Maharashtra Live News Updates: बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता सीआयडीकडून तपासाला वेग आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांची बँक खाती गोठविण्यात आली असून त्यांच्याशी संबंधित मालमत्तेवर जप्ती आणण्यात येत आहे. तसेच वाल्मिक कराड यांच्या जवळच्या लोकांची सीआयडीकडून चौकशी होत आहे. वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. आता हत्या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा आक्रमकपणे पाठपुरावा करणारे भाजपाचे आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. प्राजक्ता माळी यांच्याबाबत केलेल्या विधानावर त्यांनी कालच दिलगिरी व्यक्त करून या विषयाला पूर्णविराम लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण गेल्याचा व्हिडीओ…

Live Updates

Marathi News Live Updates | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

14:18 (IST) 31 Dec 2024

मालमत्ता कर संकलनात २०० कोटींचा टप्पा पार, नाशिक महापालिकेची ऐतिहासिक वसुली

नाशिक :महापालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आजवरच्या इतिहासात नऊ महिन्यांत इतकी वसुली कधीही झालेली नाही. थकीत घरपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेतून ५० कोटींची वसुली झाली.

सविस्तर वाचा…

13:55 (IST) 31 Dec 2024

जळगाव जिल्ह्यात नववर्ष स्वागतासाठी भरीत पार्ट्यांची धूम

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि जळगाव तालुक्यातून होणारी भरीताच्या वांग्यांची आवक पोषक हवामानामुळे वाढली आहे. या वांग्यांना किरकोळ बाजारात सध्या २० ते २५ रुपये किलोचा दर मिळत असून, ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.

सविस्तर वाचा…

13:55 (IST) 31 Dec 2024

Walmik Karad Arrest News: धनंजय मुंडे यांना भेटल्यावर वाल्मिक कराड शरण? सुरेश धस म्हणाले…

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर २१ दिवसांनी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हे सीआयडी पोलिसांना शरण आले आहेत. यानंतर पत्रकारांशी बोलत असताना सुरेश धस यांनी आपली भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर कराड शरण आले का? असा प्रश्न विचारला असता सुरेश धस म्हणाले की, याबद्दल धनंजय मुंडेच उत्तर देऊ शकतील. तसेच त्यांच्या मंत्रिपदाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारच घेऊ शकतील.

13:54 (IST) 31 Dec 2024

मुजोर रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी, बेस्ट बसलाही अडथळा ठरत असल्याने कारवाईची मागणी

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानक पूर्व परिसरात काही मुजोर रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असून यामुळे बेस्ट बसला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आशा मुजोर रिक्षाचालकांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सविस्तर वाचा…

13:53 (IST) 31 Dec 2024

व्यावसायिक डीमॅट खात्याच्या नावाखाली ५२ लाखांची सायबर फसवणूक

मुंबई : शेअर्स खरेदी -विक्री व्यावहारातून नफा मिळवण्यासाठी व्यावसायिक डीमॅट खाते उघडण्यास सांगून गोरेगावमधील रहिवाशाची ५२ लाख ५० हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मागे सराईत टोळीचा हात असल्याचा संशय असून बँक व्यवहारांच्या माध्यमातून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे.

सविस्तर वाचा…

13:37 (IST) 31 Dec 2024

गोंदिया : रेल्वेचे नवे वेळापत्रक, १ जानेवारीपासून काय बदल होणार?

गोंदिया : मुंबई – हावडा लोहमार्गवरील काही गाड्यांचे वेळापत्रक १ जानेवारी २०२५ पासून रेल्वेच्या वेळापत्रकात आंशिक बदल करण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा….

13:24 (IST) 31 Dec 2024

“तुमचा भाऊ असता तर?”, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेवरून जरांगेचा सरकारला सवाल

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत. संतोष देशमुख हा जर तुमचा भाऊ असतात तरी अशीच भूमिका घेतली असती का? असा थेट सवाल जरांगेंनी सरकारला विचारला आहे.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 31 Dec 2024

Walmik Karad News Update: “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, अन्यथा…”, मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमधील एकही आरोपी सुटता कामा नये. तसेच आरोपींना मदत करणारे जे लोक आहेत, त्यांच्यावरही कारवाई व्हावी, अशी मागमी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जर एक जरी आरोपी सुटला तर आम्ही राज्यभरात आंदोलन सुरू करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत केला आहे.

