Maharashtra News Updates, 28 August 2024 : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ च्या सुमारास कोसळला. नट बोल्ट गंजल्याने हा पुतळा कोसळला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. तसंच, पुतळ्याजवळ ४५ किमी प्रतितास वाऱ्याचा वेग होता. त्यामुळे पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच, वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टी होतात, असं म्हणत दीपक केसरकरांनी वादाला तोंड फोडलं आहे. यावरून विरोधकांनी निशाणा साधला असून महाविकास आघाडीने आज मालवण येथे बंद पुकारला आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यातून उमटू लागले लागले आहेत. यासह राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाळी वातावरण आहे. मुंबईसह अनेक शहरांतही पावसाची रिमझिम सुरूच आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. यासह घडामोडी आपण जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra News Today, 28 August 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

20:08 (IST) 28 Aug 2024
आदिवासी आयोग काय ते लवकरच समजेल; जिल्हाधिकाऱ्यांवर अंतरसिंग आर्या संतप्त

नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयातील वृक्षारोपणास अनुपस्थिती आणि जिल्हाधिकारी बैठकीसही न आल्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी संतप्त होत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक रद्द केली. या घटनाक्रमावर आदिवासी आयोग काय असतो ते आपण दिल्लीत गेल्यावर लवकरच त्यांना समजेल, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

सविस्तर वाचा

19:53 (IST) 28 Aug 2024
छत्रपती संभाजीनगर: डाॅक्टर महिलेची आत्महत्या; पतीला अटक

छत्रपती संभाजीनगर : उच्च शिक्षित असूनही हुंड्याची सतत होणाऱ्या मागणीला कंटाळून आत्महत्या केलेल्या डाॅ. प्रतीक्षा गवारे यांचा पती डाॅ. प्रीतम शंकर गवारे याला बुधवारी दुपारी पडेगाव परिसरातून अटक करण्यात आल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे यांनी दिली.

सिडकोच्या बजरंग चौकातील प्रफुल्ल हौसिंग सोसायटीतील रहिवाशी असलेल्या डाॅ. प्रतीक्षा प्रितम गवारे यांनी चारित्र्यावर संशय घेऊन, रुग्णालय उभारण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची सासरच्यांकडून होणारी मागणी व त्यातून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याच्या कारणावरून २४ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी एक मोठे पत्रही डॉक्टर पतीच्या नावाने लिहून त्यात आपण जिवापाड प्रेम केल्याचे म्हटले होते. याप्रकरणी मृत डाॅ. प्रतीक्षा गवारे यांचे वडील प्रकाश बाबूराव भुसारे यांच्या तक्रारीवरून डाॅ. प्रीतम शंकर गवारे याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. प्रीतम गवारे याचा मूळ गाव करंजखेड (ता. कन्नड) व इतर ठिकाणी शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली होती.

19:40 (IST) 28 Aug 2024
Water Crisis In Mumbai : एच पश्चिम विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन

महानगरपालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाली हिल जलाशय १ ची जुन्या, जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सविस्तर वाचा

19:19 (IST) 28 Aug 2024
मिरा-भाईंदरमधील पहिला डबलडेकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडी सुटणार

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) दहिसर - मीरारोड मेट्रो ९ मार्गिकेची उभारणी करीत आहे. ही मार्गिका मीरारोड येथील प्लेझंट पार्क, हटकेश आणि सिल्व्हर पार्क जंक्शन या एक किमीच्या परिसरातून जाणार असून मेट्रो ९ मार्गिकेमुळे या परिसरादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एमएमआरडीएने डबल डेकर उड्डाणपूल बांधला आहे. सविस्तर वाचा

18:39 (IST) 28 Aug 2024
नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी ५५ टीएमसीहून अधिक पाणी; पाणी वाटप संघर्ष टळला

नाशिक - नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल ५५ टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने बुधवारी दुपारी ६५ टक्क्यांची पातळी गाठली. त्यामुळे पाण्यावरून मराठवाडा विरुध्द नगर, नाशिक यांच्यात होणाऱ्या संघर्षाला किमान या वर्षासाठी विराम मिळाला आहे.

