Today’s News Update, 25 December 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे रविवारी (दि. २४ डिसेंबर) बोलत असताना ‘माझंच ऐका’, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच आज माध्यमांशी बोलताना त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंच्या जागी आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. तसेच एबीपी-सी व्होटरच्या सर्व्हेनंतर राजकीय पक्ष प्रतिक्रिया देत आहेत. महाविकास आघाडीच्या बाजूने सर्व्हेचा अंदाज आला तरी महाविकास आघाडीतील नेते हा अंदाज स्वीकारायला तयार नाहीत. नुकतेच पाच राज्यातील निकालाचा हवाला देऊन सर्व्हे अचूक नसतात, असे तीनही पक्षाच्या नेत्यांनी म्हटले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…
Maharashtra Breaking News Updates | राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा
कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खासदार अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले आहे.
पिंपरी: उपमुख्यंमत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. शहराचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. वाघेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. सविस्तर वाचा…
मुंबई: मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी भांडूप पश्चिमेकडे असलेल्या पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात नवीन शुद्धीकरण प्रकल्प निर्माण करण्यात येणार असून त्याचे काम नवीन वर्षात सुरू होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुर लोकसभेतून आमचा उमेदवार देणार आणि तो जिंकणार, असा दावा केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान स्वीकारतो, असे प्रत्युत्तर दिले होते. त्यावर अजित पवार यांनी पलटवार केला असून मी जेव्हा एखादे चॅलेंज देतो, तेव्हा ते जिंकूनच दाखवतो, असे म्हटले आहे.
यवतमाळ: देशात २०१६ एका बेसावध क्षणी नोटबंदी जाहीर करण्यात आली. या ‘नोटीबंदी’च्या यशापयशावर आजही चर्चा घडत आहे.
नागपूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे मनुस्मृती दिनानिमित्त सोमवारी नागपुरातील कस्तुरचंद पार्कवर स्त्रीमुक्ती दिन परिषदेचे आयोजन केले. मात्र, या सभेसाठी उभारलेल्या भव्य व्यासपीठाचा मागचा भाग (बॅकड्रॉप) लोखंडी अँगलसह अचानक कोसळला.
नागपूर: एकतर्फी प्रेमातून फेसबुक फ्रेंडने विवाहित महिलेशी अश्लील चाळे करून विनयभंग केला. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी पीडित २० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी तरुणाला अटक केली.
पहाटेपासून शहरातील वेगवेगळ्या समाज माध्यमांतील गटांवर २८ सेकंदाची एक चित्रफीत प्रसारित झाली.
डोंबिवली – आपणास अर्धवेळ नोकरी देतो, असे आमिष दाखवून येथील टिळकनगर भागातील एका तरूणाची तीन भामट्यांनी गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत ऑनलाईन व्यवहारातून आणि माध्यमातून नऊ लाख ८७ हजार रूपयांची फसवणूक केली आहे.सुमीत ललित वार्ष्णेय (२८) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. तो नोकरी करतो.
नाशिकमध्ये त्यांचे येणे म्हणजे राजकारण व दरोडेखोरीसाठीच असते, अशा शब्दांत भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, सहप्रवक्ता अजित चव्हाण यांनी राऊत यांच्यावर टिकास्र सोडले.
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना विविध ठिकाणी उजेडात आल्या आहेत. २०२३ मध्ये पश्चिम विदर्भात आतापर्यंत एक हजार २७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राज्य सरकारच्या शेतकरी स्वालंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.
कल्याण – मुरबाडा तालुक्यातील देवपे गावातील एका तरूणाचे पूर्ववैमनस्यातून हात कापणारा मुरबाड तालुका पंचायत समितीचा माजी सभापती श्रीकांत धुमाळ आणि त्याच्या इतर दोन साथीदारांना मुरबाड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे एका २२ वर्षीय तरुणाची ठेचून हत्या करण्यात आली.
पिंपरी: मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सहा आणि सात जानेवारी रोजी पिंपरी चिंचवडमध्ये ऐतिहासिक शंभरावे नाट्यसंमेलन होणार आहे. या नाट्यसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी आकुर्डीत झाले.
काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना पाच वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर विधीमंडळाने त्यांची आमदारकी रद्द केली. अटक झाल्यानंतर केदार अचानक आजारी पडले आणि त्यांना शासकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. काही दिवसांपूर्वी ललित पाटील प्रकरणात शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाताने जे केले, तेच नागपूरमध्ये होत आहे का? याची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी भाजपाचे माजी नेते आशिष देशमुख यांनी केली.
नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार २७ व २८ डिसेंबरला या दोन दिवसासाठी अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहे. या दरम्यान त्यांनी परतवाडा तालुक्यातील वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमास भेट द्यावी, अशी विनंती माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली होती.
डोंबिवली– मागील चार दिवसांपासून येथील कुंभारखाणपाडा खाडीत आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह बेपत्ता असलेल्या ४० वर्षीय वडिलांचा मृतदेह सोमवारी दुपारी अग्निशमन दलाच्या गरीबाचापाडा विभागातील जवानांना खाडीत तरंगताना आढळला.
निवडून आलो तर लोकांमुळे, निवडून नाही आलो तरी लोकांमुळेच, पण आम्ही आमचा विचार सोडणार नाही, लढत राहणार”, असे रोहित पवार म्हणाले.
नागपूर: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. उमेदवारांनी वेळ वाया न घालवता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधीच म्हणावी लागेल. महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
अकोला : मध्य रेल्वेच्या सांगली – मिरज स्थानकादरम्यान २६ डिसेंबर ते ५ जानेवारी दुहेरीकरण व ‘नॉन-इंटरलॉकिंग’ कामामुळे काही गाड्या रद्द केल्या आहेत. या तांत्रिक कामामुळे एकूण ३४ गाड्या प्रभावित झाला आहेत. यात अकोला मार्ग धावणाऱ्या दोन रेल्वेचा समावेश आहे.
अकोला : केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी काढण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये रथावर ‘भारत’ऐवजी मोदी सरकार लिहिल्याचे पाहून जिल्ह्यातील रिधोरा येथील ग्रामस्थ चांगले संतापल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.
नागपूर : बार्टी, सारथी आणि महाज्योती या तिन्ही संस्थांमध्ये पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेमध्ये गोंधळ समोर आला आहे. चाळणी परीक्षेमध्ये पुणे विद्यापीठाची २०१९ची ‘सेट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका जशास तशी छापून उमेदवारांना देण्यात आल्याने परीक्षा पद्धतीविरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे अजित पवार यांचे ऐकत असतील तर त्यांच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू इच्छिते. अजित पवारांचे ऐकून ते निर्णय घेत असतील तर याचा मला मनापासून आनंद वाटतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून घ्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
पुणे: दारूवाला पूल परिसरात गादी कारखान्याला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
यातील आरोपी मुलीचा मित्र आहे. त्यामुळे मुलीचा या अपहरण नाट्यात सहभाग आहे का? त्याचा पोलीस तपास करत आहेत.
डोंबिवली – घरकामासाठी येणाऱ्या एका गृहसेविकेने डोंबिवलीत आपल्या मालकाच्या घरातील कपाटातील तिजोरीतून पाच लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गृहसेविके विरूध्द गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
अजित पवारांशी मी चर्चा करणार असून शिरूर लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचं सांगणार आहे, असेही विलास लांडे यांनी म्हटले आहे.
तपासी पथकाला उल्लेखनीय कामगिरीबद्दल १० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.
शिरूर लोकसभेत महायुतीचा उमेदवार जिंकणार असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर करताच माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभेतून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. मागच्यावेळेसच मी तयार होतो, पण अचानक डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली गेली. यावेळी जर मला संधी दिली तर मी पूर्ण ताकदीने लढेल, असे विलास लांडे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र आणि देशातील सर्व घडामोडी जाणून घ्या