Mumbai Maharashtra News Updates, 29 August 2024: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजाचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. विरोधकांनी हे सगळं सरकारचं पाप असल्याची टीका केली असताना सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुतळ्याच्या दर्जासाठी नेमकं कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत दोन्ही बाजूंकडून बहुमताचे दावे केल जात असून सत्ताधाऱ्यांनी पराभवाच्या भीतीमुळेच निवडणुका पुढे ढकलल्याची टीका केली जात आहे.
Maharashtra News Today, 29 August 2024: शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवरून राजकारण तापलं!
सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला , चौकशीची मागणी
सावंतवाडी : मालवण राजकोट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याबाबत अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग सावंतवाडी तालुका शाखेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. जूनमध्ये डागडुजी करून सुद्धा सदरचा पुतळा विद्रुप दिसत होता आणि पुतळा स्थापत्य बाबत शंका होती त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने तत्परतेने भूमिका घेतली नसल्याने तीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सावंतवाडी राजवाडा येथे मराठा महासंघाचे कार्यकर्ते जमून त्यांनी तहसीलदार कार्यालय तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत, अँड सौ निता गावडे,तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत, मराठा समाज व्यापार संघाचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक उमाकांत वारंग, तारकेश सावंत, बाळकृष्ण नाईक, मनोज घाटकर, गोविंद सावंत, दिगंबर नाईक, संजय लाड, प्रसाद राऊत, विश्राम सावंत, संदीप गवस, शिवदत्त घोगळे ,संतोष तळवणेकर, ज्ञानेश्वर पारधी, चंद्रशेखर नाईक, वासुदेव होडावडेकर, सुनील सावंत, दत्तप्रसाद राऊत, गणेश सावंत असे मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. या घटनेचा मराठा महासंघ तीव्र निषेध करत आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
पुणे : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महायुती सरकार विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे.
वसई : वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघर येथे येणार आहेत. त्यांच्या दौऱ्या दरम्यान वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवस जड- अवजड मालवाहतूक वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
काही विषयांवर धोरण ठरवून त्यांची अंमलबजावणी केली जायला हवी. चूक काय झाली यावर तज्ज्ञ मत व्यक्त करत आहेत. आपल्याला धोरण ठरवावं लागेल. याआधी अशीच घटना भाजपा-शिवसेनेचं सरकार असताना मनोहर जोशी सर असताना घडली होती. त्यानंतर एक राज्यव्यापी धोरण ठरवण्यात आलं होतं की कोणत्याही पुतळ्याची विटंबना होऊ नये. आता बांधकामासाठी धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे असं दिसतंय.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महाविकास आघाडीच्या लोकांना काही सुचत नव्हतं की आपण काय करावं. आता या घटनेनंतर एकही सूचना कोणत्या विरोधी पक्षानं केली नाही. फक्त राजकारणावर बोलत आहेत. यातून काय निष्पन्न होणार आहे?
– पुतळा कोसळण्याच्या घटनेवर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया
नागपूर : यंदा राज्यात निवडणूकीचे वर्ष आहे. त्यामुळे राज्य शासनाच्यावतीने लाडकी बहिणसह विविध मोफत योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे राज्यातील जनता दोन विभागात विभागली गेली आहे. एकीकडे काही लोक यांचे समर्थन करत आहेत तर काही विरोध. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून अशा मोफत योजना बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागपूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी वाहनांची नियमित तपासणी होत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण (एमएसआरडीसी) आणि परिवहन विभागाचे अधिकारी करतात. हाच दावा त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एका जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान केला.
Chetan Patil On Shivaji Maharaj Statue Collapse Incident : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. या घटनेची कारणं शोधण्यासाठी सरकार आणि नौदलाद्वारे संयुक्त समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल राजकोट किल्ल्याला भेट दिली. यावेळी भाजपाचे नारायण राणे आणि नितेश राणे हेदेखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. त्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. जवळपास दोन अडीच तास चाललेल्या या राड्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे.
म्हाडाची घरे आता १० ते २५ टक्क्यांनी स्वस्त होणार आहेत. म्हाडाने पुनर्विकासाद्वारे सोडतीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांच्या किमतीत १० ते २५ टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेवरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात पुण्यात अजित पवार गटाकडून मूक आंदोलन केलं जात आहे.
आज महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत आहे. आघाडीच्या २०० हून जास्त जागा निवडून येतील – नाना पटोलेंचा दावा
स्वाभिमानाला जिथे धक्का बसतो, त्याला जर देवेंद्र फडणवीस किंवा राज्याचे मुख्यमंत्री राजकारण म्हणत असतील तर राज्याची जनता यांना खरं राजकारण दाखवेल. यांची समस्या ही आहे की निवडणुका नेमक्या कधी घेणार हा प्रश्न आहे. १५ ऑगस्टला पंतप्रधानांनी वन नेशन, वन इलेक्शनचा उल्लेख केला होता. देशाच्या चार विधानसभा निवडणुका एका वेळी घेऊ शकत नाहीत, त्यांना वन नेशन वन इलेक्शनची भूमिका मांडण्याचा अधिकार काय आहे? भाजपा सरकार हे राजकारण करत आहे. शिवाजी महाराजांचा अवमान राज्याची जनता कधीही सहन करणार नाही – नाना पटोले यांची टीका
Maharashtra News Today, 29 August 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्यावरून राजकारण तापलं!