Maharashtra News Today, 13 November 2023: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं सोशल मीडियावर कथित ओबीसी प्रमाणपत्र व्हायरल होत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. तर शरद पवारांचं ओबीसी प्रमाणपत्र आम्ही कशाला व्हायरल करू अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. यावर इतरही राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दुसरीकडे, मुंब्र्यातील शिवसेना शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. याप्रकरणी ठाकरे गट संबंधित शिवसेना शाखेची सर्व कागदपत्रे घेऊन मुंबई उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. यांसह दिवाळी संदर्भातल्या इतरही घडामोडींचा एकत्रित आढावा…

Live Updates

Mumbai Maharashtra News Live Updates : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

17:35 (IST) 13 Nov 2023
मुंबई : बोनसवरील आयकर कापण्याविरोधात कामगार संघटनांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले असले तरी त्यातून आयकराची रक्कम कापून घेतल्यामुळे हातात आठ ते दहा हजार रुपये कमी मिळाले आहेत.

सविस्तर वाचा...

17:23 (IST) 13 Nov 2023
कुख्यात गुंड अरुण गवळी आणखी चार आठवडे मुक्त…

गँगस्टर अरुण गवळीवर माजी आमदार कमलाकर जामसांदेकरसह अकरा लोकांच्या हत्येचा आरोप आहे.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 13 Nov 2023
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमक्यांचे फोन, संदेश

वडेट्टीवार यांना सकाळी भ्रमणध्वनीवर धमकी मिळाली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे.

सविस्तर वाचा...

17:05 (IST) 13 Nov 2023
अल्पवयीन मुलीची आधी ‘बलात्कार’ची तक्रार, न्यायालयात मात्र…

नागपूर: शहरातील एका अल्पवयीन मुलीने आधी बलात्काराची तक्रार केली. पण, मात्र न्यायालयात प्रकरण गेल्यावर तिने याला नकार दिला. मुलीनेच आरोपांबाबत माघार घेतल्याने बलात्काराच्या आरोपीची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

सविस्तर वाचा...

16:55 (IST) 13 Nov 2023
सांगली : लक्ष्मीपूजनाची संधी साधून चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला

शिराळा तालुक्यात सात ठिकाणी तर मिरजेत एका ठिकाणी चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला.

सविस्तर वाचा...

16:53 (IST) 13 Nov 2023
पुण्‍यातून फरार गुन्‍हेगारांना अमरावतीत अटक

अमरावती: अनेक जबरी गुन्हे करून पसार झालेल्‍या, पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस सक्रिय झाले असून पुण्‍याहून अमरावतीत आश्रयासाठी आलेल्‍या दोन गुन्‍हेगारांना पोलिसांनी आशियाड कॉलनी चौकातून ताब्‍यात घेतले.

सविस्तर वाचा...

16:43 (IST) 13 Nov 2023
विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा मृत्यू; ६ जणांवर कारवाई

शिकारीसाठी तारा लावणाऱ्या सहा जणांनी कारवाई होण्याच्या भीतीने कुंभार बंधूंचे मृतदेह जंगलात फेकले असल्याची माहिती मिळाली असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर वाचा...

16:41 (IST) 13 Nov 2023
नागपूर: दिवाळीच्या पूर्वसंध्येला विवाहितेची आत्महत्या

नागपूर: घरात दिवाळी सणाची तयारी सुरु असतानाच पतीसह सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी सुनेचा अतोनात छळ केला. शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून सूनेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सविस्तर वाचा...

16:29 (IST) 13 Nov 2023
“काळजी न घेतल्यास आरोग्याला धोका होऊ शकतो निर्माण”, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकाऱ्यांचा इशारा

वायु प्रदूषण हे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्यास धोका होऊ शकतो.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 13 Nov 2023
डोंबिवलीत फटाके वाजविणाऱ्यावरून तरूणाला मारहाण

डोंबिवली: आम्ही उभे असताना तू आमच्या जवळ फटाके का फोडतोस, असे प्रश्न करून चार जणांनी रविवारी रात्री एका तरूणाला बेदम मारहाण केली. शस्त्राने एकाने चेहऱ्यावर हल्ला केल्याने तरूणाला गंभीर दुखापत झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:16 (IST) 13 Nov 2023
‘पोलिसांनी पैसे मागितल्यास मला फोन करा’, वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने लावले फलक

पवार यांनी ठळक अक्षरात आपला खासगी मोबाईल नंबर दिला आहे. कुठलाही नागरिक मला थेट भेटायला येऊ शकतो असेही त्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

15:59 (IST) 13 Nov 2023
पिंपरी-चिंचवड : कुरघोड्या, राजकीय डाव करणारे नेते एकाच मंचावर, नेत्यांमध्ये रंगल्या गप्पागोष्टी

दिशा सोशल फाउंडेशनने आयोजित केलेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी सर्व स्थानिक नेत्यांसह आमदार, खासदार यांनी उपस्थिती लावली होती.

सविस्तर वाचा...

15:52 (IST) 13 Nov 2023
"अजित पवार नेहमीच नाराज असतात", विजय वडेट्टीवार यांचा टोला

अजित पवार कधी खूश राहिले आहेत का? ते नेहमीच नाराज असतात. मनाप्रमाणे झाले, तर खूश. मनाविरुद्ध झाले, तर नाराज. आम्ही करू तो कायदा, अशी त्यांची भूमिका असते.

- विजय वडेट्टीवार (विरोधी पक्षनेते)

15:34 (IST) 13 Nov 2023
अमरावती : तिकिटांचा काळाबाजार; ७७ जणांना अटक

अवैध ऑनलाईन तिकीट प्रकरणात गुंतलेल्‍या दलालांकडून तिकीट खरेदी करणे महागात पडू शकते.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 13 Nov 2023
आमदार राजू पारवे यांची भराडी समाज बांधव आणि आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांसोबत दिवाळी

पारवे यांनी खंगार यांच्या दोन्ही मुलांच्या घरी जाऊन दोघांच्या डोक्यावर वडीलकीच्या नात्याने हात फिरवला.

सविस्तर वाचा...

15:18 (IST) 13 Nov 2023
नाशिक शहरात पुन्हा जलसंकट; नाशिकरोड विभागात दोन दिवस पाणी पुरवठा बंद

नाशिक: दिवाळीच्या पहिल्या दिवशी जल वाहिनीच्या गळतीमुळे उद्भवलेले जल संकट ताजे असतानाच आता देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी पुन्हा एकदा नऊ प्रभागातील नागरिकांना त्याच संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

सविस्तर वाचा...

15:04 (IST) 13 Nov 2023
पाच दिवसानंतरही बदलापुरातील पाणी पुरवठा विस्कळीतच; गुरुवारपासून शहरात अपुरा पुरवठा, ऐन दिवाळीत नागरिक हतबल

बदलापूरः गुरूवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे बदलापुरातील पाणी पुरवठा यंत्रणा ठप्प झाली. वीज पुरवठा, केंद्रातील दुरुस्ती करून हा पुरवठा शनिवारी सुरळीत होण्याची आशा होती.

सविस्तर वाचा...

14:51 (IST) 13 Nov 2023
पंधरा कोटींच्या कोकेन तस्करीप्रकरणी नवी दिल्लीतून परदेशी महिलेला अटक

मुंबई: पंधरा कोटी रुपयांच्या कोकेन तस्करीप्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) नवी दिल्लीतून ३० वर्षीय परदेशी महिलेला अटक केली.

सविस्तर वाचा...

14:37 (IST) 13 Nov 2023
नागपूर : फटाक्यांच्या आतषबाजीत ११ जण जखमी, ८ ते ११ वयोगटातील ४ मुलांचा समावेश

फटाक्यांमुळे डोळे वा शरीरातील इतर भाग वा कानाला फटाक्यांच्या आवाजामुळे त्रास होऊन मेडिकल रुग्णालयात ११ रुग्ण पोहोचले.

सविस्तर वाचा...

14:37 (IST) 13 Nov 2023
कल्याणमध्ये धूळ नियंत्रणात निष्काळजीपणा, आय प्रभागात दोन विकासकांवर दंडात्मक कारवाई

कल्याण: धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे आदेश देऊनही काही विकासक त्याची गंभीर दखल घेत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आता सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळणाऱ्या, निर्माणाधिन बांधकामांच्या ठिकाणी धूळ नियंत्रणाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

सविस्तर वाचा...

14:19 (IST) 13 Nov 2023
उरणमध्ये दीपावली निमित्ताने रांगोळी प्रदर्शनातून कलेचे दर्शन… १२ ते १९ नोव्हेंबर दरम्यान पर्वणी

उरण: येथील कलाप्रेमींनी रेखाटलेल्या रांगोळीमधून हुबेहूब व्यक्ती चित्र साकारले आहेत. दिवाळीनिमित्त आयोजित हे प्रदर्शन १२ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत आठवडाभर आहे.

सविस्तर वाचा...

14:19 (IST) 13 Nov 2023
गोंदियात दिवाळीच्या रात्री दुचाकीला धडक दिल्याने तरुणाला तिघांनी चाकूने भोसकले, तरुणाचा मृत्यू

शहरातील रस्त्यांवर खळबळ उडाली असून सर्वत्र फटाक्यांच्या आवाजात घडलेल्या या हत्याकांडाने सर्वांनाच हैराण केले आहे.

सविस्तर वाचा...

14:06 (IST) 13 Nov 2023
पुण्यात पुन्हा कोयता गॅंग सक्रिय; टिळक रस्त्यावर तरुणावर वार

पुणे: टिळक रस्त्यावर कपडे खरेदीसाठी आलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा...

14:04 (IST) 13 Nov 2023
महारेराचे समुपदेशन ग्राहक आणि विकासकांना ठरतेय फायदेशीर, महिन्याला ३०० ते ३५० जणांना सेवेचा लाभ

महिन्याला ३०० ते ३५० जण या सेवेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

सविस्तर वाचा...

13:55 (IST) 13 Nov 2023
परदेशी शिष्यवृत्तीकडे मराठा विद्यार्थ्यांची पाठ, ओबीसी प्रवर्गात केवळ ५० उमेदवारांनाच संधी

दुसरीकडे ओबीसी विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या असतानाही ७५ ऐवजी केवळ ५० उमेदवारांना परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी देण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

13:35 (IST) 13 Nov 2023
तब्बल २७ टन फटाके व फुलांचा कचरा जमा, लक्ष्मीपूजनानंतर सोमवार सकाळपर्यंत नवी मुंबई पालिकेची विशेष स्वच्छता मोहीम

नवी मुंबई: देशभरात स्वच्छतेत नावलौकिक मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या कचरा व घनव्यवस्थापन विभागाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम राबवून फटाक्यांचा व फुलांचा जवळजवळ २७ टन कचरा जमा केला आहे.

सविस्तर वाचा...

13:21 (IST) 13 Nov 2023
फटाक्यांमुळे पुणे, पिंपरी चिंचवडची हवा ‘अतिवाईट’ श्रेणीमध्ये

पुणे: नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनानंतर फोडलेल्या फटाक्यांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील हवा बिघडली आहे. सफरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार पुण्याची हवा ‘अतिवाईट’ श्रेणीत आहे.

सविस्तर वाचा...

13:14 (IST) 13 Nov 2023
कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; वाहने पेटवली, धक्काबुक्कीचा प्रकार

गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रति टन ३५०० रुपये द्यावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे.

सविस्तर वाचा...

13:07 (IST) 13 Nov 2023
लक्ष्मीपूजन दिवशीच्या फटाक्यांनी वाढविले उरणच्या हवेतील प्रदूषण; पावसाच्या सरीने कमी केलेल्या हवा प्रदूषण पुन्हा वाढले

उरण: उरणमध्ये रविवारच्या लक्ष्मीपूजनाच्या फटाक्यांच्या जोरदार आतिषबाजीने उरणच्या हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. ७० च्या आसपास असलेला हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक पुन्हा एकदा २०० च्या वर पोहचला आहे.

सविस्तर वाचा...

12:50 (IST) 13 Nov 2023
कल्याण रेल्वे स्थानकात मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र यार्ड; सहा नवीन फलाटांच्या उभारणीला प्रारंभ

कल्याण: मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेससाठी स्वतंत्र यार्ड (थांबा) उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला आहे.

सविस्तर वाचा...


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाच्या अपात्रतेबाबत सूचक विधान केलं आहे...

Story img Loader