Maharashtra Cabinet Expansion Updates: महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अखेर संपन्न झाला असून तीन मंत्र्यांचं सरकार आता कामाला लागले आहे. ५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. पाठोपाठ, विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं असून आज विधान भवनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होत आहे. आज दिवसभरात विधान भवनात घडणाऱ्या घडामोडींसह राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या घटनांवर, राज्यभरात घडणाऱ्या इतर महत्त्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल. या सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सकाळी ११.३० वाजता आमदारांच्या शपथविधीला सुरुवात झाली. सर्वप्रथम देवेंद्र फडणवीसांनी आमदारकीची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांनी शपथ घेतली.
Maharashtra Political News Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर
इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चार कोटी रोजगार… गडकरींनी थेट रोडमॅपच मांडला…
हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजी, इलेक्ट्रिक हे भविष्यातील इंधन आहे. या इंधनाच्या वापराने किफायतशीर व प्रदूषणमुक्त असे इंधन उपलब्ध होणार आहे.
नागपूर : थंडी पुन्हा परतणार, पण कधीपासून? हवामान खाते म्हणते….
राज्यात नोव्हेंबर अखेरीस नुकतीच थंडीची चाहूल लागली होती. थंडीचा कडाका वाढत चालल्याने शेकोट्या पेटायला लागल्या होत्या.
पहिले बालरंगभूमी संमेलन पुण्यात, संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची निवड
संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेते सयाजी शिंदे, अजित भुरे, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष विजय गोखले, सविता मालपेकर, सुबोध भावे यांच्यासह नाट्य व बालनाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नाशिकमध्ये युवकाची हत्या, चार संशयित ताब्यात
क्रांतीनगर येथे टोळक्याच्या हल्ल्यात नितीन शेट्टी (३३, आदिवासी विकास सोसायटी) या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत बहीण सोनाली चौधरी यांनी तक्रार दिली.
ईव्हीएमविरुद्ध शंखनाद…मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात…
एकूण मतांची संख्या मतदानापेक्षा जास्त होती, ही लोकशाहीची निव्वळ हत्या आणि संविधानाशी खेळ असल्याचा आराेप यावेळी करण्यात आला.
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भोसरी येथील सभेत गोंधळ घालून महिला शिपायास शिवीगाळ करणऱ्या एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी फेटाळून लावला.
पुणे : धनादेश न वटल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकास शिक्षा, सहा महिने कारावास आणि वीस लाख रुपयांचा दंड
२०१७ मध्ये पैशांची परतफेडी करण्यासाठी दोन धनादेश दिले. परदेशी यांनी धनादेश बँके खात्यात जमा केले. मात्र, धनादेश वटले नाहीत.
पुणे : सायबर चोरट्यांच्या जाळ्यात नागरिक; सव्वा कोटींची फसवणूक
पोलीस, सीबीआय कारवाईची भीती दाखविणे, तसेच घरातून कामाची संधी अशा प्रकारची आमिषे दाखवून सायबर चोरटे नागरिकांची फसवणूक करत आहेत.
मविआला मोठा धक्का, घटकपक्षाने साथ सोडली, दोन आमदार कमी झाले
महाविकास आघाडीने आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला आहे. आज त्यांच्यापैकी कुणीही शपथ घेणार नाही. मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने वेगळी भूमिका घेतली आहे. कोण विरोधक? ज्यांनी आम्हाला जागा वाटपात विश्वासात घेतलं नाही, कुठल्याही गोष्टींची चर्चा केली नाही ते का? असा प्रश्न अबू आझमी यांनी विचारला आहे. तसंच त्यांनी शपथही घेतली आहे. त्यामुळे एक प्रकारे अबू आझमी ( Abu Azmi ) यांनी मविआतून बाहेर पडण्याचेच संकेत दिले आहेत.
गोंदिया: निर्दयीपणाघा कळस, श्वानाचे हातपाय, तोंड बांधून पोत्यात भरले, जंगलात फेकले
गोंदिया : गोंदिया शहरा जवळील आशीर्वाद कॉलनीतील काही नागरिकांनी वस्तीतील ४ ते ५ कुत्र्यांना पकडले व त्यांचे पाय व तोंड बांधून पोत्यात टाकून एका पिकअप वाहनमध्ये टाकून जंगलात सोडून दिले.शहरातील श्वानप्रेमी सामाजिक संघटनेच्या काही लोकांना याची माहिती मिळाली असता त्यांनी घटनास्थळी पोहोचून विरोध केला. आणि स्वयंसेवी संस्थेने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली.
महायुती एक्टिव मोडवर! बाजार समिती बरखास्त करीत खासदार गटास दिला झटका.
वर्धा : सत्तेत आल्यावर विरोधकांना नामोहरण करण्याची बाब राजकारणात नवी नाही. निवडून आल्यावर चारच महिन्यात नॉट रिचेबलचा टॅग लागलेल्या खासदार अमर काळे यांच्या ताब्यातील संस्था आता वक्रदृष्टीत आल्याचे दिसून येते. आष्टी बाजार समितीची उपशाखा म्हणून कारंजा बाजार समिती अस्तित्वात आली.
उरणच्या बाजारात वालाच्या शेंगा, वीकेंडला रुचकर पोपटीचे बेत
उरण : सध्या बाजारात हंगामातील पहिले वालाचे पीक दाखल झाले आहे. त्यामुळे उरणच्या ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेल्या रुचकर, मसालेदार पोपटीचे आकर्षण वाढू लागले आहे.
डोंबिवलीत पालिकेचे पाटकर प्लाझा वाहनतळ सांडपाण्याने तुंबले
पूर्व रेल्वे स्थानक भागातील बाजीप्रभू चौकातील पाटकर प्लाझामधील पालिकेचे तळघरातील रिकामे वाहनतळ गेल्या काही दिवसांपासून सांडपाण्याने तुंबले आहे.
गवंड्याच्या प्रेमात पडली दहावीची विद्यार्थिनी, पळून जाऊन लग्न केले
नागपूर : गवंड्याच्या प्रेमात दहावीची विद्यार्थिनी पडली. त्यानेही तिला ओढून लग्नाचे आमिष दाखवले. घरी कुणी नसताना दोघांनीही पलायन करीत मंदिरात लग्न केले. मात्र, पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन ताब्यात घेतले. मुलीला आईवडिलांच्या स्वाधीन केले तर गवंड्याला पोलिसांनी अटक केली.
कल्याण : बाह्यवळण रस्ते मार्गातील अटाळी येथील १२५ बांधकामे जमीनदोस्त
वळण रस्ते मार्गात अटाळी येथे बांधकामे असल्याने एमएमआरडीएला त्या भागात रस्ता बांधणीचे काम करता येत नव्हते.
मुबलक पाण्याची प्रतीक्षाच! सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण
मुंबई : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळेच दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मुदत गाठता येणार नसल्याचे चित्र आहे. प्रकल्पपूर्तीसाठी मुदतवाढ दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.
दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती: निर्णयास.अभा ग्राहक पंचायतीचा विरोध
नागपूर : दुचाकी वरील चालकासह मागे बसलेल्या व्यक्तीस हेल्मेट सक्तीचे हा एक सर्वसाधारण जनमानसाला त्रासदायक निर्णय आहे.अपघातामध्ये हेल्मेट मुळे संरक्षण होते असे म्हणणे मर्यादेपर्यंत सत्य आहे. पण हेल्मेट असले आणि अपघात झाला की काहीही होत नाही असे म्हणणे चुकीचे आहे. असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ आणि प्रवासी महासंघाचे सरचिटणीस अशोक पात्रीकर यांनी म्हटले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात बस उलटली
बस नेमकी कशामुळे, उलटली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
मेट्रो स्थानकांतील स्वच्छता सुधारणांसाठी ‘ॲप’ प्रवाशांच्या सूचना, तक्रारी जाणून घेण्यासाठी ‘एमएमएमओपीएल’चा पुढाकार
मुंबई : ‘दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील सर्व मेट्रो स्थानकांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध करण्यात आली आहेत. असे असले तरी या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत वा सुविधांबाबत प्रवाशांच्या सूचना, तक्रारी जाणून घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय एमएमएमओसीएलने घेतला आहे.
गिरीश महाजनांपाठोपाठ आमदार सीमा हिरेंनी देखील संस्कृतमधून आमदारकीची शपथ घेतली.
पुणे : कल्याणीनगर भागांतील हॉटेलमध्ये धांगडधिंगा, हॉटेल मालकांवर गुन्हे
चर्चेत असणाऱ्या येरवड्यातील कल्याणीनगर भागात पुन्हा एकदा हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा सुरू असल्याचे समोर आले आहे.
रस्ते फक्त माणसांसाठीच असतात का..? एका बिबट्याचा सवाल
Leopard Died in Accident: रस्त्यांवर माणसांनी हक्क गाजवायला सुरुवात केली आणि बिबट्यांना त्यांच्या अधिवासातून बाहेर पडणेही कठीण झाले. त्यांनी बाहेर पडायचा प्रयत्न केलाच तर रस्त्यावरील वाहनांनी त्यांना धडक देऊन थेट यमसदनी पाठवले.
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात
Badlapur Accident : ट्रकने चिरडल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
वसई : पालिकेचे एकमेव निर्बीजीकरण केंद्र बंद, पालिकेकडून दुरुस्तीचे काम; नवीन निर्बिजीकरण केंद्र ही रखडले
वसई विरार शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढू लागली आहे. सैरावैरा फिरणारे भटके श्वान नागरिक व लहान मुले यांच्यावर हल्ला चढवत असल्याच्या घटना समोर येत असतात.
Maharashtra Political News Live Updates : ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे आमदार आज शपथ घेणार नाहीत
ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांचे ४९ आमदार आज शपथ घेणार नाहीत, अशी बातमी विविध वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे. ईव्हीएमद्वारे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीला विरोध दर्शवत विरोधी पक्षांचे आमदार आज आमदारकीची शपथ घेणार नसल्याचं सांगितलं जात आहे. काही वेळापूर्वी शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं. त्यांचे बंधू व शिवसेनेचे (ठाकरे) आमदार सुनील राऊत निषेध म्हणून आज शपथ घेणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षांची महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधात मोठं आंदोलन उभारण्याची तयारी करत असल्याचं दिसत आहे.