Maharashtra Political Crisis News : शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष रविवारी नव्या वळणावर पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आल्यावर त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीनपैकी एक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली आहे. तरी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या उपलब्ध चिन्हांच्या यादीतच या तिन्ही चिन्हांचा समावेश नाही. परंतु यादीत उपलब्ध असलेली चिन्हे ही शिवसेनेचा विचारसरणी, ध्येयधोरणांशी सुसंगत नसल्यानेच अपवाद म्हणून तीनपैकी त्रिशूळ चिन्ह मिळावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

तर मराठी अस्मिता, हिंदूत्व जपणाऱ्या शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवून काय मिळवले असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिंदे गटासह भाजपला लक्ष्य केले.

२०१९ साली भाजपाबरोबर युतीमध्ये लढलात, त्यानंतर खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली. मग कट्यार कुणी काळजात घुसवली?” असा उलट सवाल म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. 

अशा राज्यातील राजकीय तसंच विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर वाचता येईल…

Live Updates

Maharashtra News Updates : राज्यातील राजकारण आणि इतर घडामोडींची माहिती एका क्लिकवर...

19:31 (IST) 10 Oct 2022
अतुल भातखळकर यांचे आक्षेपार्ह ट्वीट, मुलायमसिंह यादव यांचे नाव घेत म्हणाले...

मुलायमसिंह यांच्या निधनामुळे देशाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनीदेखील समाजमाध्यमावर जुने फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मात्र भाजपाचे नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या एका ट्वीटमुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर

19:30 (IST) 10 Oct 2022
एकनाथ शिंदेंच्या खासगी सचिवांशी खरंच वाद झाला? अब्दुल सत्तार यांनी दिलं स्पष्टीकरण

कथित वादावर आता खुद्द सत्तार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यात कोणताही वाद झालेला नाही. आचारसंहितेच्या अगोदर विकासकामे व्हायला हवीत, अशी भूमिका मी मांडली होती, असे स्पष्टीकरण सत्तार यांनी दिले आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. वाचा सविस्तर

17:40 (IST) 10 Oct 2022
‘धनुष्यबाण’ गोठवण्यासाठी उद्धव ठाकरेच जबाबदार? अरविंद सावंत म्हणाले...

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा तात्पूरता निर्णय घेतल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. उद्धव ठाकरे समर्थकांनी वेळकाढूपणा केला. निवडणूक आयोगाकडून तारीख वाढवून मागितली गेली. त्यांच्या वेळकाढूपणामुळेच धनुष्यबाण निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले, असा आरोप शिंदे गट आणि भाजपाकडून केला जातोय. वाचा सविस्तर

17:38 (IST) 10 Oct 2022
मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केले दु:ख, म्हणाल्या...

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील दु:ख व्यक्त केले आहे. ते देशातील सर्वोच्च समाजवादी नेत्यांपैकी एक होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. वाचा सविस्तर

17:37 (IST) 10 Oct 2022
पोटनिवडणुकीत काँग्रेसचा कोणाला पाठिंबा? नाना पटोले यांनी थेट सांगितले; म्हणाले

उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पर्यायी निवडणकू चिन्हे तसेच पक्षाची नावे सादर केली आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

17:36 (IST) 10 Oct 2022
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उतरण्याची शिंदे गटाची तयारी, अरविंद सावंत म्हणाले “भाजपाने आग…”

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने पक्षाच्या नावासह पर्यायी निवडणूक चिन्हे निवडणूक आयोगाकडे दिली आहेत. असे असतानाच शिंदे गट ही निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरच आता उद्धव ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची (भाजपा, शिंदे गट) धनुष्याबाण निवडणूक चिन्हाविरोधात लढण्याची हिंमत झाली नाही. म्हणूनच त्यांनी हे चिन्ह गोठवले. भाजपाने आग लावली, असे अरविंद सावंत म्हणाले आहेत. वाचा सविस्तर

17:35 (IST) 10 Oct 2022
अब्दुल सत्तार हे विकृत, कोठेही गेले तरी..,” अंबादास दानवेंचे टीकास्त्र

विकासकामांच्या मुद्द्यावरून शिंदे गटातील नेते तथा मंत्री अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवांमध्ये खडाजंगी झाल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, सत्तार आणि शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यातील कथित वादावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

17:30 (IST) 10 Oct 2022
Patra Chawl land scam case : संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ

पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊतांना न्यायालयाकडून आणखी एक धक्का मिळाला आहे. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. वाचा सविस्तर बातमी...

17:03 (IST) 10 Oct 2022
शुल्कवाढीविरोधात अभाविपकडून पुणे विद्यापीठात ‘पैसा दान करो’ आंदोलन

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेली शुल्कवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) पैसा दान करो आंदोलन केले. कुलगुरूंना खोट्या नोटा देण्यात आल्या आणि शुल्कवाढ कमी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. बातमी वाचा सविस्तर ...

