Mumbai Maharashtra News Today : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांविषयीच्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. यासंबंधीच्या बातम्या वाचकांना इथे वाचायला मिळतील.
Maharashtra News Today, 19 February 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
नाशिक : शहरातील लवाटेनगर येथील जलकुंभातील वितरण प्रणालीतील दोषामुळे संभाजी चौकातील रहिवाश्यांना चार ते पाच दिवसांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाकडून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे वारंवार सांगितले गेले. परंतु, अद्याप अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही.
नाशिक : कांदा निर्यात बंदी काहीअंशी उठवण्याची तयारी सरकारने सुरू केल्यानंतर सोमवारी घाऊक बाजारातील कांदा दरात ६०० रुपयांनी वाढ होऊन ते क्विंटलला सरासरी १८५० रुपयांवर पोहोचले. शिवजयंतीमुळे सोमवारी बाजार समितीत कांद्याची आवक कमी आहे.
नागपूर : एका तरुणाने एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १०.७३ लाख रुपये घेतले. मात्र, दुसऱ्याच तरुणीला जाळ्यात अडकवून लग्नासाठी निवड केली.
नागपूर: लातूर येथील गुरू ऑनलाईन एक्झाम सेंटर येथे परीक्षा देणाऱ्या दोन उमेदवारांविरुद्ध धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही निवड यादीत टॉपर आहेत.
बुलढाणा : राजकीय पद देण्याचे आमिष दाखवून शेगावमधील एका कथित पुढाऱ्याने अमरावती येथील महिलेच्या अब्रूचे धिंडवडे उडविले. फेसबुकवर ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस पक्षाचे पद देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला जाळ्यात ओढले.
पुणे : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून एक लाखांची लाच घेणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
पनवेल ः पनवेल परिसरामध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले. यामध्ये पनवेल महापालिका प्रशासनाने पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मुख्य रस्त्यावरुन मिरवणूक काढली होती. यामध्ये विविध शाळेंमधील विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षकांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. शिवकालिन पारंपारिक वेशभूषेमध्ये विद्यार्थी व महिलांनी या मिरवणूकीत सहभाग घेतला होता. चित्ररथामुळे पनवेलचे वातावरण शिवमय झाले होते. विद्यार्थ्यांनी लेझीम खेळ, ढोलपथकांच्या तालावर परिसर दणाणून निघाला होता. पनवेल शहरामधील मिरवणूकीच्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी हातामध्ये लोकसंदेशाचे फलक घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
शहरातील मुख्य चौकामध्ये भगव्या झेंडे व पताक्यांच्या माळ्यांमुळे शहरातील अनेक चौकाचा परिसर भगवा मय झाला होता. रात्रीच्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभारलेल्या अश्वारुढ शिवाजी महारांच्या पुतळ्याचा परिसरात पालिकेने केलेल्या विजेच्या आकर्षक रोषणाईमुळे हा परिसर नागरिकांचे आकर्षण बनले आहे. पालिका प्रशासनाने सोमवारी सकाळी ११ वाजता वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विद्यार्थी व नागरिकांसाठी शाहीर राहुल सोनावणे यांच्या पोवाड्याचे आयोजन केले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे व्यवस्थापनातील गुरु असलेले अनेक पैलु शाहीर सोनावणे यांनी उलघडून सांगीतले. तसेच प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी याच गनिमीकाव्याने अफजल खानाचा केलेल्या वधाचे कथन पोवाड्यातून केले. त्यानंतर नाट्यगृहात गार्गी ग्रुपने शिवचरीत्र सादर केले. यावेळी लेझीम पथकासह अनेकांचा सत्कार पालिकेने केला. पनवेल शहरासह खांदेश्वर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे व खारघर येथेही शिवजन्मोत्सवासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदी पाणी योजना मंजूर झाले आहे. या पाणी योजनेच्या कामकाजाला सुरुवात होऊन इचलकरंजीला पाणी मिळावे या मागणीसाठी आज शिवजयंती दिनी इचलकरंजी येथे ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या महिला संघटनेतर्फे सुळकूड पाणी प्रश्नी आमरण उपोषणास सुरवात झाली आहे. यामध्ये श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे,सुषमा साळुंखे, ज्योत्स्ना भिसे या सहभागी झाल्या आहेत,असे सुळकुड पाणी योजना कृती समितीने सांगितले.
इचलकरंजीला दूधगंगा नदीचे पाणी मंजूर झाले असताना कागल तालुक्यातील लोकांनी विरोध केला. नंतर त्यामध्ये राजकीय नेते उतरले. पालकमंत्री हसन मुश्रीफ ,भाजपचे नेते समर्जितसिंह घाटगे यांनी इचलकरंजीला दूधगंगा नदीतून पाणी देण्यास विरोध केला आहे. इचलकरंजीला पाणी दिले तर कागल तालुक्यात पिण्याला, शेतीला पाणी कमी पडेल अशी त्यांची भूमिका आहे. तर या प्रश्नावर मंत्रालयात मुख्यमंत्री समवेत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजी मध्ये दिले होते. मात्र अद्यापही बैठक झाली नसल्याने इचलकरंजीतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. दूधगंगा पाणी योजनेचा प्रश्न चांगला स्थापला आहे.
कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडे असणाऱ्या वळीवडे गावामध्ये पंचगंगा नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. रसायन युक्त सांडपाण्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. काही मासे तडफडून मरत आहेत. जीवन – मरणाच्या वाटेवर असणारे असे मासे गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. तर असे मासे खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
अमरावती : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे आणि मिरज विभागातील तारगाव, मसुर आणि सिरवडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतले आहे. त्यामुळे गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस दि. २१ फेब्रुवारीला फक्त पुण्यापर्यंतच धावेल.
अकोला : देशातील १७ कोटी मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. केवळ मत देणारे न राहता मत घेणारे नेतृत्व समाजातून निर्माण झाले पाहिजे. महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवण्याचा निर्धार करा, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केले. ‘एआयएमआयएम’च्यावतीने शहरातील गडंकी मार्गावरील शाह जुलफिकार मैदान येथे रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
अकोला : पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी येथे केले.
कोल्हापूर : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आज कोल्हापूरात उत्साही वातावरणात सुरुवात झाली. पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योत, नानाविध देखावे, विविध स्पर्धा, चौका चौकात लाभलेले भगवे ध्वज त्यामुळे वातावरण शिवमय झाले आहे.
नागपूर : नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी, बारावीत बदल केला आहे. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे.
पुणे : पुणे मेट्रोचे रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मोदींचा दौरा लांबणीवर पडला असल्याने उद्घाटनाचा मुहूर्तही पुढे ढकलावा लागला आहे.
पुणे : छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते. तेवढेच ते व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकुशलतेचे सोमवारी वर्णन केले.
मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान नव्या ‘अटल सेतू’वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहे. पुणे ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर शिवनेरी बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी बसतात.एवढ्याच तिकीट दरात पुणे-मुंबई-पुणे शिवनेरी बसचा प्रवास अधिक वेगवान होईल.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या ताकदीने काँग्रेसची बाजू मांडत आहेत. परंतु, अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकींप्रमाणे वडेट्टीवारही लवकरच भाजपात जातील अशा अफवा पसरल्या आहेत. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाला साध देण्यासाठी जे लोक भाजपात येणार असतील त्यांच्यासाठी भाजपाचा दुपट्टा तयार आहे. परंतु, विजय वडेट्टीवार यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही.
सांगली : चांदोली धरण परिसरात सोमवारी सकाळी भूकंप झाला असून ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य धक्का असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. आज सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी वारणावती पासून १४.४ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. सौम्य भूकंप असल्याने याची जाणीव झालेली नाही. भूकंपामुळे चांदोली धरणाला कोणतीही हानी पोहचलेली असून धरण सुरक्षित असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे म्हणाले, त्या काळात मोठी चूक झाली. मंडल आयोगासह इतरांकडून एक चूक झाली. केवळ मागासवर्गालाच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास वर्गालाही आरक्षण द्यायला हवं होतं. कोणीही, कुठल्याही जाती-धर्मातील व्यक्ती जर आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्या व्यक्तीला आरक्षण मिळायला हवं. परंतु, त्यांना आरक्षण नाही. या आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना मदत करणं हा विचार त्यावेळी करायला हवा होता आणि तो आरक्षणाच्या माध्यातून मांडायला हवा होता.
छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे जनक : उदयनराजे भोसले
छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज (१९ फेब्रुवारी) सकाळी नागपूर येथे शिवजयंती साजरी केली आणि सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे. महाराजांचा लोक कल्याणाचा विचार होता आणि शिवराय हे लोकशाहीचे जनक आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार महाराजांचा हा विचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्या जोडीने राज्यासह देशाचा विकास करत आहे.