Maharashtra Politics Updates : गेल्या महिन्याभरापासून राज्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख त्यांच्या हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कराडबाबत रोज नवनव्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. राज्यात सुमारे तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. नव्या सरकारच्या स्थापनेनंतर न्यायालयात यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबईत गेल्या आठवड्यात सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला होता. यातील हल्लेखोराला आता पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौरा आटपून मुंबईत परतले आहेत. या दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळालं यावर सध्या चर्चा चालू आहे. यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Marathi News Live Update Today : राज्यासह देशातील बातम्यांचा आढावा.
ठाण्यात प्रजासत्ताक दिनी अपंगाचे अर्धनग्न आंदोलन
ठाणे : विविध मागण्यांसाठी गेले अनेक दिवस पत्र देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अखिल भारतीय दिव्यांग सेनेने ठाणे महापालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन केले.
वागळे इस्टेटमध्ये नाल्यावर स्लॅब टाकून रस्त्याचे बांधकाम
ठाणे : वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक २२ येथील पासपोर्ट कार्यालयाजवळ असलेला नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर रस्ता बनविण्याचे काम महापालिकेकडून सुरु आहे. हा रस्ता कचरा हस्तांतरित केंद्राकडे जाण्यासाठी तयार केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
डोंबिवलीत महाराष्ट्रनगरमधील गांजाच्या अड्ड्याने रहिवासी त्रस्त
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील बहुतांशी गांजा विक्री, मद्य सेवन, गावठी मद्य विक्रीचे अड्डे पोलीस उपायुक्तांच्या विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक आणि विष्णुनगर पोलिसांची गस्त वाढल्याने बंद झाले आहेत. त्यामुळे गांजा, गावठी, विदेश मद्य सेवन करणाऱ्यांनी आता डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर मधील जुनी भोईरवाडी येथील जुन्या टेलिफोन एक्सचेंजच्या पाठीमागील भागातील गांजा सेवन, तस्करी अड्ड्यावर आपला मोहरा वळविला आहे.
२२० कोटींच्या फसवणूक प्रकरणी ईडीकडून ७९ कोटींची मालमत्तेवर टाच
बँक फसवणूक प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नुकतीच ७९ कोटी ७८ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. या मालमत्ता नवी मुंबई, मुंबई, सातारा, रायगड आणि डेहराडून, हरिद्वार, पौरी गढवाल (उत्तराखंड) येथील असून त्यात सदनिका,भूखंड, हॉटेल आणि शेत जमिनींचा समावेश आहे. सविस्तर वाचा…
"खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर महायुतीचेच!", पालकमंत्र्यांकडून 'ऑपरेशन टायगर'चे संकेत
धाराशिव जिल्हा हा ठाकरेसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला जिल्ह्यातील मतदारांनी प्रचंड समर्थन दिले. निवडणुकांचा धुराळा आता खाली बसला आहे. सविस्तर वाचा…
आगाशे यांच्या अपघाती निधनानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे (७३) यांच्या अपघाती निधनानंतर शहरात पुन्हा एकदा सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या ठिकाणी काही मीटर अंतरावर असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बंद होता.
ठाणे : माजी महापौर अशोक राऊळ यांचे निधन
ठाण्याचे माजी महापौर आणि ज्येष्ठ माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचे रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७५ होते. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे.
अंबरनाथ : ‘वाढदिवसाला बॅनर, होर्डिंग कमी पडले असते मात्र लोकशाहीच्या उत्सवाचा एकही बॅनर नाही, कुठे आहेत भावी नगरसेवक ?’, असा प्रश्न उपस्थित करणारे फलक घेऊन प्रजासत्ताक दिनी अंबरनाथमधील काही तरूणांनी लक्ष वेधले.
ग्रामीण भागात घरफोडी करणारा चोरटा गजाआड; चोरट्याकडून १६ लाखांचा ऐवज जप्त
ग्रामीण भागात घरफोडी करणाऱ्या सराइताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्याच्याकडून १६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. घरफोडी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध ५० गुन्हे दाखल असून, न्यायालयाकडून जामीन मिळवून तो नुकताच कारागृहातून बाहेर पडला होता. सविस्तर वाचा…
महाराष्ट्रात ‘जीबीएस’चा धोका वाढताच केंद्र सरकार ‘अलर्ट मोड’वर! केंद्राचे उच्चस्तरीय पथक राज्यासाठी तैनात
राज्यात गुइनेल बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. महाराष्ट्रातील आरोग्याची ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. सविस्तर वाचा
डॉ. अशोक कामत यांचे निधन
संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ अशोक कामत (वय ८३) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सविस्तर वाचा
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऊसाला चांगला भाव देण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा
अहिल्यानगर: सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना अंतिम भाव ३०५० रूपये देणार आहे. चांगले गाळप झाल्यास आणखी जास्त भाव देण्याचा विचार करू असे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सहकारी व खासगी कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांना ऊस भाव जास्तीत जास्त देण्यासाठी स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे खासगी विरुद्ध सहकारी अशी दरवाढीसाठी स्पर्धा सुरू आहे. यातूनच प्रत्येक कारखाना जास्त भाव देण्याची घोषणा करत असल्याचे दिसून येते. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना २०२४-२५ या चालू गळीत हंगामात गळितास आलेल्या उसास तीन हजार पन्नास रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे भाव देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली.
