Maharashtra Breaking News Today, 10 November 2023 : आजपासून दीपावलीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज धनत्रयोदशी असून राज्यभर दिवाळीचा उत्साह आहे. अनेक कार्यालयात आज दिवाळीचा जल्लोष आहे. तर बाजारात खरेदीला वेग आलाय. तर, दुसरीकडे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तसंच दिवाळीच्या उत्साहातही राजकीय नेतेमंडळींकडून राजकीय फटकेबाजी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हिवाळ्याची चाहूल लागलेली असतानाच मुंबईसह इतर शहरांत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात लहरी हवामान निर्माण झालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज घडणाऱ्या घडामोडी जाणून घेऊयात.

Live Updates

Mumbai Maharashtra News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

12:36 (IST) 10 Nov 2023
वय वर्षे १७ आणि काम वेश्यागमनसाठी मॉडेल , टिव्ही मालिकेतील महिला कलाकार पुरवणे; वाचा धक्कादायक प्रकार

नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सुरवातीपासून ज्या पद्धतीने रॅकेट चालवले जात होते ते पाहता आरोपी एखादी पोक्त महिला असावी असा कयास पोलिसांचा होता मात्र प्रत्यक्ष पाहता आरोपी एखाद्या लहान युवती प्रमाणे दिसत होती. तिचे वय सतरा हे समोर आल्यावर पोलिसही चक्रावले.

वाचा सविस्तर…

12:34 (IST) 10 Nov 2023
नागपूर : पोलिसांनी दिली पावणेचार कोटींची दिवाळी भेट, नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

नागपूर : चोरी, दरोडा, लुटमार, घरफोडीमध्ये चोरीच्या गुन्ह्याची उकल झाल्यानंतर चोरट्यांकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करतात. मुद्देमाल पोलीस ठाण्यात पडून असतो. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या दिवाळीत तक्रारदार-फिर्यादींना तब्बल पावनेचार कोटी रुपयांची दिवाळीभेट दिली आहे. नागरिकांचे चोरी झालेले सोने, वस्तू आणि वाहने परत केल्या.

सविस्तर वाचा…

12:32 (IST) 10 Nov 2023
अकोला : …तर खासगी बस वाहतूकदारांवर कारवाई, ‘या’ माध्यमातून केलेल्या तक्रारीची थेट दखल घेणार

अकोला : खासगी बससाठी कमाल भाडेदर शासनाने निश्चित केले आहे. तरीदेखील खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट केली जात आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्याचे आढळल्यास नागरिकांनी ऑनलाइन तक्रार द्यावी. अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिली.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 10 Nov 2023
वसई विरार महापालिकेतील कर घोटाळा, सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना क्लिन चिट, निलंबन रद्द

वसई : वसई विरार महापालिकेतील कर घोटाळ्याप्रकरणी निलंबित प्रभारी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना क्लिन चीट देण्यात आली असून त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले आहे. पाटील यांच्याकडे अतिक्रमण विरोधी पथकाच्या (सीयूसी) मुख्यालयातील पदभार देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:30 (IST) 10 Nov 2023
वर्धा : जमनालाल बजाज संस्थेची दुर्बल शाळांना दहा कोटींची मदत

वर्धा : जमनालाल बजाज संस्थेची दुर्बल शाळांना दहा कोटींची मदत मिळाली आहे. या संस्थेने जिल्ह्यातील दुर्लक्षित पण गुणवंत शाळांना मदत करण्याचा उपक्रम राबविणे सुरू केले आहे. गत तीन वर्षांत जिल्ह्यातील विविध शाळांना आतापर्यंत दहा कोटी रुपयाची मदत करण्यात आली असून यावर्षी साठ लाख रुपयांची मदत करण्याचे नियोजन असल्याचे संस्था सचिव संजय भार्गव यांनी सांगितले.

सविस्तर वाचा…

12:30 (IST) 10 Nov 2023
अमरावतीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

अमरावती : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या एका ट्रॅव्हल्स एजंटकडून संगणकासह विविध नावांच्या आयडी, ई-तिकीट व अन्य साहित्य ताब्‍यात घेण्‍यात आले असून रेल्वे सुरक्षा बलाने ही कारवाई केली. संजय हरिओम अग्रवाल (५४, रा. कॉंग्रेसनगर रोड, सुंदरलाल चौक, अमरावती) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दलालाचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 10 Nov 2023
अकोला : ज्वारी, बाजरी व मक्याची हमीभावाने खरेदी होणार

अकोला : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत हमीभावाने खरेदीसाठी ज्वारी, बाजरी व मका पिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

12:29 (IST) 10 Nov 2023
वाशिम : वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटता सुटेना; सिग्नल यंत्रणाही कुचकामी!

वाशिम : लाखो रुपये खर्च करून वाहतूक व्यवस्था नियंत्रित ठेवण्यासाठी शहरातील चौकांत सिग्नल व्यवस्था नगर पालिकेने लावली. परंतु मागील अनेक वर्षांपासून सिग्नल व्यवस्था सुरूच झाली नाही. सध्या दिवाळीमुळे पाटणी चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. वाढती वाहतूक कोंडी सोडविण्याचे आव्हान शहर वाहतूक शाखेसमोर आहे.

सविस्तर वाचा…

12:19 (IST) 10 Nov 2023
वडेट्टीवारांची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी- जरांगे पाटील

ओबीसीत मराठ्यांनी यायचंच नाही असं सांगणारा विरोधी पक्ष देशात कुठेच नाही. त्यामुळे तुम्ही मराठ्यांना सल्ले देऊच नका. गायकवाड आयोगलाही तुम्ही बोगस म्हणाला होतात, म्हणजे तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी विजय वडेट्टीवारांवर केली.

12:00 (IST) 10 Nov 2023
राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, १३ वर्षांपूर्वीचा गुन्हा रद्द

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपांप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राज ठाकरे यांच्याविरोधात दाखल गुन्हा आणि आरोपपत्र उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले.

वाचा सविस्तर…

10:32 (IST) 10 Nov 2023
उपमुख्यमंत्र्यांची वाऱ्यावरची वरात सुरू आहे, संजय राऊतांची टीका

मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव होणार आहे. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून भाजपा मंत्री, उपमुख्यमंत्री नेते वाऱ्यावरची वरात करत आहेत. निकाल लागल्यावर वरातीतल्या घोड्याला कळेल की किती मागे पडला आहे. उगाच कशाला नाचवायचा – संजय राऊत

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह

Mumbai Maharashtra News Updates : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर