Marathi News Today, 21 Oct 2022 : राज्यात अडीच वर्षांपूर्वा महाविकास आघाडीच्या निमित्ताने नवं राजकीय समीकरण पहायला मिळालं होतं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि आणखी एक नवा राजकीय प्रयोग पहायला मिळाला. दरम्यान आता राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाढणारी जवळीक पाहता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच आज हे तिन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत.
अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान एक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. फोन टॅपिंग ज्या कालावधीत झालं, त्यावेळी राज्यात निवडणुका होत्या. त्यामुळे हे संभाषण कोणालातरी पुरवण्यात आले होते? यामागे नेमका कोणाचा हेतू होता? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं जनतेपर्यंत पोहोचायला हवी, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Updates : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी; बोरघाटात वाहनांची रांग
नियोजित गृहप्रकल्पात चौथ्या मजल्यावर काम करणारा बांधकाम मजूर लाकडी पहाड (सांगाडा) तुटून पडल्याने मृत्युमुखी पडल्याची घटना कात्रज भागात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ठेकेदारासह बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाले आणि रिक्षा चालकांमुळे प्रवासी वेठीस धरले जात आहेत. त्यामुळे शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरात आमदार संजय केळकर यांनी वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.
ऑम्लेट व्यवस्थित बनविले नाही, या कारणावरून पोलीस हवालदाराने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. मध्यस्थी करणाऱ्या मुलाला हवालदाराने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पोलीस हवालदारास अटक केली.
ऑम्लेट व्यवस्थित बनविले नाही, या कारणावरून पोलीस हवालदाराने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. मध्यस्थी करणाऱ्या मुलाला हवालदाराने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
यंदाच्या पावसाळ्यादरम्यान शहरातील रस्त्यालगत असलेली विदेशी प्रजातीचे वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली असतानाच, दुसरीकडे शहरात मियावॉकी तंत्रज्ञानाद्वारे देशी प्रजातीच्या वृक्षांची वनराई फुलविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे.
सणासुदीत बाजारात गुजरातमधील भेसळयुक्त बर्फी विक्रीस पाठविण्यात येत असल्याचा प्रकार अन्न आणि ओैषध प्रशासनाने् (एफडीए) उघडकीस आणला. बातमी वाचा सविस्तर...
जमिनीच्या वादातून नेरे दत्तवाडीत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत दोन गोळ्या झाडण्यात आल्या. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चाळीस वर्षांपूर्वी उरण व अलिबाग या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रेवस करंजा खाडी पुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाची आता मंजुरी मिळाली असून २०२५ पर्यंत तो पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे रेवस व करंजा ही दोन्ही बंदरे रस्ते मार्गाने जोडली जाणार आहेत.
अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांना माती, चिखल, दगड, गोणपाट यांचीही चांगली ओळख असावी. निसर्गातील या वस्तूंमधून चांगल्या देखण्या कलाकृती तयार करू शकतो याची माहिती व्हावी, या उद्देशातून येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने गेल्या आठवड्यापासून ३५० विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळेच्या आवारात २१ किल्ले बांधणीची कामे सुरू केली आहेत.
कल्याण रेल्वे यार्डचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून लोकल प्रवास सुकर करण्यासाठी या स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र फलाट तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन वर्ष लागणार आहेत.
राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम १५ ऑक्टोंबरपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. तरीही रोहित पवार यांच्याशी निगडीत असलेल्या इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती अॅग्रो कारखान्याने त्यापूर्वीच हंगाम सुरु केला होता. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्यांच्या संचलाकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजपा नेते राम शिंदे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली होती.
नाशिक : देवळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शांतारामतात्या आहेर यांचे गुरूवारी रात्री येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बातमी वाचा सविस्तर...
Anil Deshmukh Money Laundering Case : कथीत १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख गेल्या ११ महिन्यांपासून तुरुंगात आहेत. या प्रकरणी सीबीआय आणि ईडी दोघांनीही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वीच ‘ईडी’च्या गुन्ह्यांमध्ये देशमुखांना जामीन मिळाला होता. मात्र, याच प्रकरणात त्यांच्यावर सीबीआयनेही गु्हा दाखल केला असल्याने त्यांच्या तुरंगात राहावे लागले होते. मात्र, आज सीबीआय कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे. सविस्तर वाचा -
बारामती कृषी विकास ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी लहानपणींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच पोहोण्यासंदर्भातली एक विशेष आठवणही सांगितली. सविस्तर वाचा -
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेंचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे पदाधिकारी राम पवार यांनी दिली. बातमी वाचा सविस्तर...
गेली पाच दशके पवार कुटुंबीयांचा दबदबा असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. मनसेच्या मिशन बारामतीची रणनीती निश्चित झाली आहे. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : एन.डी.ए. चौक (चांदणी चौक) उड्डाणपूल प्रकल्पातील मुळशी-मुंबई मार्गाच्या उर्वरित भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी दाखल प्रकरणात उच्च न्यायालयाने भूसंपादनाला परवानगी दिली असल्याने या ठिकाणचे उर्वरित काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. बातमी वाचा सविस्तर...
दिवाळीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शिवाजीपार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाचे निमंत्रण जनतेला दिले आहे. ”आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील, तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा
राजकीय नेते, काही पोलीस आणि मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या छत्रछायेमुळे प्रकाशात आलेल्या स्वयंघोषित तोतया समाज माध्यम विश्लेषक अजित पारसेला अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. बातमी वाचा सविस्तर...
दिवाळीच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) मार्फत करण्यात येणाऱ्या अन्न पदार्थांच्या विशेष तपासणी मोहिमेला वेग आला आहे. प्रशासनाकडून मुंबईत नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात येत असलेली आणि विनापरवाना उत्पादन-विक्री करण्यात येत असलेली मिठाई जप्त करण्यात आली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. HOC ब्रिज ते अमृतानजन पुलापर्यंत २ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. साप्ताहीक सुट्टी आणि दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी दिसून येत आहे.
शहरातील वाहतूक समस्येची जबाबदारी झटकणार नसल्याचे स्पष्ट करत वाहतूक हा शहराच्या नगर नियोजनाचाही भाग असल्याचा विसर पडल्याचे मत मांडले. तसेच अरुंद रस्ते, खड्डे, पाणी, मेट्रो, बीआरटी, उड्डाणपुलांची कामे अशा परिस्थितीत केवळ एक तृतीयांश रस्ताच वापरण्यास मिळत असूनही वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम केले जात असल्याचे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी दिले. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चौधरी यांना काल उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आता त्यांच्या कार्यकाळात झालेल्या गैरप्रकाराबाबत नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने कारवाईला सुरुवात केली आहे. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : सीरमने कोविशिल्ड लशीचे उत्पादन डिसेंबर २०२१ मध्येच थांबवले. लशीच्या त्या वेळच्या साठ्यापैकी शंभर दशलक्ष लशी मुदतबाह्य ठरल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी गुरुवारी स्पष्ट केले. बातमी वाचा सविस्तर...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला भाजपनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही लक्ष्य केले आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. बातमी वाचा सविस्तर...
रयत शिक्षण संस्थेनंतर राज्यातील दुसरी मोठी शिक्षण संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण (मविप्र) संस्थेतील नवनिर्वाचित पदाधिकारी दीड महिन्यांपासून गावोगावी निव्वळ सत्कार स्वीकारण्यात मग्न असल्याचे चित्र आहे. बातमी वाचा सविस्तर...
नागपूर : पाश्चिमात्य देशांनी भारताच्या आधीच लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला. मात्र, असे असतानाही तेथील कृष्णवर्णीय लोकांना आणि विशेषत: महिलांना आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी लढा द्यावा लागला. बातमी वाचा सविस्तर...
सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शिधा पत्रिकाधारकांना १०० रुपयांत साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेलाचा शिधासंच (आनंदाचा शिधा संच) देण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. बातमी वाचा सविस्तर...
अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना दिलासा मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सविस्तर वाचा -
पुणे शहरातील वाघोली परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. या परिसरातील एका रहिवाशी सोसायाटीच्या सेप्टिक चेंबरची स्वच्छता करताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य एक जण बेपत्ता आहे. पुणे महागर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1583306131983962114?s=20&t=tAVmoinrvYOnMAaABIIDbg
शाळेतील सहामाहीच्या परीक्षा संपल्या आहेत. तसेच आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. त्याआधी आलेल्या साप्ताहीक सुट्टीची संधी साधून अनेकांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय, साप्ताहीक सुट्टी निमित्ताने मुंबईकर आणि ठाणेकर मुंबईच्या बाहेर जाताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांची गर्दी दिसून येत आहे. परिणामी बोरघाटात वाहनांची रांग लागली आहे. अमृतांजन पुलाजवळ सुमारे २ किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहे.