Maharashtra Assembly Election Schedule Updates, 16 August 2024: विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी महायुतीला जेरीस आणण्यासाठी मोट बांधायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Live Updates

Vidhan Sabha Election 2024 Schedule Live Updates, 14 August 2024: राज्य विधानसभा निवडणुकांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स!

19:28 (IST) 16 Aug 2024
भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप

कुलगुरू डॉ. चौधरींच्या निलंबनावर कल्पना पांडे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रवीण दटके, विष्णू चांगदे यांच्यावर गंभीर आरोप केले.

सविस्तर वाचा...

19:15 (IST) 16 Aug 2024
Nagpur Rain News: रक्षाबंधनावर पावसाचं सावट! हवामान खातं काय म्हणतंय जाणून घ्या…

भारतीय हवामान खात्याने या आठवड्याच्या अखेर आणि पुढील आठवड्याच्या सुरुवातीचा पावसाचा कार्यक्रमच जाहीर केला आहे.

सविस्तर वाचा...

19:02 (IST) 16 Aug 2024
Sharad Pawar : शरद पवारांचा ‘राखीव’ वेळ कुणासाठी?, खासगी विमानाने…

वर्धा : ज्येष्ठ नेते शरद पवार हे १७ ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पवार यांचा दौरा राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण करणारा ठरत असतो. या दौऱ्यात मात्र त्यांचे अधिकृत राजकीय कार्यक्रम नाहीत. तरीही काही वेळ राखीव असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

वाचा सविस्तर...

19:01 (IST) 16 Aug 2024
वसई : प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार, फरार आरोपीला ४ वर्षांनी अटक

वसई : प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने ४ वर्षांने हरिद्वार येथून अटक केली. नाव बदलून तो पोलिसांना गुंगारा देत होता.

वाचा सविस्तर...

18:56 (IST) 16 Aug 2024
Archana Puttewar News: आता काय बोलावं! ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप, त्यांनाच मागितला अहवाल, अर्चना पुट्टेवारच्या कार्यकाळातील प्रकरणे…

Archana Puttewar : उपविभागीय अधिकारी राहुलकुमार मीना यांनी घोटाळ्याचा आरोप असलेल्या नगररचना विभागालाच चौकशी करुन अहवाल सादर करा, असे अजब फर्मान काढले आहे.

सविस्तर वाचा...

18:46 (IST) 16 Aug 2024
BJP Tweet on Uddhav Thackeray: अखेर सत्य बाहेर आलेच - भाजपानं शेअर केला उद्धव ठाकरेंच्या भाषणातला व्हिडीओ

अखेर सत्य बाहेर आलेच, महाराष्ट्राचे खरे गद्दार उद्धव ठाकरेच... मला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता असा खोटा नरेटिव्ह उद्धव ठाकरेंनी पसरवून तमाम शिवसैनिकांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली. सत्य लपत नसते आज त्यांच्या तोंडूनच ते बाहेर आले की, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री हा महायुतीचा फार्मुला ठरला होता. मुख्यमंत्रीपदासाठी जनमताचा अनादर करत २५ वर्षांची युती आणि हिंदुत्वाशी गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. त्याची कबुली त्यांनी आज स्वतःच्या तोंडून दिली आहे - भाजपा</p>

https://x.com/BJP4Maharashtra/status/1824406986764534143

18:40 (IST) 16 Aug 2024
Amol Mitkari: अमोल मिटकरी म्हणतात, “संजय राऊत दुतोंडी साप! ते लवकरच…”

"ज्या व्यक्तीचा नरडा दुसऱ्यावर तोंडसुख घेण्यासाठी वळवळत असेल त्या माणसाच्या नरड्यातून सरडा हा शब्द आला तर त्यात काही गैर वाटत नाही", अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.

सविस्तर वाचा...

17:54 (IST) 16 Aug 2024
‘पोकेमॉन गो’च्या स्पर्धेत नागपूरचा तरुण…तब्बल वीस लाख डॉलर….

नागपूरचा २३ वर्षीय तरुण पोकेमॉन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

सविस्तर वाचा...

17:17 (IST) 16 Aug 2024
कल्याण : शिवसेनेच्या सोमवारच्या कार्यक्रमासाठी वर्दळीच्या शिवाजी चौकात मोठ्ठा मंडप, नागरिकांची नाराजी

कल्याण : रक्षाबंधन आणि मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सर्वाधिक वर्दळीच्या शिवाजी चौकात मंडप उभारून सोमवारी कार्यक्रम करण्याचे निश्चित केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी चौक वाहन कोंडीने कार्यक्रम नसताना दररोज गजबजलेला असतो.

सविस्तर वाचा...

17:10 (IST) 16 Aug 2024
विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला मिळाले ‘हे’ चिन्ह….

लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढले होते.

सविस्तर वाचा...

16:42 (IST) 16 Aug 2024
Video: खारुताईच्या पाठीवरील पट्टे झाले बेपत्ता, रंगही झाला पांढरा!

अमरावती शहरात गेल्या दोन महिन्यांपासून गाईच्या गोठ्यामध्ये चक्क पांढरी खारुताई आढळून येत आहे.

सविस्तर वाचा...

16:41 (IST) 16 Aug 2024
आरक्षणासाठी उड्डाणपुलावर चढून तरुणाचे आंदोलन, अभियांत्रिकी महाविद्यालय चौकातील घटना; तरुणाची सुखरुप सुटका

पुणे : आरक्षणासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयातील चौकातील उड्डाणपुलावरील सज्जावर चढून तरुणाने आंदोलन केले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून सज्जावर चढलेल्या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात आली. तरुणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

16:40 (IST) 16 Aug 2024
लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामुळे बालेवाडी परिसरातील वाहतुकीत शनिवारी बदल

पिंपरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर प्रातिनिधिक स्वरूपात जमा करण्यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उद्या (शनिवारी) राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे बालेवाडी परिसरातील वाहतुकीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

16:36 (IST) 16 Aug 2024
Nashik Lathicharge: सकल हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये तणाव, पोलिसांकडून लाठीचार्ज

नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान तणाव, पोलिसांकडून लाठीचार्ज. बांगलादेशमधील हिंदूंवरील हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी केलं होतं मोर्चाचं आयोजन

16:23 (IST) 16 Aug 2024
Assembly Election 2024 Schedule Live: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर

गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका एकत्रच घेतल्या होत्या. तेव्हा जम्मू-काश्मीरच्या निवडणुका नव्हत्या. पण यावेळी चार इतर निवडणुकाही घ्यायच्या आहेत. जम्मू-काश्मीर, हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंड आणि दिल्ली. उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा विचार करून आम्ही दोन राज्यांच्या निवडणुका एका वेळी घ्यायचा निर्णय घेतला आहे. दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात सध्या खूप पाऊस पडतो आहे आणि काही सण-उत्सवही आहेत - राजीव कुमार, केंद्रीय निवडणूक आयुक्त

https://x.com/ANI/status/1824391503755747786

16:21 (IST) 16 Aug 2024
नागपूर विद्यापीठाच्या दोन गटातील वाद आणि ३० कोटींच्या वसुलीच्या आरोपाचा काय संबंध आहे?

विद्यापीठाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक भरतीमध्ये ३० कोटी रुपयांची वसुली करण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला होता.

सविस्तर वाचा...

16:09 (IST) 16 Aug 2024
‘एमपीएससी’च्या १८ आणि २५ ऑगस्टच्या परीक्षा पुढे ढकलण्यावर आयोगाच्या सचिव काय म्हणाल्या?

‘आयबीपीएस’च्या तारखांची घोषणा जानेवारी २०२४ मध्ये झाली असतानाही ‘एमपीएससी’ने तारखांचा घोळ केल्याची ओरड होत आहे.

सविस्तर वाचा...

16:02 (IST) 16 Aug 2024
अमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराइताकडून साडेसहा लाखांचे मेफेड्रोन जप्त, रविवार पेठेत कारवाई

पुणे : मेफेड्रोनची विक्री करणाऱ्य सराइताला अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवार पेठेत पकडले. त्याच्याकडून साडेसहा लाख रुपयांचे ३२ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. सागर जयसिंग चव्हाण (वय ३४, रा. गायत्री भवनशेजारी, रविवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वाचा सविस्तर...

16:01 (IST) 16 Aug 2024
गरवारे मेट्रो स्थानक परिसरात महाविद्यालयीन तरुणांची लूट

पुणे : महाविद्यालयीन तरुणांना धमकावून त्यांच्याकडील तीन मोबाइल संच चोरट्यांनी चोरून नेण्यात आल्याची घटना कर्वे रस्त्यावरील गरवारे मेट्रो स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर...

15:53 (IST) 16 Aug 2024
अजित पवारांसमोर सुनील शेळकेंच्या डोळ्यात आलं पाणी! सुनील तटकरे यांनी दिली पाठीवर थाप, नेमकं काय झालं?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज मावळमध्ये पोहोचली आहे. तळेगाव येथील जाहीर सभेत मावळचे आमदार सुनील शेळके भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. २०१९ विधानसभेच्या आठवणी सांगत असताना शेळके यांच्या डोळ्यात अश्रू तरळे.

सविस्तर वाचा....

15:41 (IST) 16 Aug 2024
पिंपरी-चिंचवड: लंडनमधील २०० कोटींचे हॉटेल कुणाचं? आमदार महेश लांडगे यांनी केलं स्पष्ट; म्हणाले, पुरावे दिल्यास…

शिवस्वराज्य यात्रेच्या जाहीर सभेत शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यावर अप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला होता. भोसरीमधील कर्तृत्ववान व्यक्तीचे लंडनमध्ये २०० कोटींचे हॉटेल असल्याचे विधान केल्याने एकच चर्चा रंगली होती. यावरून आमदार महेश लांडगे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

सविस्तर वाचा....

15:40 (IST) 16 Aug 2024
केंद्रीय अतिक्रमण दक्षता पथक स्थापन, नवी मुंबईतील अतिक्रमणांवरील कारवाईतील टाळाटाळ रोखली जाणार

नवी मुंबई : शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून त्यावरील कारवाईत टाळाटाळ केली जात असल्याचे निदर्शनास आले. तसेच फेरीवाल्यांना कारवाईचा आधीच सुगावा लागत असल्याने अडचणी येतात.

सविस्तर वाचा...

15:40 (IST) 16 Aug 2024
करंजा बंदरात अखेर मासळी बाजार सुरू

उरण : मुंबईतील ब्रिटिशकालीन ससून व भाऊचा धक्का बंदरात उतरविण्यात येणारी मासळी आता करंजा येथे उरणच्या करंजा बंदरात खरेदी-विक्री सुरू करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनी उरणचे आ. महेश बालदी यांच्या हस्ते काट्याचे पूजन करून ही सुरुवात करण्यात आली. या वेळी स्थानिक मच्छीमारांनी आनंद व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

15:28 (IST) 16 Aug 2024
नागपूर: आजारांच्या साथी, मात्र शासकीय डॉक्टर संपावर, रुग्ण वाऱ्यावर; खासगी डॉक्टरही…

नागपुरात विविध आजारांची साथ असतांनाच मेडिकल, मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टर संपावर आहे.

सविस्तर वाचा...

15:16 (IST) 16 Aug 2024
अजित पवार असे का म्हणाले, देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते…

पिंपरी : मुले होताना देवाची, अल्लाहाची काही कृपा नसते. नवऱ्याची कृपा असती म्हणून मुले होतात. लहान कुटुंब ठेवले तर योजनांचा फायदा होईल. मुलांना चांगले शिक्षण देऊ शकाल. स्वत:चे जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल. त्यामुळे सर्वांनी दोन मुलांवर थांबावे, असे आवाहन उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी केले.

वाचा सविस्तर...

15:11 (IST) 16 Aug 2024
Video: स्टंटबाजी भोवली! तलावाच्या भिंतीवर चढून मस्ती; एक बुडाला, दोघे बचावले

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावाच्या सांडव्यावर उभे राहून स्टंटबाजी करणे काही तरुणांना चांगलच भोवले आहे.

सविस्तर वाचा...

14:54 (IST) 16 Aug 2024
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास : ५५० घरांचा ताबा मार्च २०२५ मध्ये

मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून या घरांचा ताबा देण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाने जाहीर केले होते. मात्र काही कारणाने कामास विलंब झाल्याने बीडीडीवासीयांची घराची प्रतीक्षा लांबली आहे. आता या ५५० घरांच्या ताब्यासाठी मार्च २०२५ चा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर...

14:51 (IST) 16 Aug 2024
भंडारा : भाजपाला धक्का! माजी खासदार शिशुपाल पटलेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

सविस्तर वाचा...

14:41 (IST) 16 Aug 2024
वर्धा : सरसंघचालक प्रथमच मुक्कामी दौऱ्यावर, संघ वर्तुळात…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत प्रथमच वर्ध्यात मुक्कामी येत आहेत.

सविस्तर वाचा...

14:40 (IST) 16 Aug 2024
वर्धा : वय वर्ष चार अन् विक्रमास गवसणी, जाणून घ्या चिमुकल्याची कामगिरी…

दोन वर्षाचा असतानाच साहसला लहान मोठ्या वस्तूंचे निरीक्षण करण्याची आवड निर्माण झाली होती.

सविस्तर वाचा...

Loksatta karan rajkaran Deputy Chief Minister Ajit Pawar refused to answer whether he would reunite with Sharad Pawar group

शरद पवारांशी हातमिळवणी बाबत अजित पवारांचे मौन ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

Vidhan Sabha Election 2024 Schedule Live Updates, 14 August 2024: महाराष्ट्र निवडणूक व इतर राजकीय घडामोडींचा आढावा