Maharashtra Politics Updates : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्त ठाकरे गटातर्फे राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ष्णंमुखानंद सभागृह येथे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आज ते कोणावर तोफ डागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या दोन जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येईल. भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान, संदर्भात आज भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होईल अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Live Updates

Maharashtra Latest News  : आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती; ठाकरे गटातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन

20:04 (IST) 23 Jan 2023
“आदित्य ठाकरेंच्या अज्ञानपणाच्या वक्तव्यांमुळेच शिवसेनेत…”, दीपक केसरकर यांचा टोला, म्हणाले…

आदित्य ठाकरे यांच्या अज्ञानपणाच्या, (अनमॅच्युरिटी) वक्तव्यांमुळेच शिवसेनेत फूट पडली. आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना सौम्य भाषेत उत्तरे दिली जातील. त्यातून महाराष्ट्राच्या जनतेला खरी गद्दारी, लाचारी कोणी केली.

सविस्तर वाचा

19:30 (IST) 23 Jan 2023
शिवसेना-वंचितचे भाजपपुढे आव्हान?, रामदास आठवले यांच्या नेतृत्वाची कसोटी

माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवेसना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवेसना-वंचितचे जागावाटपाचे गणित नीट जमले तर, भाजपपुढे आव्हान उभे करु शकतात.

सविस्तर वाचा

19:15 (IST) 23 Jan 2023
सातारा औद्योगिक वसाहत परिसरात कचरा डेपोला आग, नागरिकांकडून धुरामुळे संताप व्यक्त

सातारा नवीन औद्योगीक वसाहत परिसरातील कचरा डेपोला आग लागल्याने या भागात धुराचे लोट पसरले आहेत. यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील कचरा डेपोला आग लागल्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत.

सविस्तर वाचा

19:01 (IST) 23 Jan 2023
नाशिक : जादूटोणा विरोधी कायदा अधिक कठोर करावा, अंनिसची मागणी

रामकुंड परिसरात काही हिंदुत्ववादी संत, महंतांनी अंधश्रध्दा निर्मूलन समिती केवळ हिंदू धर्मीयांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप केला असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांचा हा दावा खोडून काढला आहे. जादूटोणा विरोधी कायद्यातंर्गत दाखल पहिल्या शंभर गुन्ह्यात २० गुन्हे मुस्लिम व्यक्तींविरोधात असल्याचे अंनिसने म्हटले आहे.

सविस्तर वाचा

18:42 (IST) 23 Jan 2023
‘कसब्या’चा काँग्रेसचा उमेदवार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करणार, कसबा पोटनिवडणुकीवर नाना पटोलेंची माहिती

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक आहेत. निवडणूक लढविण्यासाठी दहा अर्ज आले आहेत. त्या अर्जांची चाचपणी सुरू असून, तीन फेब्रुवारीपर्यत उमेदवाराचे नाव निश्चित आणि जाहीर केले जाईल, असे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी येथे सांगितले.

सविस्तर वाचा

18:12 (IST) 23 Jan 2023
२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘धर्मवीर’, आणखी ‘या’ सात मराठी चित्रपटांचा समावेश

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) स्पर्धात्मक विभागामध्ये “धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

17:54 (IST) 23 Jan 2023
पुणे : लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ, सहारा पूल परिसरात युगुलाला लुटले

लोणावळ्यातील सहारा पूल भागात युगुलाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका महाविद्यालयीन युवकाने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा...

16:54 (IST) 23 Jan 2023
...तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी

‘तुम्ही बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या विरुद्ध बोलणे थांबवले नाही तर तुमचा आम्ही नरेंद्र दाभोळकर करू’ अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांना देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे.

सविस्तर वाचा

16:53 (IST) 23 Jan 2023
नागपूर : धीरेंद्र कृष्ण महाराजांना ‘तो’ कायदा ठरणार अडचणीचा…

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज ऊर्फ चमत्कारी महाराजांनी दावा केलेल्या दिव्य शक्ती आणि त्या बळावरील चमत्कार यास प्रा. श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. तर हे आव्हान स्वीकारतो पण रायपूरला या, असे प्रतिआव्हान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी श्याम मानव यांना दिले आहे.

सविस्तर वाचा

16:51 (IST) 23 Jan 2023
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची गुरुवारी डोंबिवलीत बैठक

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडुंचा ठसा उमटावा. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी वेळीच योग्य मार्गदर्शन व्हावे. यासाठी राज्यातील क्रीडा क्षेत्राची दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी (ता.२६) महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची बैठक डोंबिवली जीमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

16:50 (IST) 23 Jan 2023
वाशीम : प्रदूषित धुरामुळे अनेकांना त्वचारोग, शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पीक व फळांचेही नुकसान

अकोला नांदेड महामार्गावर डही इरळा शेतशिवारात असलेल्या खाजगी डांबर प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. शेतातील पिकांची वाढ खुंटली असून पिकांची राखरांगोळी होत आहे, तसेच जनावरे आणि मानवांना देखील विविध त्वचारोगाचे आजार उद्भवत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी, निवेदने करूनही कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सविस्तर वाचा...

16:50 (IST) 23 Jan 2023
कोश्यारी यांची उपयुक्तता भाजपसाठी संपली

उर्वरित काळ चिंतन, मनन करण्याचा मानस व्यक्त करीत राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केले असले तरी भाजपसाठी कोश्यारी हे अडचणीचे ठरले होते.

सविस्तर वाचा

16:27 (IST) 23 Jan 2023
पुणे : सोसायटीचा मेंन्टनन्स न भरल्याने रहिवाशाला बेदम मारहाण, बांधकाम व्यावसायिकासह तिघांवर गुन्हा दाखल

सोसायटीचे देखभाल शुल्क (मेंन्टनन्स) न भरल्याने रहिवाशाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

16:09 (IST) 23 Jan 2023
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

गावातील अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुणाने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भूषण पाटील असे तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 23 Jan 2023
अमरावती : निवडणूक प्रचारादरम्‍यान अपक्ष उमेदवारावर हल्ला; पाठिंब्यासाठी मारहाण केल्‍याचा आरोप

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्‍या प्रचारादरम्‍यान अपक्ष उमेदवार विकेश गोकुलराव गवाले (३१) यांच्‍यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. पाठिंबा देण्‍याच्‍या मागणीसाठी वाद घालून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा...

15:34 (IST) 23 Jan 2023
गर्भपाताचे निर्णयस्वातंत्र्य स्त्रीचेच, उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई : गर्भधारणा कायम ठेवायची की नाही, हे निवडण्याचा अधिकार स्त्रीला आहे. तसेच हा निर्णय केवळ तिच्या एकटीचा आहे, असे ठाम मत उच्च न्यायालयाने एका विवाहितेला ३२ व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी देताना व्यक्त केले. गर्भात गंभीर विकृती आढळून आल्याच्या वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयाने ही परवानगी दिली.

सविस्तर वाचा...

15:07 (IST) 23 Jan 2023
नागपूर : धक्कादायक! श्वान आवडत नाही म्हणून थेट विषप्रयोग

मानव-वन्यजीव संघर्ष विकोपाला गेल्यामुळे मांसभक्षी प्राण्याने मारलेल्या जनावरावरच वीष टाकून त्या मांसभक्षी प्राण्याला मारण्याचे प्रकार जंगलालगतच्या गावांमध्ये होतात. त्याच धर्तीवर आता शहरातही मानव-श्वान संघर्ष सुरू झाला असून तीच वीषप्रयोगाची पुनरावृत्ती सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा

14:41 (IST) 23 Jan 2023
धक्कादायक! वरळी येथे २० महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, शेजारी राहणाऱ्या आरोपीला अटक

अवघ्या २० महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. औषधोपचारानंतरही पीडित मुलीचा त्रास कमी न झाल्यामुळे आईने तपासणी केली असता हा प्रकार उघड झाला.

सविस्तर वाचा

14:41 (IST) 23 Jan 2023
नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकराचा मुलीवर बलात्कार

एकाच घरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकराने १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्याने आईला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने मैत्रिणीच्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 23 Jan 2023
ठाणे : डोंबिवलीतील ६५ भूमाफियांची बेकायदा दस्त नोंदणी कागदपत्र विशेष तपास पथकाच्या ताब्यात

डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारताना भूमाफियांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बनावट परवानग्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्क्यांचा वापर करून अकृषिक, बांधकाम परवानग्या तयार केल्या. या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाची फसवणूक करून त्यांच्याकडून रेरा नोंदणीकृत क्रमांक मिळविला. ही सर्व कागदपत्रे भूमाफियांनी डोंबिवलीतील गांधीनगरमधील दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत करून त्याआधारे घर खरेदीदारांची फसवणूक केली. ही सर्व नोंदणीकृत कागदपत्र ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास येथील दस्त नोंदणी कार्यालयातून तपासासाठी ताब्यात घेतली.