सविस्तर वाचा

18:26 (IST) 28 Aug 2024
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात?यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन

सायंकाळी चरायला गेलेली गुरे गोठ्यात येतात, मांजर लांब सोडले तरी ते मालकाच्या घरी परतते, कबुतरांच्या शेकडो किलोमिटरच्या शर्यती लावल्या जातात. पाळलेले बहुतेक सर्व पशू-पक्षी रस्ता शोधून घरी परततात. सविस्तर वाचा…

17:45 (IST) 28 Aug 2024
पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग

नाशिक: पावसाच्या सरी झेलत पेसा कायदा अंतर्गत भरती करण्यात यावी, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी येथे १७ संवर्ग सेवा कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शहरात मोठ्या प्रमाणावर आलेले आदिवासी बांधव उलगुलान मोर्चाच्या माध्यमातून आदिवासी भवनावर धडकले.

सविस्तर वाचा

17:45 (IST) 28 Aug 2024
सोनगिरी, मीरगड हे दोन वेगळे गड; इतिहास संशोधक राज मेमाणे यांचे संशोधन

पुणे : मीरगड म्हणजे सध्याचा पेण तालुक्यातील सोनगिरीचा किल्ला आहे, अशीच आजपर्यंत समजूत होती. परंतु, हे दोन स्वातंत गड असल्याची बाब पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरातील मोडी कागदपत्रांतून इतिहास संशोधक राज मेमाणे यांनी केलेल्या संशोधनातून उजेडात आली आहे.

सविस्तर वाचा

17:07 (IST) 28 Aug 2024
येरवडा कारागृहासमोर टोळक्याची दहशत; मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणाला मारहाण

पुणे : येरवडा कारागृहातून बाहेर पडलेल्या मित्राला भेटण्यासाठी आलेल्या तरुणांना टोळक्याने अडवून मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने कारागृहासमोर दहशत माजविली. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याप्रकरणी मयूर उर्फ यम सरोदे (रा. भोसरी), ज्ञानेश्वर लोंढे, यदू (तिघे रा. गोडाऊनचौक, भोसरी) यांच्यासह आठ जणंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा

16:59 (IST) 28 Aug 2024
आरोग्य विभागाच्या मानसिक उपक्रमांनाच 'मानसिक आधाराची' गरज!

मुंबई : राज्यातील चारही मनोरुग्णालय असो की आरोग्य विभागाचे मानसिक आजार विषयक विविध उपक्रम असो, ऐकीकडे  मानसिक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे पुरेशा मनुष्यबळा अभावी मानसिक आजाराच्या रुग्णांना परिणामकारक उपचार मिळू शकत नाहीत.

सविस्तर वाचा

16:48 (IST) 28 Aug 2024
आदिवासींना वाचविण्याची युवापिढीवर जबाबदारी; युवा संवादमध्ये अंतरसिंग आर्या यांचे आवाहन

नाशिक - आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. जल-जंगल-जमीन यावर आदिवासी समाजाचा अधिकार आहे. सध्या आदिवासी समाजाला सांभाळण्याची आणि जागृत करण्याची जबाबदारी युवा पिढीवर आहे. युवा पिढीने प्रक्षोभक वक्तव्यांना बळी न पडता आदिवासी धर्म वाचवावा, अन्यथा त्यांचे जीवन उदध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंग आर्या यांनी दिला.

सविस्तर वाचा

15:55 (IST) 28 Aug 2024
विरार : क्लासमध्ये मुलीचा लैंगिक छळ, शिक्षकाला मारहाण करत काढली धिंड

कोचिंग क्लासेस मध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या प्रमोद मोर्या या शिक्षकाला नागरिकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केली. बुधवार सकाळी विरार पूर्वेच्या मनवेलापाडा येथे ही घटना घडली.

वाचा सविस्तर...

15:51 (IST) 28 Aug 2024
बाळाच्या नियमित लसीकरणासाठी ‘हॅलो व्हॅक्सी'; लसीकरणाची सर्व माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार

मुंबई : बाळांचे लसीकरण करताना अनेक मातांचा गोंधळ उडतो. लसीकरणाची तारख लक्षात राहत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरणाची माहिती मोबाइलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मातांना लसीकरणाची इत्यंभूत माहिती व्हावी यासाठी ‘हॅलो व्हॅक्सी’ हे व्हॉट्स ॲप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

15:45 (IST) 28 Aug 2024
Instagram Friend Dupes Mumbai Woman : लंडनमधील मित्राने केली २४ लाखांची सायबर फसवणूक

इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या लंडनमधील मित्राने माहीम येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेची २४ लाख रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

15:25 (IST) 28 Aug 2024
शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या नावाखाली ५० लाखांची सायबर फसवणूक

मुंबई शहरातील एका मोठ्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीला ऑनलाइन शेअर्समधील गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याची ५१ लाख ३६ हजार रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा

15:19 (IST) 28 Aug 2024
धारावी पुनर्विकासात उद्धव ठाकरे सरकारचा निर्णय बदलल्याने एकाधिकारशाही रोखली, देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन

धारावी पुनर्वसन निविदांसाठीच्या अटी-शर्ती ठाकरे सरकारच्या काळात तयार झाल्या होत्या. पण त्यातून विकासकाची टीडीआर एकाधिकारशाही निर्माण होण्याचा धोका होता. त्यामुळे आम्ही तेवढ्यापुरताच बदल करुन आम्ही टीडीआरवर मर्यादा (कॅपिंग) आणली आणि एकाधिकारशाही रोखली, असे परखड मतप्रदर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.

वाचा सविस्तर...

15:19 (IST) 28 Aug 2024
हे काय..! पावसाच्या परतीची वेळ असताना आता चक्रीवादळाचा इशारा

नागपूर : देशभरात पावसाच्या परतीचे वेध लागण्याची वेळ आली असताना आता चक्रीवादळाची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातमध्ये कमी दाबाचा पट्टा अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे आणि तो अधिक तीव्र होऊन चक्रीवादळात त्याचे रुपांतर होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजस्थानमध्येही वादळी प्रणाली अरबी समुद्राच्या दिशेने पुढे सरकत आहे. अनेक राज्यांमध्ये सध्या मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे.

वाचा सविस्तर...

15:17 (IST) 28 Aug 2024
नागपुरात डेंग्यूच्या तुलनेत चिकनगुनियाचे रुग्ण चारपट, ही काळजी आवश्यक…

नागपूर : उपराजधानीत डेंग्यूच्या तुलनेत चिकनगुनियाचे रुग्ण चारपट आढळले आहेत. या दोन्ही आजारावर नियंत्रणात महापालिकेच्या आरोग्य विभागाला अद्यापही यश मिळाले नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात डेंग्यूच्या रुग्णांचे मंगळवारी शतक पूर्ण झाले.

वाचा सविस्तर...

15:17 (IST) 28 Aug 2024
कोल्हापूर जिल्ह्यात पक्षांतराला जोर    

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पक्षनिष्टेला तिलांजली देण्याच्या हालचाली कोल्हापूर जिल्ह्यातील इच्छुकांनी चालवल्या आहेत. विरोधी गोटातून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवून विधानसभेत जाण्याचे मनसुबे बहुतांशी मतदारसंघातील नेत्यांमध्ये दिसत असल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सविस्तर वाचा…

15:00 (IST) 28 Aug 2024
Battle for Sangli : सांगलीत जयंत पाटील यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू

राज्याचे नेते म्हणून उल्लेख केला जात असलेले आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदच्रंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात जिल्ह्यातील तरूण तुर्क अर्थातच यंग ब्रिगेडने कंबर कसली असल्याचे विधानसभा निवडणुकीत सुरू असलेल्या मोर्चेबांधणीवरून दिसत आहेत. सविस्तर वाचा…

14:47 (IST) 28 Aug 2024
“या भागातलं एकही झाड पडलं नाही, पण पुतळा पडला”, जयंत पाटलांची सरकारवर टीका; म्हणाले, “ज्या बाजूने वारा होता…”

तब्बल दोन तास आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर थांबून होते. अखेर ते तेथून निघाले असून त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला. दरम्यान, जयंत पाटीलही त्यावेळी राजकोट गडावर पोहोचले होते. त्यांनीही संवाद साधला.

सविस्तर वृत्त वाचा

14:22 (IST) 28 Aug 2024
शिक्षा स्थगितीस न्यायालयाचा नकार; नववधूची हुंड्यासाठी हत्या; पतीसासूच्या जन्मठेपेच्या शिक्षेची केवळ नऊच वर्षे पूर्ण

हुंड्यासाठी महिलेला जाळल्याच्या आरोपाप्रकरणी पती आणि सासूला झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती देण्यास आणि जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. दोघांनी नववधू तरूणीला पेटवून देण्यापूर्वी तिला क्रूर वागणूक दिली. सविस्तर वाचा…

14:02 (IST) 28 Aug 2024
भाईंदर मधील शिवरायांचा पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत! मुख्यमंत्र्यांना वेळच मिळेना

मिरा भाईंदर महानगरपालिकेने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या आठ महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. २६ जानेवारी गेला आणि १५ ऑगस्टची तारीख उलटूनही या पुतळ्याचे अनावरण झालेले नाही.

वाचा सविस्तर...

13:57 (IST) 28 Aug 2024
१ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीचं मुंबईत जोडो मारो आंदोलन

पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं १ सप्टेंबरला जोडो मारो आंदोलन.

हुतात्मा चौक ते गेट वे पर्यंत सरकारला जोडो मारणार.

सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याने पुतळा कोसळला - शरद पवार

राज्यात भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय - शरद पवार

गुन्हा दाखल करणार म्हणजे, गुन्हा झाल्याचं मान्य झालं आहे - उद्धव ठाकरे

https://www.youtube.com/live/gQZHW7Vq-YA

13:54 (IST) 28 Aug 2024
"भाजपाच्या नसानसांत शिवद्रोह ठासून भरलाय", उद्धव ठाकरेंची टीका

माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतरही त्यांची बदली करण्यात आली नव्हती. त्यामुळे यांच्या नसनसांत शिवद्रोह ठासून भरलाय हेच सिद्ध होतंय, असं उद्धव ठाकरे आज पत्रकार परिषदेत म्हणाले.

13:53 (IST) 28 Aug 2024
पुणे : विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरणी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा

पुणे : विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी खासगी शिकवणी चालकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सादीक महंमद बिडीवाले (वय ३८, रा. श्रावस्तीनगर, घोरपडी) असे गु्न्हा दाखल करण्यात आलेल्या शिकवणी चालकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 28 Aug 2024
नवी मुंबईत वीस लाखांचे हेरॉईन जप्त; तिघांना अटक, एका महिलेचा समावेश

नवी मुंबई पोलिसांनी हेरॉईन हा अंमलीपदार्थ विक्री प्रकरणी दोन पुरुष आणि एका महिलेस अटक केले आहे. त्यांच्याकडे १०० ग्रॅम वजनाचे हेरॉईन आढळून आले असून त्याचे मूल्य वीस लाख आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. सविस्तर वाचा…

13:43 (IST) 28 Aug 2024
Narayan Rane : “एकेकाला घरात घुसून मारेन”, पोलिसांसमोर नारायण राणेंची मविआच्या कार्यकर्त्यांना धमकी

आदित्य ठाकरे किल्ल्यावर असल्याने नारायण राणे यांना पोलिसांनी अडवून ठेवलं. परिणामी राणे समर्थकांनी गोंधळ घालयला सुरुवात केली. तसंच, नारायण राणे यांनीही संताप व्यक्त केला.

सविस्तर वृत्त वाचा

Maharashtra News Live Today, 28 August 2024 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर