Mumbai Live News Today : देशासाठी आज ऐतिहासिक दिवस ठरणार आहे. चांद्रयान ३ चे आज सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष आज भारताकडे असणार आहे. तर, दुसरीकडे राज्यात अनेक राजकीय घडमोडी घडत आहेत. शरद पवारांची २५ ऑगस्ट रोजी कोल्हापुरात सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसंच, कांदाप्रश्नीही शेतकरी आक्रमक होत आहेत. कांदाप्रश्नावरून आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
Marathi News Today : राज्यातील राजकीय घडामोडी, पावसाचे अपडेट्स, चांद्रयान ३ लँडिंगचे थेट प्रक्षेपण एका क्लिकवर
बुलढाणा: जळगाव तालुक्यातील मोठी असलेल्या सुनगाव ग्रामपंचायतच्या सरपंचावरील अविश्वास प्रस्तावादरम्यान ग्रामपंचायत परिसरात पोलिसांसमोरच कार्यकर्त्यांनी राडा केला. विरोधी पक्षाच्या तीन सदस्यांना वाहनातून बळजबरीने बाहेर काढून सोबत नेल्याने अविश्वास बारगळला खरा मात्र यामुळे अगदी ग्रामीण भागातील राजकारण कोणत्या स्तराला गेले याचा प्रत्यय आला.
कोल्हापूर : शाळा इमारतीच्या भाड्यापोटी एक महिन्याचे ९५ हजार ५७७ रुपये वेतनाची रक्कम लाचरूपात मागणी करणाऱ्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिपाई अशा तिघांवर बुधवारी कारवाई करण्यात आली.
राहुल गांधींनी लडाखमध्ये
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 23, 2023
मोटार सायकल चालवली…
म्हणून उद्धव ठाकरे पाठ थोपटतायत कारण,
हे पंढरपूरपर्यंत वाहन चालवत गेले होते.
कर्तृत्व नसलं की,
अशी थेरं करावी लागतात…
नागपूर: भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचे विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी मुंबईत नियोजित 'इंडिया'च्या बैठकीसाठी महाविकास आघाडी व सहकारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आज पूर्वतयारी आढावा बैठक झाली. pic.twitter.com/nE4aE43jjm
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 23, 2023
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातून पदयात्रा ३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
नागपूर: उपराजधानीत डेंग्यू सदृष्य आजाराचे थैमान असतांनाच आता दुषित पाण्यामुळे झालेल्या दोन कावीळच्या रूग्णांची नोंद झाली. या रुग्णांवर डागा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पाचोरा व भडगाव तालुक्यांतील सुमारे १५ हजार लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन प्रशासन स्तरावर करण्यात आले होते.
फळ बाजारात १७ नोव्हेंबर २०२२ मध्ये घडलेल्या घटनेत मोठ्या प्रमाणात गाळ्यांचे नुकसान झाले होते.
पनवेल: पनवेल शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. पनवेल पालिका प्रशासनाने पोलीसांच्या मागणीनंतर ३० वार्डन देण्याची तयारी दर्शविली आहे.
पनवेल: रहाण्यायोग्य वसाहत अशी जाहिरात केली जात असलेल्या खारघर वसाहतमधील सेक्टर ३४ आणि ३५ मधील रहिवाशांना पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहे.
आपलं चांद्रयान-३ आज ६ वा. ४ मि. चंद्रावर उतरणार आहे… विज्ञानयुगातील भारताची हि भरारी जगाला हेवा वाटावा अशीच आहे. भारतीय हा क्षण सणासारखा साजरा करत आहेत. भारताची हि वैज्ञानिक समज, चिकित्सक तर्कबुद्धीच भारताला जगाचं नेतृत्व करायची संधी देईल. जय हिंद ??#Chandrayaan3Landing pic.twitter.com/JhCLq7SJtZ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 23, 2023
मुंबई: संशयीतरित्या लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या २० वर्षीय तरूणाला हटकले असता त्याने पोलिसाच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात घडला.
सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे येथील तळजाई पाचगाव-पर्वती वन विभागामध्ये उगमस्थान असलेला ४० फुटी नैसर्गिक नाला गायब झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. महापालिकेने प्रायमूव्ह संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात या नाल्याची नोंद होती. सविस्तर वाचा
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी राज्य शासनाने एक अतिरिक्त आयुक्त आणि दोन उपायुक्त या पदांना मंजुरी दिली होती. त्यानुसार दोन पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस उपायुक्तांची संख्या आता पाचवर पोहोचली आहे. सविस्तर वाचा
नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांवर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या उच्च शिक्षण संचालकांच्या पत्राला राज्यातील विद्यापीठांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे. उच्च शिक्षण संचालकांनी पत्र पाठवून दहा दिवस उलटून गेल्यानंतरही एकाही विद्यापीठाने प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा
विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत असल्याने या प्रकाराला आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चार पथके नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे वृक्षतोडीला चाप बसणार आहे. सविस्तर वाचा
विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब आणि भाविकांच्या भावनांचा विचार करून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी ही माहिती दिली. सविस्तर वाचा
पावसाळ्यातील साथीचे आजार नियंत्रणासाठी जूनपासून कल्याण डोंबिवली पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने तीन लाख घरांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून आढळून आलेल्या विविध प्रकारच्या साथ आजारातील रुग्णांना तातडीने उपचार करुन दिले. सविस्तर वाचा
घोडबंदर येथील गायमुख भागात बुधवारी सकाळी वाहन बंद पडल्याने गायमुख ते भाईंदर येथील नवघर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे गुजरात, वसई, भाईंदर भागातून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत.
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग (दुहेरी बोगदा) प्रकल्पाच्या कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नुकत्याच निविदा जारी करण्यात आल्या आहेत.
संशयीतरित्या लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या २० वर्षीय तरूणाला हटकले असता त्याने पोलिसाच्या हाताला चावा घेतल्याचा प्रकार विक्रोळी परिसरात घडला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी तरूणाला अटक केली. सविस्तर वाचा
उरण: शेकडो वर्षांपासून उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान जलप्रवास सुरू आहे. मात्र या प्रवासात प्रवासी जेट्टी, वाहनतळ, वीज आणि सुरक्षा यांचा अभाव गाळाची समस्या कायम आहे.
नाशिक: संक्षिप्त मतदार यादी मोहिमेंतर्गत घरोघरी मतदार नोंदणी मोहिमेत जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २० टक्के गृहभेटी दृष्टीपथास आल्या आहेत.
मुंबई: ‘ओमेगा’ या नामांकीत विदेशी कंपनीच्या घड्याळांचा परस्पर अपहार करणाऱ्या ४७ वर्षीय कर्मचाऱ्याला बोरिवली पोलिसांनी ४८ तासांत अटक केली. आरोपीने सुमारे २७ लाख रुपयांच्या घड्याळांचा अपहार केला होता.
नवी मुंबईत आता भाडेकरू देताना पोलीस एन.ओ .सी अर्थात ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र पोलीस ठाण्याला भाडेकरूंचे ओळखपत्र, पॅनकार्ड आणि फोटो जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये दराने खरेदीचा निर्णय जाहीर केला.
पुणे: कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (CII) वतीने देशातील पहिल्या ‘नेक्सजेन मोबिलिटी शो’चे (NexGen mobility show) आयोजन पुण्यात करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीत दोन आणि विधानसभा निवडणुकीत १५ जागा मिळविण्याचा रिपाईचा प्रयत्न आहे.
पुणे: राज्यभरात डोळे येण्याच्या साथीचे रुग्ण वाढत आहेत. पुण्यातही ही साथ फैलावली असून, दररोज पाचशेहून अधिक रुग्ण आढळत आहेत.