Maharashtra News Updates Today, 20 October 2023 : राज्यात सध्या मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. दोन्ही समाजाकडून शिंदे-फडणवीस सरकारने वेळ घेत आरक्षणाचं आश्वासन दिलं आहे. ही दिलेली मुदत आता संपत आली असल्याने मराठा समाजातील नेते आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील आरक्षण मिळेल याबाबत आशावादी आहेत. दुसरीकडे नाशिक आणि पुण्यात सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणात दररोज नवे आरोप होत आहेत. त्यावरही राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Mumbai Maharashtra News Updates in Marathi : राजकारणासह महाराष्ट्रातील दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर…

11:20 (IST) 20 Oct 2023
रेल्वे प्रवाशांसाठी आकुर्डी स्थानकावर आता लिफ्टची सुविधा

पिंपरी: अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईसाठी उद्वाहनाची (लिफ्ट) व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुलांना उद्वाहनाचा फायदा होणार आहे.

वाचा सविस्तर…

11:13 (IST) 20 Oct 2023
“फडणवीस भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

राज्यातील ड्रग्ज रॅकेटवरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली. “देवेंद्र फडणवीस फार भरकटल्यासारखं बोलत आहेत. त्यांची थोडी मती गुंग झाली,” असा आरोप संजय राऊतांनी केला. ते शुक्रवारी (२० ऑक्टोबर) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर वाचा…

11:07 (IST) 20 Oct 2023
महापुराचा धसका, नागपुरात आता सिमेंट रस्त्याला विरोध

रस्ते, उड्डाण पूल, भुयारी मार्ग बांधकामामुळे ज्या गडकरींचे नाव देशपातळीवर झाले,’ रोडकरी’ अशी त्यांना ओळख मिळाली त्याच गडकरींच्या नागपूर शहरात आता सिमेंट रस्त्याला विरोध होऊ लागला आहे.

सविस्तर वाचा

10:56 (IST) 20 Oct 2023
सुनील कावळेंच्या आत्महत्येला पूर्णपणे सरकार जबाबदार – मनोज जरांगे

सुनील कावळेंच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे. मराठा समाजाच्या पोरांचे मुडदे पडायला लागले आहेत. मराठा समाजाचे पोरं हट्ट करायला लागले. याला पूर्ण जबाबदार सरकार आहे. जगात आमच्यासाठी शिवनेरीपेक्षा मोठं आणि पवित्र क्षेत्र असूच शकत नाही. मी आज शिवनेरी किल्ल्यावरून जाहिरपणे सांगतो की, आमच्या आत्महत्या होत आहेत याला सरकार जबाबदार आहे. त्यांनी हा मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा आम्ही एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही.

– मनोज जरांगे पाटील (मराठा आरक्षण आंदोलनातील नेते)

10:48 (IST) 20 Oct 2023
“भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी”; सुषमा अंधारे यांची प्रखर टीका, म्हणाल्या…

भाजपला नेते घडवता आलेले नाहीत. हा पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांच्या भरवशावर चालत आहे. भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी आहे, अशी प्रखर टीका शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

सविस्तर वाचा

10:48 (IST) 20 Oct 2023
आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली – मनोज जरांगे पाटील

काल आपल्या बांधवाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या केली. आपल्या परिवारातील सदस्य गेला आहे. त्यामुळे आज आपल्याला हार-फुलं काहीच घ्यायचं नाही. त्याच्या जाण्याचं आपल्याला दुःख असलं पाहिजे. त्याचं स्वप्न होतं की, माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.

10:41 (IST) 20 Oct 2023
देवेंद्र फडणवीसांसारखा गृहमंत्री महाराष्ट्राला लाभणं दुर्दैव आहे – संजय राऊत

डीसीपीची कॉलर पकडण्यात आली. काय हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. बाळासाहेब देसाईंसारखा गृहमंत्री लाभलेल्या महाराष्ट्राला असा गृहमंत्री लाभणं दुर्दैव आहे. या महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिले आहेत. त्यांनी राजकारणापलिकडे जाऊन राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळली. त्यांनी सुडाने कधीही कारवाया केल्या नाहीत.

– संजय राऊत (शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार)

10:38 (IST) 20 Oct 2023
बनावट जात पडताळणी करून विमुक्त जमातीमध्ये घुसखोरी; आता निघणार ‘ही’ पदयात्रा…

मूळ विमुक्त जमाती तील १४ जातीच्या गरीब विध्यार्थ्यांच्या मेडिकल, इंजिनीरिंग, महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत भरल्या जाणाऱ्या जागा तसेच शिक्षक, ग्रामसेवक, पोलीस, पटवारी आदी नोकऱ्यांमध्ये अन्याय होत असून या विरोधात वाशीम जिल्ह्यातील गहुली ते दिल्ली बंजारा लदेणी यात्रा काढण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

10:37 (IST) 20 Oct 2023
उत्तर गडचिरोलीवरील ‘हत्ती’संकट अधिक गडद!; शेतीसह मनुष्यहानी रोखण्याचे वनविभागासमोर आव्हान

ओडिशातील जंगल परिसरातील खाणीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननामुळे पारंपरिक अधिवास बाधित होऊन स्थलांतरित झालेला २३ रानटी हत्तींचा कळप २०२१ च्या शेवटी छत्तीसगडमार्गे गडचिरोलीच्या जंगलात दाखल झाला.

सविस्तर वाचा

10:37 (IST) 20 Oct 2023
सरकारी बंगल्यावर पोलीस उपायुक्तावर भाजपा कार्यकर्त्याकडून हल्ला, तुम्ही काय करताय? – संजय राऊत

कसलं नेक्सस उघड होणार आहे? देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत. राज्यात एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि फडणवीस राजकारण करत आहेत. फडणवीसांच्या नागपूरमधील सरकारी बंगल्यावर एका पोलीस उपायुक्तावर भाजपा कार्यकर्त्याकडून हल्ला झाला. फडणवीस काय करत आहेत?

10:36 (IST) 20 Oct 2023
राज्यातील ७० हजार आशा काम बंद आंदोलनाच्या पवित्र्यात; काय आहेत करणे…

ग्रामीण भागात अत्यंत तुटपुंज्या मानधनावर आशा स्वयंसेविका, गत प्रवर्तक नित्य नेमाने सेवा बजावित आहेत. मात्र, त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने वाशीम सह राज्यातील ७० हजार अशा स्वयंसेविका काम बंद आंदोलन करण्याचा तयारीत असून बेमुदत संपावर आहेत.

सविस्तर वाचा

10:35 (IST) 20 Oct 2023
अरबी समुद्रातील चक्रीवादळाचे ‘तेज’ असे नामकरण; कसा असेल दोन्ही चक्रीवादळांचा प्रवास जाणून घ्या…

अरबी समुद्रसोबतच बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. अरबी समुद्र आणि लगतच्या लक्षद्वीप परिसरात चक्राकार वारे तयार झाले असून २१ ऑक्टोबरला दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

10:28 (IST) 20 Oct 2023
नशेबाजांमुळे देवेंद्र फडणवीसांची थोडी मती गुंग झाली – संजय राऊत

देवेंद्र फडणवीस म्हणतात मोठं नेक्सस उघड होणार आहे. मात्र, नेक्सस उघड झालं आहे. फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका. तेही फार भरकटल्यासारखं बोलत आहेत. ते भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना त्याच्या वासाने नशा येत असेल. त्यांच्या आसपासची माणसं नशेच्या बाजारात फिरतात. त्या नशेबाजांमुळे फडणवीसांची थोडी मती गुंग झाली आहे.

10:23 (IST) 20 Oct 2023
“सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल ‘कुत्ता गोली’प्रमाणे…”; ठाकरे गटाचा हल्लाबोल

“महाराष्ट्राच्या संपूर्ण सरकारवर सत्तेच्या नशेचा अंमल ‘कुत्ता गोली’प्रमाणे चढला आहे. मिळेल त्या मार्गाने पैसा ओढायचा. मग तो नशेच्या व्यापाराचा का असेना. इथपर्यंत सरकारच्या नीतिमत्तेची घसरण झाली आहे,” असा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने केला आहे. तसेच मिंधे सरकार व त्यांच्या गृहमंत्र्यांची ही लक्तरे आहेत. गुजरात हे ड्रग्ज माफियांचे आंतरराष्ट्रीय आगार बनले आहे. गुजरातचा माल महाराष्ट्रात येत आहे, असाही आरोप केला. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील अग्रलेखात ही भूमिका मांडण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र न्यूज