Maharashtra News Updates : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाले असून, मंत्रिमंडळाचा विस्तार व मंत्र्यांना खातेवाटपही झाले आहे. अशात बीडमधील सरपंच आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूने राज्य हादरले आहे. दरम्यान या प्रकरणी राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीला येत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.

दुसरीकडे महायुतीमधील अनेक नेते मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) छगन भुजबळ यांनी तर उघड नाराजी व्यक्त केली आहे. अशात त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यासह, महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा पाहुयात.

Live Updates

Marathi News Live Updates | नीलकमल बोट दुर्घटनेतील प्रवाशांना वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा उद्धव ठाकरेंकडून सत्कार

20:20 (IST) 24 Dec 2024

खेडमधील बाजारपेठेत कडकडीत बंद; गोवंश हत्या प्रकरण

खेड: तालुक्यातील देवणे पूल परिसरातील नारिंगी नदीपात्रात गोवंशाचे अवशेष आढळल्यानंतर मंगळवारी खेडमधील हिंदू बांधवांनी बाजारपेठ बंद ठेवून निषेध व्यक्त केला. सकाळी तीनबत्ती नाका येथून मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते; परंतु सोमवारी सायंकाळी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून या घटनेशी निगडित असलेल्या तीन संशयितांना अटक केली. त्यामुळे हा मोर्चा रद्द केला.

19:39 (IST) 24 Dec 2024

नाताळच्या पूर्वसंध्येला बिशप डिसोजा यांचे आवाहन, आशेचे यात्रेकरू बनून द्वेष नाहिसा करू

वसई- प्रभू देव असून मानव झाला आणि नम्र झाला. आपण देखील वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर नम्रतेने वागायला हवे. एकमेकांप्रती निर्माण होत असलेली कटूता दूर करण्यासाठी माणसाने स्वार्थीपणाचा विचार सोडून व्यापक विचार करायला हवा, असे आवाहन वसई धर्मप्रांताचे बिशप रेव्ह, फादर थॉमस डिसोजा यांनी केले आहे. नाताळाच्या पूर्वसंध्येला बिशप डिसोजा यांनी वसईकरांना नाताळच्या शुभेच्छा देतांना शांतता प्रस्थापित व्हावी अशी प्रार्थना केली.

17:32 (IST) 24 Dec 2024

गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा

नागपूर - चंद्रपूर आणि नागपूर - वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपूल खचला आहे.

सविस्तर वाचा...

17:31 (IST) 24 Dec 2024

माजी वनमंत्र्यांच्या जिल्ह्यातील जंगल घटले

नुकतीच वन सर्वेक्षण विभागाने २०२३ ची भारतातील वनांचे प्रमाण आणि स्थिती दर्शविणारी आकडेवारी जाहीर केली.

सविस्तर वाचा...

17:31 (IST) 24 Dec 2024

राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४३१ जागांसाठी नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही शेवटची वस्तूनिष्ठ परीक्षा नुकतीच घेण्यात आली.

सविस्तर वाचा...

17:30 (IST) 24 Dec 2024

महिला आयोगाकडे सर्वाधिक तक्रारी वैवाहिक समस्यांबाबत, बलात्काराच्या तक्रारींचाही समावेश

माहिती अधिकारातून हा तपशील समोर आला असून त्यात आणखी धक्कादायक पुढे आलेल्या माहितीबाबत आपण जाणून घेऊ या.

सविस्तर वाचा...

16:16 (IST) 24 Dec 2024

गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा

नागपूर - चंद्रपूर आणि नागपूर - वर्धा मार्गाला जोडणारा आणि पुढे हैदराबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील बुटीबोरी येथील उड्डाणपूल खचला आहे.

सविस्तर वाचा...

