असून त्यामुळे विस्थापित होणाऱ्या प्रकल्पबाधितांसाठी तातडीने ५० हजार घरांची गरज आहे. तसेच भविष्यात ही गरज सव्वादोन लाख घरांची आहे. त्यामुळे शासनाने प्रकल्पबाधितांसाठी घरनिर्मिती व वितरणाबाबत नवे धोरण जाहीर केले आहे.
नाटे सडापेठ बाजारपेठेतील एसटी स्टँड नजीकच्या जैद मोबाईल शॉपीमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. यात लाखो रुपयांचे मोबाईल आणि अन्य साहित्य चोरून नेल्याची सांगण्यात येत आहे. आश्चर्य म्हणजे हाकेच्या अंतरावर सागरी पोलीस ठाणे असून नाटे व्यापारी मंडळांने संपूर्ण बाजारपेठेत सीसीटीव्ही ही लावल्याची चर्चा सुरू आहे. मात्र हे असताना देखील चोऱ्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या काही दिवसात नाटे भागात मोठ्या प्रमाणावर चोरांनी उच्छाद मांडल्याची चर्चा सुरू असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सोमवारी दिवसभर उरण शहर आणि ग्रामीण भागातही बारा तासाहून अधिक काळ वीज गायब होती. एकीकडे ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी विजेच्या लपंडावामुळे महावितरणविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
बुलढाणा : मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या सन २०१९ च्या निवडणुकीत ‘काही जवळच्या लोकांनीच अडचणी निर्माण केल्या’. यामुळे दीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रथमच पराभव स्वीकारावा लागला, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती यांनी केला आहे.
पुणे : आर्थिक वादातून तरुणाने धावत्या रेल्वेगाडी खाली उडून मारुन आत्महत्या केल्याची घटना खडकी रेल्वे स्थानक परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पाचजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुणे : समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी महंत रामगिरींविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शोएब इस्माइल शेख (वय ६२, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महंत रामगिरी महाराज (रा. सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, सरला बेट, ता. श्रीरामपूर, जि. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नवी मुंबई : कायदा आणि सुव्यवस्थेला युती सरकारने रखेल बनवून ठेवले आहे. कायद्याची बुज राहिली नाही. त्यामुळे बदलापूर सारख्या घटना घडत आहेत, असे प्रतिपादन नवी मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केले. नवी मुंबई महाविकास आघाड़ी महिलांच्या वतीने आज वाशीतील शिवाजी चौक येथे निषेध व निदर्शने करण्यात आली.