16:18 (IST) 10 Oct 2022
सत्ताधारी आमदारांचाच पाण्यासाठी ठिय्या

अंबरनाथ : अंबरनाथ शहराला सुमारे १२० दशलक्ष लीटर पाणी मिळते. मात्र तरीही शहरातील विविध भागात पाणी टंचाई भेडसावते आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या ढिसाळ कारभारावर नागरिकांत संताप असतानाच सोमवारी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात ठिय्या मांडला. बातमी वाचा सविस्तर ...

16:05 (IST) 10 Oct 2022
पुणे महापालिकेत निविदा अधिकारांचे विकेंद्रीकरण ; आयुक्त विक्रम कुमार यांचा निर्णय

पुणे : विविध कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार उपअभियंता, कार्यकारी अभियंत्यांनाही काही ठरावीक रकमेच्या निविदा काढण्याचे अधिकर देण्यात आले आहेत. बातमी वाचा सविस्तर ...

15:58 (IST) 10 Oct 2022
कोथरुड भागातून दुचाकी चोरणारा अटकेत

पुणे : कोथरुड भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चोरट्यांने कोथरुड, एरंडवणे , तसेच हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरीचे सहा गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

15:51 (IST) 10 Oct 2022
ठाकरे गटाने जी तीन चिन्हं दिली ती आयोगाच्या यादीतच नाहीत, मग काय करणार? अनिल देसाई म्हणाले...

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही गोठवले. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार तातडीने पक्षाची तीन नवी नावं आणि पक्षचिन्हं कळवली. मात्र, यातील तिन्ही पक्षचिन्हं आयोगाच्या यादीत नसल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अनिल देसाई यांना "ठाकरे गटाने जी तीन चिन्हं दिली ती आयोगाच्या यादीतच नाहीत, मग काय करणार?" हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अनिल देसाईंनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (१० ऑक्टोबर) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी...

15:51 (IST) 10 Oct 2022
नाव आणि चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट उच्च न्यायालयात, अनिल देसाई म्हणाले...

निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही गोठवले. यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आयोगाने नैसर्गिक न्यायाचं तत्व पाळलं नाही आणि आम्हाला आमचं म्हणणं मांडण्याची संधी न देताच घाईत निर्णय दिला असं मत शिवसेना नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केलं. ते सोमवारी (१० ऑक्टोबर) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी...

15:40 (IST) 10 Oct 2022
हाॅटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची फसवणूक ; आरोपींना मुंबईतून अटकेत

परदेशातील एका तारांकित हॉटेलमध्ये नोकरीच्या आमिषाने हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघांना स्वारगेट पोलिसांनी मुंबईतून अटक केली. आरोपींनी समाजमाध्यमावर जाहीरात प्रसारित करुन विद्यार्थ्यांची फसवणूक केली. बातमी वाचा सविस्तर ...

15:25 (IST) 10 Oct 2022
अकोला येथील जमावाचा शेगावात धुडगूस

बुलढाणा : शेगाव येथील मुरारका परिवाराच्या मालकीची मुरारका जीन रिकामी करून जागेसह घराचा ताबा घेण्यासाठी अकोला येथील पन्नास जणांचा जमाव शेगावात दाखल झाला. या टोळीने गोंधळ घालून सामानाची नासधूस केली. बातमी वाचा सविस्तर ...

15:15 (IST) 10 Oct 2022
कल्याण डोंबिवली पालिकेतील बेशिस्त कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्तांचा दणका

कल्याण : पालिकेतील आपण प्रस्थापित, ज्येष्ठ कर्मचारी आहोत. आपणास कोणी काही करू शकत नाही. अशा अविर्भावात असलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेतील कार्यालयात नियमित उशिरा येणाऱ्या कर्मचाऱी, अधिकाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी सोमवारी सकाळी चांगलाच दणका दिला. बातमी वाचा सविस्तर ...

15:04 (IST) 10 Oct 2022
धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याला ‘ते’च जबाबदार ; आमदार संजय गायकवाड

बुलढाणा : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. हे त्यांच्याच चुकीचा परिणाम आहे. आता ‘त्यांना’ या घोडचुकीचे परिणाम भोगावेच लागतील, अशी बेधडक प्रतिक्रिया शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांनी दिली. बातमी वाचा सविस्तर ...

14:00 (IST) 10 Oct 2022
जागतिक टपाल दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे : जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून भारतीय टपाल विभागाच्या वतीने राष्ट्रीय टपाल सप्ताहांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

13:34 (IST) 10 Oct 2022
अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

भंडारा : किशोरवयीन मुलीसोबत अश्लील छायाचित्र काढून ते समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत मागील चार वर्षापासून अनैतिक संबंध स्थापित केल्याचे धक्कादायक प्रकरण साकोली तालुक्यात उघडकीस आले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

13:27 (IST) 10 Oct 2022
पुणे : यंदाच्या रब्बीत तेलबिया लागवडीत मोठ्या घटीची शक्यता

यंदाच्या रब्बी हंगामात करडई, सूर्यफुलाच्या लागवड क्षेत्रात घटीचा कल कायम राहणार आहे. करडईचे क्षेत्र फक्त २६ हजार हेक्टरवर, तर सूर्यफुलाचे क्षेत्र जेमतेम सहा हजार हेक्टरच्या घरात राहण्याची शक्यता आहे. जवसाची लागवड नगण्य राहील. बातमी वाचा सविस्तर ...

