Maharashtra News Updates, 21 August 2024: एकीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राजकीय वातावरण तापल्याचं दिसत असतानाच बदलापूरमधील बलात्काराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आदर्श शाळेतील तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतल्याच कार्मचाऱ्यानं बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरून आता वातावरण ढवळून निघालं असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून या घटनेवर तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Update, 21 August 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा…

15:06 (IST) 21 Aug 2024
Marathi News Live : भाजपाला धक्का; कोल्हापूरचे नेते समरजीत घाटगे शरद पवार गटात प्रवेश करणार?

कोल्हापूरमधील भाजपाचे नेते, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे भाजपाला राम राम ठोकून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. ३ सप्टेंबर रोजी शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना घाटगे यांचा पक्षप्रवेश होईल, असे बोलले जाते.

14:58 (IST) 21 Aug 2024
सावधान! मंकीपॉक्स झपाट्याने पसरतोय… नागपुरातील ‘या’ रुग्णालयांत उपचाराची व्यवस्था

Monkeypox treatment Nagpur : जगभरात ‘मंकीपाॅक्स’चा प्रसार वेगाने होत आहे. हा आजार आता भारताच्या शेजारील पाकिस्तानपर्यंत पोहचला आहे. केंद्र सरकारने दक्ष राहण्याच्या सूचना करताच नागपुरातील मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णशय्या आरक्षित केल्या गेल्या.

सविस्तर वाचा….

14:56 (IST) 21 Aug 2024
लाडक्या बहिणींसाठी प्रवासी वेठीला, रत्‍नागिरीतील कार्यक्रमासाठी रायगडमधून १५० एसटी बसेस रवाना, प्रवाशांची मोठी गैरसोय

रत्नागिरी इथं बुधवारी झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना ये जा करण्याकरिता रायगड जिल्ह्यातून तब्बल १५० एस टी बसेस पाठवण्‍यात आल्या. त्यामुळे रायगड जिल्ह्यात एस टी बसेसची कमतरता जाणवत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

वाचा सविस्तर…

14:25 (IST) 21 Aug 2024
‘लाडकी बहीण’ बाबत माजी राज्यमंत्र्यांची मोठी मागणी म्हणाले…!

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिला वर्गाला खुश करण्यासाठी राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला महिला वर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये याचे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत.

वाचा सविस्तर…

14:24 (IST) 21 Aug 2024
‘मंकीपॉक्स’वर वर्षभरात लस?

पुणे : मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

वाचा सविस्तर…

14:21 (IST) 21 Aug 2024
उत्सवांत लेझर, डीजेला बंदी नाहीच; उच्च न्यायालयाकडून जनहित याचिका निकाली

सण-उत्सवांतील डीजे, प्रखर दिव्यांचा (लेझर बीम) वापर, त्यांची विक्री, ते भाडेतत्त्वावर देणे या सगळ्यांवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.

वाचा सविस्तर…

14:20 (IST) 21 Aug 2024
वरळी अपघात प्रकरण : मिहीर शहा आणि त्याच्या चालकाची अटक बेकायदा?

मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी अटकेत असलेला मिहीर शहा (२३) आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांच्या बेकायदेशीर अटकेच्या दाव्यावर आठवडाभरात भूमिका स्पष्ट करा, असे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई पोलिसांना दिले.

वाचा सविस्तर…

13:52 (IST) 21 Aug 2024
…अखेर पालकमंत्री शंभूराज देसाई बदलापूरमध्ये येणार, आदर्श शिक्षण संस्थेची घेणार भेट

ठाणे – बदलापूर येथील आदर्श शाळेतील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची सविस्तर चौकशी करण्याचे आणि त्याचे अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगवारी उशिरा दिले. यानंतर नागरिकांकडून त्यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. तसेच समाजमाध्यमांवरही पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता. यानंतर आज अखेर दुपारी १ वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई आदर्श शिक्षण संस्थेची भेट घेणार असून स्थानिक पोलीस प्रशासनासमववेत बैठक घेणार आहेत.

सविस्तर वाचा….

13:41 (IST) 21 Aug 2024
लाडकी बहीण योजना : खात्यावर जमा केले ३ हजार अन् मिळताहेत केवळ पाचशे ते १ हजार रुपये! बँकांकडून कात्री…

अमरावती : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेंतर्गत राज्य सरकारने पात्र महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा केले. मात्र, अमरावती जिल्ह्यातील काही महिलांच्या हातात प्रत्यक्षात ५०० आणि १००० रुपये पडले असल्याचे समोर आले आहे. बँकांनी विविध कारणे देत महिलांच्या रकमेतून कपात केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त होत आहेत. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ सुरू केली.

वाचा सविस्तर…

13:40 (IST) 21 Aug 2024
बदलापूर घटनेप्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? सुप्रिया सुळेंनी उत्तर देणे टाळले

पुणे : बदलापूर येथील दोन शाळकरी चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. या घटनेच्या निषेधार्थ काल बदलापूर रेल्वे स्थानकावरील नागरिकांनी तब्बल १० तास रेल्वे रोखून ठेवली होती. या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.

वाचा सविस्तर…

13:39 (IST) 21 Aug 2024
आयर्लंड वकिलातीमधील अधिकाऱ्याची सायबर फसवणूक, आरोपीला हरियाणातून अटक

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील आयर्लंड वकिलातीमधील अधिकार्‍याची सुमारे सात लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आरोपीला हरियाणातून अटक करण्यात सांताक्रुझ पोलिसांना यश आले. सुनील जगदीश गर्ग असे अटक आरोपीचे नाव असून तो सायबर फसवणूक करणाऱ्या आरोपींना बँक खाते उपलब्ध करण्यात मदत करीत होता. आरोपीने आतापर्यंत चार बँक खाती आरोपींना उपलब्ध केल्याचे तपासात उघड झाले आहे.

वाचा सविस्तर…

12:41 (IST) 21 Aug 2024
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण

Dombivli Kalyan Roads – कल्याण, डोंबिवलीतील अनेक रस्त्यांची खड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेले सिमेंट काँक्रिट आणि खडीचा गिलावा गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे सुकून गेला आहे. या रस्त्यांवरून वाहने नेताना या धुळीचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना होत आहे.

सविस्तर वाचा….

12:40 (IST) 21 Aug 2024
कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांना स्वपक्षातून आव्हान

पुणे : राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक कोथरूडमधून लढण्याची बालवडकर यांनी तयारी केली असून गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन देखील सुरू केले आहे. स्वपक्षातून विरोध होऊ लागला असल्याने पाटील यांच्यासमोर नाराजी रोखण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

वाचा सविस्तर…

12:08 (IST) 21 Aug 2024
कोकणात कक्षा रुंदविण्यासाठी धैर्यशील पाटील यांना भाजपकडून खासदारकी

अलिबाग : शेकापमधून भाजपमध्ये आलेल्या धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची खासदारकी देऊन भाजपने कोकण व विशेषत: रायगडमधील कक्षा रुंदविण्याच्या दृष्टीने भर दिला आहे. त्याचबरोबर आगरी समाजाला प्रतिनिधीत्व देऊन हा समाजही बरोबर राहिल याची पक्षाने खबरदारी घेतली आहे.

वाचा सविस्तर…

12:06 (IST) 21 Aug 2024
ठाणे : मागील पाच महिन्यांत महिलांवरील लैंगिक अत्याचाराची १४६ प्रकरणे

sexual assault on women thane : ठाणे जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी या शहरांमध्ये मागील पाच महिन्यांत लैंगिक अत्याचाराचे १४६ गुन्हे दाखल असून विनयभंगाचे २५३ प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सविस्तर वाचा….

11:54 (IST) 21 Aug 2024
जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, निवासस्थानांवर छापा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर बुरुंजवाडी, तसेच महंमदवाडी येथील निवासस्थानांवर सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकांनी छापे टाकून कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी बांदल यांना ईडीकडून अटक करण्यात आली. यापूर्वी बांदल यांच्याविरुद्ध प्राप्तीकर विभागाने कारवाई केली होती.

वाचा सविस्तर…

11:53 (IST) 21 Aug 2024
गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी गड, किल्ले, मंदिरांच्या प्रतिकृतींना परदेशात पसंती

मुंबई : पर्यावरणस्नेही पुठ्ठयांपासून तयार करण्यात येणाऱ्या मखरांना या वर्षी मागणी वाढली आहे. पुठ्ठयांपासून तयार केलेल्या मखरांना मुंबईसह कोकण आणि परराज्यातील बडोदे, बंगळुरू, चेन्नई, केरळ, गोवा आदी विविध राज्यांतून पसंती मिळत असून दुबई, अमेरिका, लंडन, मॉरिशस, चीन आदी देशांतूनही या मखरांना मागणी वाढू लागली आहे.

वाचा सविस्तर…

11:38 (IST) 21 Aug 2024
Badlapur School Case : ..मला दिलेली सुरक्षा सरकारनं काढून घ्यावी – सुप्रिया सुळे

माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना सुरक्षा दिली आहे. मी ऐकलं की आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी.. आसामला गेलेल्या सगळ्यांनाही सुरक्षितता दिला आहे. माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षेची खरच गरज नाही. मीही तुमच्यासारखीच या राज्याची नागरिक आहे. जेवढी माझी सुरक्षा महत्त्वाची आहे तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक नागरिक व महिलेची सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे माझी सुरक्षा काढून घ्यावी आणि ती राज्यातल्या प्रत्येक लेकीला आणि नागरिकाला द्यावी – सुप्रिया सुळे</p>

11:38 (IST) 21 Aug 2024
Badlapur School Case : …तर मला सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी – सुप्रिया सुळे

जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला सरकारनं फाशीची शिक्षा द्यावी, पण आम्ही बलात्कार झालेल्या मुलीच्या कुटुंबाच्या बाजूने उभे राहणार. आम्ही आंदोलनं करणार. जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला व नागरिक सुरक्षित नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारनं आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावी – सुप्रिया सुळे</p>

11:33 (IST) 21 Aug 2024
शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा

पुणे : शाळकरी मुलीला दारु पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीच्या मित्रांसह एका मैत्रीणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आलेले अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

11:31 (IST) 21 Aug 2024
Badlapur School Case : बदलापुरात आंदोलन का पेटले? पोलिसांचा निष्काळजीपणा, शाळा प्रशासनाचे मौन आणि…

बदलापूर: एरवी शहरात झालेल्या कोणत्याही राड्यात हक्काने कार्यकर्त्यांसाठी पोलीस ठाण्याची पायरी झिजवणारे नेते आदर्श शाळेत झालेल्या चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणावर शांत होते. त्यात इतका गंभीर प्रकार झालेला असतानाही स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात घेतलेले आढेवेढे आणि शाळा प्रशासनाने बाळगलेले मौन या कारणांमुळे बदलापुरात नागरिकांचे उत्स्फूर्त आंदोलन पेटले.

सविस्तर वाचा….

11:17 (IST) 21 Aug 2024
badlapur school crime case: आरोपीला २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याची २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

बलापूर प्रकरणातील एफआयआरमधून अनेक धक्कादायक माहिती समोर (फोटो – लोकसत्ता टीम आणि Freepik)

Marathi News Update, 21 August 2024: बदलापूर बलात्कार प्रकरणातील सर्व घडामोडींचे अपडेट्स