Maharashtra Live News Updates: बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीकडून तपासाला वेग आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांची बँक खाती गोठविण्यात आली असून त्यांच्याशी संबंधित मालमत्तेवर जप्ती आणण्यात येत आहे. तसेच वाल्मिक कराड यांच्या जवळच्या लोकांची सीआयडीकडून चौकशी होत आहे. वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. आता हत्या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा आक्रमकपणे पाठपुरावा करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. प्राजक्ता माळी यांच्याबाबत केलेल्या विधानावर त्यांनी कालच दिलगिरी व्यक्त करून या विषयाला पूर्णविराम लावला आहे.
वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण गेल्याचा व्हिडीओ…
Marathi News Live Updates | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
नववर्ष स्वागतासाठी लोणावळ्यात पर्यटकांची झुंबड; लोणावळा, खंडाळ्यात ठिकठिकाणी कोंडी
नववर्ष स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर, तसेच लोणावळा, खंडाळ्यात ठिकठिकाणी कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
आयआरसीटीसीचे संकेतस्थळ पुन्हा बंद
मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळामध्ये मंगळवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना तिकीट काढणे कठीण झाले. गेल्या आठवड्यातही आयआरसीटीसीच्या संकेतस्थळात बिघाड झाला होता.
पुणे : हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव; सामिष खवय्यांकडून सरत्या वर्षाला निरोप
पुणे : हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून सामिष खवय्यांनी सरत्या वर्षाला निरोप दिला. मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी मंगळवारी सकाळपासून बाजारात गर्दी झाली होती. मार्गशीर्ष महिन्याची सोमवारी सांगता झाल्यानंतर खवय्यांनी रांगा लावून खरेदी केली.
रस्त्यावर नव्याने चर खोदण्यास महापालिकेची मनाई, केवळ जलवाहिन्यांच्या दुरुस्तीस परवानगी
मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे वायू गुणवत्ता स्तर खालावल्याचे निदर्शनास आले आहे. वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिकेने तातडीच्या, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेने रस्त्यावर चर खोदण्यासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले आहे.
Walmik Karad News LIVE Updates: वाल्मिक कराड पुढे येताच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी मागितले सरंक्षण
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झालेल वाल्मिक कराड अखेर आज सीआयडीसमोर शरण झाले. त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आता सरंक्षणाची मागणी केली आहे. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून गावातील लोक भयभीत आहेत. त्यामुळे आमच्यासह गावात बंदोबस्त वाढविण्यात यावा.
अधोविश्व सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या झाल्या अधिक सराईत
मुंबई : सायबर फसवणुकीत पूर्वी नायजेरीयन टोळ्याची मक्तेदारी होती. मात्र आता भारतात अनेक ठिकाणी सायबर फसवणूक करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. राजस्थान, दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या सायबर फसवणूक टोळ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर फसवणुकीसाठी कुख्यात जामताराच्या धर्तीवर देशात अनेक ठिकाणी अशा सराईत टोळ्या कार्यरत झाल्या आहेत.
Walmik Karad News LIVE Updates: वाल्मिक कराड यांचं पुढं काय होणार? CID चे अधिकारी म्हणाले…
बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर फरार आरोपी वाल्मिक कराड आज दुपारी पुणे येथील सीआयडी कार्यालयात स्वतःहून हजर झाला. वाल्मिक कराड याची चौकशी केल्यानंतर त्यांना बीडमधील CID पथकाचे अधिकारी अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्यासाठी रवाना केले गेले आहे, अशी माहिती सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी दिली.
अटक केल्यानंतर वाल्मिक कराड यास केज न्यायालयासमोर हजर करणार
अवदा कंपनीतील कर्मचाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागणारे वाल्मिक कराड यास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याला अटक करुन मंगळवारी सायंकाळपर्यंत केज येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे.
