Mumbai News Today, 16 June 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना काही दिवसांपूर्वी जीवे-मारण्याची धमकी मिळाली होती. ही धमकी मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीने दिल्याचं समोर आल्यानंतर हा व्यक्ती ठाकरे गटाचाच कार्यकर्ता असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मयूर शिंदे नावाच्या व्यक्तीची जोरदार चर्चा चालू आहे. संजय राऊत आणि त्यांचे बंधू सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मयूर शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. यावरून भाजपा आणि मनसेनं ठाकरे गटावर व विशेषत: संजय राऊतांवर टीकास्र सोडलं आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारणात सत्ताधारी मित्र पक्षच एकमेकांवर बेडूक आणि हत्तींवरून आरोप प्रत्यारोप करत असल्याने विरोधकांनी त्यांच्या युद्धात आपले हात धुवून घेतले आहेत. तसंच, देशात समान नागरी कायदा येणार असल्याची चर्चा आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.
Maharashtra News Update राज्यातील घडामोडी वाचा
पुणे : क्वीन्स गार्डन परिसरातील साधू वासवानी पूल पाडून तो नव्याने उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी ८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव महापालिका प्रशानसाकडून स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.
पुणे: भारत आणि ऑस्ट्रिया यांच्या राजकीय मैत्रीपूर्ण संबंधांची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे १७ जूनला संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
“या (लोकप्रिय मुख्यमंत्री) जाहिरातीचे वेलविशर कोण आहेत, याचा आम्ही शोध घेतोय. दादालाही मी याचा शोध घ्यायला सांगितला आहे. दादा आता जळगावला गेला आहे, तिथे त्याला सांगितलं बघ तिकडे तरी आहे का वेलविशर. मी काल पुण्यात होते. तिथेही शोधला. आज बऱ्याच दिवसांनी मुंबईत आलेय. आजची मिटिंग झाली की हा वेलविशर कोण आहे ते शोधणार आहे. असे वेलविशर आपल्या पक्षालाही मिळाले पाहिजेत. माध्यमांना फूल पेज जाहिराती मिळाल्या तर तुमचं आणि आमचं दोघांचंही भलं होईल. असे वेलविशर कोणी असतील तर त्यांना माझा, जयंत पाटील किंवा अजित दादांचा नंबर द्या”, अशी मिश्किल टिप्पणीही सुप्रिया सुळेंनी यावेळी केली.
बुलढाणा : बुलढाणा तालुका शिवसेनेची महत्त्वाची बैठक आज शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे. वरकरणी संघटनात्मक विषयांवर असली तरी या बैठकीत ‘मिशन-४५’ आणि ‘जाहिरात अध्याय’चे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
पुणे: स्वारगेट आणि मार्केट यार्ड परिसरातून मुळशी तालुक्यात जाणारे अकरा दहा मार्ग गुरुवारपासून पूर्ववत करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात २०२२-२३ मध्ये १ लाख ५ हजार ४९४ जणांची तर, २०२३-२४ मध्ये ४ हजार ३९० जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. यामध्ये अनुक्रमे ३२४ व २३ नवे एचआयव्ही बाधित रुग्ण आढळून आले आहे.
नाशिक – नवीन शैक्षणिक वर्ष प्रवेशोत्सव महापालिका शाळांमध्ये उत्साहात झाला असताना दुसरीकडे, पटसंख्या वाढविण्यासाठी ‘मिशन ॲडमिशन’ मोहीम सुरु करण्यात आली असून प्रत्येक वर्गात किमान ५० विद्यार्थी असे उद्दिष्ट मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्गाला देण्यात आले आहे.
यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील एरंडगाव आणि वडगाव येथील अनुक्रमे राजेंद्र वानखडे आणि संजय गावंडे या सावकारग्रस्त शेतकऱ्यांची अवैध सावकारीत हडपलेली जमीन जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाने गुरुवारी या शेतकऱ्यांना ताब्यात दिली गेली.
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ करीता मुलाखती घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल दिनांक १५ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.
गोंदिया : जिल्ह्यात सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व शाळा ३० जूनपासून सुरू करण्याच्या सूचना शासनाने जाहीर केल्या आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने ४,०८२ घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन नोंदणी, अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रियेतील अडचणी सोडविण्यासाठी वेब संवादाचे आयोजन केले आहे. त्यानुसार शनिवार, १७ जून रोजी सकाळी ११ वाजता वेब संवाद होणार असून नोंदणीधारक, अर्जदार आणि यापूर्वी म्हाडाच्या घरासाठी अर्ज केलेल्या सर्वांना एक लिंक पाठविण्यात आली आहे.
नागपूर : शाळकरी मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आईने तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलगी ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. कुणीतरी मुलाच्या प्रेमात पडल्याचा संशय आईला आला. मात्र, तिने शेजारी राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीकडून गर्भवती असल्याचे सांगताच आईच्या पायाखालची जमीन सरकली.
