Maharashtra News Updates, 23 August 2024 : येत्या शनिवार रविवारी हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय ठाणे, पालघर, रायगडला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणीही चर्चेत आहे. याप्रकरणावरून राजकीय आरोपी-प्रत्योरोपदेखील सुरू आहे. याशिवाय राज्यातील इतर घडामोडींवरही आपलं लक्ष असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Today, 22 August 2024 : गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण करा, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
Dindori Leopard Attack: वनारवाडी येथील विठ्ठल भीमा पोतदार (१७) हा गाई चारण्यासाठी वनारवाडी शिवारातील खंडेराव डोंगर परिसरात गेला होता.
तत्पूर्वी, पीडित मुलीने आताच लग्न करायची इच्छा नसल्याने मामाशी गुपचूप मोबाइलद्वारे संपर्क साधून आपबीती सांगितली.
महाविकास आघाडीच्यावतीने उद्या (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. यानंतर नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नाना पटोले म्हणाले, “उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करून आम्ही उद्या काळा झेंडा घेऊन आणि तोंडाला काळी पट्टी बांधून आम्ही उद्या सकाळी ११ वाजता आंदोलन नाही मात्र आम्ही एकत्र बसू. यामध्ये आम्ही न्यायालयाचा आदर करू. यासंदर्भातील सूचना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दिलेल्या आहेत. आम्ही बंद करणार नाही, जनतेनं बंद केल्यास संबंध नाही”, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
गोळीबार मैदानात बसने एका मोटारीला धडक दिली. त्यावेळी बसचालक पुंड आणि मोटारचालकात वाद झाला.
गाय वाटप योजनेत घोटाळा केल्याचे सिद्ध झाल्यानंतर ‘आयएएस’ शुभम गुप्ता यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढू लागला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन शरद पवारांनी केलं आहे.
बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 23, 2024
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वर्षा बंगल्यावरील आंदोलनापूर्वी मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली.
अलिबाग- नवीमुंबईतील नेरूळ येथून बेपत्ता असलेल्या दोन जणांपैकी सुमित जैन याचा मृतदेह पेण तालुक्यातील गागोदेजवळ झुडपात सापडाला. नवीमुंबई पोलीस आणि रायगड पोलीस या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत.
वसई : चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असताना वसईत काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. सावत्र आईने ७ आणि ८ वर्षांच्या चिमुकल्यांना अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे.
नालासोपार्यात १७ वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
उतारवयात तिची कुणाशी लढाई झाली की तिला आयुष्यातून उठावे लागले, हे कोडे अजूनही उलगडलेले नाही. ती अचानक बेपत्ता झाली.
यंदा अनधिकृत वीज पुरवठा घेतल्यास संबंधित मंडळांवर महावितरणकडून कारवाई केली जाणार आहे.
एसटी कामगारांनी घंटानाद, महाआरती, द्वारसभा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना राखी पाठवणे इत्यादी उपक्रमाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलनाची राळ उठवली .
महाविकास आगाडीने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने उद्याचा बंद हा बेकादेशीर असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलीस नोटीस पाठवली जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही उद्या १०० टक्के बंद पाळू, असे ते म्हणाले.
नाशिक : नेपाळ दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने १४ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १६ पर्यटक गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये काही जण जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे.
कोलकाता बलात्कार व हत्या प्रकरण आणि बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलेला असताना अमरावतीतही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ज्या बहिणी अजूनही या योजनेपासून वंचित असतील त्या सर्व बहिणींनी अजूनही फॉर्म भरावा. ३१ ऑगस्टपर्यंत ज्या बहिणी फॉर्म भरतील त्यांना जुलै व ऑगस्टचे पैसे एकत्रितपणे मिळतील.
सावंतवाडीचे सुपुत्र, युवा पत्रकार व पर्यावरण अभ्यासक ऋषिकेश नंदकुमार पाटील यांनी अल्पावधीत पर्यावरणावरील केलेल्या संशोधनात्मक अभ्यासामुळे त्यांना पुढील उच्च शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारची अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी (६० लाख रुपयांची चेव्हनिंग) शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या शिष्यवृत्तीमुळे ते लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या लंडन येथील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अॅण्ड पॉलिटिकल सायन्स येथे रवाना होणार आहेत. या निवडबद्दल त्यांचे राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे.
राज्यातील जनतेने राज ठाकरेंच्या हातात एकदा सत्ता देऊन बघावी. कायदा काय असतो, हे सर्वांना दाखवून देईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
मुंबई : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी गणेशमूर्ती मातीची असावी अशा आग्रहाखातर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घातली. मात्र, मूर्तीकारांचे नुकसान होत असल्याचे कारण देत या निर्णयाला राजकीय पक्ष, संघटनांकडून होत असलेला विरोध आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष यांमुळे यंदाही बाजारात पीओपीच्या गणेशमूर्तीच अधिक दिसत आहेत.
नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो. प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते आहे. राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत. महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 23, 2024
प्रारंभिक माहितीनुसार, हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचे कळते… https://t.co/dnBWB8goKx
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपड्यांमुळे येथील वन अधिकाऱ्यांना उद्यानाचे व्यवस्थापन करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे, या बेकायदा झोपडीधारकांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी धोरण आखण्याचे आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला दिले.
गेल्या काही दिवसांत राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं आहे. माझ्या हातात एकदा सत्ता द्या, आरोपींना कायद्याचा धाक काय असतो, हे दाखवून देतो, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली. ते यवतमाळमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
राज ठाकरे यांनी वणी मतदारसंघासाठी मनसेच्या उमेदवाराची घोषणाही केली आहे. वणी विधानसभा मतदारसंघातून मी राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. सर्वांनी त्यांच्या पाठिशी उभे राहावं आणि त्यांना विधानसभेत पाठवावं. असं राज ठाकरे म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तक्रारदार अल्पवयीन मुलीचा आरोपीने विनयभंग केला होता. या घटनेनंतर मुलगी घाबरली होती.
देशभरात अखिल भारतीय कोटा, अभिमत महाविद्यालयांतील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे.
बदलापूर – येथील आदर्श शाळेत झालेल्या दोन लहान मुलींच्या अत्याचाराचा सविस्तर आणि अधिक खोलात तपास करण्यासाठी राष्ट्रीय बालहक्क आज बदलापूर शहराला भेट देणार आहे. यावेळी आयोगाचे दिल्ली येथील वरिष्ठ महिला अधिकारी आणि त्यांचे सहकारी शाळा व्यवस्थापनातील संबंधित व्यक्ती आणि बदलापूर येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेणार आहेत.
Gondia Crime News: गोंदिया शहरात गेल्या तीन चार महिन्यांपासून क्षुल्लक कारणावरून होणारे हत्यांचे सत्र काही थांबता थांबत नाही.
बदलापूर येथील घटना ताजी असताना नवी मुंबईतही विविध प्रकरणांत अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे, बलात्कार, विनयभंगप्रकरणी दोन दिवसांत चार गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
सांंगली : सातत्याने होत असलेल्या छेडछाडीतून एका महाविद्यायीन युवतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार खंडेराजुरी (ता. मिरज) येथे घडला. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशयित साहील बबन डफेदार याच्याविरुध्द दाखल करण्यात आली आहे.
गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर, विनाव्यत्यय होईल, यादृष्टीने येत्या दहा दिवसांत युद्धपातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मास्टिक पद्धतीने रस्ते दुरूस्ती करण्याचे परिणाम चांगले आढळत आहेत. त्यामुळे मास्टिकचा वापर करूनच रस्त्यांची दुरूस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले.