Maharashtra News: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर देशभरातील राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठ्या घोषणा केल्यामुळे त्यांना रिटर्न गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प हा चर्चेचा विषय ठरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा आढावा

20:47 (IST) 24 Jul 2024
अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्याच खडाजंगी? शंभुराज देसाईंनी वाढवला सस्पेन्स

अर्थमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात निधी वाटपावरून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. “आमच्या खात्याला निधी देत नसाल तर आम्ही काय जमिनी विकायच्या का?” असा प्रश्न महाजन यांनी अजित पवारांना विचारल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर आता शिंदे गटाचे नेते, मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. देसाई म्हणाले, “मंत्रि‍पदाची शपथ घेताना गोपनीयतेची शपथ दिली जाते. त्यामुळे मी त्या शपथेला बांधिल असल्याने मंत्रिमंडळ बैठकीत काय चर्चा झाली? हे मी सांगू शकत नाही, असं सूचक विधान मंत्री शंभूराज देसाई यांनी केलं. त्यामुळे अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाली का? याबाबत आता सस्पेन्स वाढला आहे.

19:32 (IST) 24 Jul 2024
केंद्रीय अर्थसंकल्पाचा सोलापुरात भोपळा फोडून निषेध

सोलापूर : केद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारला टेकू देणाऱ्या बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना एकीकडे भरघोस निधीची खैरात करताना देशाला भरपूर आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राची उपेक्षा करण्यात आल्याचा आरोप करीत, त्याच्या निषेधार्थ सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भोपळा फोडून आंदोलन केले.

18:09 (IST) 24 Jul 2024
ठाण्यातील तरुणीचा पाकिस्तानातील तरुणासोबत निकाह, बनावट कागदपत्रांप्रकरणी तरुणीची चौकशी

महिलेने बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच तिच्या मुलीच्या नावाने बनावट जन्मदाखला आणि आधारकार्ड तयार केले.

सविस्तर वाचा…

17:41 (IST) 24 Jul 2024
आरोग्यावर अडीच टक्के तरतुदीची पंतप्रधान मोदींची २०१७ ची घोषणा हवेतच! आरोग्यावरील तरतूद निराशाजनक…

२०२४- २५चा देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाला असून यात आरोग्यासाठी केवळ १.९ टक्के रक्कम दाखविण्यात आल्याने पंतप्रधान मोदींची घोषणा हवेतच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

सविस्तर वाचा…

16:49 (IST) 24 Jul 2024
जोगेश्वरीमधील उच्चभ्रू इमारतीला भीषण आग; चारजण जखमी

मुंबई : जोगेश्वरीमधील एस. व्ही. मार्गावरील दिल्ली दरबार हॉटेलनजीकच्या ‘ई – हाय’ या बहुमजली इमारतीमध्ये बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत चारजण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 24 Jul 2024
आणखी दोन दिवस पावसाचे! कुठे धो-धो, तर कुठे…

नागपूर : जुलै महिन्याच्या उत्तरार्धापासून महाराष्ट्रातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाने अद्यापही उसंत घेतली नसून राज्यात ठिकठिकाणी पाऊस सुरूच आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस हा पाऊस कायम राहणार असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा उतरणार आहे.

वाचा सविस्तर…

16:06 (IST) 24 Jul 2024
महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांत वाढ, नवी मुंबई शहरात दोन दिवसांत चार गुन्हे

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दोन दिवसांत महिला अत्याचाराचे चार गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे नातेवाईकांकडून मारहाण, कौटुंबिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे गुन्हे नोंद असून यात पती विरोधातही एक गुन्हा नोंद आहे.

वाचा सविस्तर…

16:01 (IST) 24 Jul 2024
कळवा-मुंब्य्रात जितेंद्र आव्हाड यांना धक्का; आठ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश

ठाणे : कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यापैकी अनेक पदाधिकाऱ्यांची विविध पदांवर नेमणुका करण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला असून त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेशांची मालिका सुुरू झाल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा

16:01 (IST) 24 Jul 2024
मुंबई: इंजिनच्या धडकेत रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी रेल्वे स्थानक येथे कोर्णाक एक्स्प्रेसला इंजिन जोडताना पॉइंटमन सूरज सेठ याचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ असा परिवार आहे. वडिलांचे निधन झाल्यानंतर सूरज रेल्वेत रुजू झाला होता.

सविस्तर वाचा

16:00 (IST) 24 Jul 2024
कल्याणमधील चिंचपाडा येथील माधव इमारतीमधील रहिवाशांवर पुनर्वसनात अन्याय, रहिवाशांची तक्रार

अधिकारी बदलले त्यामुळे आमच्या मागणीची कधीच कोणी गांभीर्याने दखल घेतली नाही, असे रहिवाशांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

16:00 (IST) 24 Jul 2024
महायुतीतील खदखद चव्हाट्यावर, अजित पवार गटाच्या आमदाराची मंत्र्यांवर टीका

भविष्यकाळ वाईट असून अद्याप वेळ गेलेली नाही, मंत्र्यांनी सुधारणा करावी, आमदारांच्या फाईल मार्गी लावाव्यात, असे कोकाटे यांनी सूचित केले.

सविस्तर वाचा…

15:08 (IST) 24 Jul 2024
यवतमाळ जिल्ह्यात पाऊस मुक्कामी! २५ मंडळांत अतिवृष्टी; खुनी नदीला पूर

यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मंगळवारी सकाळापासून सुरू असलेला पाऊस आज बुधवारीही कायम आहे. मंगळवारी अनेक भागात मुसळधार तर अनेक ठिकाणी संततधार पाऊस झाला. जिल्ह्यात २५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. केळापूर तालुक्यात खुनी नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने मांडवी ते पाटणबोरी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. मंगळवारी कळंब तालुक्यात घराची भिंत कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

वाचा सविस्तर…

14:39 (IST) 24 Jul 2024
दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर दर्यात जाण्यास नाखवा सज्ज

दोन महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा एकदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार असल्याने खवय्यांची ताज्या मासळीची समस्या दूर होणार आहे.

सविस्तर वाचा…

14:31 (IST) 24 Jul 2024
नवी मुंबई: महायुतीत झोपडपट्टी पुनर्वसनावरून वाद, झोपु योजना गणेश नाईकांमुळेच रखडल्याचा आरोप

तीसपेक्षा जास्त वर्षे एकहाती सत्ता नवी मुंबईत असूनही मात्र झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत एक तरी परिपत्रक आणले असेल तर दाखवा असे आव्हान त्यांनी नाईक यांना दिले आहे.

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 24 Jul 2024
विखे विरुद्ध लंके वाद चिघळला

नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नगरचे खासदार नीलेश लंके यांनी निवडू आल्यानंतर लगेचच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शिवाय पालकमंत्री विखे यांची जिल्हा प्रशासनावर असलेली पकड सैल करण्यासाठी, लोकभावनेच्या माध्यमातून विविध विभागांच्या विरोधात आंदोलनेही सुरु केली आहेत.

वाचा सविस्तर…

13:48 (IST) 24 Jul 2024
डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीच्या छताला गळती; स्मशानभूमीत पाण्याची तळी, लाकडे भिजत असल्याने टायर, केरोसिनचा वापर

दहनासाठी पार्थिक चित्तेवर ठेवले की त्यावरही पावसाच्या पाण्याती गळती सुरू होते.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 24 Jul 2024
पुणे: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खून करून तो रात्रभर मृतदेहाशेजारी झोपला

मंगळवारी आई कामावर आल्याने मुलीने दुपारी घरी जाऊन पाहिले. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सविस्तर वाचा…

13:18 (IST) 24 Jul 2024
कल्याणमध्ये सुरक्षा रक्षकांचे वेतन रखडवल्याने मंगेशी संस्कार सोसायटीच्या रहिवाशांना कोंडून ठेवले

खासगी सुरक्षा रक्षकांचे पंधरा दिवसांचे वेतन रखडून ठेवले म्हणून संतप्त झालेल्या एका सुरक्षा रक्षकाने बलदंड (बाऊन्सर) सात सुरक्षा रक्षक सोबत घेतले.

सविस्तर वाचा…

13:15 (IST) 24 Jul 2024
लोकशाही वाचवण्यासाठी मी इंडिया आघाडीचा प्रचार करण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे-श्याम मानव

चार प्रतिज्ञापत्रांवर अनिल देशमुखांवर सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
त्या काळात अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते. अनिल देशमुख यांनी त्या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या नाहीत. कारण त्यांनी सह्या केल्या असत्या तर ते सुटले असते मात्र उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अनिल परब हे तुरुंगात गेले असते. अनिल देशमुख यांनी १३ महिने तुरुंगवास सहन केला. मात्र त्यांनी भाजपाला हव्या असलेल्या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या नाहीत. ही गुंडशाही, झुंडशाही आणि हुकूमशाही आहे. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आपला देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात यावंसं वाटतं आहे. त्यामुळे मी इंडिया आघाडीचा प्रचार करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. असं श्याम मानव यांनी म्हटलं आहे.

13:13 (IST) 24 Jul 2024
पुणे: लष्करात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणारा जवान ताब्यात; लष्करी गुप्तचर यंत्रणेची कारवाई

लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जवानाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 24 Jul 2024
पत्रीपुलावर नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाची बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी

पुलाच्या मध्यभागी बस बंद पडल्याने ती मागून लोटून पुलाच्या किंवा रस्त्याच्या बाजुला घेणेही शक्य नव्हते.

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 24 Jul 2024
IAS पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ‘वायसीएम’च्या ‘त्या’ डॉक्टरांना क्लीन चिट! चौकशीत डॉक्टर निर्दोष

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना वाय.सी.एम रुग्णालयाने सात टक्के दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 24 Jul 2024
Manoj Jarange Live News: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण घेतलं मागे

लोक मला म्हणाले, तुम्ही आम्हाला पाहिजेत. तुम्ही उपोषण करायचं नाही. तुम्ही आम्हाला सांगा कुणाला पाडायचं आहे. तुम्ही म्हणाल त्यांना आम्ही पाडू. आमच्या बापाला जरी पाडायचं असेल निवडणुकीत तरी आम्ही पाडू. समाजानं सांगितलं की तुम्ही फक्त सगळ्यांमध्ये राहा – मनोज जरांगे पाटील

12:28 (IST) 24 Jul 2024
Manoj Jarange Live News: मराठा समाजाला काही प्रमाणात का होईना, आरक्षण देऊ शकलो – जरांगे पाटील

उद्या सरकारनं मला मारलं किंवा मी मेलो तरी माझं जीवन सार्थकी लागलं आहे. मी मराठा समाजाला फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही प्रमाणात आरक्षण देऊ शकलो. मी समाजाच्या कामी माझं आयुष्य लावलं आहे – मनोज जरांगे पाटील

12:27 (IST) 24 Jul 2024
Manoj Jarange Live News: मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित केलं

रात्री त्यांनी सलाईन लावल्या. पण त्याचा उपयोग काय? त्या उपोषणाला काय अर्थ आहे? मग नुसतं झोपायचंच काम आहे. समाजाला वेड्यात काढल्यासारखं झालं असतं. म्हणून उपोषण थांबवून कामाला लागण्याचा निर्णय मी घेतला – मनोज जरांगे पाटील

12:00 (IST) 24 Jul 2024
ठाणे: देहविक्री करणाऱ्या महिलांचा उद्योजकतेकडे प्रवास

अनेक वर्षापासून देहविक्री करणाऱ्या महिलांना यातून बाहेर पडण्यासाठी राज्य शासन वेगवेगळे उपक्रम राबवीत आहे.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 24 Jul 2024
ससूनमधील रुग्ण बाहेर गेला कसा? रुग्णालयात त्या रात्री नेमकं काय घडलं…

नीलेश हिनवटी (वय ३२, रा. मध्य प्रदेश) असे या रुग्णाचे नाव आहे. त्याच्यावर ससूनमधील अस्थिव्यंगोपचार विभागात उपचार सुरू होते.

सविस्तर वाचा…

11:49 (IST) 24 Jul 2024
पुणे: लहान मुलांमध्ये फ्लूची साथ! जाणून घ्या काय काळजी घ्यावी…

पावसाळा सुरू झाल्यापासून साथरोगांचा प्रसार वाढला आहे. सध्या लहान मुलांमध्ये फ्लूची साथ सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा…

11:48 (IST) 24 Jul 2024
दोन कुख्यात गँगस्टरला अटक, राजुरा गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी…

चंद्रपूर : राजुरा येथे शिवज्योतसिंह देवल (२८) यांच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करणाऱ्या लल्ली शेरगील व शगीर उर्फ मोणू कादीर शेख या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास अटक केली. तर बल्लारपूर पेट्रोल बॉम्ब हल्ला प्रकरणात देखील जबलपूर येथून दोन गँगस्टरला अटक करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर…

11:48 (IST) 24 Jul 2024
पिंपरी : पूजा खेडकर यांना अंपगत्वाचे प्रमाणपत्र देणारे ‘वायसीएम’चे डॉक्टर अडचणीत? जिल्हाधिकाऱ्यांचा महत्वाचा आदेश

खेडकर यांना वायसीएम रुग्णालयातून २०२२ मध्ये अपंगत्वाचेे प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह

Marathi News Live Updates: राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर