Mumbai News Today, 16 June 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जीवे-मारण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीने दिल्याचं समोर आल्यानंतर हा व्यक्ती ठाकरे गटाचाच कार्यकर्ता असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीची जोरदार चर्चा चालू आहे. संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मयूर शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. यावरून भाजपा आणि मनसेनं ठाकरे गटावर व विशेषत: संजय राऊतांवर टीकास्र सोडलं आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारणात सत्ताधारी मित्र पक्षच एकमेकांवर बेडूक आणि हत्तींवरून आरोप प्रत्यारोप करत असल्याने विरोधकांनी त्यांच्या युद्धात आपले हात धुवून घेतले आहेत. तसंच, देशात समान नागरी कायदा येणार असल्याची चर्चा आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.

Live Updates

Maharashtra News Update राज्यातील घडामोडी वाचा

18:30 (IST) 16 Jun 2023
दिवाळीनंतर कांदा शंभरी गाठणार? अवकाळी, गारपिटीचा फटका

अवकाळी, गारपिटीमुळे झालेले मोठे नुकसान. बाजारात अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे काढणी, वाहतूक खर्चही परवड नसल्यामुळे शेतकरी तयार कांदा शेतातच गाडून टाकत आहे. बाजारात आलेल्या कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे ऐन दिवाळी किंवा दिवाळीनंतर कांदा शंभरी गाठू शकतो, असा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

सविस्तर वाचा

18:20 (IST) 16 Jun 2023
“पूर्वीचे सरकार ‘घरी’, आम्ही लोकांच्या दारी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पूर्वी ७० हजार कोटी रुपये गेले तरी सिंचन झाले नाही. आता सिंचन योजनेला गती दिली आहे. आमचे सरकार खोटे काम करत नाही. खोटी आश्वासने देत नाही. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल असे हे सरकार आहे. आम्ही घरात बसून आदेश देत नाही. बाहेर फिरतो, जनतेत मिसळतो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगाविला.

सविस्तर वाचा

18:10 (IST) 16 Jun 2023
‘RTO’त अर्ज करा, पंढरपुरपर्यंत पथकरात सुट मिळ‌वा.. काय आहे योजना?

नागपूर: शासनाने एकादशीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्या भाविकांना पथकरात सुट दिली आहे. १३ जून ते ३ जुलै दरम्यान स्थानिक प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून वाहन पास घेऊन प्रवास करणाऱ्या भाविकांना याचा लाभ मिळणार आहे.

सविस्तर वाचा...

18:01 (IST) 16 Jun 2023
कळवा – मुंब्रा परिसरात नालेसफाई झालीच नाही; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप

ठाणे: कळवा आणि मुंब्रा परिसरात नालेसफाईची कामेच झाली नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कचऱ्याने भरलेल्या नाल्यांची छायाचित्र समाजमाध्यमांवर पुरावे म्हणून सादर केली आहेत.

सविस्तर वाचा...

17:48 (IST) 16 Jun 2023
नवी मुंबई : शहरातील पे अँड पार्किंगमध्ये होतेय नियमांचे उल्लंघन, वाहनतळाचा व्यवसायिक वापर

नवी मुंबई शहरात सिडकोच्या वतीने  रेल्वे स्थानकाबाहेर पे अँड पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र  याठिकाणी नियमांचे उल्लंघन करून पार्किंगच्या जागेत वाहने उभी करून व्यवसायिक वापर वाढत चालला आहे. नेरुळ मधील वाहनतळावर गॅस वितरणाचा व्यवसाय थाटण्यात आला आहे तर कोपरखैरणे रेल्वे स्थानकाबाहेर गाड्या उभ्या करून फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू आहे.

सविस्तर वाचा

17:27 (IST) 16 Jun 2023
ठाण्यात प्रकल्प उद्घाटनांचा पुन्हा धडाका; वर्षपुर्तीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार ‘या’ प्रकल्पांचे उदघाटन

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यातून मुख्यमंत्री शिंदे यांना मोठे समर्थन मिळाल्याचे दिसून आले होते. या जिल्ह्यातील शहरांमध्ये विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून त्याचबरोबर सुशोभिकरण तसेच इतर लोकोपयोगी प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

सविस्तर वाचा

17:15 (IST) 16 Jun 2023
चंद्रपूर : वेगवेगळ्या घटनेत दोघांची रेल्वेखाली आत्महत्या

चंद्रपूर : दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. पहिल्या घटनेत भद्रावती तालुक्यातील ऊर्जाग्राम व विजासन या दोन रेल्वे लाईनवर रेल्वे खाली उडी घेऊन महेश विजय जुनघरे (४७) रा. कुटाळा याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

सविस्तर वाचा...

16:53 (IST) 16 Jun 2023
पुणे: साळुंखे विहार कचराकुंडीजवळ सापडले मृत अर्भक

पुणे: वानवडी परिसरातील साळुंखे विहार कचराकुंडीजवळ पुरूष जातीचे मृत अर्भक फेकून दिल्याची घटना गुरुवारी (१५ जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास  उघडकीस आली. अनैतिक संबंधातून अर्भक जन्मले असल्याने त्याला फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 16 Jun 2023
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तयारीसाठी मिळताहेत ५० हजारांचे आर्थिक सहाय्य! वाचा सविस्तर…

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी तर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले अशा उमेदवारांना पन्नास हजार रुपयांचे सहाय्य प्रदान केले जाणार आहे. अर्ज केलेल्यांना हा लाभ मिळेल.

सविस्तर वाचा...

16:41 (IST) 16 Jun 2023
हुक्का पार्लरवर समाजसेवा शाखेची कारवाई

घाटकोपर राजावाडी रुग्णालय परिसरात अनधिकृतरित्या ‘किक कॅफे’ हा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली. समाजसेवा शाखेने गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास ‘किक कॅफे’वर छापा घातला.

सविस्तर वाचा

16:25 (IST) 16 Jun 2023
"अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे...", युतीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्टोक्ती

"एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती कमजोर नाही. ही युती वेगळ्या विचारातून आणि भावनेतून केली आहे. बाळासाहेबांनी ही युती अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हा केली होती. मधल्या वर्षात कोणीतरी मिठाचा खडा टाकला होता, तो खडा आम्ही बाहेर काढून फेकून दिला", असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. "जाहिरातीमुळे आमच्यात वितुष्ट येणार नाही. देवेंद्र आणि माझी दोस्ती जोरदार आहे. आमची युती सत्तेसाठी, पदासाठी झालेली नाही. सर्वसामान्य, रस्त्यावरचे आणि लोकांचे कार्यकर्ते आम्ही आहोत", असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

16:23 (IST) 16 Jun 2023
“शरद पवारांना धमकी दिली नाही”, सौरभ पिंपळकर यांचे स्‍पष्‍टीकरण; म्हणाले, “राष्‍ट्रवादीच्या नेत्‍यांविरोधात मानहानीचा दावा…”

अमरावती : माझ्यावर खोटे आरोप करण्‍यात आले, त्‍यामुळे मी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी, जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या विरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्‍याचे सौरभ पिंपळकर यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

सविस्तर वाचा...

16:05 (IST) 16 Jun 2023
“बीआरएस’च्या मॉडेलमध्ये किती चुका आहेत याची चित्रफीत लवकरच”, बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसला मत देणे…”

नागपूर : तेलंगणामधील बीआरएसच्या मॉडेलमध्ये किती चुका आहेत, याची एक चित्रफित आम्ही लवकरच सर्वांसमोर आणणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सविस्तर वाचा...

15:53 (IST) 16 Jun 2023
बुलढाणा: हजारो आशा व गट प्रवर्तकांना दोन दिवसात मिळणार मानधन; जिल्हाव्यापी आंदोलनाचे फळ

बुलढाणा: मागील सहा महिन्यांपासून प्रलंबित मानधनामुळे अडचणीत आलेल्या आशा व गटप्रवर्तक ह्या अत्यंत अल्प मोबदला व मानधनावर आरोग्याची महत्त्वाची कामे करतात, परंतु त्यांना मिळणारा कामाचा मोबदला हा सातत्याने उशिरा मिळतो.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 16 Jun 2023
पिंपरीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ‘ओआरएस’चे वाटप; नागरिकांमध्ये चर्चेला उधाण

पिंपरी – चिंचवड शहरात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. त्या अगोदर कार्यक्रमाला उपस्थित आणि येणाऱ्या नागरिकांना ‘ओआरएस’ची पाकिटे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा...

15:13 (IST) 16 Jun 2023
डोंबिवलीत वाईन शाॅपमध्ये चोरी करणारे चोरटे अटकेत

कल्याण येथे राहणारे रवींद्र शेट्टी यांचे डोंबिवलीत डिलक्स वाईन दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे मुख्य प्रवेशव्दार लोखंडी कटावणीने उघडून दुकानात प्रवेश केला.

सविस्तर वाचा

15:07 (IST) 16 Jun 2023
शिवसेनेकडून डिवचलेल्या भाजपची ठाणे जिल्ह्यात मतदारसंघ बांधणी मोहीम?

कल्याण – डोंबिवली प्रकरण आणि शिवसेनेच्या जाहिरातीमुळे डिवचलेल्या भाजप नेत्यांनी ठाणे जिल्ह्यातील आपले भक्कम वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आता जाहीर सभा, नागरिकांच्या भेटीगाठींची जोेरदार मोहीम सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

15:04 (IST) 16 Jun 2023
इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन’; अल्पवयीन मुलीला धमकी, दोन तरुण अटकेत

एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंय करून तिच्यावर इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी नकली बंदुकीने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

वाचा सविस्तर...

15:01 (IST) 16 Jun 2023
पथदिव्यांच्या जिवंत वीज वाहिनीमुळे डोंबिवलीत रहिवाशाचा मृत्यू

या आंदोलनानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सिध्दार्थनगर येथील महावितरणचे विजेचे खांब, या खांबांवरील जिवंत वीज वाहिन्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांना पालिकेच्या पथदिव्याची जिवंत वीज वाहिनी मोरे राहत असलेल्या इमारतीच्या लोखंडी जिन्याला स्पर्श करत असल्याचे जाणवले.

सविस्तर वाचा

14:51 (IST) 16 Jun 2023
“राज्यात प्रचंड भ्रष्टाचार, महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य मात्र…”, अजित पवार यांची सरकारवर टीका

शासन आपल्या दारी या उपक्रमावर प्रचंड खर्च होत आहे. कोल्हापूर, पालघरमध्ये जे झाले, त्यात सगळी यंत्रणा अडकली. निव्वळ राजकारण सुरू आहे. विरोधक असल्याने आम्हाला निधी दिला जात नाही, आमची कामे मंजूर केली जात नाहीत. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे.

सविस्तर वाचा

14:25 (IST) 16 Jun 2023
गोंदिया: आमगांव येथील दोन पोलिसांना मारहाण; पाच आरोपींना अटक

गोंदिया: आमगांव पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी मारहाण केली असल्याची घटना रविवारी घडली होती. या प्रकरणातील एक पोलीस प्रवीण मेगरे याला गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी निलंबित केले आहे.

सविस्तर वाचा...

14:19 (IST) 16 Jun 2023
दत्तवाडी पोलीस ठाण्याचे नाव बदलले; आता ‘या’ नावाने ओळख

काही वर्षांपूर्वी स्वारगेट पोलीस ठाण्याचे विभाजन करून दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. २००६-२००७ या दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्यात एक हजारांहून अधिक गुन्हे दाखल होत होते. त्यामुळे वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन २००७ मध्येच दत्तवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती.

सविस्तर वाचा

14:09 (IST) 16 Jun 2023
बुलढाणा : मंजुरीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन, इंदूरच्या कंपनीला साडेसात कोटींचा दंड

बुलढाणा : राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मंजूरपेक्षा जास्त गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या इंदूरच्या कंपनीला अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तब्बल साडेसात कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या रक्कमेचा तीस दिवसांच्या आत भरणा करावा व उत्खनन तात्काळ बंद करावे, असे आदेशात नमूद आहे.

सविस्तर वाचा...

13:47 (IST) 16 Jun 2023
पुणेकरांसाठी पाणीबाणी, टँकरमाफियांसाठी पाणीच पाणी

पुणे: पाणीबचतीसाठी दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने लाखो पुणेकरांना पाणी बंदनंतरचे काही दिवस पाणीबाणीला सामोरे जावे लागत आहे. मात्र, पाणीकपातीमध्येही महापालिकेकडून टँकरमाफियांसाठी पाणीच पाणी दिले जात असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे.

सविस्तर वाचा...

13:39 (IST) 16 Jun 2023
पुणे: एकात्मिक पाठ्यपुस्तकांतून ‘क्यूआर कोड’ वगळले

पुणे : बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये २०१६पासून समाविष्ट केलेल्या क्यूआर कोडचा नव्या एकात्मिक पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. क्यूआर कोड पाठ्यपुस्तकांकडून वगळण्याच्या या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

13:38 (IST) 16 Jun 2023
पश्चिम बंगालमधील तरुणीवर अत्याचार; पिंपरी महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीविरुद्ध गुन्हा

पिंपरी : नोकरीसाठी पश्चिम बंगालवरुन आलेल्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या माजी सभापतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पिंपरी आणि लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

सविस्तर वाचा

13:31 (IST) 16 Jun 2023
वर्धा : विठू माऊलीच्या दर्शनासाठी ‘आषाढी एकादशी’ विशेष गाडी का नाही? खासदार रामदास तडस यांचा प्रश्न

वर्धा : वारकरी भक्तांसाठी ‘आषाढी एकादशी’ विशेष गाडी का नाही, असा सवाल खासदार रामदास तडस यांनी रेल्वे प्रशासनाला केला आहे.

सविस्तर वाचा...

13:30 (IST) 16 Jun 2023
विद्यार्थ्यांना दिलासा! दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

वर्धा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात दहावीची पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आज शुक्रवारपर्यंत होती. ती आता २१ जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सविस्तर वाचा..

13:20 (IST) 16 Jun 2023
पनवेल : शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिसांच्या चिरिमिरीचा जाहीर आरोप

पनवेल : राज्यात जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणारे लघुसंदेश समाजमाध्यमांवर पसरवून दंगल सदृष्य स्थिती निर्माण केली जात असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याअंतर्गत शांतता कमिटीच्या बैठका घेण्याच्या सूचना केल्या. गुरुवारी ठरल्याप्रमाणे शांतता कमिटीमधील सदस्यांसोबत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावण्यात आले होते. परंतु या बैठकीत थेट पोलिसांच्या चिरिमिरीमुळे नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करण्यात आल्याने उपस्थित पोलीस चक्रावले.

सविस्तर वाचा...

13:07 (IST) 16 Jun 2023
सिंहस्थासाठी संनियंत्रण समितीची गरज, निधीसाठी कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल आवश्यक; छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने जिल्हा आणि राज्यस्तरीय संनियंत्रण समितीची घोषणा करावी, तसेच राज्य आणि केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक, त्र्यंबकेश्वर येथील कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी आ. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सविस्तर वाचा

Maharashtra News Live

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Maharashtra News Live Update

Story img Loader