सविस्तर वाचा...

14:32 (IST) 23 Jan 2023
ठाकरे-आंबेडकरांची युती, मात्र वंचित महाविकास आघाडीचा भाग असेल का? उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही यासंदर्भात…”

शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली, तरी वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान, याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 23 Jan 2023
पुणे : काकाकडून दोन अल्पवयीन पुतणींवर अत्याचार, काकासह मित्राविरोधात गुन्हा

काकाच्या भरवशावर सोडून परगावी गेलेल्या दाम्पत्याच्या दोन अल्पवयीन मुलींवर काका आणि त्याच्या मित्राने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा...

13:36 (IST) 23 Jan 2023
मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचे प्लास्टर पडून आठ वर्षीय मुलीचा मृत्यू

गिरगावातील चंदनवाडी परिसरात रविवारी रात्री एका इमारतीचे प्लास्टर अंगावर पडल्यामुळे आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. चोवीस मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याचा काही भाग या मुलीवर कोसळला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

13:21 (IST) 23 Jan 2023
क दिवस मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल - प्रकाश आंबेडकर

निवडणुकांमध्ये सध्या बदला घेण्याचं राजकारण सुरु आहे. एक दिवस मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल. ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचं काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

13:14 (IST) 23 Jan 2023
उद्धव ठाकरेंकडून वंचित-ठाकरे गट युतीची घोषणा; म्हणाले, ”महाराष्ट्रातील जनता…”

महाराष्ट्रातील जनता ज्याची निर्णयाची वाट बघत होती, आणि पुढची वाटचला एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलो आहोत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा स्नेही होते. दोघांनीही समाजातील वाईट रुढी पंरपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. याबद्दल आम्ही दोघांनी वेगळं सांगायाची आवश्यकता नाही. सध्या राजकारणा ज्या वाईट रुढी परंपरा सुरू तो त्या मोडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

13:14 (IST) 23 Jan 2023
उद्योगांपाठोपाठ महाराष्ट्रातील वन्यप्राणीही गुजरातमध्ये रवाना

महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला देण्याची उदारवृत्ती महाराष्ट्र सरकारने दाखवली आणि दाखवत आहेत. पण आता हेच सरकार महाराष्ट्रातील वन्यप्राणी देखील गुजरातला पाठवण्याची उदारवृत्ती दाखवत आहेत. हत्तींपासून सुरु झालेला हा प्रवास आता वाघ आणि बिबट्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. गोरेवाडा प्रकल्पातील चार वाघ आणि चार बिबट कुणालाही कानोकान खबर लागू न देता शनिवारी रात्री गुजरातला रवाना करण्यात आले.

सविस्तर बातमी

12:58 (IST) 23 Jan 2023
थोड्याच वेळात उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद; युतीची घोषणा होणार?

गेले अनेक दिवस चर्चेत असलेली  शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात नव्या युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आंबेडकर भवन येथे ही पत्रकार परिषद होणार आहे.

12:55 (IST) 23 Jan 2023
युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करोना काळात भ्रष्टाचार केला - मनसे

स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर करोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप लावले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह हे आरोप केले. युवासेनेचे पदाधिकारी आणि मुंबई मनपा वॉर्ड ऑफिसर यांचे चॅटिंगचे स्क्रिनशॉट यावेळी त्यांनी दाखविले. तसेच हे सर्व पुरावे ईडी, ईओडब्लू कडे देणार असून चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. वाचा सविस्तर वृत्त

12:46 (IST) 23 Jan 2023
…म्हणून Googleने भारतीय हॅकर्सना दिले चक्क १८ लाखांचे बक्षीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Google हे एक सर्च इंजिन आहे. याचा वापर प्रत्येकजण करत असतो. यावर आपण आपल्याला हवी ती माहिती शोधू शकतो. बातमी वाचा सविस्तर

12:34 (IST) 23 Jan 2023
ठाणे : सैनिकांना मानवंदना देण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली दौड, २६ जानेवारीला रनर्स क्लॅनचा उपक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील रनर्स क्लॅन फाउंडेशनने सैनिकांना मानवंदना देण्यासाठी २६ जानेवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली धावण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ६५ किलोमीटरची ही दौड २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे सुरू होऊन डोंबिवलीत सकाळी पोहचणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

सविस्तर वाचा...

 

balasaheb thackeray

संग्रहित फोटो

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्त ठाकरे गटातर्फे राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.

Story img Loader