एकतर्फी प्रेमातून तरुणीसह आईवर कोयत्याने हल्ला
एकतर्फी प्रेमातून लग्नाची केलेली मागणी धुडकावल्यामुळे संतापलेल्या तरुणाने मुलीच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या आईवर कोयत्याने हल्ला केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथे हा प्रकार घडला. सविस्तर वाचा…
रत्नागिरीत मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा; महामार्गाच्या अर्धवट कामांचा पर्यटकांना मोठा फटका
रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई – गोवा महामार्गावर अर्धवट सुरु असलेल्या कामांचा फटका जिल्ह्यात येणा-या पर्यटकांना चांगलाच बसला आहे. महामार्गावरील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वहातूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने पर्यटकांना नाहक भूरदंड सहन करावा लागत आहे. सविस्तर वाचा…
नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला कडेकोट बंदोबस्त
नववर्ष स्वागतानिमित्ताने ठाणे पोलिसांनी आज, मंगळवारपासून आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी पोलिसांकडून विशेष मोहीमा राबविल्या जात आहेत. तसेच, तडीपार गुंड, फरारी आरोपी, अभिलेखावरील गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत आहेत.
नववर्षात एफएसआयसोबत तितकाच टीडीआरही घ्यावा लागणार; अंबरनाथ नगरपालिकेचा टीडीआरला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
बांधकाम परवानगी घेताना मुळ चटईक्षेत्र निर्देशांक अर्थात एफएसआय, प्रिमीयम एफएसआय आणि त्यावर अनुज्ञेय असलेला सहायक चटईक्षेत्र निर्देशांक अर्थात अँसिलरी एफएसआय वापरला जातो. अशावेळी हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टीडीआरची मागणी केली जात नाही. सविस्तर वाचा…
जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांचे शासनाला साकडे
संचालक मंडळास भत्ता देण्याची तरतूद, गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण, खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या सभासदांना आळा घालणे अशा वेगवेगळे ठराव मांडत ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांनी राज्यसरकारकडे आपल्या मागण्यांची यादी सादर केली आहे.
डोंबिवलीत गोळवली येथील महारेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर शुक्रवारी कारवाई
डोंबिवली जवळील गोळवली गावातील ६५ महारेरा प्रकरणातील एका पाच माळ्याच्या बेकायदा इमारतीवर येत्या शुक्रवारी (ता. ३) कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागाने कारवाईचे नियोजन केले आहे. सविस्तर वाचा…
नागपूर की मिर्झापूर… गृहमंत्र्याच्या शहरात वर्षभरात ९० हत्या, महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ
नागपूर : गृहमंत्र्यांचे शहर असूनही नागपुरात गुन्हेगारी शहरात झपाट्याने वाढत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ९० हत्यांच्या घटनांनी उपराजधानी हादरली आहे. गेल्या ६ दिवसांत तर तब्बल ७ हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत.
डोंबिवली, कल्याणमध्ये वृक्ष प्रदूषित रोषणाई; पालिकेच्या उद्यान विभागाकडून कारवाईचा इशारा
नववर्षानिमित्त अनेक दुकानदार, खासगी आस्थापनांनी आपल्या दुकान, आस्थापनांसमोरील झाडांवर विद्युत रोषणाई केली आहे. झाडांवर विद्युत रोषणाई करू नये, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही काही व्यावसायिक त्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी आरोपी वाल्मिक कराड यांची सीआयडी पोलिसांच्या चार तासाच्या चौकशीनंतर पुण्यातून बीडला रवाना
पुणे : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे आता पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आले आहेत.शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला.त्यानंतर पुढील काही तासात वाल्मिक कराड MH23 BG 2231 क्रमांकाच्या पांढर्या स्कॉर्पिओमधून 12 वाजून 5 मिनिटांनी सीआयडी कार्यालयात हजर झाले.या घटनेची माहीती राज्यात वार्यासारखी पसरली.त्यानंतर वाल्मिक कराड यांचे समर्थक सीआयडी कार्यालया बाहेर जमा झाले.तर त्याच दरम्यान अखंड मराठा समाजाच्या वतीने वाल्मिक कराड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.यामुळे सीआयडी कार्यालया बाहेर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.त्या दरम्यान अनेक राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.तर वाल्मिक कराड यांची तब्बल चार तासाच्या चौकशीनंतर बीड (केज) येथे घेऊन गेले आहे.या चौकशीलमधील माहीती अद्यापपर्यंत समोर आली नाही.
वाल्मिक कराड शरण येणे हे पोलिसांचे अपयश, फडणवीसांच्या मर्यादा स्पष्ट, कॉंग्रेसचा आरोप
नागपूर : खंडणीचा गुन्हा दाखल असलेला आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात हात असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडला अटक करता न येणे हे भाजपा सरकारचे अपयश आहे. या घटनेमुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून कायदा-सुव्यवस्था राखण्यात ते अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.
“माझ्या वाटेला जाऊ नका…”, भाजप आमदार प्रवीण तायडेंचा बच्चू कडूंना इशारा, भाषणात शिवीगाळ..
अचलपूरचे भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख व माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केल्याने प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. प्रवीण तायडे यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लुटीचे शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेला आरोपी अटकेत
मुंबई : रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत आरोपीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. या आरोपी विरोधात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये शंभरहून अधिक गुन्हे दाखल असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सविस्तर वाचा...
पुणे : कुंभमेळ्यासाठी पुण्यातून विशेष रेल्वे
पुणे : उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त रेल्वे विभागाच्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) ‘भारत गौरव’ या विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील भाविकांसाठी १५ जानेवारी रोजी पुणे स्थानकावरून रात्री दहा वाजता ही विशेष रेल्वे उत्तर प्रदेशकडे रवाना होणार आहे.
रेल्वे स्थानकात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात एक वर्षांची बालिका बेवारस अवस्थेत सापडली. बालिकेला बेवारस अवस्थेत सोडून पसार झाल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पिंपरी : तळेगाव एमआयडीसीमधून तीन बांगलादेशींना अटक
पिंपरी : तळेगाव एमआयडीसी परिसरातून तीन बांगलादेशी नागरिकांना भारतात अवैधरित्या वास्तव्य केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (३० डिसेंबर) नवलाख उंब्रे येथे करण्यात आली.
वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यात चंदन चोरी, तीन झाडे कापून नेल्याचे उघड
पुणे : वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या बंगल्यातून चंदनाची तीन झाडे कापून नेल्याची घटना उघडकीस आली. पसार झालेल्या चंदन चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.
कात्रज घाटात पिस्तुलातून गोळी झाडून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे : कर्जबाजारी झाल्याने तरुणाने पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Marathi News Live Updates : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज ज्यांच्यावर विरोधक आरोप करत होते, त्या वाल्मिक कराड यांनी पुणे सीआयडीसमोर शरण आले आहेत. त्यानंतर या प्रकणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलत असताना फडणवीस म्हणाले, "संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीवर कडक कारवाई करण्यात येईल, हे मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलो आहे. कुणालाही अशाप्रकारची हिंसा करण्याचा अधिकार नाही. सर्व दोषी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत, तोपर्यंतची सर्व कारवाई पोलीस करतील." तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सध्या आम्ही आरोपींना शिक्षा देण्यावर लक्ष केंद्रीत केले असून राजकीय विषयावर बोलणार नाही.
एटीएम कापून पळविण्याचा प्रयत्न, रिक्षाचालकाची सतर्कता
नाशिक : नाशिकरोड परिसरातील सिन्नर फाटा येथे एका इमारतीच्या गाळ्यात असलेले इंडिया नंबर वन बँकेचे एटीएम यंत्र मंगळवारी पहाटे कटरच्या सहाय्याने कापून वाहनातून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. रिक्षाचालकाच्या सर्तकतेमुळे हा प्रयत्न फसला.
टंकलेखन परीक्षेत गैरप्रकार, बनावट विद्यार्थ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा
नाशिक : पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेली मराठी टंकलेखन परीक्षा बनावट विद्यार्थ्याने दिल्याचे उघड झाले आहे. यात टंकलेखन (टायपिंग) संस्था चालकाने मदत केल्याचा संशय आहे.
सोने-चांदीच्या दरात घसरण… सरत्या वर्षात…
नागपूर: नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी (३१ डिसेंबर २०२४ रोजी) सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. लग्न सराईच्या काळात दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यवतमाळ : आरपीआय जिल्हाध्यक्षाचा शासकीय कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न; प्रशासकीय वर्तुळात खळबळ
यवतमाळ : येथील प्रशासकिय इमारतीत असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या कक्षात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने कांत्राटाचे बिल मिळत नसल्याने विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला.