Maharashtra Cabinet Expansion Updates: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर संपन्न झाला असून सरकार कामाला लागले आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. या सोहळ्याला मनोरंजन, क्रीडा, राजकारण आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार, विधानसभा अध्यक्ष, खातेवाटप याची चर्चा सुरू आहे. तसेच विधानसभेत विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार का? याचीही चर्चा सुरू आहे. दरम्यान विरोधकांनी मात्र शपथविधीला उपस्थित राहणे टाळले. राज ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत.
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर आले आहेत. आज सकाळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले.
Maharashtra Political News Live Updates | Madhukar Pichad Death | महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
Madhukar Pichad Death: मधुकर पिचड यांचे नाशिकमध्ये निधन; वैभव पिचड यांनी दिली माहिती
अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती पिचड यांचे सुपुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनी दिली.
Madhukar Pichad Death: मधुकरराव पिचड यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट
भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच पक्षाचे नेते त्यांना श्रद्धांजली व्यक्त करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एक्सवर पोस्ट टाकून त्यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. "आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते", असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Madhukar Pichad Death: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मधुकर पिचड यांना वाहिली श्रद्धांजली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, "ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. विधिमंडळात अनेक वर्षं आम्ही सोबत काम केले. अतिशय नम्र, अभ्यासू आणि महाराष्ट्राच्या विकासाची तळमळ असलेला नेता म्हणून पिचड साहेब कायम स्मरणात राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती"
https://twitter.com/nitin_gadkari/status/1865032003394977792
Madhukar Pichad Death: सुप्रिया सुळेंनी मधुकर पिचड यांना वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. "ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. या कठिण प्रसंगी माझ्या संवेदना पिचड कुटुंबियांच्या सोबत आहेत. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पिचड साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..", अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली.
Madhukar Pichad Death: भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी मधुकर पिचड यांना वाहिली श्रद्धांजली
Madhukar Pichad Death: "भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचडजी यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. सर्वसामान्य घरातून येऊन राज्याच्या राजकारण व समाजकारणात मधुकररावांनी ठसा उमटवला. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागणीसाठी, शेवटच्या माणसाच्या हक्कांसाठी लढणारा लढवय्या नेता अशी मधुकरराव पिचडजी यांची ओळख होती. आज त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे", अशी भावना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
Maharashtra Breaking News Live: ‘छत्रपती शाहू महाराज, स्वा. सावरकर यांचे फोटो छापले नाहीत’, हसन मुश्रीफांनी मागितली माफी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने ५ डिसेंबर रोजी राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रात जाहिरात करण्यात आली होती. त्यात छत्रपती शाहू महाराज, स्वा. सावरकर यांचे फोटो छापले गेले नाहीत. यावरून महायुतीवर जोरदार टीका करण्यात आली होती. यावर आता हसन मुश्रीफ यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
https://twitter.com/PradnyaPawar121/status/1864538835838812257
पिंपरी : कीर्तनकार प्रवाशाला मारहाण; मोटार चालकाला अटक
पिंपरी : मोटारीमधील वातानुकूलित यंत्रणेसाठी (एसी) अधिकचे पैसे मागत चालकाने कीर्तनकार प्रवाशाला बेदम मारहाण केली. ही घटना रावेत येथे घडली.अविनाश दिगंबर कल्याणकर - देशमुख (वय २४, रा. आळंदी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिराज जावेद इराणी (वय ३५, रा. चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली आहे.
कल्याणकर हे कार्यक्रमासाठी चिंचवड येथून मुंबईला जात होते. चिंचवड स्टेशन येथून प्रवाशी मोटारीमधून जात असताना रावेत येथील एका पेट्रोल पंपावर मोटार थांबली. तिथे मोटारीमधील एसीसाठी अधिकचे पैसे देण्याची चालक इराणी याने मागणी केली. त्यावरून कल्याणकर आणि इराणी यांच्यात बाचाबाची झाली. इराणी याने कल्याणकर यांचे डोके मोटारीच्या दरवाजावर मारून त्यांना जखमी केले. पोलीस हवालदार गुळींग तपास करीत आहेत.
राज्याचे माजी मंत्री, शरद पवारांचे एकेकाळचे जवळचे सहकारी, भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ८४ वर्षीय मधुकर पिचड यांच्यावर मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती आणखी खालावली, त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची बातमी समोर येत आहे.
https://twitter.com/satyajeettambe/status/1865026405299352047
मनपा निवडणुकीत शक्य झाल्यास राज ठाकरेंना बरोबर घेऊ – देवेंद्र फडणवीस
सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंबाबत बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत तीन पक्ष महायुतीत असल्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेला जागावाटपात न्याय देता आला नसता. त्यामुळे त्यांना एकत्र घेतले नाही. पण आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि मनपा निवडणुकीत शक्य असेल तिथे त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करू.
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद
पुणे : पादचारी दिनानिमित्त ११ डिसेंबर रोजी लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते गरुड गणपती चौक दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
श्रीकांत देशपांडे यांना वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर; ‘नृत्य-प्रभा’ विशेष प्रकाशचित्र प्रदर्शनाचे आयोजन
पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने सवाई गंधर्व यांचे नातू आणि स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. श्रीकांत देशपांडे यांना मरणोत्तर वत्सलाबाई जोशी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५१ हजार रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुल येथे १८ ते २२ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
‘नृत्य-प्रभा’ प्रदर्शन
’नृत्य-प्रभा’ या संकल्पनेवर आधारित प्रकाशचित्र प्रदर्शन हे या महोत्सवाचे आकर्षण आहे. गेली पंधरा वर्षे दरवर्षी प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असे प्रदर्शन महोत्सवादरम्यान सादर करत असतात. याविषयी माहिती देताना पाकणीकर म्हणाले, ‘महोत्सवाच्या सुरुवातीच्या काळापासून दरवर्षी एका नृत्यशैलीच्या कलाकाराची कला सवाईच्या मंचावरून सादर होत आली आहे. गेल्या सहा दशकांत या स्वरमंचावरून सादर झालेल्या काही नृत्यकलांचे प्रकाशचित्रकारांनी जतन करून ठेवलेले काही क्षण यंदाच्या महोत्सवातील ‘नृत्य-प्रभा’ या प्रदर्शनातून सादर करण्यात येणार आहेत. या बरोबरच किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना आदरांजली म्हणून त्यांच्याही प्रकाशचित्रांचा एक विभाग हे प्रदर्शनाचे दुसरे वैशिष्ट्य असणार आहे’. या प्रदर्शनात पाकणीकर यांच्यासह अनिल देशपांडे आणिसुधाकर जोशी यांनी टिपलेल्या या प्रकाशचित्रांचा समावेश आहे.
जीवा महाले पुरस्कार अतुल सावे यांना जाहीर
पुणे : शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीने आमदार अतुल सावे यांना हिंदवी स्वराज्यभूषण जीवा महाले पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हिंदुत्वासाठी तसेच अन्यायग्रस्त समाजघटकांसाठी न्यायालयीन लढाई लढणारे ॲड. अमोल डांगे यांना शिवभूषण गोपीनाथपंत बोकील पुरस्कार जाहीर झाला आहे.जय गणेश व्यासपीठ, शिवप्रतापगड उत्सव समिती आणि समस्त हिंदू आघाडीच्या वतीने शिवप्रतापदिन अर्थात अफझलखान वधाचा आनंदोत्सव रविवारी (८ डिसेंबर) नातूबाग मैदानावर सायंकाळी पाच वाजता होणार असून त्यामध्ये संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे आणि आदर्श युद्धनीतीचे स्मरण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीषमहाराज मोरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल ॲड. स्मित शिंदे, बाळासाहेब भामरे आणि ऋषिकेश कामठे यांना सन्मानित करण्यात येणार आहे , अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी शुक्रवारी दिली.
सोन्याच्या दरात घट, चांदीने वाढवली चिंता… हे आहेत आजचे दर…
नागपूर : सोने चांदीचे दर अद्यापही नियंत्रणात नाहीत. दिवाळीत सोन्याचे दर विक्रमी उंचीवर असतांनाही पुढे ते आणखी वाढेल म्हणून नागपूरकरांनी जोरात दागिन्यांची खरेदी केली. परंतु त्यानंतर दर घसरल्याने ग्राहकांची निराशा झाली. दरम्यान आता बारा दिवसांत सोन्याच्या दरात घट झाली असतांना चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांचे टेंशन वाढले आहे.
