Maharashtra Assembly Election Schedule Updates, 16 August 2024: विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. एकीकडे सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकांच्या निकालांमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या विरोधकांनी महायुतीला जेरीस आणण्यासाठी मोट बांधायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आजची निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
Vidhan Sabha Election 2024 Schedule Live Updates, 14 August 2024: राज्य विधानसभा निवडणुकांसंदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स!
मुख्यमंत्री कोण होणार? ते आमचं आम्ही बघू. पण जो अनुभव आम्ही भाजपासोबतच्या युतीत घेतलाय, त्या अनुभवाची पुनरावृत्ती मला नकोय. जागावाटप, अशाच बैठका वगैरे व्हायच्या. त्यात जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. हेच धोरण आम्ही एकमेकांच्या जागा पाडण्यात घालवायचो. पाडापाडीच्या राजकारणात युतीला काय महत्त्व राहिलं? – उद्धव ठाकरे</p>
मी माझ्यासाठी लढतोय ही माझी भावना नाही. मी मुख्यमंत्रीपद माझ्या स्वार्थासाठी सोडलेलं नाही. महाराष्ट्राला झुकवण्याची जो हिंमत करतो, त्याला आम्ही गाडून टाकतो – उद्धव ठाकरे</p>
आपल्यात काड्या घालणारे लोक त्यांच्या युतीत बसलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार का? मी आज सांगतो, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, माझा त्या उमेदवाराला पाठिंबा असेल – उद्धव ठाकरे</p>
मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्याला सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार व बाळासाहेब थोरात यांच्यासह तिन्ही पक्षांमधील अनेक नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत.
निवडणूक आयोगाची आज दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार असून त्यात आगामी निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
“जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १९९ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच २७० कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी तब्बल १९९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार आहे”, असा मुद्दा वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
https://x.com/VijayWadettiwar/status/1824105540559196303
शरद पवारांशी हातमिळवणी बाबत अजित पवारांचे मौन ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता