Maharashtra News Updates, 23 August 2024 : येत्या शनिवार रविवारी हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय ठाणे, पालघर, रायगडला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणीही चर्चेत आहे. याप्रकरणावरून राजकीय आरोपी-प्रत्योरोपदेखील सुरू आहे. याशिवाय राज्यातील इतर घडामोडींवरही आपलं लक्ष असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Today, 22 August 2024 : गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण करा, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून सर्व ५७ शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आल्याने जवळजवळ ५० हजार विद्यार्थ्यांना सीसीटीव्हीचे सुरक्षाकवच आहे त्यामुळे सुरक्षेबाबत अत्यंत समाधानकारक बाब आहे. परंतु लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या महिला मदतीनासांची कमतरता असल्याने याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्वतःचं न बघता महाराष्ट्र पेटवण्याचं काम सध्या आघाडीकडून केले जात असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
Maharashtra Rain: मान्सूनच्या वेळेतील आगमनापासून तर आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदा मान्सून “मान्सून” सारखा कोसळत आहे.
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत पंडित दिनदयाळ रस्त्यावरील सम्राट चौकात एका पाळीव श्वानाच्या मालकाने बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका वडील आणि त्याच्या चार वर्षाच्या मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. तसेच, रागाच्या भरात सम्राट चौकातील भटक्या कुत्र्यांना हातामधील काठीने निर्दयपणे मारहाण केली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
shiye kolhapur news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार होऊन तिचा खून झाल्याचा प्रकार कोल्हापूर शहराजवळील शिये गावात काल घडला. या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. त्याला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी नाही. उद्याचा बंद विकृती विरुद्ध संकृती असा आहे. पालकांना आज काल आपल्या मुलींची चिंता आहे. या अस्वस्थेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे. उद्याच्या बंदमध्ये नागरिकांनीही सहभागी व्हावं, सामाजिक विषयावर असलेला बंद आहे. हा बंद दुपारी २ वाजेपर्यंत पाळावा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पित्यानेच आपल्या दोन वर्षांच्या मुलाची दीड लाख रुपयांना विक्री केल्याचा गंभीर प्रकार ॲन्टॉप हिल परिसरात घडला.
Raj Thackeray: पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची आहे. चांगल्या लोकांना पक्षात घ्या, चांगले असेल तर घेऊ, पक्षात कोणी पाठवला असेल तर घेणार नाही.
Akola Sexual Assault: चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या कोल्हापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नाशिक – अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने नुकताच एक लाख मराठा उद्योजकांच्या निर्मितीचा टप्पा पार केला. वैयक्तिक व्याज परतावा योजनेंतर्गत राज्यात एक लाख दोन हजार ३७५ नवउद्योजकांना तब्बल ८५८६ कोटींचे कर्ज वाटप होऊन महामंडळाने संबंधितांना आजवर ८३७ कोटींचा व्याज परतावा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात या योजनेतून १० हजार ६४५ लाभार्थ्यांना ८० कोटींचा परतावा मिळाल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी येथे दिली.
रविकांत तूपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ते आज मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शेतकरी वोटबॅंक नसल्याने त्यांच्या मागण्याकडे सरकार दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप रविकांत तूपकर यांनी केला आहे.
नाशिक – शुक्रवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत येथील तपोवन परिसरात महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमामुळे वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
नाशिक – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत येथे महाशिबीर होत आहे. महाशिबिराच्या पूर्वसंध्येला शहरातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
मुंबई: गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून जे. जे. मार्ग परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकाची २० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात पुण्यात राहणाऱ्या दोन आरोपींविरोधात फसवणूक व फौजदारी विश्वासघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ११ वर्षं तक्रारदाराकडून गुंतवणुकीच्या नावाखाली थोडी थोडी रक्कम घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार मोहम्मद युसुफ सुलेमान मन्सुरी (५२) असे तक्रारदार व्यापाऱ्याचे नाव आहे.
मुंबई : राज्यात २०१९ ते २०२१ या कालावधीत बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या लाखभर असून त्यांचा शोध घेण्यासाठी काय प्रयत्न केले, त्यासाठी काही ठोस यंत्रणा आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकार आणि पोलीस दलाला केली. तसेच, याप्रकरणी राज्य महिला आयोगाला प्रतिवादी करून या मुद्यावर प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
बदलापूरमध्ये पीडित मुलींचे पालक १२ दिवस फिरत होते. मात्र, त्यांचा गुन्हा नोंदवला जात नव्हता. मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात जी प्रतिक्रिया दिली आहे. ती गंभीर आहे. राज्यात महिलांवर अत्याचार सुरू असतील तर या सरकारला राज्य करण्याचा अधिकार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे. या घटनेत पोलीस ही तितकेच जबाबदार आहेत. राज्यातील पोलीस खातं भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच कोल्हापुरात मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
woman police hawildar caught prisoner : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना येरवड्यातील खुल्या कारागृहातून पसार झालेल्या कैद्याला मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस हवालदाराने पकडले. राजू पंढरीनाथ दुसाने (वय ४३, रा. महालगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे.
बदलापूर – येथील शाळेत लैंगिक शोषण झालेल्या दोन लहान मुलींपैकी एका मुलीच्या कुटुंबातील सदस्याने शाळा प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर निष्काळजीपणा आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. लोकसत्ताशी बोलताना कुटुंबातील सदस्याने आरोप केला की शाळेच्या मुख्याध्यापकांनी लैंगिक अत्याचाराचा दावा करणारे वैद्यकीय अहवाल फेटाळले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. येथे महिला सशक्तीकरण अभियानाला कार्यक्रमाला तिन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ वाजताच्या सुमारास या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
आज दुपारी १ वाजता दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. http://www.mahresult.nic.in व http://www.mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल बघता येईल.
शनिवार रविवारी हवामान खात्याने मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याशिवाय ठाणे, पालघर, रायगडला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
गणेशोत्सवादरम्यान नागरिकांना रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये. नागरिक, वाहनचालकांचा प्रवास सुखकर, विनाव्यत्यय होईल, यादृष्टीने येत्या दहा दिवसांत युद्धपातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची दुरूस्ती पूर्ण करावी, असे स्पष्ट आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. मास्टिक पद्धतीने रस्ते दुरूस्ती करण्याचे परिणाम चांगले आढळत आहेत. त्यामुळे मास्टिकचा वापर करूनच रस्त्यांची दुरूस्ती करावी, असेही त्यांनी सांगितले.