13:05 (IST) 31 Dec 2024

चंद्रपूरमध्ये ९१ टक्के नागरिकांचा ‘ईव्हीएम’ऐवजी ‘बॅलेट’ला कौल; नेमकं झालं काय?

नागपूर : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम आणि बॅलेटचा वाद सुरू झाला आहे. विरोधकांनी भाजपाचा विजय हा ईव्हीएममुळे झाल्याचा आरोप केला आहे, तर भाजपने हा संपूर्ण आरोप खोडून काढत ‘लाडकी बहीण योजना’ आणि जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचा विजय असल्याचे सांगितले आहे.

सविस्तर वाचा….

12:57 (IST) 31 Dec 2024

निवडणुकांतील कामगिरीचे श्रेणीकरण; भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

चंद्रपूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकांत प्रचारात सक्रिय भाजपच्या १९६ गाभा समितीच्या (कोअर कमिटी) सदस्यांचे शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ असे श्रेणीकरण (ग्रेडेशन) केले आहे. ‘ए’ म्हणजे उत्कृष्ट, ‘बी’ म्हणजे कमकुवत आणि ‘सी’ म्हणजे सर्वांत कमकुवत बुथ संरचणा, अशा पद्धतीचे हे श्रेणीकरण आहे.

सविस्तर वाचा….

12:56 (IST) 31 Dec 2024

वसईत व्याजाने कर्ज देणारी सावकारी टोळी सक्रीय, ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

वसई : बेकायदेशीरपणे व्याजाने कर्जे देऊन आर्थिक पिळवणूक करणारी सावकारी टोळी वसईत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह ५ जणांविरोधात सावकारी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. ही टोळी प्रामुख्याने रिक्षाचालकांना कर्जे देऊन त्यांचे आर्थिक शोषण करत होती.

वाचा सविस्तर..

12:55 (IST) 31 Dec 2024

पारसी कॉलनी जिमखान्यातील लग्न समारंभांमुळे रहिवासी त्रस्त

मुंबई : वडाळ्यातील पारसी कॉलनी जिमखान्यात वारंवार होणारे विवाह समारंभ, मनोरंजनपर आणि व्यावसायिक कार्यक्रम यामुळे या परिसरातील रहिवाशांना वर्षभर अनेक गैरसोयींनी, ध्वनिप्रदूषणाला सामोरे जावे लागते आहे.

वाचा सविस्तर…

12:41 (IST) 31 Dec 2024
उरण : बाह्यवळणचा ‘मार्ग मोकळा’, उरण बायपास मार्ग नव्या वर्षात कार्यान्वित होण्याची शक्यता

उरण : शहरातील वाहतूक कोंडीवर महत्वपूर्ण उतारा असलेल्या उरण बाह्यवळण (बायपास) मार्ग येत्या २०२५ मध्ये पूर्णत्वास जाण्याची आशा निर्माण झाली आहे. यातील नगरपरिषद हद्दीतील जमिनीचे भूसंपादनाचा अथडळाही लवकरच दूर होईल असा विश्वास उरण नगर पालिकेने व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा….

12:37 (IST) 31 Dec 2024

Walmik Karad Arrest News: वाल्मिक कराड पोलिसांना शरण; स्वतः व्हिडीओ प्रसिद्ध करत म्हणाले, “राजकीय द्वेषापोटी..”

वाल्मिक कराड यांनी पुणे येथे सीआयडी कार्यालयात शरण येण्यापूर्वी स्वतःचा व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सविस्तर वृत्त वाचा

https://twitter.com/LoksattaLive/status/1873988601878618186

12:11 (IST) 31 Dec 2024

नागरिकांनी पकडलेल्या चोराची केली ‘सुटका’, आचोळे पोलिसांचा ‘अजब’ कारभार

वसई : मोबाईल चोरणार्‍या एका महिलेला रंगेहाथ पकडून दिल्यानंतरही आचोळे पोलिसांनी गुन्हा दाखल न करता तिला सोडून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दुसर्‍या दिवशी गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर…

12:11 (IST) 31 Dec 2024

Walmik Karad Arrest News: मोठी बातमी! वाल्मिक कराड पोलिसांना शरण

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड हे अखेर २२ दिवसांनंतर पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आलेले आहेत.

11:23 (IST) 31 Dec 2024

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दुरवस्थेचे ‘अंक’!

पुणे : उद्योग, कामगारनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ रुजावी, वाढावी यासाठी महापालिकेने पाच नाट्यगृहे उभारली आहेत. त्यांपैकी भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह एप्रिल महिन्यापर्यंत विविध कार्यक्रमांसाठी आरक्षित झाले आहे. मात्र, असे असतानाही महापालिकेने नाट्यगृहाकडे दुर्लक्ष केल्याने नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे.

वाचा सविस्तर…

11:22 (IST) 31 Dec 2024

सार्वजनिक बांधकामचे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण करणार – शिवेंद्रसिंहराजे

सातारा : जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या प्रकल्पांना निधी देण्यात येईल. तसेच प्रकल्प गतीने पूर्ण करण्यात येतील, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

पुसेगाव येथील गर्दी पाहता अंतर्गत रस्ता, बाह्य रिंग रस्ता तयार करून वाहतूककोंडीवर मार्ग काढण्यात येईल, असे सांगून सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले म्हणाले, ‘या रस्त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य मिळावे. असे सहकार्य लाभल्यास कामे गतीने होतात. उरमोडी धरण सातारा तालुक्यात आहे. त्याचे पाणी आज दुष्काळी माण-खटाव तालुक्यात जात आहे. त्यामुळे येथील ऊस शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

11:21 (IST) 31 Dec 2024

शरद पवारांकडून पाडण्याची भाषा अशोभनीय – उदयनराजे

सातारा : राजकारणात शरद पवार यांच्या पाठीशी कायमच लक्ष्मणराव पाटील यांनी उभे राहून त्यांची पाठराखण केली. तरीदेखील विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघात येऊन शरद पवार यांनी मकरंद पाटील यांना पाडण्याची केलेली भाषा अशोभनीय आहे. त्यांच्या स्वतःच्या जोरावरच चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याचे आज खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले. महायुतीने चार कॅबिनेट मंत्री दिल्याने जिल्ह्याला न्याय मिळाला असून, मंत्रिपदाच्या माध्यमातून ते लोकांची सेवा करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

11:21 (IST) 31 Dec 2024

पिंपरी : मद्यपान करून वाहन चालवाल तर…; पोलिसांनी दिला गंभीर इशारा

पिंपरी : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३१ डिसेंबरला रात्रीपासून ते एक जानेवारीला पहाटेपर्यंत १८१९ पोलीस असणार आहेत.

वाचा सविस्तर…

11:20 (IST) 31 Dec 2024

पुणेकरांसाठी नवे वर्ष कोंडीमुक्त! पोलीस आयुक्तांचा संकल्प; वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ‘रडार बेस टेक्नोलॉजी’चा वापर

पुणे : वाहतूककोंडीने श्वास कोंडलेल्या पुणेकरांसाठी नवे वर्ष हे कोंडीमुक्त असणार आहे. त्यासाठी पोलिसांनी पावले उचलली असून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन वर्षात वाहतूककोंडी सोडविण्यावर भर देण्याचा संकल्प केला आहे.

वाचा सविस्तर…

11:20 (IST) 31 Dec 2024

…तर नववर्षाची रात्र कोठडीत, मद्यपी वाहनचालकांना पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे : नववर्षाचे स्वागत करताना नागरिक, तसेच पब, हॉटेल, तसेच मद्यालयाच्या चालकांनी नियमांचे पालन करावे. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध खटला दाखल केला जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

वाचा सविस्तर…

11:18 (IST) 31 Dec 2024

Marathi News Live Updates: “वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, पण..”, जितेंद्र आव्हाड यांची खळबळजनक पोस्ट

“आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये”, अशी खळबळजनक पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

10:43 (IST) 31 Dec 2024

Marathi News Live Updates: ‘धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या’, संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत २१ दिवस उलटूनही मुख्य आरोपी पकडले गेलेले नाहीत. यानंतर आता संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून दूर करण्याची मागणी केली आहे. वकील शोमितकुमार सोळंके यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वाल्मिक कराड यांच्यावर कलम ३०२ आणि मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि धनंजय मुंडे यांना तपास होईपर्यंत मंत्रिपदापासून दूर करा, अशी मागमी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

अजित पवारांचे सूचक मौन, देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सर्वपक्षीय टीका (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)