Mumbai Maharashtra News Updates, 29 August 2024: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजाचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी हे सगळं सरकारचं पाप असल्याची टीका केली असताना सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुतळ्याच्या दर्जासाठी नेमकं कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत दोन्ही बाजूंकडून बहुमताचे दावे केल जात असून सत्ताधाऱ्यांनी पराभवाच्या भीतीमुळेच निवडणुका पुढे ढकलल्याची टीका केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 29 August 2024: शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून राजकारण तापलं!

21:37 (IST) 29 Aug 2024
Western Railway Block: पश्चिम रेल्वेवर दहा तासांचा ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ८ दरम्यान गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर १० तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

21:36 (IST) 29 Aug 2024
पिंपरी: रस्त्यांची पुन्हा चाळण, यापुढे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर…

पिंपरी शहरात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. रस्त्यांवर खड्डेच-खड्डे पडले आहेत. अवघ्या आठ दिवसात ८८८ खड्डे आढळले आहेत. त्यामुळे पुढील वर्षीपासून कंत्राटदार, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

सविस्तर वाचा

18:40 (IST) 29 Aug 2024
हरकतींसाठी महिन्याची मुदत द्या, पनवेल प्रारूप आराखड्याबाबत शेकापची महापालिकेकडे मागणी

पनवेल : पनवेल महापालिकेने ८ ऑगस्टला जाहीर केलेल्या प्रारूप विकास आराखड्यावर हरकती आणि सूचना देण्यासाठी ७ सप्टेंबरची अंतिम मुदत संपण्यापूर्वीच आणखी महिनाभराची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.

सविस्तर वाचा…

17:55 (IST) 29 Aug 2024
उरणकरांची सुरक्षितता रामभरोसे?

उरण : उरण-पनवेल या रहदारीच्या मार्गावर जुलैत झालेल्या हत्याकांडानंतर उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सविस्तर वाचा…

17:54 (IST) 29 Aug 2024
वादग्रस्त ‘आयएएस’ अधिकारी शुभम गुप्ताच्या अडचणीत वाढ, कार्यकाळातील सर्व प्रकरणांची होणार चौकशी…

गडचिरोली : भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.

वाचा सविस्तर…

17:51 (IST) 29 Aug 2024
Aaditya Thackeray on Vaibhav Naik: काही दुर्घटना घडू नये म्हणून वैभव नाईकांना संरक्षण मिळायला हवं – आदित्य ठाकरे

आम्ही कुणाला घाबरत नाही. कोंबडीचोरांना तर घाबरतच नाही. पण हे असं करणं योग्य नाही. काही ठराविक लोकांनी पोलिसांना धमक्या दिल्या, पोलिसांना शिवीगाळ केली. एका पोलिसाला दगड बसला आहे. वैभव नाईक यांना पोलीस संरक्षण देणं गरजेचं आहे. ते स्वत: दमदार आहेत, पण कुठे काही दुर्घटना घडू नये म्हणून मला हे योग्य आहे असं वाटतं – आदित्य ठाकरे</p>

17:50 (IST) 29 Aug 2024
कोपरखैरणेत पदपथांची दुरुस्ती अखेर सुरू, सेक्टर १९ येथील मोठ्या खड्ड्यांमुळे पदपथ दोरी बांधून वापरासाठी बंद

नवी मुंबई : कोपरखैरणेतील पदपथांची अतिशय वाईट अवस्था झाली असून पदपथांवरून चालणे धोक्याचे झाले आहे. याबाबत शनिवारी ‘कोपरखैरणेत पदपथांची दुरवस्था’ या मथळ्याखाली लोकसत्ताने बातमी प्रसिद्ध करताच मनपाच्या संबंधित विभागाला जाग आली असून पदपथांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.

सविस्तर…

17:48 (IST) 29 Aug 2024
शिक्षक, मदतनीसांची चारित्र्य पडताळणी; नवी मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी निर्णय

नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व बालवाडी शिक्षिका, मदतनीस तसेच पालिका आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात कार्यरत असणाऱ्या ठोक मानधन, घड्याळी तासिका अशा सर्वच शिक्षकांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा…

17:48 (IST) 29 Aug 2024
मुसळधार पावसातही कोरड्या धरणाची कथा…

नाशिक : मुसळधार पावसात जिल्ह्यातील लहान-मोठी सर्वच धरणे तुडूंब भरली असताना पांझण नदीवरील नागासाक्या हे एकमेव धरण मात्र त्यास अपवाद ठरले. नांदगाव तालुक्यातील हे धरण आजदेखील कोरडेच आहे. दोन ते तीन किलोमीटरचे पाणलोट क्षेत्र आणि वरील भागातील (मनमाड) पावसावर ते क्वचितच भरते. तीन दशकांच्या इतिहासात एक-दोन वर्षाआड अपवादाने भरणारे नागासाक्या धरणाच्या बांधणीतून नेमके काय साध्य झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा सविस्तर…

17:45 (IST) 29 Aug 2024
देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी धुळ्यात मोर्चा

धुळे : सात डिसेंबर २०२३ रोजी नंदुरबार ते मुंबई पायी काढण्यात आलेल्या बिढार मोर्चासमोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनांची ताबडतोब अंमलबजावणी करावी, यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

वाचा सविस्तर…

17:44 (IST) 29 Aug 2024
डोंबिवली जवळील २७ गावांमधील पथदिव्यांचे काम घेण्यासाठी राजकीय ठेकेदारांमध्ये चढाओढ

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील २७ गावांमधील पथदिव्यांची २६ कोटीची कामे घेण्यासाठी राजकीय आशीर्वाद असलेल्या ठेकेदारांमध्ये जोरदार चढाओढ लागली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही कामे होणार असल्याने आपल्याच ठेकेदाराला हे काम मिळावे म्हणून काही राजकीय मंडळींकडून पालिका अधिकाऱ्यांवर जोरदार दबाव आणला जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

वाचा सविस्तर…

17:40 (IST) 29 Aug 2024
आरोग्य विभागाच्या रुग्णालयांची सुरक्षा वाऱ्यावर ! तीन महिने सुरक्षा रक्षकांना पगारच नाही…

मुंबई: कोलकत्ता येथील वैद्यकीय महाविद्यालयात एका डॉक्टरवर झालेला अत्याचार व हत्येचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर केंद्र सरकारने रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाईल असे जाहीर केले. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशीच भूमिका जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात आरोग्य विभागाच्या राज्यातील रुग्णालयांमध्ये पुरेशी व सक्षम सुरक्षा व्यवस्था नसल्याचे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचेच म्हणणे आहे.

सविस्तर वाचा

17:33 (IST) 29 Aug 2024
शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधील घराला काळे फासले; संभाजी ब्रिगेडची आपटेंच्या घरासमोर निदर्शन

मालवण राजकोट येथील शिवरायाचा पुतळा कोसळण्यास कारणीभूत असलेले येथील शिल्पकार जयदीप आपटे यांच्या घरासमोर गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी आपटे यांच्या बंद दरवाजाला काळे फासण्यात आले.

सविस्तर वाचा…

17:19 (IST) 29 Aug 2024
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत, सुरक्षा रक्षकाकडून गाडीची स्वच्छता, चित्रफित व्हायरल

बुलढाणा: बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाच्या शिवसेनेचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या कृतीवरून राजकीय वादळे उठते, त्यांच्या वादंग निर्माण होते. आमदार गायकवाड आणि वाद-वादंग-वादळ असे समीकरणच मागील दोन वर्षांपासून तयार झाले आहे.

सविस्तर वाचा

16:50 (IST) 29 Aug 2024
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प,विक्रीयोग्य घटकातील भूखंडांची विक्री ?

मुंबई: ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी बीडीडी चाळअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध होणाऱ्या विक्रीयोग्य घटकातील भूखंडांची (चटई क्षेत्र निर्देशांकासह) विक्री करण्यात येण्याची शक्यता आहे. बीडीडी पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाला निधीची चणचण भासू लागल्याने विक्रीयोग्य घटकातील उपलब्ध भूखंडांवर सदनिका बांधून विकण्यापेक्षा भूखंड विकणे योग्य पर्याय होईल का याची व्यवहार्यता तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

16:42 (IST) 29 Aug 2024
मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना पाडणार? निर्वाणीचा इशारा देत म्हणाले, “मला…”

देवेंद्र फडणवीसांना इशारा देत मनोज जरांगे म्हणाले, मी सगळं काही साफ करून टाकेन. तुम्हाला ग्रामपंचायतीचा सदस्यही होऊ देणार नाही. माझ्या नादाला लागू नका. तुम्ही आमचे दुश्मन नाहीत. मला तुरुंगात टाकणार आहे. टाका तुरुंगात. इथे बसायचं काय अन् तिथे बसायचं काय? मला तुरुंगात टाकल्यावर भाजपची एकही सीट येणार नाही. नागपूरची सीटही पडेल; असा इशाराच मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना दिला.

