Maharashtra Politics Updates : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्त ठाकरे गटातर्फे राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ष्णंमुखानंद सभागृह येथे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आज ते कोणावर तोफ डागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या दोन जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येईल. भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान, संदर्भात आज भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होईल अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

Live Updates

Maharashtra Latest News  : आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती; ठाकरे गटातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन

12:29 (IST) 23 Jan 2023
“साहेब, मला क्षमा करा!” बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंनी व्यक्त केल्या भावना; म्हणाले, “…या गोष्टीची आयुष्यभर खंत राहील”

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ट्वीटद्वारे बाळासाहेबांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना भेटू शकलो नाही, याची खंत असल्याचेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा

12:19 (IST) 23 Jan 2023
Spotify Layoff: Spotify करणार पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

Spotify Planning Layoff: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple व् Microsoft आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. एकापाठोपाठ मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Spotify कंपनीमध्ये कमर्चाऱ्यांची कपात अजून थांबलेली दिसत नाही. बातमी वाचा सविस्तर

12:18 (IST) 23 Jan 2023
IIT मद्रासने लाँच केली BharOS ऑपरेटिंग सिस्टीम; मिळणार हे जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या

भारत हा देश विकसनशील देश आहे. हा देश बऱ्याच कालावधीपासून स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्याचा पर्यटन करत आहे. यामध्ये आपल्याला यश मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संरक्षण प्रणाली सर्वच क्षेत्रात भारत स्वदेश निर्मितीवर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. बातमी वाचा सविस्तर

12:10 (IST) 23 Jan 2023
मुंबई : नागपाड्यात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल

१४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी ५५ वर्षीय मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीचे प्रेमसंबंध घरी सांगण्याची धमकी देऊन आरोपी मुख्याध्यापकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 23 Jan 2023
मुंबई : समृद्धी महामार्गावरील फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी अधिक प्रतीक्षा, एमएसआरडीसीला कंत्राटदार मिळेना

नागपूर समृद्धी महामार्गावर फूड प्लाझा आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा मागविल्या होत्या. मात्र, या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने फेरनिविदा काढण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढावली आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरील आवश्यक त्या सोयी सुविधांची प्रतीक्षा लांबली आहे.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 23 Jan 2023
नागपूर : बाळासाहेब ठाकरे स्मृती केंद्राचा प्रस्ताव अजूनही कागदावरच

उपराजधानीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव अजूनही प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अजुनही कागदावर आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार असताना गेल्या सहा महिन्यापासून या प्रकल्पाला गती मिळाली नाही.

सविस्तर बातमी

11:47 (IST) 23 Jan 2023
राज्यातील ५२० हवालदार होणार पोलीस उपनिरीक्षक

राज्यभरातील ५२० पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना संवर्ग न मागितल्यामुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. परंतु, आता पोलीस महासंचालकांनी सकारात्मक पाऊल उचलले असून निवड झालेल्या हवालदारांची माहिती मागवण्यात आली आहे. लोकसत्ताने पदोन्नतीबाबत वृत्त मालिका प्रकाशित करून पाठपुरावा केला होता, हे विशेष.

सविस्तर बातमी

11:47 (IST) 23 Jan 2023
पुणे : कसब्यातील भाजपचा उमेदवार आज निश्चित? पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेत्यांची बैठक

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत कसब्यातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, पोट निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीतीही निश्चित केली जाणार आहे. या बैठकीमुळे निवडणुकीच्या घडामोडींना वेग मिळणार आहे.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 23 Jan 2023
जळगाव : गोद्रीत बंजारा समाजाच्या महाकुंभाची तयारी पूर्णत्वास

जामनेर तालुक्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नाईकडा समाजाच्या महाकुंभासाठी राज्यभरातूनच नव्हे, तर देश-विदेशातून मदतीचा ओघ सुरू आहे. महाकुंभात संत-महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांचीही उपस्थिती राहणार आहे. सद्यःस्थितीत १५ लाख भाविकांना पुरेल एवढा धान्यसाठा झाला असून, इतर अत्यावश्यक वस्तूंच्या स्वरुपातही मदत येत असल्याची माहिती श्याम चैतन्य महाराजांनी दिली.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 23 Jan 2023
‘खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठीच जुनी पेन्शन योजना बंद’; ॲड. आंबेडकर यांचा आरोप

सध्या देशातील वातावरण बघता प्रत्येकाने भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. कामगार मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेन्शनचा अधिकार मिळवून दिला. परंतु, नंतर ती बंद करण्यात आली. ही योजना बंद करण्यात भाजपसोबत अन्य पक्षांचाही सहभाग आहे. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी ही योजना बंद करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

सविस्तर बातमी

11:41 (IST) 23 Jan 2023
INS Vagir पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल, भारताचे समुद्रातले सामर्थ्य वाढले

नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील नौदल तळावर झालेल्या एका शानदार कार्यक्रमात INS Vagir ही पाणबुडी आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. या पाणबुडीच्या समावेशामुळे समुद्रात विस्तृत भागात गस्त घालत लक्ष ठेवण्याच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे.

सविस्तक वाचा…

11:38 (IST) 23 Jan 2023
“स्मारकं होतील, पुतळे उभे राहतील, तैलचित्रांचे अनावरण होतील, राजकारण होईल पण…” बाळासाहेबांचे स्मरण करत संजय राऊतांचं विधान!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांचे स्मरण करत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी…

10:22 (IST) 23 Jan 2023
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर पुणे महापालिकेची दंडात्मक कारवाई; १० दिवसांत वसूल केला तब्बल…

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर आता पुणे महापालिकेने कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या १० दिवसांत अशा ३५३ जणांवर कारवाई करत साडेतीन लाख रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. या कारवाईसाठी पालिका प्रशासनाने विशेष पथक तयार केले असून ही मोहीम यापुढेही सुरू राहील, अशी माहितीही पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

10:20 (IST) 23 Jan 2023
“सोमनाथ मंदिर तोडून गझनीने कोणतीही चूक केली नाही”; ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांचं वादग्रस्त विधान

आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारे ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिरची लूट करून मोहम्मद गझनीने कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचे ते म्हणाले. एनएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा

10:19 (IST) 23 Jan 2023
“…तिथेच या हरा**** राजकीय चिता पेटेल अन् हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली”; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

Shivsena Criticized Shinde Group : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्याच घाटावर या हरा*** राजकीय चिता पेटेल आणि हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली असेल, असं शिवसेनेनं ‘सामना’त म्हटलं आहे. तसेच मुंबई दौऱ्यावरूनही पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.

सविस्तर वाचा

10:19 (IST) 23 Jan 2023
जबदरस्त डिस्प्लेसह Infinix Note 12i स्मार्टफोन ‘या’ तारखेला होणार लाँच; जाणून घ्या खासियत

Infinix स्मार्टफोनचे उत्पादन करणारी कंपनी असून, ही कंपनी लवकरच आपलं एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. Infinix Note 12i असे या स्मार्टफोनचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर

संग्रहित फोटो

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्त ठाकरे गटातर्फे राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.