Marathi News Today, 28 Oct 2022 : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपुरात होणारा ‘टाटा एयरबस’ हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यात होणार आहे. यावरून राज्यात आरोप-प्रत्योरापाच्या फैरी झडत आहेत. तर, दुसरीकडे अतिवृष्टीने राज्यातील शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून होत आहे.

Live Updates

Maharashtra News Live Today : राज्यातील ठळक घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:16 (IST) 28 Oct 2022
टाटा एअर बस प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, म्हणाल्या…

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज(शुक्रवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. टाटा एअर बस प्रकरणात सरकारने वस्तूस्थिती समोर आणावी. राज्यातील गुंतवणूक दुसरीकडे कशी जाते हा नागरिक म्हणून प्रश्न पडतो. असं त्या म्हणाल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी...

17:19 (IST) 28 Oct 2022
२६/११ चा हल्ला कोणीही विसरू शकणार नाही, तो दिवस सर्वांसाठी काळा दिवस होता – एकनाथ शिंदे

दहशतवाद विरोधात संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहेत. या परिषदेस अनेक देशांचे प्रतिनिधी आलेले असून, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या परिषदेत सहभाग नोंदवला. यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी...

16:00 (IST) 28 Oct 2022
“आता आपल्या महाराष्ट्राच्या तरुणांनी काय करायचं? आरती करा, हनुमान चालीसा करा…”; छगन भुजबळांचं विधान!

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ही गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राज्यातील आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यरोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:52 (IST) 28 Oct 2022
‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सुभाष देसाईंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले...

वेदान्त फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एअरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्यााचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. सविस्तर वाचा -

14:34 (IST) 28 Oct 2022
“आदित्य ठाकरे यांचा बाप…” अब्दुल सत्तारांच्या ‘छोटा पप्पू’ टोल्यावरुन सुनील राऊतांचा हल्लाबोल

‘टाटा एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन राज्यात राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांचा उल्लेख ‘छोटा पप्पू’ असा केला आहे. या खोचक टीकेला आमदार आणि ठाकरे गटातील नेते सुनील राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सविस्तर बातमी वाचा...

14:07 (IST) 28 Oct 2022
‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार, जर…”

‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे. सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना उत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

14:05 (IST) 28 Oct 2022
टाटा एअरबस प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचे उदय सामंतांवर टीकास्र; म्हणाले, “मग इतके महिने…”

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता टाटा एअरबसचा मालवाहू विमान बांधणी करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्यात राजकारण तापले आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर टाटा एअरबसचा एमओयू महाविकास आघाडी सरकार असताना झाला होता, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. दरम्यान, उदय सामंत यांच्या स्पष्टीकरणानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा -

13:56 (IST) 28 Oct 2022
पुण्यात चंद्रकांत पाटलांसमोरच वाजवले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारगीत, पोलिसांनी ‘डीजे’ला घेतले ताब्यात

भारतीय जनता पक्षाचे नेते, पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असलेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारगीत असलेले ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे वाजविण्यात आले. चंद्रकांत पाटील कार्यक्रमस्थळी येताच गाणे वाजविण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले आहे.

सविस्तर बातमी

13:20 (IST) 28 Oct 2022
मुंबई: पत्नीने मॉडेलसोबत रोमान्स करताना पाहिलं, कारखाली चिरडून निर्मात्याचा पळ, पोलिसांनी केली अटक

मुंबई पोलिसांनी चित्रपट निर्माता कमल किशोर मिश्रा यांना अटक केली आहे. दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यानंतर कमल मिश्रा यांनी पत्नीला कारखाली चिरडलं होतं आणि पळ काढला होता. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करत नऊ दिवसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

सविस्तर बातमी

13:18 (IST) 28 Oct 2022
Tata Airbus Project: ‘मला तोंड उघडायला लावू नका’, प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरे आणि देसाईंवर गंभीर आरोप; म्हणाले “मातोश्रीला किती टक्के…”

‘वेदान्त-फॉक्सकॉन’ प्रकल्पानंतर आता ‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. हा प्रकल्प नागपूरमधील मिहानमध्ये सुरू व्हावा असा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न होता. मात्र हा प्रकल्पही गुजरातला गेल्याने आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. यादरम्यान भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे. आपल्याला तोंड उघडायला लावू नका असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावर सुभाष देसाई यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

12:39 (IST) 28 Oct 2022
“मला त्रास दिला, तर बोकांडी बसेन”, एकनाथ खडसेंचा शिंदे-भाजपा सरकारला इशारा

भोसरी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खडसे यांचे विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भोसरी प्रकरण उचलून धरलं आहे. भोसरी प्रकरणावरून थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावरून एकनाथ खडसे यांनी सरकारला इशारा दिला आहे.

वाचा सविस्तर

11:55 (IST) 28 Oct 2022
“अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” ‘टाटा एअरबस’ प्रकल्पावरुन जयंत पाटलांचा राज्य सरकारला संतप्त सवाल

‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे.

सविस्तर बातमी वाचा...

11:54 (IST) 28 Oct 2022
“त्यांना आता साक्षात्कार झाला आहे” आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन चंद्रकात पाटलांचं टीकास्र; म्हणाले, “मातोश्रीवरुनच…”

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर भाजपा नेते चंद्रकात पाटील यांनी टोलेबाजी केली आहे.

सविस्तर बातमी वाचा...

11:47 (IST) 28 Oct 2022
दादा भुसे यांची बेधडक कार्यशैली पुन्हा चर्चेत

मालेगाव : शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या खत विक्रेत्यास अद्दल घडविणे असो की,पोलिसांच्या कृपाशीर्वादामुळे बिनदिक्कतपणे सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर बुलडोझर चालविणे असो, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांची बेधडक कार्यशैली नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. बातमी वाचा सविस्तर...

11:47 (IST) 28 Oct 2022
पुणे: पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन तरुणावर हल्ला

पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करुन टोळक्याने एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घोरपडी गाव परिसरात घडली. या प्रकरणी शिवराज साेनवणे, विनेश धिवार, तुषार गायकवाड, सुमीत गायकवाड, राहुल गायकवाड, तेजस जाधव, संजय परदेशी यांच्यासह १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी वाचा सविस्तर...

11:46 (IST) 28 Oct 2022
साताऱ्यात शंभूराजे देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली

सातारा: राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून, एकमेकांवर आरोपांच्या, टीकेच्या फैरी झडू लागल्या आहेत. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यात आरोपांचा सामना आता रंगू लागला आहे . बातमी वाचा सविस्तर...

11:46 (IST) 28 Oct 2022
चंद्रपूर: दिवाळीत वाघोबाची आणि नागाची पूजा; गोंड गोवरी समाजाची ४५० वर्षांची परंपरा

चंद्रपूर : पोंभूर्णा तालुक्यातील भिमणी गावात ४५० वर्षाची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा असलेला दिवाळीतील गायगोधण व ढालपूजण कार्यक्रम येथील आदिवासी गोंड गोवारी जमातीच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. बातमी वाचा सविस्तर...

11:45 (IST) 28 Oct 2022
नागपूर: दिव्यांग शिक्षकांना पाच महिन्यांपासून वेतन नाही, दिवाळी अंधारात

समाजातील दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांना समाज कल्याण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ऑगस्ट महिन्यापासून पगार मिळाला नाही. बातमी वाचा सविस्तर...

11:45 (IST) 28 Oct 2022
जग अण्वस्त्र हल्ल्याच्या छायेत; डॉ. संदीप वासलेकर

नागपूर : मानवी इतिहासातील हा सर्वांत धोकादायक काळ आहे. संपूर्ण जग अण्वस्त्र हल्ल्याच्या छायेत आहे. भविष्यात फार मोठ्या धोक्याच्या घटना घडण्याची भीती असून यात सृष्टीचा सर्वनाश होऊ शकतो, अशी भीती आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ. संदीप वासलेकर यांनी व्यक्त केली. बातमी वाचा सविस्तर...

11:44 (IST) 28 Oct 2022
माणुसकी : बेवारस व्यक्तीवर बौद्ध, मुस्लीम व्यक्तींनी हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार

बुलढाणा : ‘त्या’ बेवारस व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंगावरील खाणाखुणांमुळे तो हिंदूधर्मीय असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर अंत्यसंस्कार कोण करणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला… अशावेळी धावून आलेल्या बौद्ध व मुस्लीम व्यक्तींनी त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. बातमी वाचा सविस्तर...

11:43 (IST) 28 Oct 2022
यंदा नागपूर गारठणार!; २४ तासांत तापमानात ०.४ अंश सेल्सिअसने घट

नागपूर : नैऋत्य मोसमी पाऊस परतल्यानंतर आता तापमानाचा पारा वेगाने घसरला आहे. त्यामुळे उपराजधानीला यावेळी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत किमान तापमानात ०.४ अंश सेल्सिअसने घट झाली. बातमी वाचा सविस्तर...

11:43 (IST) 28 Oct 2022
‘कटुता संपवाच’, ठाकरे गटाकडून फडणवीसांना आवाहन; म्हणाले “विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा…”

तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला असं आवाहन ठाकरे गटाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आलं आहे. शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ‘बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? अशी विचारणाही ‘सामना’ अग्रलेखातून करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर

11:42 (IST) 28 Oct 2022
बच्चू कडू-रवी राणा वादावरून एकनाथ खडसेंची शिंदे गटावर खोचक टीका; म्हणाले, “बच्चू कडूंच्या माध्यमातून…”

अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर खोके घेऊन गुवाहाटीला गेल्याचा आरोप केल्यानंतर दोघांमध्ये सद्या वाद सुरू आहे. राणांच्या आरोपानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक होत त्यांना १ नोव्हेंबरपर्यंत आरोप सिद्ध करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.

वाचा सविस्तर

Jayant-Patil-Eknath-Shinde

‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे.