Maharashtra Live News Updates, 26 August 2024 : विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर आल्यामुळे सध्या महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांच्या नेत्यांचे सध्या महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जात आहे. तसेच उमेदवारांची चाचपणी करत आगामी रणनीती आखली जात आहे. आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये पोलिसांनी दोन्ही गटाच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यासह राज्यातील राजकीय, सामाजिक घडामोडी वाचा, राज्यातील हवामानाचे अपडेट्स जाणून घ्या आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Live Updates

Maharashtra News Live Today, 26 August 2024

10:45 (IST) 26 Aug 2024
पुणे विमानतळाबद्दल मुरलीधर मोहोळ यांची मोठी मागणी, म्हणाले…

पुणे : पुणे शहराचे महापौरपद भूषवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या मुरलीधर मोहोळ यांनी कामाचा सपाटा सुरू केला आहे. नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना मोहोळ यांनी महाराष्ट्रामधील काही शहरातून विमानांची उड्डाणे सुरू केली आहे.

वाचा सविस्तर…

10:45 (IST) 26 Aug 2024
पिस्तुलाच्या धाकाने तरुणाची लूट, येरवडा पोलिसांकडून तिघे अटकेत

पुणे : पिस्तुलाच्या धाकाने तरुणाला धमकावून त्याच्याकडील सोनसाखळी, अंगठी असा ऐवज लुटून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

वाचा सविस्तर…

10:44 (IST) 26 Aug 2024
कृषीच्या २५८ जागांच्या मागणीपत्राची एमपीएससीकडून परतपाठवणी

पुणे : कृषी विभागाच्या २५८ जागांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २०२२ च्या शासन निर्णयाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचे पालन कृषी विभागाने न केल्यामुळे ‘एमपीएससी’ने २५८ जागांसाठीचे मागणीपत्र कृषी विभागाकडे परत पाठवले आहे.

वाचा सविस्तर…

10:32 (IST) 26 Aug 2024
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजपा आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.

10:29 (IST) 26 Aug 2024
MLA Rohit Pawar : रोहित पवारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्का, मधुकर राळेभात यांचा राजीनामा

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत-जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळेभात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राजीनामा देताना मधुकर राळेभात यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, मधुकर राळेभात यांनी राजीनामा दिल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर रोहित पवारांना धक्का बसला आहे.

आमदार आदित्य ठाकरे