पुणे: ससून सर्वोपचार रुग्णालय म्हटले, की रुग्णांच्या लांबच लांब रांगा असे चित्र नेहमी दिसते. अनेक वेळा रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे दिसते. ससून रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातील (OPD) ही परिस्थिती आता बदलणार आहे.
पुणे : पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांच्यावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापा टाकून केलेल्या कारवाईनंतर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) प्रकल्पांमधील भूसंपादन मोबदल्यांच्या प्रकरणांत दिलेल्या निकालांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नागपूर: ‘माझी मैत्रिण स्वर्गात माझी वाट बघत आहे. ती मला नेहमी बोलावते. स्वप्नात येऊन सोबत नेण्याचा प्रयत्न करते. ती स्वर्गात एकटीच आहे, त्यामुळे तिला साथ देण्यासाठी मला जायचे आहे’ असे वारंवार सांगून २२ वर्षीय युवतीने पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली.
नागपूर : देशात एखाद्या पक्षाने विस्तारासाठी पावले उचलली तर त्याला दुसऱ्या राजकीय पक्षाची ‘ए’, ‘बी’, ‘सी’ टीम म्हणण्याची ‘फॅशन’ झाली आहे, असा टोला भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) पक्षप्रमुख व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना लगावला.
नागपूर : राज्यात विजेची मागणी वाढल्याने अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणला महागडी वीज विकत घ्यावी लागत आहे. याचा अतिरिक्त भार आधीच ग्राहकांवर पडत असताना आता नागपूर महापालिकेने ‘सी-२०’ परिषदेच्या निमित्ताने केलेल्या रोषणाईमुळे महिन्याला १.८५ लाख युनिट वीज जळत आहे.
काँग्रेस, शिवसेना किंवा आता भाजप कोणत्याही पक्षात असो, नगर जिल्ह्यातील पक्षांतर्गत नेत्यांशी वितुष्ट कायम ही विखे-पाटील यांची खासियतच. भाजप शिस्तप्रिय पक्ष म्हणून गणला जातो, पण जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभावाचे खापर फोडूनही विखे-पाटील यांचे पक्षांतर्गत महत्त्व अबाधित.
चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर अतिशय धडाडीचे आक्रमक नेते होते. त्यांनी संघर्ष करून शून्यातून विश्व निर्माण केले. संकटांना तोंड देणाऱ्या, अनेक आव्हाने लीलया पेलणाऱ्या या नेत्याला कमकुवत करणाऱ्यांना कदापि विसरणार नाही, असा इशारा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस पक्षातील विरोधकांना दिला. धानोरकर यांची स्वप्ने पूर्ण करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
चंद्रपूर : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र आता चंद्रपुरात उभे राहणार आहे. त्यासाठी ८.५३ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. या विद्यापीठाच्या उपकेंद्राकरिता शासनाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाचे उपकेंद्र बल्लारपूर-चंद्रपूर मार्गावर तयार होत असताना आता गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्रही चंद्रपुरात होत आहे.
नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून विजेचे खांब पडण्याच्या घटना शहरात होत आहेत. शुक्रवारी अपरात्रीही वाशी सेक्टर ७ येथे एक विजेचा खांब पडला असून त्यामुळे एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद झाला आहे. विशेष म्हणजे, सकाळी साडेआठपर्यंत विद्युत विभागाला याची माहितीही नव्हती.
अमरावती : विदर्भाच्या विकासाच्या नावावर अमरावती शहरासह विदर्भातील उर्वरित नऊ जिल्ह्यांची सुरू असलेली घोर उपेक्षा ही अत्यंत वेदनादायी असून आता नव्याने राज्य शासनाने नागपुरात काँक्रिट रस्त्यांसाठी १ हजार कोटी रुपये दिले आहेत. गेल्या आठ वर्षांत नागपुरातील प्रकल्पांवर तब्बल १ लाख १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे, असा दावा माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे.
वर्धा : नागरी बँकेच्या सायबर दरोड्याप्रकरणी आरोपींची पाळेमुळे खणून काढण्यात यश आले असून यात ‘जामतारा’ व ‘नायजेरीयन’ संबंध असल्याचे धक्कादायी चित्र आहे.
नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘नाशिक भूषण २०२३’ पुरस्कार सामाजिक, साहित्य आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या फ्रेंड्स सर्कलचे संचालक जयप्रकाश जातेगावकर यांना जाहीर झाला आहे.
“कृषी खात्यात जो भ्रष्टाचार सुरू आहे तो पाहिल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दया येते. बोगस धाडीचे प्रकरणात त्यांचेच लोक आहेत. खताचा विषयामध्ये कोट्यवधी रुपये गोळा केले आहे. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्काळ पावले उचलले पाहिजेत. कारण मुख्यमंत्री काहीच करू शकत नाहीत. कारण मुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्यांचेच आणि आमदारांचेच मिंधे आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.
Maharashtra News Live Update