16:42 (IST) 29 Aug 2024
मालवण राजकोट किल्ल्यावरील राडा प्रकरणी राणे आणि ठाकरे समर्थकांवर गुन्हा दाखल

मालवण राजकोट किल्ल्यावर काल बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी मालवण पोलिसांनी राणे समर्थक, ठाकरे गटातील दंगा करणाऱ्या ४२ जणांसह अनोळखी दीडशे जणांवर गुन्हा दाखल केले आहे, अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. सविस्तर वाचा

16:41 (IST) 29 Aug 2024
आळंदीच्या इंद्रायणीत तरुणीने घेतली उडी; गेल्या चार दिवसात उडी घेतल्याची दुसरी घटना

पुण्याच्या आळंदीमध्ये आज सकाळी अज्ञात युवतीने इंद्रायणी नदीत उडी घेतली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तरुणीने स्वतःला वाचवण्यासाठी नागरिकांना हाक देत असल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.

सविस्तर वाचा

16:01 (IST) 29 Aug 2024
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात कापड आणि कागद भरले होते, नाना पटोलेंचा आरोप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत अशी माहितीही समोर येते आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं जे डोकं होतं त्यात या शिल्पकाराने कागद आणि कापड भरलं होतं, ही बाबही निदर्शनाला आली असल्याचं म्हणत नाना पटोलेंनी हा आरोप केला आहे. पेशवाईच्या काळात जसा छत्रपती शिवरायांचा अपमान केला जात होता तसाच लोकशाही माध्यमातून आलेल्या सरकारचा अपमान केला. असंवैधिनिक सरकारने जाणूनबुजून महाराजांचा अपमान केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून पुतळा उभारला गेला, त्यानंतर आठ महिन्यांताच पुतळा पडला. याचं मुख्य कारण फक्त आर्किटेक्ट नाही किंवा मूर्तीकार नाही पण आमचं हे म्हणणं आहे की केंद्र आणि राज्य सरकारची ही चूक आहे” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

15:46 (IST) 29 Aug 2024
भंडारा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारली

भंडारा : रिक्त जागा व अपूऱ्या यंत्रसामुग्रीचा ठपका ठेवत राज्यातील एकूण ८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नाकारली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केलेल्या तपासणीनंतर आठ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची मान्यता लांबणीवर पडली आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्याचाही समावेश आहे.

सविस्तर वाचा

15:38 (IST) 29 Aug 2024
विदेशी चलनाचे आमिष दाखवून फसवणूक; दोघांना अटक

मुंबई : विदेशी चलनाच्या बदल्यात भारतीय चलन देण्याचे आमिष दाखवून १५ लाखांचे विदेशी चलन घेऊन पळून गेलेल्या दोघांना अटक करण्यात वांद्रे – कुर्ला संकुल (बीकेसी) पोलिसांना यश आले. गुरुकुमार उपेंद्र सहानी आणि मृत्यूजंय विजयकुमार गर्ग अशी या दोघांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

15:30 (IST) 29 Aug 2024
पर्युषण पर्वादरम्यान पशुहत्या, मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घाला; मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई : पर्युषण पर्व काळात म्हणजेच ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे,शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटीजच्या वतीने ही याचिका करण्यात आली.

सविस्तर वाचा

14:34 (IST) 29 Aug 2024
ठाणे : वागळे इस्टेटमधील बहुमजली वाहनतळाची क्षमता वाढणार

ठाणे : येथील वागळे इस्टेट भागातील नेहरूनगरमधील भुखंडावर उभारण्यात येणाऱ्या बहुमजली वाहनतळाच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. या नव्या आराखड्यानुसार ५४५ ऐवजी ७१८ वाहन क्षमतेचे वाहनतळ उभारण्यात येणार असून दुचाकी वगळून तीन आणि चारचाकी वाहनांसाठीच हे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. एकूणच नव्या आराखड्यामुळे वाहनतळाची क्षमतेत वाढ होणार आहे.

सविस्तर वाचा…

14:22 (IST) 29 Aug 2024
उल्हासनगर पालिका अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा, जाहिरात घोटाळ्यातील कारवाई रोखण्याचा प्रयत्नाचा अधिकाऱ्याचा आरोप

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी याप्रकरणी खुलासा केला असून शहरातील जाहिरात घोटाळ्यातील कारवाई रोखण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले आहे.

सविस्तर वाचा…

14:17 (IST) 29 Aug 2024
‘एफडीए’च्या नावावर बनावट पथकाकडून छापेमारी, व्यवसायिकांची लूट

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागातील (एफडीए) भरारी पथकाच्या नावावर राज्यातील काही भागात बनावट भरारी पथके व्यावसायिकांवर छापे घालून वसुली करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात धुळे जळगाव जिल्ह्यात प्रत्येकी एक गुन्हाही दाखल झाला आहे.

सविस्तर वाचा…

14:16 (IST) 29 Aug 2024
नागपुरात डॉक्टरांनाही डेंग्यू, चिकनगुनियाचा विळखा

नागपूर : उपराजधानीत डेंग्यू आणि चिकनगुनियाने डॉक्टरांनाही विळखा घातला आहे. मेडिकल, मेयो या दोन्ही रुग्णालयातील सुमारे १२५ डॉक्टरांना हा आजार झाला असून त्यापैकी सुमारे १० डॉक्टरांवर उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

13:57 (IST) 29 Aug 2024
मुंबईत पीओपी मूर्तीवरील बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने

मुंबई : सुधारित नियमावलीद्वारे गणेशमूर्तीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) वापरावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) बंदी घातली आहे. असे असले तरी मुंबईतील गणेशोत्सव साजरा करण्याचे व्यापक स्वरूप, मोठ्या गणेशमूर्तींप्रती असलेले आकर्षण आणि उत्सवावर अवलंबून असलेला अनेकांचा उदरनिर्वाह या सगळ्या बाबी विचारात घेऊन सीपीसीबीची नियमावलीची विशेषत: पीओपी बंदीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुंबई महानगरपालिकेने बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले.

वाचा सविस्तर…

13:56 (IST) 29 Aug 2024
मुंबई : ‘महारेरा’चे संकेतस्थळ दोन दिवस बंद

मुंबई : ‘महारेरा’चे नवीन संकेतस्थळ १ सप्टेंबरपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे. नवीन संकेतस्थळ कार्यान्वित करण्यासाठी जुन्या संकेतस्थळावरील सर्व माहिती नवीन संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. ‘महारेरा’ने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी सध्याचे संकेतस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा सविस्तर…

13:45 (IST) 29 Aug 2024
छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा मालवणमध्ये दाखल, पोलीस करत आहेत चौकशी

सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एका ट्रक मधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण येथे आणला आहे.

वाचा सविस्तर…

13:28 (IST) 29 Aug 2024
Rohit Pawar on Chandrakant Patil: रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

मंत्र्यांनी गुन्हेगारांना सोबत घेऊन फिरणं म्हणजे या सरकारने लाडका_गुन्हेगार_योजना सुरू केल्याचं लक्षण आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत गुन्हेगारांच्या मदतीने जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्यांनी हा महाराष्ट्र आहे हे मात्र विसरू नये. असो!

देवेंद्र फडणवीससाहेब तुमचे खासदार पोलिसांना धमक्या देतात, पत्रकारांना धक्काबुक्की करतात, मंत्री गुंडांना भेटतात यालाच पार्टी_विथ_डीफरन्स म्हणायचं का? आपल्या याच आदरातिथ्यामुळं गुंडाचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला असून गुन्हेगारी वाऱ्याच्या वेगाने फोफावत चाललीय. गुंडांना राजाश्रय देण्याच्या आपल्या कृत्यामुळं दहशतीखाली असलेली सामान्य जनताच आपल्याला योग्य वेळी चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही – रोहित पवार यांचा हल्लाबोल

https://x.com/RRPSpeaks/status/1829039070942769579

भर सभेत अजित पवारांनी महाराष्ट्रातील जनतेची मागितली माफी; म्हणाले, "पुतळा पडणे ही…"

Maharashtra News Today, 29 August 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यावरून राजकारण तापलं!