Maharashtra Breaking News Today, 10 November 2023 : आजपासून दीपावलीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज धनत्रयोदशी असून राज्यभर दिवाळीचा उत्साह आहे. अनेक कार्यालयात आज दिवाळीचा जल्लोष आहे. तर बाजारात खरेदीला वेग आलाय. तर, दुसरीकडे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तसंच दिवाळीच्या उत्साहातही राजकीय नेतेमंडळींकडून राजकीय फटकेबाजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिवाळ्याची चाहूल लागलेली असतानाच मुंबईसह इतर शहरांत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात लहरी हवामान निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज घडणाऱ्या घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Mumbai Maharashtra News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:56 (IST) 10 Nov 2023

18:55 (IST) 10 Nov 2023
कांदिवलीमध्ये साडेतीन लाखांचा भेसळयुक्त मावा जप्त

मुंबई: दिवाळीनिमित्त नागरिकांना सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मागील काही दिवसांपासून भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे.

सविस्तर वाचा…

18:48 (IST) 10 Nov 2023
सिकंदर शेख ठरला ६६ वा महाराष्ट्र केसरी

गेल्यावर्षी महाराष्ट्र केसरीची गदा थोडक्यासाठी हुकलेल्या सिकंदर शेख यांनी यंदाची गदा उंचावली आहे. ६६ व्या महाराष्ट्र केसरीचा मान सिकंदर शेख यांनी मिळवला असून शिवराज राक्षेचा अंतिम सामन्यात पराभव झाला आहे.

18:42 (IST) 10 Nov 2023
सोलापुरात साखर कारखान्यांमध्ये ऊसदरासाठी चढाओढ

सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम उसाचा जास्त दर देण्याचे जाहीर करताच इतर कारखानेही जादा दर देण्यासाठी पुढे सरसावत आहेत.

सविस्तर वाचा…

18:21 (IST) 10 Nov 2023
दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात घसरण, दुकानदारांना मोठ्या विक्रीची अपेक्षा

Dhanteras 2023: आज देशभरात धनत्रयोदशीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अशा स्थितीत सोने, चांदी आणि हिर्‍याचे दागिने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. धनत्रयोदशी आणि दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे.

वाचा सविस्तर

17:52 (IST) 10 Nov 2023
अबब…धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जळगावात १०० किलोवर सोने विक्री

देशभरात प्रसिद्ध असलेल्या सुवर्णनगरीत नेहमीच सोने खरेदीसाठी गर्दी असते. नवरात्रोत्सवापासून सुरू झालेला सुवर्णखरेदीचा उत्साह अद्याप कायम आहे.

सविस्तर वाचा…

17:42 (IST) 10 Nov 2023
‘ओबीसीं’च्या यादीत आणखी काही जातींच्या समावेशाची शिफारस; राज्य सरकारचा राज्य मागासवर्ग आयोगाकडे पुन्हा प्रस्ताव

राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीशिवाय काही नव्या जाती, पोटजातींना राज्याच्या ओबीसी यादीत समाविष्ट केले असून त्यांचा केंद्राच्या यादीत समावेश व्हावा म्हणून प्रयत्न चालवले आहेत.

सविस्तर वाचा…

17:17 (IST) 10 Nov 2023
नाशिक : पोलिसांची ५० पेक्षा अधिक गुन्हेगारांविरुध्द कारवाई

नोंदीतील तसेच तडीपार अशा एकूण १३५ गुन्हेगारांची तपासणी करून ६५ गुन्हेगारांचे चौकशी अर्ज भरुन घेण्यात आले.

सविस्तर वाचा…

16:28 (IST) 10 Nov 2023
नागपूर: महाराष्ट्र एक्सप्रेसमधून चांदी तस्करी, दोघांना अटक

नागपूर: महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन व्यक्तीकडून रेल्वे सुरक्षा दलाने तब्बल ४१.२३ किलो चांदी इतरवारी रेल्वे स्थानकावर जप्त केली.

सविस्तर वाचा…

16:26 (IST) 10 Nov 2023
कोवळ्या माशांच्या मासेमारीवर निर्बंध, पारंपारिक मच्छीमारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण आदेश

कोवळ्या माशांची मासेमारी करण्यावर निर्बंध घालण्याचा आदेश राज्य सरकारने २ नोव्हेंबर रोजी जारी केला आहे.

सविस्तर वाचा…

16:25 (IST) 10 Nov 2023
मोठी बातमी : ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्त उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

वाचा सविस्तर….

16:22 (IST) 10 Nov 2023
जे भेसळ करतील त्यांना शिक्षा भोगावीच लागेल, काय म्हणाले मंत्री?

नागपूर : दिवाळीला भेसळ रोखण्यासाठी राज्यात सगळीकडे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. ज्या दुकानात भेसळ आढळले तर संबंधित वस्तू तयार करणारी कंपनी आणि दुकान बंद करण्यात येईल. जे भेसळ करतील त्यांना शिक्षा भोगावीच लागेल असा इशारा अन्न व औषध मंत्री धर्मराव आत्राम यांनी दिला.

सविस्तर वाचा…

16:04 (IST) 10 Nov 2023
अनुपालन अहवाल सादर करा, एमएमआरसीचे दोन्ही कंत्राटदारांना आदेश; वायू प्रदुषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश

‘मेट्रो ३’ मार्गिकेचे काम करणाऱ्या सर्वच कंत्राटदारांना वायू प्रदुषणाबाबतच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा…

16:03 (IST) 10 Nov 2023
लोकलवर दगड फेकणारा आरोपी अटकेत

आरोपीने भिरकावलेला दगड महिला डब्यात उभ्या असलेल्या वैष्णवीच्या नाकाला लागला.

सविस्तर वाचा…

15:20 (IST) 10 Nov 2023
मुंबई : अखेर म्हाडाला डीआरपीकडून ५०० कोटी परत मिळाले

समृद्धी महामार्गासाठी म्हाडाने एक हजार कोटी रुपये दिले असून रेल्वेची जागा संपादित करण्यासाठी डीआरपीला ५०० कोटी रुपये दिले होते.

सविस्तर वाचा…

15:15 (IST) 10 Nov 2023
नागपूर : ‘गडकरी साहेब… आमचे रस्ते चोरीला जात आहेत..’

नागपूर : ‘गडकरी साहेब… आमचे रस्ते चोरीला जाऊ लागले आहेत…’ दाभा ले आऊट येथील नागरिकांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेच तक्रार केली. त्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणेसह सारेच हादरले आहेत.

सविस्तर वाचा…

14:40 (IST) 10 Nov 2023
उपमुख्यमंत्री अजित पवार खासगी विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना

या सर्व घडामोडी दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे विमानतळ येथून खासगी विमानाने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत.

सविस्तर वाचा…

14:23 (IST) 10 Nov 2023
मेट्रोच्या कामामुळे औंधकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे विद्यापीठ चौकातील पुलाचे आणि मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असेपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

14:08 (IST) 10 Nov 2023
शिवडी, परळमधील चार सामुदायिक प्रसाधनगृहांचे बांधकाम सुरू; पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भूमिपूजन

मुंबई शहर विभागात एकूण ८६ ठिकाणी सामुदायिक प्रसाधनगृहांची पुर्नबांधणी करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा…

13:55 (IST) 10 Nov 2023
मुंबई : मराठी तरुणाने बदलायला लावले रेल्वेच्या ‘एक्स’ खात्याचे नाव

मुंबई : भारतीय रेल्वेचा प्रत्येक झोन, विभाग आणि त्याच्या उपविभागाचे समाज माध्यमावर स्वतंत्र खाती आहे. रेल्वे संदर्भातील महत्त्वाची माहिती त्या खात्यावर प्रसारित केली जाते. तसेच प्रवासी आपल्या तक्रारी, समस्या त्यावर मांडतात. प्रत्येक विभागाचे नाव हे त्याच्या समाज माध्यमावरील खात्याला दिले जाते. मात्र, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) हे खाते अधिकाऱ्याच्या नावाने सुरू होते. वैयक्तिक नावाला आक्षेप घेत मराठी तरुणाने रेल्वे मंडळाकडे तक्रार केली. त्यानंतर ‘एक्स’ (ट्विटर) खात्याचे नाव ‘डीआरएम पुणे’ करण्यात आले.

