Maharashtra News Updates Today, 20 October 2023 : राज्यात सध्या मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. दोन्ही समाजाकडून शिंदे-फडणवीस सरकारने वेळ घेत आरक्षणाचं आश्वासन दिलं आहे. ही दिलेली मुदत आता संपत आली असल्याने मराठा समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळेल याबाबत आशावादी आहेत. दुसरीकडे नाशिक आणि पुण्यात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणात दररोज नवे आरोप होत आहेत. त्यावरही राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra News Updates in Marathi : राजकारणासह महाराष्ट्रातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…

14:57 (IST) 20 Oct 2023
UPSC Exam: यूपीएससी परीक्षेतील चुका सुधारण्‍यासाठी आयोगाकडून मार्गदर्शक सूचना

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्‍या (यूपीएससी) परीक्षेदरम्‍यान काही किरकोळ चुकांमुळे परीक्षार्थ्‍यांना गुण गमवावे लागतात. यूपीएससीने परीक्षेपूर्वी उत्‍तरपत्रिकेवरील महत्‍वाची माहिती कशी भरावी, याचे सोदाहरण स्‍पष्‍टीकरण ऑनलाईन उपलब्‍ध करून दिले असून मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्‍या आहेत.

सविस्तर वाचा

14:41 (IST) 20 Oct 2023
राजगुरूनगरमधील सभेत तरुणाकडून गोंधळाचा प्रयत्न, मनोज जरांगे संतापले

राजगुरूनगरमधील सभेत मनोज जरांगे यांचं भाषण संपलं आणि एक तरूण अचानक मंचावर चढला. यावेळी या तरुणाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर मनोज जरांगे संतापले. काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि मग उपस्थित आयोजकांनी या तरुणाला उचलून मंचावरून खाली नेलं. यावेळी आयोजकांपैकी एकाने म्हटलं, “हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे. आपल्याला आत्महत्या करून आरक्षण मिळवायचं असेल, तर असं आरक्षण न मिळालेलं चांगलं.”

14:40 (IST) 20 Oct 2023
उरणच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा विरुद्ध इंडिया आघाडीचा सामना

उरण : तालुक्यातील जासई, चिरनेर व दिघोडे या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका ५ नोव्हेंबरला होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत थेट पक्ष नसले तरी गावातील स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते पक्ष म्हणून एकत्र येऊन निवडणूक लढवितात. यामध्ये देशपातळीवर असलेल्या सत्ताधारी भाजप आणि विरोधातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षात ही निवडणूक लढली जाणार असल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर…

13:31 (IST) 20 Oct 2023
दांडियाच्या ३०० रुपयांच्या पासमुळे सात वर्षांच्या शिक्षेची शक्यता

मुंबईः मुंबईतील बोरिवली भागातील तीन जणांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी बनावट पासचा वापर केला.

सविस्तर वाचा…

13:17 (IST) 20 Oct 2023
“पाकिस्तानी कलाकारांना विरोध ही देशभक्ती नव्हे”; बंदीची मागणी फेटाळताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

देशभक्ती सिद्ध करण्यासाठी शेजारील देशाच्या कलाकारांशी शत्रुत्व, वैर बाळगण्याची आवश्यकता नाही. किंबहुना, पाकिस्तानी कलाकारांना विरोध ही देशभक्ती नव्हे, असे परखड मत उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले.

सविस्तर वाचा

13:13 (IST) 20 Oct 2023
कृष्णा खोरे महामंडळाच्या कार्यकारी संचालकाची खुर्ची जप्त… काय आहे प्रकरण?

नीरा-देवघर प्रकल्पाअंतर्गत दापकेघर गावातील एका शेतकऱ्याला लघुवाद न्यायालयाने सहा लाख २७ हजार ८७१ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊनही गेले पाच वर्ष कृष्णा खोरे विकास महामंडळाने चालढकल केली.

वाचा सविस्तर…

13:07 (IST) 20 Oct 2023
डोंबिवलीतील बालकाच्या हत्या प्रकरणातील मोक्काचे आरोपी निर्दोष; पोलिसांनी तपासात त्रृटी ठेवल्याचा न्यायालयाचा ठपका

कल्याण: पंधरा वर्षापूर्वी डोंबिवलीतील एका १४ वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी शाळेत जात असताना अपहरण करून त्याला बदलापूर जवळील जंगलात ठार मारणाऱ्या दिवा, डोंबिवलीतील आजदे गावातील चार आरोपींची मोक्का न्यायालयाने मोक्काच्या आरोपातून निर्दोष सुटका केली.

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 20 Oct 2023
गोंदिया जिल्ह्यातील २.४२ लाख कुटुंबाना मिळणार १०० रुपयांत सहा वस्तू

महाराष्ट्र शासनाच्या गौरी-गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला. आता सरकारने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आनंदाने ‘शिधा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरिबांच्या ‘दिवाळीचा गोडवा वाढला आहे.

सविस्तर वाचा

12:47 (IST) 20 Oct 2023
Weather Update: दक्षिण-पश्चिम मान्सूनची देशातून पूर्णपणे माघार

दक्षिण-पश्चिम मान्सूनने अखेर देशातून पूर्णपणे माघार घेतली आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास यावर्षी आठ दिवस उशिराने सुरू झाला. यावर्षी २५ सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला होता.

सविस्तर वाचा

12:44 (IST) 20 Oct 2023
आज माझ्याकडे कागदपत्रे जास्त आहेत, पण सगळ्यांना उघडं पाडणार – देवेंद्र फडणवीस

आज माझ्याकडे कागदपत्रे जास्त आहेत, पण सगळ्यांना उघडं पाडणार आहे. १ सप्टेंबर २०२१ रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी कंत्राटी भरतीला मान्यता दिली. २ सप्टेंबरला महाटेंडर पोर्टलवर याचा मसुदा प्रकाशित झाला. ९ सप्टेंबरला निविदापूर्व बैठक घेण्यात आली. ३१ जानेवारी २०२२ रोजी निविदा दाखल करण्याची अंतिम मुदत होती. सगळीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत.

– देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री, गृहमंत्री)

12:43 (IST) 20 Oct 2023
डायघर घनकचरा प्रकल्पाची चाचणी; प्रकल्पात १५ टन कचऱ्यावर प्रक्रीया; सुरूवातीला बायो सीएनजी गॅसची निर्मिती

ठाणे: महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी डायघर येथे उभारण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्प प्रत्यक्षात सुरू करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.

सविस्तर वाचा…

12:38 (IST) 20 Oct 2023
देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादन

पुणे : देशात २०२२-२३मध्ये विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १४०.७१ लाख टनांनी उत्पादनात वाढ होऊन एकूण अन्नधान्य उत्पादन ३२९६.८७ लाख टन झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.

वाचा सविस्तर…

12:30 (IST) 20 Oct 2023
चंद्रपूर : आईच्या मृतदेहाशेजारी चिमुकल्याचा रात्रभर टाहो

चार वर्षीय चिमुकल्याला दुचाकीवर घेऊन जात असलेल्या महिलेचा राजुरा-बल्लारपूर पुलावर अपघातात मृत्यू झाला. सुदैवाने चार वर्षांचा चिमुकला बचावला. मात्र, तो रात्रभर आईच्या मृतदेहाशेजारी रडत होता.

सविस्तर वाचा

12:28 (IST) 20 Oct 2023
कल्याणमधील अखंड वाचन यज्ञाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १२०० हून अधिक वाचकांसह २२ शाळांचा उपक्रमात सहभाग

ठाणे: कल्याणमध्ये आयोजित अखंड वाचन यज्ञाला वाचकांनी उस्त्फूर्त प्रतिसाद दर्शवला. अभिवाचन सत्र, कथा वाचन, ललित वाचन ,काव्य संमेलन, बालसाहित्य वाचन, महिलांचे काव्यसंमेलन, पत्रकारांचे अभिवाचन, भयकथा आणि आध्यात्मिक साहित्य वाचन अशा विविध सत्रात हे वाचन यज्ञ पार पडले.

सविस्तर वाचा…

12:24 (IST) 20 Oct 2023
“…म्हणून आम्ही कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेतला”; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की, त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायचं. त्यामुळे त्या सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

12:19 (IST) 20 Oct 2023
डोंबिवलीत मोठागावमध्ये निसर्ग उद्यानासाठी हरितपट्ट्यावर मातीचा भराव; महसूल विभागाकडून गंभीर दखल

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव उल्हास खाडी किनार माघार पाणलोट (बॅक वाॅटर) भागात मातीचा भराव टाकून कल्याण डोंबिवली पालिकेकडून निसर्ग उद्यान विकसित करण्याचे काम सुरू आहे.

सविस्तर वाचा…

12:15 (IST) 20 Oct 2023
कंत्राटी भरतीसाठी महाराष्ट्रात पहिला निर्णय १३ मार्च २००३ रोजी झाला – देवेंद्र फडणवीस

कंत्राटी भरतीसाठी महाराष्ट्रात पहिला निर्णय १३ मार्च २००३ रोजी झाला. तेव्हाच्या काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये पहिली कंत्राटी भरती शिक्षण विभागात सुरू झाली. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१० मध्ये जीआर काढून कंत्राटी भरती सुरू करण्यात आली. २०१० मध्ये अशोक चव्हाण यांनी पहिला जीआर काढला आणि परत त्यांनी ६ हजार कंत्राटी पदांसाठी जीआर काढला.

12:09 (IST) 20 Oct 2023
“यांची थोबाडं उघडी पडली पाहिजे म्हणून मी काही गोष्टी…”; पत्रकार परिषदेत फडणवीस आक्रमक, म्हणाले…

महाराष्ट्रात कंत्राटी भरतीवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ केला जात आहे. विशेष म्हणजे जे याचे दोषी आहेत, ज्यांनी हे केलंय तेच जास्त आवाज करत आहेत. म्हणून म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समाजासमोर आलं पाहिजे, यांची थोबाडं उघडी पडली पाहिजे म्हणून काही गोष्टी मी पोहचवण्याचा प्रयत्न करतो आहे.

12:05 (IST) 20 Oct 2023
नाशिक जिल्ह्यात ११ लाख स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम, ग्राहकांपेक्षा वीज कर्मचाऱ्यांना अधिक लाभ

नाशिक: आगाऊ रक्कम भरून अर्थात प्रिपेड स्वरुपातील स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या मोहिमेत जिल्ह्यात सुमारे ११ लाख ग्राहकांसाठी हे मीटर बसविले जाणार आहे. थकबाकी वसुलीसाठी वीज अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात मोठी कसरत करावी लागते. नव्या मीटरमुळे या कामातून त्यांची पूर्णपणे मुक्तता होईल आणि तांत्रिक कामांवर ते अधिक लक्ष देऊ शकतील, अशी भावना महावितरणच्या वर्तुळात उमटत आहे.

वाचा सविस्तर..

12:04 (IST) 20 Oct 2023
देशातून मोसमी वारे माघारी

पुणे : देशभरातून मोसमी वारे माघारी गेले आहेत. यंदा २५ सप्टेंबर रोजी दक्षिण राजस्थानमधून मोसमी वाऱ्यांनी माघारीचा सुरू केलेला प्रवास १८ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला आहे. देशातून मोसमी वाऱ्याची संपूर्ण माघार सामान्य वेळेनुसार झाली आहे.

वाचा सविस्तर…

12:01 (IST) 20 Oct 2023
रत्नागिरीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास डोंबिवलीत अटक

कल्याण: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर याच भागातील दोन जणांनी कट करून लैंगिक अत्याचार केला होता.

सविस्तर वाचा…

11:46 (IST) 20 Oct 2023
बारावे येथेच कल्याण न्यायालयाची नवी इमारत उभारणे सोयीस्कर; सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासनाला अहवाल

कल्याण: कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत दाटीवाटीच्या ठिकाणी, वर्दळीच्या भागात आहे. या भागात नव्याने न्यायालय इमारतींची उभारणी करताना आवश्यक सुविधा देताना अनेक अडथळे येतील.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 20 Oct 2023
कल्याण-डोंबिवली पालिकेतील दहा अधिकारी चौकशी रडारवर

कल्याण: कल्याण डोंबिवली पालिकेतील विविध विभागातील सुमारे १० अधिकारी महारेरा बेकायदा इमारत प्रकरणातील पोलिसांचे विशेष चौकशी पथक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि प्राप्तिकर विभाग यांच्या रडारवर आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.

सविस्तर वाचा…

11:40 (IST) 20 Oct 2023
एकनाथ खडसेंना १३७ कोटी रुपये दंडाची नोटीस का पाठवली? उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘खडसे यांनी काही तरी केलेले…’

पिंपरी : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना एकनाथ खडसे यांना मंत्रिपदावरून जावे लागले होते. खडसे यांनी काही तरी केलेले आहे, असा आरोप ठेवूनच त्यांचे मंत्रिपद काढले होते. त्या वेळी त्यांना नोटीस देण्यात आली होती. आता अवैध उत्खननप्रकरणी त्यांना देण्यात आलेल्या १३७ कोटी रुपयांच्या दंडाच्या नोटिशीत कोणतेही राजकारण नाही, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

वाचा सविस्तर…

11:34 (IST) 20 Oct 2023
प्रकाश आंबेडकर म्हणाले,’एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांनी निधी पुरविल्याचा आरोप खोटा!’

एल्गार परिषदेला नक्षलवादी, माओवाद्यांनी निधी पुरविल्याचा पोलिसांचा आरोप धादांत खोटा असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर केला.

वाचा सविस्तर…

11:31 (IST) 20 Oct 2023
भाजपच्या ओबीसी जागर यात्रेला अल्पप्रतिसाद!; प्रारंभ व समारोप सोडला तर गर्दीच नाही

भाजपने माजी आमदार आशीष देशमुख यांच्या नेतृत्वात ओबीसी जागर यात्रा काढली. पण, या यात्रेला कुठेही अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे यात्रेच्या पुढच्या टप्प्यात कुठल्याही कसर राहू नये म्हणून प्रयत्न सुरू झाले आहेत.

सविस्तर वाचा

11:23 (IST) 20 Oct 2023
प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा लोकल आता दुपारीही धावणार

पुणे : पुणे-लोणावळा लोकल सेवा दुपारच्या वेळेत तीन तास बंद असते. लोहमार्गांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही सेवा बंद ठेवली जाते. त्यामुळे दुपारच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होते. आता प्रवाशांच्या सोईसाठी दुपारच्या वेळी लोकलची एक फेरी सुरू करण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केले आहे.

वाचा सविस्तर…

11:23 (IST) 20 Oct 2023
अमली पदार्थ, भ्रष्टाचाराविरोधात आता पथनाट्याद्वारे जनजागृती, मानवी साखळीवेळी काँग्रेसचा संकल्प

नाशिक: शहर काँग्रेसने हाती घेतलेल्या नाशिक बचाव, ड्रग हटाव मोहिमेंतर्गत कॉलेज रोड परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीला मानवी साखळीद्वारे विरोध दर्शविण्यात आला. यावेळी पुढील काळात पथनाट्यांच्या माध्यमातून महाविद्यालय व विविध चौकात अंमली पदार्थ, गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले.

वाचा सविस्तर…

11:21 (IST) 20 Oct 2023
स्मार्टसिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या चोरणारी टोळी अखेर अटकेत

पिंपरी : स्मार्टसिटी प्रकल्पातील अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या बॅटऱ्या आणि दुचाकी चोरणाऱ्या टोळीस पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पिंपरीत करण्यात आली.

वाचा सविस्तर…

11:21 (IST) 20 Oct 2023
कामकाज सोडून अधिकारी रंगले क्रिकेट सामना पाहण्यात! पिंपरी महापालिकेत अजब प्रकार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, दोन अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त यांच्यासह काही वरिष्ठ अधिकारी गुरुवारी महापालिका वाऱ्यावर सोडून क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी गहुंजेला गेले होते. आयुक्तच दुपारपासून गायब झाल्याने महापालिकेत शुकशुकाट होता.

वाचा सविस्तर…

महाराष्ट्र न्यूज