किरकोळ वादातून व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार; कसबा गणपती मंदिराजवळील घटना
किरकोळ वादातून दुचाकीस्वार व्यावसायिकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याला मारहाण करण्यात आल्याची कसबा गणपती मंदिराजवळ घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा…
विक्रोळी रेल्वे स्थानकात युगुलाची मेल एक्स्प्रेस गाडीखाली आत्महत्या
कुटुंबियांकडून होणाऱ्या विरोधामुळे एका प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी विक्रोळी रेल्वे स्थानकात घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सविस्तर वाचा…
उपराजधानीत एक हजार कोटींची विकासकामे होणार; कारागृह, बसस्थानकांसह…
नागपूर : आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने शहरासाठी विविध विकास कामांची घोषणा केली आहे. महसूलमंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रेस क्लबमध्ये झालेल्या संवाद कार्यक्रमात शहरात एक हजार कोटी रुपयांच्या नवीन २९ प्रकल्पांची उभारणी होणार असल्याची माहिती दिली.
टॅब्यूबियाच्या फुलांनी विक्रोळी परिसर बहरला
पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी या भागात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहक अशा गुलाबी फुलझाडांना बहर आला आहे. टॅब्यूबिया असे नाव असलेल्या या झाडांच्या गुलाबी फुलांमुळे सध्या विक्रोळी परिसर बहरला आहे. सविस्तर वाचा…
सनफ्लॅग कंपनीत मोठी दुर्घटना, क्रेनची पुली पडल्यामुळे…
भंडारा : भंडारा येथील सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत ब्राईड बार विभागात क्रेनची पुली पडल्यामुळे दोन मजूर गंभीररित्या जखमी झाल्याची घटना सकाळी ११ वाजता दरम्यान घडली.
महाकुंभ : अमित शाहांचं त्रिवेणी संगमावर शाही स्नान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रयागराजमध्ये जाऊन महाकुंभ २०२५ मध्ये सहभाग घेतला. शाह यांनी यावेळी त्रिवेणी संगमावर शाही स्नान केलं. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील त्यांच्याबरोबर उपस्थित होते. या शाही स्नानाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर एएनआयने प्रसिद्ध केला आहे.
कल्याणमध्ये रिक्षा चालक समर्थकांचा प्रवाशांवर चाकू हल्ला
एका प्रवाशाला रिक्षा चालकाने रिक्षा चालका शेजारील आसनावर बसण्यास सांगितले. या बसण्यावरून रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्या वाद झाला.
महारेराच्या दलालांच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर, ७६२४ पैकी ६७५५ परीक्षार्थी उत्तीर्ण
मुंबई : स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला एकूण ७६२४ उमेदवार बसले होते, त्यापैकी ६७५५ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
म्हाडा कोकण मंडळाच्या घराकडे इच्छुकांची पाठ, २२६४ घरांपैकी ७१३ घरांना शून्य प्रतिसाद
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी ५ फेब्रुवारीला ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढली जाणार आहे. त्यातील २२६४ घरांसाठी २४ हजार ९११ अर्ज दाखल झाले असले तरी २२६४ घरांपैकी तब्बल ७१३ घरांना एकही अर्ज दाखल झालेला नाही.
नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना ‘पद्मश्री’, यवतमाळ जिल्ह्याला प्रथमच…
सुभाष शर्मा हे गेल्या तीस वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत.
डोंबिवली लोढा हेवन येथे दुचाकी खड्ड्यात आपटून ज्येष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू
दुचाकी स्वार जतीन भोई हे आपली आई भारती भोई यांना दुचाकीवर बसून लोढा हेवन भागातील बाजारात खरेदीसाठी चालले होते.
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी वडापाव विक्रेत्याविरुद्ध गुन्हा
वडापाव विक्रेत्याने कदम यांना राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या कागदात वडापाव गुंडाळून दिला.
पुणे : सदनिकेचे कुलूप तोडून साडेसात लाखांचा ऐवज चोरीला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढव्यातील हेवन पार्क सोसायटीत राहायला आहेत.
एसटीची दरवाढ सरकारने केली नसेल तर हा निर्णय कोणी घेतला? काँग्रेसचा प्रताप सरनाईकांना टोला, म्हणाले, "खात्याला वालीच नाही"
सरकारने एसटीची दरवाढ मागे घ्यावा, या खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंबंधीचे आदेश मागे घ्यावेत किंवा विभागाला तसे आदेश द्यावेत. त्यांनी स्वतः मान्य केलं आहे की हे आदेश त्यांनी दिलेले नाहीत. त्यांना अशा निर्णयाची कल्पना नव्हती. त्याचबरोबर सरकार म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला नसेल तर मग हा निर्णय घेतला कोणी? मंत्र्यांना डावलून असे निर्णय कोण घेतंय? असा प्रश्न काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने १० वर्षाच्या ग्रिहीथाने उत्तराखंडाच्या केदारकंठावर फडकविला प्रतिकात्मक राष्ट्रध्वज
केदारकंठामध्ये तापमान उणे असतानाही तिने हा शिखर यशस्वीरित्या सर केला. त्यानंतर तिने तेथे जाऊन भारताचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज फडकविला.