Today’s News Update, 25 December 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे रविवारी (दि. २४ डिसेंबर) बोलत असताना ‘माझंच ऐका’, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तसेच आज माध्यमांशी बोलताना त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंच्या जागी आपला उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तसेच शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. तसेच एबीपी-सी व्होटरच्या सर्व्हेनंतर राजकीय पक्ष प्रतिक्रिया देत आहेत. महाविकास आघाडीच्या बाजूने सर्व्हेचा अंदाज आला तरी महाविकास आघाडीतील नेते हा अंदाज स्वीकारायला तयार नाहीत. नुकतेच पाच राज्यातील निकालाचा हवाला देऊन सर्व्हे अचूक नसतात, असे तीनही पक्षाच्या नेत्यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या…

Live Updates

Maharashtra Breaking News Updates | राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

12:18 (IST) 25 Dec 2023
जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये २२ हजारने वाढ, पुरुष मतदारांमध्ये ४४ हजारने वाढ

निवडणूक आयोगाने नऊ डिसेंबरनंतरही मतदार नोंदणीची संधी दिली आहे. यासाठी अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 25 Dec 2023
विवाहासाठी घेतलेल्या लाखो रुपयांच्या साड्या घेऊन चोरटे पसार

ठाणे : विवाहासाठी घेतलेल्या साड्या, कपडे घेऊन चोरटे पसार झाल्याचा प्रकार भिवंडीतील काल्हेर भागात उघडकीस आला आहे.१२ लाखाहून अधिक रुपयांचे हे वस्त्र आहेत. या चोरी प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 25 Dec 2023
संघभूमीत आज आंबेडकरांची सभा, काय बोलणार याकडे लक्ष

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात आज ( सोमवारी) मनुस्मृती दहन दिनानिमित्त वंचित बहुजन विकास आघाडीने स्री मुक्ती परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.

सविस्तर वाचा

11:55 (IST) 25 Dec 2023
सावली वनपरिक्षेत्रत वाघाचा मृत्यू; पाच दिवसात तीन वाघ दगावले

चंद्रपूर:सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवन क्षेत्रातील कापसी बीट परिसरात आज सोमवार २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास गोसेखुर्द नहराच्या बाजूला शेतात  वाघाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा

11:54 (IST) 25 Dec 2023
 सिलेंडरचा स्फोट,५ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

नागपूर : सदरमधील जुन्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानाच्या समोर पदपाथावर गॅस फुग्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फ़ोट झाला.या स्फ़ोटात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर कुटुंबातील तीन जण जखमी झाले.

सविस्तर वाचा

11:54 (IST) 25 Dec 2023
नातेवाईक-परिचित व्यक्तीकडून सर्वाधिक बलात्कार; राज्यात २३३६ महिलांवरील बलात्कारातील आरोपी ओळखीचे

नागपूर : महाराष्ट्र सरकारने जरी महिला सुरक्षेला प्राधान्य दिल्याचा दावा केला असला तरी महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात चवस्था स्थानावर आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपींमध्ये सर्वाधिक कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, पती, मित्र, प्रियकरांसह ओळखीच्याच व्यक्तींचा समावेश आहे.

सविस्तर वाचा

11:53 (IST) 25 Dec 2023
चंद्रपूर: मोहर्लीच्या रस्त्यावर दोन वाघांचे दर्शन

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या मोहर्ली येथे रस्त्यावर दोन वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले. हे दोन्ही वाघ बराच वेळ रस्त्यावर उभे होते.आज सोमवार २५ डिसेंबर रोजी सर्वत्र क्रिसमस साजरा करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

11:31 (IST) 25 Dec 2023
बाजीराव रस्त्यावर अपघात, मोटारीवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे: मोटारीवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बाजीराव रस्त्यावरील राणा प्रताप उद्यानासमोर मध्यरात्री घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुण जखमी झाला.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 25 Dec 2023
अटक करायला आलेल्या पोलिसांवर श्वान सोडले, मुळशीत काय घडलं?

पुणे: सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर पाळीव श्वान सोडण्यात आल्याची घटना मुळशीतील रिहे गावात घडली. या प्रकरणी त्या सराईत गुन्हेगाराला पौड पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा…

11:03 (IST) 25 Dec 2023

10:43 (IST) 25 Dec 2023
पश्चिम विदर्भात तुरीचे दर ९ हजारांवर स्थिर; महिनाभरात दीड हजार रुपयांची घसरण 

अमरावती :  नवीन तूर बाजारात यायच्या आधीच पश्चिम विदर्भातील कृषी उत्‍पन्‍न बाजार समित्‍यांमध्‍ये तुरीचे भाव कमी झाले असून दर गेल्या महिनाभरात दीड हजार रुपयांनी घसरले आहेत. आयात सुरु झाल्‍यानंतर तुरीचे दर आणखी कमी होतील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

सविस्तर वाचा

10:42 (IST) 25 Dec 2023
मावळमध्ये खासदारकीसाठी महायुतीमध्ये तीन पायांची शर्यत, आता बाळा भेगडेंचे भावी खासदार म्हणून लागले फ्लेक्स

शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे आगामी मावळ लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तशी त्यांनी इच्छा बोलून देखील दाखवलेली आहे.

सविस्तर वाचा…

10:42 (IST) 25 Dec 2023
जीव मुठीत धरून शाळकरी विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून प्रवास !

वाशीम : वाशीम आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सिमेलगत पेनगंगा नदीच्या तिरावर ४ हजार लोक संख्येचे गोहोगाव हाडे गाव आहे.मात्र, गावाजवळून गेलेल्या नदीवर पूल नसल्याने गावातील लहान मुले, महिला आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून दररोज जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

सविस्तर वाचा

10:41 (IST) 25 Dec 2023
राज्यातून धावणाऱ्या दक्षिण मध्य रेल्वेच्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल

अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्या काझीपेठ-बल्हारशाह विभागात ‘नॉन-इंटरलॉकिंग’च्या कामामुळे गांधीधाम-विशाखापट्टणम एक्स्प्रेस आणि ओखा-पुरी एक्स्प्रेस गाड्या वळवलेल्या मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागेल.

सविस्तर वाचा

महाराष्ट्र आणि देशातील सर्व घडामोडी जाणून घ्या

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह