Maharashtra : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी महाराष्ट्रभर वादळ उठलं आहे. य प्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे स्नेही असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे वाल्मिक कराडला अटक झाल्यास धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे हे मंत्रिपदी असल्याने याप्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही, त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जाते. तसंच, भाजपा आमदार सुरेश धस यांनी याप्रकरणात काही अभिनेत्रींची नावे घेतली. पैकी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांच्यावर संताप व्यक्त केला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी जाणून घेऊयात.
Marathi News Live Updates : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
ज्यांना आवश्यकता नाही त्यांना बंदुकीचे परवाने मिळणार नाहीत-पोलीस अधीक्षक
बीडमध्ये शस्त्र परवाना देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असते. पोलीस त्याबाबत पडताळा करत असतात. आम्ही ज्यांची आवश्यकता नाही त्याचा नकारात्मक अहवाल पाठवत असतो यापुढेही पाठवू असं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी ही माहिती दिली.
बीड जिल्ह्यात वरिष्ठांच्या मार्दर्शनाखाली आमचा एकच उद्देश आहे की बेकायदेशीर धंदे नियंत्रणात आणू, नियम आणि शासन आणू. बेकायदेशीर रित्या जे शस्त्रं वापरत आहेत, त्याबाबत आम्ही सोशल मीडियाद्वारेही नोटीस जारी केली होती. दहशत पसरवणारे व्हिडीओ किंवा फोटो हे सोशल मीडियावर जर व्हायरल झाले तर त्याविरोधात गुन्हा दाखल होईल. तीन ते चार गुन्हे आपण दाखल केले आहेत. असंही कॉवत यांनी म्हटलं आहे. सामाजिक तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्यानंतरही गुन्हा दाखल होईल असंही कॉवत यांनी स्पष्ट केलं.
अंजली दमानियांनी जी माहिती आम्हाला दिली त्याची आम्ही सखोल चौकशी केली. त्यानंतर हे निष्पन्न झालं की एका माणसाने दारु पिऊन अंजली दमानियांना तो मेसेज केला होता. जे लोकेशन आम्हाला त्यांनी सांगितलं तिथे आम्ही विचारणा केली आहे.
Maharashtra Live Blog : "अंजली दमानिया यांना आलेला व्हॉईस मेसेज दारूच्या नशेत"; बीडच्या पोलीस अधिक्षकांची माहिती
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केला होता. यासंदर्भातील व्हॉईस मेसेज त्यांनी पोलिसांना पाठवला होता. या व्हॉईस मेसेजची पोलिसांनी तपासणी केली असून हा मेसेज दारूच्या नशेत पाठवला असल्याचं पोलिसांना समजलं आहे. याप्रकरणी आज बीडचे पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी माहिती दिली.
जेजुरीतील सोमवती यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोचा अपघात; अपघातात दोघांचा मृत्यू, १३ भाविक जखमी
आंबेगाव तालुक्यातून सोमवारी यात्रेनिमित्त जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला समोरुन येणाऱ्या टेम्पोने घडक दिल्याची घटना सासवड रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री घडली. अपघातात टेम्पोतील दोन भाविकांचा मृत्यू झाला, तसेच १३ जण जखमी झाले.
मुंबई : रे रोडमध्ये जलवाहिनी फुटली, शिवडी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम
मुंबई : हार्बर मार्गावरील रे रोड येथील उड्डाणपुलाजवळ जलवाहिनी फुटली असून पुलाजवळ पाणीच पाणी साचले आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे शिवडी परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. त्यामुळे या भागाला संध्याकाळी पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
एमएचटी-सीईटीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये होणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. सविस्तर वाचा…
मद्यपी रिक्षाचालकाचा बेदरकारपणा प्रवाशाच्या जीवावर; रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू
मद्यपी रिक्षाचालकाचा बेदरकारपणा प्रवाशाच्या जीवावर बेतला. नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसजवळ विरुद्ध दिशेने निघालेल्या मद्यपी रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सविस्तर वाचा…
प्रवाशांची आर्थिक कोंडी, खासगी वाहतूकदारांकडून बसभाड्यात वाढ
मुंबई : सरत्या वर्षाचा निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांनी कोकण, गोव्याची वाट धरली. त्यामुळे मुंबईहून कोकण, गोव्याला जाणाऱ्या खासगी प्रवासी वाहतुकीचे बसभाडे गगनाला भिडले आहेत.
प्रयोगशाळेपासून मैदान, सर्वांचीच वानवा; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या मागण्या
शाळेत अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय पाहिजे...खेळण्यासाठी मैदान नाही...शाळांच्या वेळेत बदल करावा...पोहणे शिकविण्यासाठी शासकीय प्रशिक्षक द्यावा, कुस्तीसाठी शाळेत आखाडा तयार करावा, असे एक ना अनेक मूलभूत प्रश्न आणि मागण्या करुन विद्यार्थ्यांनी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना भंडावून सोडले. सविस्तर वाचा…
धुळ्यात चोरीस गेलेल्या २६ तोळे सोन्याचा मध्य प्रदेशातील जंगलात शोध
धुळे शहरातील हॉटेल कृष्णा रिसोर्ट येथील लग्न समारंभात चोरीस गेलेले २६ तोळे सोने राजगढ (मध्य प्रदेश) येथील जंगलात तब्बल नऊ दिवस तळ ठोकून झोपडीवजा घरातून हस्तगत केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आश्चर्य म्हणजे ज्यांच्याकडे १५ लाख ९० हजाराचे सोने मिळाले, ते पोलिसांना सापडले नाहीत. सविस्तर वाचा…
आरटीईअंतर्गत शाळा नोंदणी सुरू… विद्यार्थी नोंदणी कधीपासून?
शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत सुमारे २३०० शाळांनी नोंदणी केली असून, विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. सविस्तर वाचा…
पुणे : भोंदूकडून महिलेवर बलात्कार, बिबवेवाडी पोलिसांकडून गुन्हा दाखल
दैवीशक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करुन एका भोंदूने महिलेवर चाकुच्या धाकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी भोंदूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पिंपरी : महापालिकेची मोठी कारवाई; थकबाकी असलेल्या १२८ मालमत्ता 'सील', पुढील...
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसात तब्बल १२८ लाखबंद (सील) केल्या आहेत. लाखबंदची कारवाई सात जानेवारी पर्यंत केली जाणार आहे. सविस्तर वाचा…
भुसावळ-दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ; पश्चिम रेल्वे प्रशासनाचा निर्णय
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांवर धडक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसात तब्बल १२८ लाखबंद (सील) केल्या आहेत. लाखबंदची कारवाई सात जानेवारी पर्यंत केली जाणार आहे. सविस्तर वाचा…
दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यास अटक
मुंबई : सांताक्रुझ येथे पाच व सहा वर्षांच्या लहान मुलींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या ३५ वर्षीय फेरीवाल्याला पोलिसांनी शनिवारी अटक केली. आरोपीविरोधात विनयभंग व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण(पोक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार केली होती. आरोपीने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर त्यांनी शनिवारी याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून मानखुर्द येथून अटक केली.
Maharashtra Live News : "देवाच्या काठीला आवाज नाही, तसंच देवाभाऊच्या काठीलाही आवाज नाही", सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले?
बीडमध्ये अमानुष पद्धतीने सरपंचाचा खून करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मने सुन्न झाली आहेत. देवाच्या काठीला आवाज नसतो. त्याप्रमाणेच राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. त्यांच्याही काठीला आवाज नाही. पण न्याय निवाडा निश्चित होणार आहे. ज्या दिवशी आरोपी पकडले जातील त्यांना या मांडवाखालून जावंच लागेल. ही केस फास्ट टॅग कोर्टात चालवावी - सदाभाऊ खोत
मुंबई : मालाड येथे १० वर्षांच्या मुलाची आत्महत्या
मुंबई : मालाड पश्चिमेतील मालवणी येथील धार्मिक शैक्षणिक संस्थेत शनिवारी रात्री १० वर्षीय मुलाने आत्महत्या केली. कारण स्पष्ट झाले नसल्याचे मालवणी पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी कोणतीही घातपाताची शक्यता नसून मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
खासदार रवींद्र वायकर यांच्या मोटरगाडीला अपघात
मुंबई : खासदार रवींद्र वायकर यांच्या मोटरगाडीला गोरेगाव परिसरात रविवारी रात्री अपघात झाला. वायकर यांचा चालक मोटरगाडी चालवत होता. अपघात किरकोळ स्वरूपाचा असून त्यात कोणीही जखमी झालेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा सज्ज, गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क
लोणावळा : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. हुल्लडबाज पर्यटकांवर आणि नियमांचं पालन न करणाऱ्या टवाळखोरांवर लोणावळा पोलिसांची करडी नजर असणार आहे.
सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे : ठाणे शहराच्या जडण-घडणीत सतीश प्रधान यांचे मोठे योगदान आणि सहकार्य होते. त्यांनी नगराध्यक्ष असो वा महापौर जी पदे मिळाली. त्या पदांचा उपयोग ठाणे शहराच्या विकासासाठी केला. सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
मुंबई नाशिक महामार्गावर कारला आग, महामार्गावर वाहतुक कोंडी
ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील दिवे अंजूर भागात सोमवारी सकाळी एका कारला अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात वाहतुक कोंडी झाली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या मार्गावर खारेगाव टोलनाका ते मानकोली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोंडी सोडविण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला कल्याण, डोंबिवलीत १७० तळीरामांवर कारवाई
कल्याण : नववर्षाचा आनंद साजरा करत असताना कल्याण, डोंबिवली शहरांच्या विविध भागात मोकळ्या जागांवर मद्य, अंमली पदार्थ सेवन करणारे, ढाब्यामध्ये मद्य विक्रीची परवानगी नसताना मद्य विक्री करून ग्राहकांची गर्दी जमवणे, सार्वजनिक रस्त्यांवर झाडांचा आडोसा घेऊन मद्य सेवनासाठी रात्री उशिरापर्यंत बसणे, अशा सुमारे १७० तळीरामांवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशावरून स्थानिक पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई केली आहे.
जळगाव औद्योगिक वसाहतीत चटई कारखान्याला आग
जळगाव : शहरातील औद्योगिक वसाहतीत डी सेक्टरमधील सिद्धिविनायक चटई कारखान्याला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत लाखो रुपयांचा प्लास्टिक दाण्यांचा कच्चा माल तसेच विक्रीसाठी तयार चटईचा साठा खाक झाला. आतमध्ये काम करणारे सर्व कामगार प्रसंगावधान राखून लगेच बाहेर पडल्याने दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
नववर्षातील तुमचे राशिभविष्य कसे असेल? विवाह मुहूर्त आणि बरेच काही जाणून घ्या आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्यकडून
नागपूर: नवीन वर्ष २०२५ सुरू व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत. नवीन वर्षात अनेक मोठ्या ग्रहांचा राशी बदल होत आहे, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल. त्यामुळे अनेक राशींसाठी नवीन वर्ष महत्त्वाचे आणि खास ठरणार आहे.
मुंबई : कारवाई केल्याच्या रागातून पोलिसावर हल्ला
मुंबई : कारवाई केल्याच्या रागातून कुर्ला येथे पोलीस हवालदाराला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपी अब्बास हबीब मर्चंट (३७) विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार अविनाश जाधव हे कुर्ला पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत.
मुंबई : देवनारमध्ये कचऱ्यापासून दुप्पट वीजनिर्मिती
मुंबई : देवनारमध्ये कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली आहे. मूळ कंत्राटात कचऱ्यापासून प्रतिदिन ४ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येणार होती. मात्र त्याच कंत्राटांतर्गत आता प्रतिदिन ७ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात येईल. हा प्रकल्प पुढीलवर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
३ जानेवारीला पृथ्वी ते सूर्याचे अंतर राहणार सर्वांत कमी !
अमरावती : सूर्याभोवती पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरते. यादरम्यान पृथ्वी कधी सूर्यापासून लांब, तर कधी जवळ असते. ३ जानेवारीला सूर्यापासून पृथ्वीचे अंतर सर्वांत कमी १४.७१ कोटी किमी राहील. नेहमी हे अंतर १५ कोटी किमी राहते. या जवळिकीचा जीवसृष्टीवर परिणाम होणार नाही. ही एक खगोलीय घटना असल्याचे खगोलतज्ज्ञांनी सांगितले.
मुंबई : शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून एकाची हत्या, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक
मुंबई : शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने शिवाजी पार्क पोलिसांनी मनोज अमित सहारे ऊर्फ मन्या (३०) या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फसवणुकीत द्राक्ष व्यापाऱ्यांना मदत करणारेही गुन्हेगार, पोलिसांची गुन्हे दाखल करण्याची तयारी
नाशिक : द्राक्ष खरेदीत यापूर्वी व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या प्रकरणात नवीन गुन्हे दाखल करून त्यामध्ये फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांबरोबर त्यांना मदत करणारे स्थानिक लोक, दलाल व वाहतूकदारांनाही आरोपी करण्याची तयारी नाशिक ग्रामीण पोलिसांनी केली आहे.
राज्यातील हवामानात येत्या २४ तासात मोठे बदल
नागपूर : राज्यातील हवामानात आजपासून पुन्हा एकदा बदल होणार आहेत. गेल्या आठवड्यात डोकावलेला अवकाळी पाऊस आता जवळजवळ परतला असून थंडी पुन्हा परत येणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
नागपूरमध्ये मध्यरात्रीनंतर थरार, पैशाच्या वादातून भाच्यांचा खून
नागपूर : पैशाच्या वादातून मामानेच आपल्या दोन्ही भाच्यांचा चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात एका भाच्याचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर दुसऱ्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास मृत्यू झाला.
Marathi News : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा