Maharashtra News Updates : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाले असून, मंत्रिमंडळाचा विस्तार व मंत्र्यांना खातेवाटपही झाले आहे. अशात बीडमधील सरपंच आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूने राज्य हादरले आहे. दरम्यान या प्रकरणी राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणीला येत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरीकडे महायुतीमधील अनेक नेते मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) छगन भुजबळ यांनी तर उघड नाराजी व्यक्त केली आहे. अशात त्यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यासह, महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा पाहुयात.
Marathi News Live Updates | नीलकमल बोट दुर्घटनेतील प्रवाशांना वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा उद्धव ठाकरेंकडून सत्कार
अप्पर कोपर रेल्वे स्थाकातील फलाटावर छप्पर टाकण्याच्या कामाला प्रारंभ
डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील दिवा-पनवेल, दिवा- वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहून शटल पकडावी लागते. अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर छत बसविण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे.
पुणे : सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एकाला अटक
वाघ यांच्या खून प्रकरणात पसार झालेला आरोपी आतिश जाधवचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता.
पुण्यात ‘या’ रस्त्यावरून क्षमतेपेक्षा जास्त वाहनांचा प्रवास, प्रवाशांसाठी का ठरतोय जीवघेणा?
‘येत्या महिनाभरात या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी. अन्यथा, मोठे आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा वाघोली अगेन्स्ट करप्शन संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार मिश्रा यांनी दिला.
पुणेकरांचा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास झाला सुखकर, काय आहेत नवीन बदल ?
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलवर स्थलांतरणासाठी (इमिग्रेशन) आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली होती.
नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा, आरक्षणासाठी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा
पावसाळा संपुष्टात आल्यानंतर धरणांमध्ये डिसेंबरअखेरपर्यंत इतका जलसाठा असण्याची ही मागील काही वर्षातील पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.
नवी मुंबई : वाशी खाडीपुलाला कोंडीचा विळखा कायम, वाहनचालकांचा दररोज ५ मिनिटांच्या अंतरासाठी तासाभराचा खोळंबा
मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या नवी मुंबई वाशी खाडी पुलावरील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्घाटन १३ ऑक्टोंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले होते.
नाताळासाठी बाजार सजले, ऑनलाईन बाजारपेठांमध्ये विशेष सवलती; सांताच्या टोपी, पोशाखाला ग्राहकांची मागणी
शहरातील बाजारपेठा तसेच ऑनलाईन बाजारपेठांमध्ये नाताळ सणांशी निगडित असणाऱ्या विविध वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले आहे. मात्र सत्तेवर आल्यावर सर्वात लगबग सूरू आहे ती या मंत्र्यांचे पी. ए. म्हणजेच खासगी सचिव होण्यासाठी.
गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच!
एकेकाळी गडचिरोलीचे पालकमंत्री पद म्हणजे काटेरी मुकुट समजल्या जायचे. आदिवासीबहुल अतिदुर्गम भाग आणि त्यात नक्षलवाद्यांची गंभीर समस्या यामुळे गडचिरोलीचे पालकत्व घेण्यास नेते इच्छुच नसायचे.
मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, “शेवटी पक्ष आणि पक्षाचे केंद्रीय व राज्य नेतृत्त्व निर्णय घेत असते. त्यांना कदाचित मी लायक वाटलो नसेन त्याच्यामुळे नाही घेतले. मी पक्षाचे स्थापनेपासून काम करत आहे. त्यावेळी आमच्या डोळ्यासमोर कधी आमदार, मंत्री व्हायचेय असा कोणता विचार नव्हता. त्यामुळे मी जेव्हा लायक वाटेल तेव्हा पक्ष जबाबदारी देईल.”
Marathi News Live Updates : नीलकमल बोट दुर्घटनेतील प्रवाशांना वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा उद्धव ठाकरेंकडून सत्कार
१८ डिसेंबर (बुधवारी) सायंकाळी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथून घारापुरीला जाणाऱ्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली होती. या अपघातानंतर नीलकमल बोटीला जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत १४ प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ९८ जण जखमी झाले होते. यामध्ये आरिफ बामणे यांनी अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बामणेंचा सत्कार केला आहे.