वाचा सविस्तर…

13:54 (IST) 10 Nov 2023
पिंपरी :महापालिका ठेकेदारावर मेहरबान; मोशी रुग्णालयाच्या वाढीव दराच्या निविदेला प्रशासनाची मान्यता

पिंपरी : महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या गावांतील रहिवाशांसाठी मोशीमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ८५० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने ठेकेदारावर मेहरबानी दाखवत पाच टक्के वाढीव दराची निविदा स्वीकारली आहे. ३४० कोटी रुपयांचा निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. रुग्णालयाच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

13:48 (IST) 10 Nov 2023
तुनिषा आत्महत्या प्रकरण : अभिनेता शिझान खानला दिलासा नाहीच; गुन्हा रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

तुनिषा हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाप्रकरणी शिझान याने त्याच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सविस्तर वाचा…

13:24 (IST) 10 Nov 2023
नाशिक जिल्ह्यात ७२ हजारांहून अधिक कुणबी नोंदींचा शोध, आतापर्यंत तीस लाख नोंदींची पडताळणी

जिल्ह्यात मराठा-कुणबी नोंदी शोधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ३० लाख नोंदींची तपासणी झाली असून यात ७२ हजार ८७६ कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

सविस्तर वाचा…

13:16 (IST) 10 Nov 2023
नागपूर : धनत्रयोदशीला सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी गर्दी; सराफा व्यावसायिक म्हणतात, “रेकॉर्ड तुटणार…”

नागपूर : दिवाळीतील धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर शुक्रवारी (१० नोव्हेंबर) सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी नागपुरातील सराफा दुकानांत ग्राहकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. खरेदीचा मुहूर्त सकाळी ९.३० वाजता असला तरी ग्राहकांनी सकाळी ९ वाजतापासूनच गर्दी केली. ग्राहकांचा कल बघता यंदा दागिने विक्रीचे सर्व रेकॉर्ड तुटण्याची शक्यता सराफा व्यावसायिक वर्तवत आहेत.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 10 Nov 2023
सिडकोमध्ये १०० पदांची भरती; मंजूर पदांसाठी नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना

पनवेल: सिडको महामंडळामध्ये मागील अनेक वर्षे नोकर भरती केली नाही. मात्र आवश्यकतेनूसार मंजूर पदांपेक्षा कमी पदांवर येथील कर्मचारी काम करत असल्याने कर्मचा-यांवर कामाचा ताण वाढला आहे.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 10 Nov 2023
उपकार माना, ‘एनएमएमटी’ खारघरसाठी बस सोडते! चौकी नियंत्रकाचे प्रवाशांना उत्तर

नवी मुंबई: खारघर रायगडमध्ये येतं, नवी मुंबईत नाही, हे लक्षात घ्या आणि ‘एनएमएमटी’चे उपकार माना की नवी मुंबईच्या बस रायगडमध्ये सोडल्या जातात.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 10 Nov 2023
दर दोन तासांनी हवा गुणवत्ता तपासणी; नवी मुंबई महापालिकेची प्रदूषण नियंत्रणासाठी लगबग

नवी मुंबई: मुंबईस लागून असलेल्या नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी दिवसागणिक वाढू लागल्याने खडबडून जागे झालेल्या महापालिकेने हवेचे प्रदूषण नियंत्रणात राहावे यासाठी युद्धपातळीवर उपाय आखण्यास सुरुवात केली आहे.

सविस्तर वाचा…

12:46 (IST) 10 Nov 2023
मुंबई : मोनोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

मुंबई : चेंबूर – जेकब सर्कल दरम्यान मोनो रेलने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोनो रेलच्या ताफ्यात नवीन मोनो गाडी दाखल झाली आहे. त्यामुळे मोनो रेलच्या २४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मोनो रेलच्या एकूण फेऱ्यांची संख्या ११८ वरून १४२ फेऱ्यांवर पोहोचली आहे.

वाचा सविस्तर…

12:42 (IST) 10 Nov 2023
अमरावतीत सोनेरी मिठाईची चर्चा, यंदा फराळात १० ते १५ टक्के दरवाढ

अमरावती : दिवाळीसाठी तयार फराळाची बाजारपेठदेखील सजली आहे. किराणा बाजारात फराळाचे जिन्नस करण्यासाठी लागणाऱ्या भाजणीसह अनेक पदार्थांची तयार पीठदेखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. अमरावतीकरांसाठी शहरातील रघुवीर मिठाईच्या संचालकांनी खास सोनेरी वर्ख असणारी ‘गोल्डन फ्लॉवर’ ही मिठाई बाजारात आणली आहे. ११ हजार रुपये किलो असा या खास मिठाईचा दर आहे.

सविस्तर वाचा…

12:42 (IST) 10 Nov 2023
ठाणे : महापालिकेच्या २१७ अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान नाही

ठाणे : ठाणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना यावर्षी २१ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आला आहे. मात्र यावर्षी वर्ग एकमधील अधिकाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाणार नसल्याचे पत्रक महापालिकेने काढले आहे.

वाचा सविस्तर…

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर