Maharashtra News Updates Today, 20 October 2023 : राज्यात सध्या मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. दोन्ही समाजाकडून शिंदे-फडणवीस सरकारने वेळ घेत आरक्षणाचं आश्वासन दिलं आहे. ही दिलेली मुदत आता संपत आली असल्याने मराठा समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळेल याबाबत आशावादी आहेत. दुसरीकडे नाशिक आणि पुण्यात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणात दररोज नवे आरोप होत आहेत. त्यावरही राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Mumbai Maharashtra News Updates in Marathi : राजकारणासह महाराष्ट्रातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…
बुलढाणा: महावितरणमध्ये कार्यरत २८ हजार लाईनमन कर्मचाऱ्यांवरील प्रशासकीय अन्यायाच्या विरोधात विविध कामगार संघटना एकवटल्या आहे.
आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गट, शिंदे गटाच्या एकूण ३४ याचिका आहेत. या सर्व ३४ याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.यावर आज (२० ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीत राहुल नार्वेकरांनी ३४ याचिका ६ गटात एकत्र करून या ६ याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे.
बुलढाणा: अलीकडेच रुजू झालेले जिल्हाधिकारी अर्थात जिल्हाप्रशासनाची मोठी नामुष्की आज टळली. याचे कारण एका प्रकरणात त्यांचे फर्निचर, वाहन व खुर्ची जप्त होता होता वाचली.
चंद्रपूर: बाह्ययंत्रणेमार्फत सुरू केलेली कंत्राटी पदभरती रद्द करावी, ‘दत्तक शाळा योजना’ रद्द करण्यात यावी, परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे, यासह राज्य सरकारच्या खाजगीकरण व कंत्राटीकरणाविरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले.
सोलापूर: साखर उद्योगासाठी विख्यात ठरलेल्या सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळी हंगामाने निराशा केली असली तरी एकूण ४१ पैकी ३७ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी साखर संचालकांकडे परवानेही मागितले आहेत.
विरारच्या निसर्गरम्य अशा परिसरातील मारंबलपाडा येथे श्री सोनुबाई भवानी देवीचे मंदिर आहे. अनेक वर्षे जुने असलेल्या मंदिराचे तीन वर्षांपूर्वी नूतनीकरण करून जीर्णोद्धार झाल्याने मंदिराची प्रसिद्धी अधिकच वाढली आहे त्यामुळे शारदीय नवरात्री उत्सव ही मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे.
शहरा लगतच्या तीर्थक्षेत्र कोराडी येथील जगदंबा माता मंदिरात सध्या नवरात्र उत्सव सुरू असून तेथे रोज लाखो भाविक दर्शनासाठी जातात. भाविकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी लाकडी प्रवेशव्दार तयार करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी होऊन अजित पवारांच्या नेतृत्वातील गट भाजपा-शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला. राष्ट्रवादीतील या फुटीनंतर आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून कोण कोणत्या जागा लढवणार, कोणत्या जागेवर उमेदवार दिला जाणार नाही याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना बघायला मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
चंद्रपूर येथील महाकालीचे दर्शन घेऊन दुचाकीने परत गावाकडे निघालेल्या पती – पत्नीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अभियंता असलेल्या पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली. १९ ऑक्टोबरला रात्री आष्टी-चंद्रपूर मार्गावर हा अपघात घडला.
वाई: दोन लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार करूनही कारवाई होत नसल्याच्या कारणावरून आज शुक्रवारी दुपारी सदर बझारमधील लक्ष्मी प्रकाश डागा, प्रकाश डागा यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील घरासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला.
नवी मुंबई: नवी मुंबई शहरातील महापालिकेच्या शाळा इमारतींची मागील दोन दिवसांपासून न्यायाधीशांकडून पाहणी करण्यात येत आहे.
मुंबई : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केलीच पाहिजे, तसे न केल्यास खासगी असो किंवा शासकीय बांधकामांचे काम थांबवण्यात येईल, असा सक्त इशारा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिला आहे.
सुरगाणा पोलिसांनी गुरूवारी रात्री उशीरा मोहडफाटा परिसरातून राज्यात प्रतिबंधित असलेली दारु तसेच वाहतूक करणारे वाहन असा ११ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुरगाणा परिसरातून राज्यात प्रतिबंधित दारुची विक्री होणार असल्याची माहिती सुरगाणा पोलिसांना मिळाली. विशेष पथकाने सापळा रचत मोहड फाटा येथून संशयास्पद वाहन ताब्यात घेतले. या वाहनात वेगवेगळ्या कंपनीच्या मात्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या दारूच्या बाटल्या आढळल्या. सुमारे दोन लाख, ५७ हजार २५ रुपयांची दारू तसेच मालवाहतूक वाहन जप्त करण्यात आले. या प्रकरणी रवींद्र जाधव (५१, रा. हतगड) याला ताब्यात घेण्यात आले.
सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमधील गर्दी लक्षात घेता विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या विशेष गाड्यांच्या तिकिटाचे भाडे देखील नियमित गाड्यांच्या तुलनेत जास्त राहणार असल्याचे प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे.
बंडखोर आमदारांच्या अपात्रता प्रकरणात एकत्र सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा निर्णय, एकूण ३४ याचिकांच्या मिळून ६ याचिका करत एकत्र सुनावणी करणार, पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला होणार
राज्यात कंत्राटी पोलीस भरतीवरून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. तसेच पोलीस विभागाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२० ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत मोठा निर्णय जाहीर केला. यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. यावेळी फडणवीसांनी मविआ नेत्यांवर सडकून टीका केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील नेते मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. जरांगे शुक्रवारी (२० ऑक्टोबर) पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी राजगुरूनगर येथे भव्य सभा घेतली. या सभेत मनोज जरांगे यांचं भाषण संपल्यानंतर अचानक एक तरूण मंचावर चढला आणि त्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनोज जरांगे संतापलेले पाहायला मिळाले.
अमरावती: राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या मुद्यावर येत्या २४ ऑक्टोबरच्या आधी काय करता येईल, यावर विचार करीत आहेत.
मुंबई : बोरिवली पूर्व परिसरात नवरात्रोत्सवात पूजा आटोपून परतणाऱ्या महिलेला बोलण्यात गुंतवून दोन भामट्यांनी तिचे दागिने पळवल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी तिने दोन अनोळखी व्यक्तींविरोधात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई – इन्स्टाग्रामवर तरुणींशी ओळख करून नंतर त्यांची लैंगिक आणि आर्थिक शोषण करणारा डॉक्टर अखेर गजाआड झाला आहे. योगेश भानुशाली असे या आरोपीचे नावा असून त्याला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत ३ तरुणींनी बलात्कार आणि फसवणुकीच्या तक्रारी दिल्या आहेत. आणखी मुली त्याच्या जाळ्यात फसल्या असण्याची शक्यता असून पोलीस शोध घेत आहेत. नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी हे प्रकरण सर्वप्रथम उघडकीस आणले होते.
वाई : राजकीय पक्षात फूट पाडून महाराष्ट्राच्या विरोधात कूटकारस्थान रचले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. दिल्लीच्या अदृश्य शक्तीकडून महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेचे हाल सुरू आहेत. या अदृश्य शक्तीला घालवणे गरजेचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सोलापूर : एकेकाळी स्वतःचा बालेकिल्ला असलेल्या आणि दस्तुरखुद्द शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अवस्था अतिशय दयनीय झाली असताना ही जागा पुन्हा शरद पवार यांनीच लढवावी, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. परंतु पवार यांनी २०१४ नंतर निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे माढ्यातून लोकसभेची जागा कोणी आणि कशी लढवायची, याचा पेच कायम आहे.
मुंबई : मुंबईतील कोळीवाड्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून या कोळीवाड्यांचे अस्तित्व आणि त्यांचे वैशिष्ट जपण्यासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली तयार करावी लागणार आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. कोळीवाड्यांच्या विकासासाठी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली असून त्यात या विषयावर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई : किनारपट्टीवर असलेल्या छोट्या घरांची डागडुजी किंवा पुनर्बांधणीसाठी आता राज्य सागरी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई ते पालघरपर्यंत तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील गावठणे तसेच खासगी बंगलेधारकांना आता थेट बांधकाम करता येणार आहे. मात्र त्यांचे एकूण बांधकाम हे ३०० चौरस मीटर म्हणजे साधारण तीन हजार चौरस फुटाचे असणे आवश्यक आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कक्ष अधिकाऱ्याची क्रेडिट कार्ड शुल्काच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अधिकाऱ्याने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पिंपरी: संभाषण ध्वनिमुद्रित केल्याचे सांगत आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत बँक व्यवस्थापकाकडून खंडणी उकळणा-या महिलेसह दोघांना खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी अटक केली.
पुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पोषण आहार योजनेतील तांदळाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तहसिलदार, नायब तहसिलदार कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी ६ सप्टेंबर २०२३ रोजी जी.आर. कोणी काढला याचे उत्तर आधी द्यावे, असे आव्हान माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले.
अमरावती: एकीकडे आधीच अनेक अशैक्षणिक कामांचे ओझे बाळगणाऱ्या शिक्षकांवर आणखी एक जबाबदारी देण्यात आली आहे. घरोघरी जाऊन आयुष्मान कार्ड काढण्याचे नवे काम शिक्षकांकडे सोपविण्यात आले असून हे अशैक्षणिक काम न करण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे.
काँग्रेस, उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट यांनी कंत्राटी भरतीचे आदेश काढून युवकांची दिशाभूल केली. त्यांनी जनतेची माफी मागावी अन्यथा राज्यात उद्या शनिवारी सकाळी १० वाजता भाजप तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.