Political News Today, 17 Oct 2022 : राज्यात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. रोज नवनवीन राजकीय घडामोडीं घडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हटले आहे. यानंतर आता भाजपाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याशिवाय आज राज्यभरातील १ हजार १६६ ग्रामपंचायतींचा निकालही लागणार आहे. सकाळी वाजेपासून मतमोजणी सुरू होत आहे. १८४ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झालेली आहे.
याशिवाय राज्यभरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षिणक आदी विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एकाच क्लिकरवर.
Maharashtra News Updates: याशिवाय राज्यभरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षिणक आदी विविध क्षेत्रातील सविस्तर बातम्या वाचा फक्त एकाच क्लिकरवर.
वाई : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत सर्व अपक्ष निवडून आले आहेत.गावात उभे राहिलेले प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनेलचे पक्षीय उमेदवार पराभूत झाले. जावळी तालुक्यात भणंग या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. बातमी वाचा सविस्तर...
सिरोंचा वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सागवान तस्करीत गुंतल्याचे प्रकरण ताजे असताना आलापल्ली वनविभाग ‘दोन’ अधिकाऱ्यांच्या मनमर्जी आणि भ्रष्ट कारभारामुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बातमी वाचा सविस्तर...
नायजेरियातील तरुणाला बेदम मारहाण करुन त्याच्यावर चाकूने वार केल्याची घटना हांडेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी मूळचे नायजेरियातील आहेत. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : वर्गमित्राने प्रेमसंबंध प्रस्थापित करून तरुणीचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफीत तयार केली. ती चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीकडे खंडणीची मागणी केली. बातमी वाचा सविस्तर...
मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी तसेच कबीर कला मंचच्या सदस्य ज्योती जगताप यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन देण्यास नकार दिला. त्यांच्या विरोधातील आरोप सकृतदर्शनी खरे असल्याची टिपण्णीही न्यायालयाने केली. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : आपल्या समाजातील उच्चनीचतेची भावना, अस्पृश्यता, जातीयवाद समूळ नष्ट व्हायला हवा. माणूस हा जातीने मोठा नाही तर गुणांनी मोठा होतो. हिंदुत्व, हिंदू धर्म आणि हिंदू जीवनपद्धतीचा संबंध पूजापद्धतीशी फार कमी आहे. परंतु, बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : जातीव्यवस्था कायद्याने संपुष्टात आणली आहे. समाजात माणूस म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरू झालेली संततधार कायम आहे. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून राज्य सरकारने दिवाळीपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करून मदत खात्यात जमा न केल्यास ऐन दिवाळीत आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. बातमी वाचा सविस्तर...
डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानात सोमवारी सकाळी आग लागण्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : देशासमोर सध्या हिंदुत्व आणि अध्यात्माच्या माध्यमातून सांस्कृतिक क्रांतीचे निर्माण झालेले मोठे आव्हान समाजासाठी घातक आहे. समाजवाद आणि समृद्धीचे भांडण नाही. परंतु, यातून विचारांची कोंडी झाली आहे. बातमी वाचा सविस्तर...
ज्येष्ठ रंगकर्मी राजाराम ऊर्फ राजा नाईक (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. १९५२ पासून त्यांनी प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांमधून तसेच चित्रपटांतून भूमिका साकारल्या होत्या. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : नागपूर जिल्हा परिषदेत पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी आज, सोमवारी निवडणूक होत आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शांता कुमरे, मुक्ता कैकाडे व देवानंद कोहळे यांची तर उपाध्यक्षपदासाठी सुमित्रा कुंभारे, मनोहर सव्वालाखे यांची नावे चर्चेत आहेत. बातमी वाचा सविस्तर...
२६ ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत हाती आलेला निकाल खालीलप्रमाणे
भाजपा - ५
कॉग्रेस - ४
राष्ट्रवादी - १
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट )- १
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना - ०
निकाल आला असून एक वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती घेऊन चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायती आणि थेट सरंपचंपदासाठीच्या निवडणुकांचा आज निकाल आहे. थेट सरपंचपदासाठी ७४ टक्के मतदान झालं आहे. गुलाल कोण उधळणार याकडे सर्वांचं लक्ष. रविवारी पार पडलं होतं ग्रामपंचायतींसाठी मतदान.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला ही निवडणूक न लढण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी...
अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपामध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हं असतानाच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांच्या पत्रावर पक्ष नेतृत्व आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी...
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला ही निवडणूक न लढण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काल पत्रकारपरिषदेत बोलताना ही निवडणूक बिनविरोध करावी असं म्हटलं. पवारांनी पत्रकारपरिषदेत हे विधान केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे पवारांचे आभार व्यक्त केले. तर या पत्रानंतर आता मनेसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटद्वारे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये संदीप देशापांडे म्हणतात, ‘राजसाहेब एक म्हण आठवली "कपटी भावा पेक्षा दिलदार शत्रू बरा"’