महायुतीच्या शपथविधीला विरोधकांची अनुपस्थिती होती. यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. "शपथविधीचा निरोप कोणाला दिला याची माहिती नाही, आम्हाला निरोप असता तर गेलो असतो. आम्हाला कधीच बोलावले नाही, माझे मित्र मुख्यमंत्री झाले त्यांना शुभेच्छा", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
वर्धा : नौदलाची कॅप प्राप्त होताच आईच्या डोक्यावर चढवून केला कडक सॅल्युट
वर्धा : परिस्थितीअभावी स्वप्न पूर्ण न होणारे अनेक. पण त्यावर मात करीत आईवडिलांना निराश न करण्याचा निर्धार ठेवणारे पण काहीजण असतात.हाच निर्धार कारंजा घाडगे येथील कार्तिक राजू बाजारे याने ठेवला. आता त्याची भारताच्या नौदलात सब लेफ्टनंट या अधिकारी पदावर निवड झाली आहे.
भाजपाचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांची दुसऱ्यांदा विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राजभवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्ण यांनी त्यांना अध्यक्षपदाची शपथ दिली. याआधी २०१४ सालीदेखील कोळंबकर यांनी हंगामी अध्यक्षपद भुषविले होते.
पुणे रेल्वे स्थानकात ज्येष्ठ, अपंग प्रवाशांची परवड ?
पुणे : पुणे रेल्वेस्थानकावर ज्येष्ठ नागरिक आणि अपंग प्रवाशांच्या सुविधेसाठी चालविण्यात येत असलेली ‘विशेष प्रवासी सशुल्क बॅटरी ऑपरेटेड कार’ सेवा काही महिन्यांपासून बंद पडली आहे.देखभाल-दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने आणि संबंधित कंत्राटदाराला व्यावहारीकदृष्ट्या परवडत नसल्याने या कार रेल्वेस्थानकात धूळखात पडून आहेत.
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता
यवतमाळ : मुंबईतील राजकीय रंगमंचावर गुरुवारी सायंकाळी जो शपथविधी सोहळा पार पडला. त्याने राज्यभरात अनेक राजकीय कार्यकर्त्यांना निराशेच्या गर्तेत ढकलले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शपथ घेतली, मात्र याव्यतिरिक्त एकाही मंत्र्याचा शपथविधी न होणे, हे कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक ठरले.
सविस्तर वाचा...
Maharashtra News Live: 'लाडक्या बहिणींना १ जानेवारीपासून २१०० रुपये..', सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
महायुतीने लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता सरकारचा शपथविधी झाला आहे. त्यामुळे त्यांनी आता १ जानेवारी पासून २१०० रुपये देण्यास सुरुवात करावी. आम्ही तर ३००० रुपये देणार होतो. पण आता महायुतीचे सरकार आले आहे तर त्यांनी २१०० रुपये देण्यास सुरुवात करावी.
आशिया, सायबेरिया, मंगोलियाचे 'पाहुणे' उतरले चंद्रपुुरात…चक्क हिमालय पर्वत ओलांडून…
चंद्रपूर : कुठल्याही परिसरातल्या जैवविविधता आणि पर्यावरणाचे निर्देशक म्हणून पक्ष्यांना अधिक महत्त्व आहे. चंद्रपुरात जिल्ह्यात साधारणपणे ३५० प्रकारचे पक्षी आढळतात. दरवर्षी हिवाळ्याच्या कालावधीत परदेशी पाहुणे जिल्ह्यातील विविध जलाशयांवर हजेरी लावतात. त्यामध्ये स्थानिक पक्षी तर काही स्थलांतरित हिवाळी पक्षी आहेत. यावर्षी युरोप, मध्य आशिया, सायबेरिया, मंगोलिया आणि रशिया येथील पक्षी इरई धरण परिसरात दाखल झाले आहेत.
Maharashtra News Live: महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लोटला भीमसागर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांचा जनसागर आज सकाळपासूनच रेल्वे स्थानकाजवळील पुतळ्याजवळ लोटला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आंबेडकरी अनुयायी रेल्वे स्थानकाजवळील पुतळ्याजवळ रात्रीपासून अभिवादन करण्यासाठी येत होते. आज सकाळी देखील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हजारो आंबेडकर अनुयायांनी आणि विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
वसई विरारमधील महावितरणचे वीज ग्राहक सेवा केंद्र बंद
वसई : वसई विरार शहरातील वीज ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा व त्यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी वीज ग्राहक सुविधा केंद्र तयार केली आहेत. मात्र मागील पाच दिवसांपासून ही केंद्र बंद झाली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांची गैरसोय होऊ लागली आहे. तर दुसरीकडे यात काम करणारे कर्मचारी चिंतेत सापडले आहेत.
बुडालेल्या ठेवी परत मिळण्याची शक्यता! न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर शासनाकडून परिपत्रक जारी
मुंबई : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपीची मालमत्ता जप्त करण्यासाठी न्यायालयात ३० दिवसांत अर्ज करणे आवश्यक असताना तशी काळजी घेतली जात नसल्यामुळे जप्तीची प्रक्रिया रखडून त्याचा फटका ठेवीदारांना बसतो. याबाबत न्यायालयाकडून चपराक बसल्यानंतर राज्य शासनाने विशेष परिपत्रक काढून ही कालमर्यादा कसोशीने पाळण्याचे आदेश दिले आहेत.
कात्रज कोंढवा रस्त्याबाबत मोठी अपडेट, जागा ताब्यात देण्यासाठी आले इतके प्रस्ताव...!
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या कात्रज ते कोंढवा या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न हळूहळू सुटत आहे. या रस्त्यावर होत असलेल्या वाहतुकीच्या कोंडीमुळे काही वर्षांपासून हा रस्ता वाहनचालक तसेच या भागातून ये जा करणाऱ्या नागरिकांसाठी त्रासदायक बनला आहे.
वर्सोव्यात मनसे उमेदवाराला दोन्ही वेळेस सारखीच मते
मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला गेल्या विधानसभा निवडणूकीत जेवढी मते मिळाली अगदी तेवढीच मते त्यांना २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली आहेत.
कर परताव्यातील विलंबामुळे सरकारी तिजोरीवर व्याजाचा वाढता बोजा, उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त
मुंबई : प्राप्तिकर परताव्याच्या प्रक्रियेतील विलंबामुळे सार्वजनिक तिजोरीवर वाढत असलेल्या व्याजाच्या बोजाबद्दल उच्च न्यायालयाने नुकतीच चिंता व्यक्त केली. तसेच, परतावा देण्यास विलंब करणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्याची सूचनाही कर विभागाला केली आहे.
झोपु कायद्याच्या कठोर अंमलबजावणीत १०० हून अधिक समस्यांचा अडसर, उच्च न्यायालयात अहवाल
मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्रे ओळखणे आणि घोषित करणे यातील गुंतागुंतीसह झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याच्या (झोपु) अंमलबजावणीवर परिणाम करणाऱ्या १०० हून अधिक समस्यांवर प्रकाश टाकणारा अहवाल गुरुवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आला.
'या' गावात आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी
अमरावती : भारतीय संविधानाचे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून त्यांचे लाखो अनुयायी चैत्यभूमी (दादर, मुंबई) येथे येतात. पण, डॉ. बाबासाहेबांच्या काही अस्थी या अमरावती जिल्ह्यातील नया अकोला या गावात ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी असणाऱ्या या अस्थींच्या दर्शनासाठी हजारो अनुयायी त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबरला दर्शनासाठी रांगा लावतात.
देशभरात पूल बांधले…पण, नागपुरातील इवलाशा पूल मात्र तब्बल इतके दिवस…
नागपूर : अंबाझरी तलावाचा सांडवा वाहून नेण्याऱ्या नाल्यावर पुलाच्या बाजूच्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. परिणामी, रोज सायंकाळपासून ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होते.
Maharashtra Political News Live Updates: एकनाथ शिंदेंशिवाय भाजपा शपथविधी सोहळा घेणार होते, संजय राऊत यांचा धक्कादायक दावा
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नसती, तर त्यांच्याशिवाय शपथविधी सोहळा पार पाडण्याची तयारी भाजपाने केली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.