Maharashtra Political Crisis News : शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष रविवारी नव्या वळणावर पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठविण्यात आल्यावर त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या तीनपैकी एक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली आहे. तरी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या उपलब्ध चिन्हांच्या यादीतच या तिन्ही चिन्हांचा समावेश नाही. परंतु यादीत उपलब्ध असलेली चिन्हे ही शिवसेनेचा विचारसरणी, ध्येयधोरणांशी सुसंगत नसल्यानेच अपवाद म्हणून तीनपैकी त्रिशूळ चिन्ह मिळावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तर मराठी अस्मिता, हिंदूत्व जपणाऱ्या शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवून काय मिळवले असा सवाल करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिंदे गटासह भाजपला लक्ष्य केले.
२०१९ साली भाजपाबरोबर युतीमध्ये लढलात, त्यानंतर खुर्चीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली. मग कट्यार कुणी काळजात घुसवली?” असा उलट सवाल म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.
अशा राज्यातील राजकीय तसंच विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर वाचता येईल…
Maharashtra News Updates : राज्यातील राजकारण आणि इतर घडामोडींची माहिती एका क्लिकवर…
मित्रांसोबत अंबाझरी तलावावर फिरायला आलेल्या १२ वर्षीय मुलाला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्या मुलाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. शौर्य तुकाराम कोहळे (१२, रा. लोखंडेनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : हिंदू धर्म हा सर्वसमावेश, सहिष्णू आणि सर्वांना सामावून घेण्याची ताकद ठेवतो. ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ इंग्रजी शब्दकोषात धर्मनिरपेक्ष असला तरी त्याचा खरा अर्थ सर्वधर्मसमभाव असा आहे. सर्वधर्मसमभाव हीच हिंदुत्वाची आधारशिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : गेल्या अनेक दिवसांपासून शहरातीस अर्धेअधिक वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे त्याचा सामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून ही समस्या सोडवण्याकडे महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून चौकात सिग्नल लावण्यात आले. बातमी वाचा सविस्तर …
पिंपरी चिंचवड : उद्धव ठाकरे यांनी खासदार, आमदारांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार हुकूमशाही प्रवृत्तीने लादण्याचा प्रयत्न केला. ज्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हातात भगवा झेंडा घेऊन स्वाभिमान, हिंदुत्वाचा विचार शिकवला. बातमी वाचा सविस्तर …
पुणे : आरोग्य सेवा रुग्णकेंद्री करण्यासाठी माहितीवर (डेटा) आधारित निर्णय घेणे आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकाभिमुख आरोग्य व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे, असे मत आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. बातमी वाचा सविस्तर …
बारामती : शिवसेनेतील नेते एकमेकांना गद्दार बोलतात, पण त्याने राज्यातील प्रश्न सुटणार आहेत का? दोन लाख नागरिकांचे रोजगार गेले, देशात महागाई वाढली आहे, यावर बोलायला कोणीच तयार नाही. माणसे फोडण्याचेच काम केले जात असून, लोकशाहीचा नुसता खेळखंडोबा झाला आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : राज्यातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ७ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी देत कर्मचाऱ्यांचा दिवाळी भेट असल्याचा दावा सामाजिक न्याय विभागाकडून केला जात असला तरी या पैशातून काही महाविद्यालयांचे एका महिन्याचे वेतन होणेही कठीण होणार आहे. बातमी वाचा सविस्तर …
जत तालुक्यातील बिळुर येथे तलावात पडून आई आणि तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घराशेजारी असलेल्या तलावावर धुण्याचे कपडे आणि साबण असे साहित्य आढळून आले आहे. बातमी वाचा सविस्तर …
उरण : पनवेलमधील १ हजार ६३० पारंपरिक मच्छीमारांना ९५ कोटी आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून जेएनपीएने सर्वोच्च न्यायालयात नुकसानभरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. बातमी वाचा सविस्तर …
भारतीय डाक विभागाने नव्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून ज्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाची गरज आहे अशा राज्यासोबत समन्वय साधून ड्रोनद्वारे अत्यावश्यक सेवा टपाल खात्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचा विचार असल्याचे नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल (विदर्भ) शुभा मधाळे यांनी सांगितले.