16:08 (IST) 24 Dec 2024

वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप

घरांचा दर्जा, अपुऱ्या सोयी-सुविधा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे या प्रकल्पातील हजारो सदनिका विक्रीविना रिक्त पडून आहेत.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 24 Dec 2024

पालकमंत्री पदाचा वाद, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती; तर बीडच्या घटनेवर म्हणाले…

महायुती सरकारचे खातेवाटप झाले असले तरी जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री असा मार्ग मुख्यमंत्र्यांनी काढल्याची चर्चा आहे.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 24 Dec 2024

ज्येष्ठ महिला चोरट्यांचे ‘लक्ष्य’ पर्वती, लोकमान्यनगर भागात दागिने चोरीच्या घटना

पुणे : पादचारी महिलांकडील दागिने, तसेच मोबाइल संच चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी नवी लोकमान्यनगर, तसेच पर्वती भागात पादचारी महिलांकडील दागिने चाेरुन नेल्याच्या घटना घडल्या.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 24 Dec 2024

सोन्याच्या दरात २४ तासांत घसरण… चांदीने मात्र…

सोन्याच्या दरात चढ- उताराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. सोन्याच्या दरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (२३ डिसेंबर २०२४) वाढ झाली होती.

सविस्तर वाचा...

16:04 (IST) 24 Dec 2024

लाडकी बहिण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट…

लाडकी बहिण योजनेसंदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची अपडेट दिली आहे. याबाबतची घोषणा त्यांनी याज रायगड जिल्ह्यात केली. विधानसभा निवडणूकीनंतर योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाची रक्कम पुन्हा जमा होण्यास आज पासून सुरुवात झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 24 Dec 2024

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार, येरवड्यातील घटना

पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एकावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

14:38 (IST) 24 Dec 2024

ठाणे : नागरिकांच्या जीवाशी खेळ, गाई-म्हैशींच्या दूधाचे प्रमाण वाढविण्यासाठी संप्रेरकांचा वापर

ठाणे : भिवंडीतील अवैधरित्या संप्रेरकांचा (हार्मोन) वापर गाई-म्हैशींच्या दूधाचे उत्पादन वाढविण्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारच्या दूधाचे सेवन केल्यास दृष्टिहीनता, गर्भपात, त्वचेचे आजार अशा गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर वाचा....

14:37 (IST) 24 Dec 2024

मुंबई : इमारतींचा पुनर्विकास पुन्हा लांबणीवर, निविदा प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई : शीव कोळीवाडा, जीटीबीनगरमधील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींच्या पुनर्विकासासाठीच्या तांत्रिक-आर्थिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून येत्या काही दिवसांतच निविदा अंतिम करण्यात येणार होती. मात्र आता ही प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निविदा प्रक्रियेस स्थगिती दिली आहे.

सविस्तर वाचा....

14:37 (IST) 24 Dec 2024

प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेची नवीन नियमावली, पालन न करणाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबईतील हवेचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत असून प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे, महापालिकेच्या घनकचरा विभागाने प्रदूषण नियंत्रणासाठी यावर्षी नव्याने नियमावली तयार केली असून त्यात विकासकामांमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण रोखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा....

14:36 (IST) 24 Dec 2024

मुंबई : रस्त्यावरील १० हजार खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा, स्वच्छतेचे धडे

मुंबई : शहरातील सुमारे १० हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

14:35 (IST) 24 Dec 2024

अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि बोमन इराणी यांनी श्याम बेनेगल यांचे अंत्यदर्शन घेतले.

अभिनेते नसीरुद्दीन शहा आणि बोमन इराणी यांनी श्याम बेनेगल यांचे अंत्यदर्शन घेतले.

14:35 (IST) 24 Dec 2024

श्याम बेनेगल यांचे आशिष शेलार यांनी अंत्यदर्शन घेतले

प्रयोगशील दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे दादर स्मशानभूमीत भाजपचे आमदार व मंत्री आशिष शेलार यांनी अंत्यदर्शन घेतले .

14:20 (IST) 24 Dec 2024

कुंभमेळ्याला जायचेयं? भाविकांसाठी रेल्वे आली धावून…

अकोला : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कुंभमेळा होणार आहे. शाही स्नानांचे महत्त्वपूर्ण दिवस पौष पौर्णिमा, मकर संक्रांती, मौनी अमावस्या, वसंत पंचमी आणि महाशिवरात्री हे आहेत. या कुंभमेळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीव कुंभमेळ्याला जाण्यासाठी इच्छुक असलेल्या पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांसाठी आता रेल्वे धावून आली आहे.

सविस्तर वाचा...

13:23 (IST) 24 Dec 2024

'ग्रासलँड सफारी'द्वारे पुणेकरांना वन्यजीवांचे दर्शन, वनविभागाच्या उत्पन्नात भर

पुणे : पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात वनविभागाच्या वतीने राज्यात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या 'ग्रासलँड सफारी' उपक्रमाला पुणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमातून स्थानील ग्रामस्थांना कमाई झाली असून वनविभागाच्या उत्पन्नात भर पडली आहे.

सविस्तर वाचा...

12:47 (IST) 24 Dec 2024

परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर, गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी विद्यार्थ्यांची निवड

पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील ४४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

12:40 (IST) 24 Dec 2024

शहरबात : छडी वाजे छम छम…

महापालिकांची जी मूलभूत कर्तव्ये असतात त्यामध्ये सोयीसुविधांबरोबर आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच शिक्षणाचा समावेश असतो. शहरातील विद्यार्थ्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणे हा सर्वात महत्वाचे काम महापालिकेचे आहे.

सविस्तर वाचा...

12:40 (IST) 24 Dec 2024

Solapur Crime News : सोन्याच्या हव्यासापायी सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून; मृतदेहाचे तुकडे करून शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले

कृष्णा नारायण चामे (वय ५२) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी शेतमजुराला अटक केली आहे.

सविस्तर वाचा...

12:28 (IST) 24 Dec 2024

दाऊद इब्राहिमच्या भावाची सदनिका ईडीने घेतली ताब्यात

मुंबई : कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या ठाण्यातील ‘नेओपोलिस’ टॉवरमधील सदनिकेचा ताबा सक्तवसुली संचलनालयाने (ईडीे) घेतला आहे. आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणात ईडीने एप्रिल २०२२ मध्ये या सदनिकेवर टाच आणली होती. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात २०१७ मध्ये कासकरविरोधात दाखल खंडणीच्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडी तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा...

12:10 (IST) 24 Dec 2024

टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचा विक्रमच! आधी ३२०० किलोमीटर, आता ५०० किलोमीटर

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून वाघाने तब्बल ५०० किलोमीटरचे स्थलांतर करत सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

सविस्तर वाचा...

12:10 (IST) 24 Dec 2024

चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढाव्या, स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचा सूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी तीन महिन्यात होतील, असे संकेत दिले आहेत.

सविस्तर वाचा...

12:09 (IST) 24 Dec 2024

नियोजित वराला आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून तरूणीची केली बदनामी

एका तरुणीच्या नियोजित वराला बनावट आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून तिची बदनामी करण्यात आली. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

सविस्तर वाचा...

12:08 (IST) 24 Dec 2024

सौंदर्या ”सोनचाफ्याचा भिवंडीत यशस्वी प्रयोग ! संतोष पाटील या शेतकऱ्याची यशस्वी फुलशेती, सूर्यफुलाच्या आंतरपिकातूनही उत्पन्न

ठाणे : जिल्ह्यातील पारंपरिक भातशेतीला जोड देत अधिक उत्पन्नासाठी शेतकरी फळलागवडी समवेतच फुलशेतीकडे वळताना दिसून येत आहे. याच पद्धतीने भिवंडी तालुक्यातील कोलीवली येथील संतोष पाटील या शेतकऱ्याने चार एकर मध्ये सोनचाफ्याची लागवड करून उत्तम अर्थार्जन केले आहे.

सविस्तर वाचा...

Story img Loader