13:18 (IST) 10 Oct 2022
मेट्रो ४ आणि ४ अ च्या कामाला गती, आतापर्यंत ४१ टक्के काम पूर्ण

मुंबई आणि ठाण्याला जोडण्यासाठी मेट्रो ४ (वडाळा ते कासारवडवली) आणि मेट्रो ४ अ (कासारवडवली ते गायमुख) अशी एकूण ३५.२५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. या मार्गिकेचे काम पुढील दोन ते अडीच वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियोजन असून आतापर्यंत दोन्ही मार्गिकांचे मिळून ४१ टक्के काम पूर्ण झाले आहे.

सविस्तर वाचा...

13:17 (IST) 10 Oct 2022
बदलापुरच्या वेशीवर पुन्हा बिबट्या ; ग्रामस्थांना सावध राहण्याच्या सूचना

बदलापूर : संपन्न जंगलामुळे वन्यजीवांचा वावर असलेल्या बदलापूर आणि आसपासच्या जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हालचाली पाहण्यात आल्या होत्या.  चामटोली भागात बिबट्या असल्याच्या चर्चा रंगत असतानाच आता बदलापूरपासून काही अंतरावर असलेल्या राहटोली भागातही बिबट्य़ाचा वावर असल्याचे समोर आले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

13:07 (IST) 10 Oct 2022
पुणे : अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी कंत्राटी पद्धतीने ४५ निरीक्षक

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागासाठी ४५ निरीक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन विभागातील जागा कायम स्वरूपी पद्धतीने भरण्यासाठी सरळ सेवा पद्धती राबविली जात आहे.

13:06 (IST) 10 Oct 2022
पुणे जिल्ह्यात ७७ जणांना नव्याने करोना संसर्ग

पुणे : रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील ७७ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

12:30 (IST) 10 Oct 2022
विद्यार्थीनीचा मोबाईल लंपास, सिंघम पोलिसांनी पाच मिनीटांत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

नवी मुंबई : सिंघम सारख्या चित्रपटात चपखल बसेल अशी घटना नवी मुंबईतील वाशीत घडली आहे. एक फोन आणि ५ मिनिटात पोलीस हजर. या दोन पोलिसांनी धावत्या बस मध्ये चढत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. बातमी वाचा सविस्तर ...

11:48 (IST) 10 Oct 2022
डोंबिवलीत महिलेला तरुणाची बेदम मारहाण

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील गर्दीतून वाट काढत रामनगर भागातील रिक्षा वाहनतळावर पायी चाललेल्या एका महिलेचा धक्का दोन तरुणांना लागला. महिलेने आपणास मुद्दाम धक्का मारला म्हणून एका तरुणाने महिलेला जाब विचारुन रस्त्यावरच बेदम मारहाण सुरू केली. बातमी वाचा सविस्तर ...

11:39 (IST) 10 Oct 2022
चार वर्षापासून राज्य मुख्य नियंत्रण कक्ष कागदावरच; पॅनिक बटन, व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा अद्याप कार्यरत नाही

काळी-पिवळी टॅक्सी, टूरिस्ट टॅक्सी, प्रवासी बससह नव्याने नोंदणी होणाऱ्या सर्वच सार्वजनिक वाहनांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटन, व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा जानेवारी २०१९ पासून बंधनकारक करण्यात आली. परंतु ही यंत्रणा हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून अद्यापही मुख्य नियंत्रण कक्ष स्थापन झालेला नाही. यंत्रणा असूनही त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही.

सविस्तर वाचा...

11:07 (IST) 10 Oct 2022
“भाजपा कार्यकर्ते मला भेटतात आणि सांगतात…”, अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आगामी गुजरात निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करत आहे. त्यांच्या या प्रचारामुळे गुजरातमध्ये भाजपाला ‘आप’चे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच भाजपा कार्यकर्त्यांबाबत केजरीवाल यांनी मोठा दावा केला आहे.

सविस्तर बातमी वाचा...

11:06 (IST) 10 Oct 2022
कट्यार काळजात कुणी घुसवली? नरेश म्हस्केंचा उद्धव ठाकरेंना सवाल; म्हणाले, “तेच रडगाणं, तीच कथा, हा तर…”

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठविण्याचे ४० खोकासुरांच्या रावणाचे हे काम म्हणजे आईच्या काळजात कट्यार घुसविण्यासारखे असल्याचे ठाकरे म्हणाले आहेत. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सविस्तर बातमी वाचा...

Maharashtra Marathi News Live Updates

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Story img Loader