Maharashtra News Updates, 1 August 2022 : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापेमारी करून साडेअकरा लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. यातील दहा लाखाच्या पाकिटावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याची माहितीही समोर येत आहे. संबंधित दहा लाख रुपये अयोध्या दौऱ्यातून उरलेले असून ती रक्कम पक्ष कार्यालयात जमा करण्यासाठी ठेवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना ईडी कार्यालयाच्या बाहेर शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन केलं आहे. तसेच राऊतांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मैदानात उतरले आहेत. राऊत यांना अटक केल्याने महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादनंतर ते पुण्यात देखील शक्तीप्रदर्शन करणार आहेत. तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यातील आणि देशातील अशा प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra News Today, 1 August 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…

13:29 (IST) 1 Aug 2022
बालकांमध्ये हात-पाय-तोंडाच्या संसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ; मंकीपॉक्स सारखी लक्षणे असल्याने पालकांमध्ये चिंता

लहान मुलांच्या हात-पाय-तोंडाला (हॅण्ड-फूट-माऊथ) होणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचे प्रमाण मुंबई, ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून याचे स्वरूपही दरवर्षी बदलत असल्याचे दिसून येत आहे. याची लक्षणे मंकीपॉक्ससारखी असल्यामुळे पालक चिंताग्रस्त असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 1 Aug 2022
पीएनबी आणि बँक ऑफ बडोदाचे नाव बदलण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बँक ऑफ बडोदा (बीओबी) या बँकाच्या नावांतून प्रादेशिक नावे काढून टाकण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. बँकांच्या या नावांमुळे त्या प्रादेशिक, राष्ट्रीय की आंतरराष्ट्रीय आहेत याबाबत नागरिकांमध्ये विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. वाचा सविस्तर बातमी…

12:47 (IST) 1 Aug 2022
पुणे : दरमहा हप्ता आणि फुकट दारू देण्यास नकार दिल्याने मद्यालयाची तोडफोड

दरमहा पाच हजार रुपयांचा हप्ता तसेच फुकट दारू देण्यास नकार दिल्याने टोळक्याने मद्यालयाची तोडफोड केल्याची घटना एनडीए रस्त्यावर घडली. या प्रकरणी एका सराईतासह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:25 (IST) 1 Aug 2022
औरंगाबादनंतर उस्मानाबादच्या नामकरणालाही उच्च न्यायालयात आव्हान

औरंगाबादनंतर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. मात्र दोन्ही याचिकांवर न्यायालयाने सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच प्रकरणाची सुनावणी २३ ऑगस्ट रोजी ठेवली. वाचा सविस्तर बातमी…

12:10 (IST) 1 Aug 2022
राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन; जितेंद्र आव्हाड, परांजपेंना घेतलं ताब्यात!

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज(सोमवार) सकाळी ठाण्यातील तीन हात नाक्याजवळ मुख्य महामार्गावर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन सुरू झालं. वाचा सविस्तर बातमी…

11:48 (IST) 1 Aug 2022
राऊतांच्या घरी सापडलेल्या नोटांवर ‘एकनाथ शिंदें’चं नाव, शिंदे गटाने दिली प्रतिक्रिया, म्हणाले “आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा…”

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रात्री उशिरा त्यांना अटक केली. पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, ईडीने कारवाई करताना संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा टाकून सुमारे साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त केली. यातील १० लाखांच्या रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असा उल्लेख केल्याची माहिती समोर येत आहे. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर बातमी

11:46 (IST) 1 Aug 2022
कल्याण : पोस्टात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून दिवा येथील दोन जणांची फसवणूक

तुम्हा दोन जणांना भारतीय टपाल खात्यात नोकरीला लावतो. आमची टपाल विभागात ओळख आहे, असे खोटे सांगून दिवा येथील मुंब्रा देवी भागात राहत असलेल्या दीर, वहिनीकडून मुरबाड येथील दोन जणांनी नऊ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. तर, दीड वर्ष झाले तरी नोकरी नाही आणि दिलेले पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या दोन जणांनी कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:04 (IST) 1 Aug 2022
नागपूर : विद्यापीठात नव्या सत्रापासून नवीन शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रम

केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी, धोरणाविषयी अद्यापही स्पष्टता नसल्याने अंमलबजावणी मागे पडली. मात्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शतकोत्तर महोत्सव साजरा करताना नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी कंबर कसली आहे. या धोरणानुसार या सत्रापासून विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत बीबीएम, बीसीसीए व बी. कॉम.मध्ये नवीन धोरणानुसार अभ्यासक्रम लागू होईल. वाचा सविस्तर बातमी…

10:22 (IST) 1 Aug 2022
बदलापूर, अंबरनाथमध्ये पसरली राख; नागरिकांमध्ये चर्चांना उधाण

बदलापूर आणि अंबरनाथ शहराच्या बहुतांश भागात आज (सोमवार) सकाळी पसरलेल्या राखेमुळे एकच खळबळ उडाली. घराबाहेर मोकळ्या जागेत, रस्त्यांवर, पार्कींगमधील वाहनावर, झाडांवर सगळीकडे राखच राख दिसत होती. त्यामुळे हा काय प्रकार आहे, अशा चर्चा रंगू लागल्या. वाचा सविस्तर बातमी…

10:19 (IST) 1 Aug 2022

10:03 (IST) 1 Aug 2022
पूर्व विदर्भात हिवताप, डेंग्यू रुग्णसंख्या चिंताजनक; गडचिरोलीत सर्वाधिक बाधित

नागपूर : पूर्व विदर्भात डेंग्यू व हिवतापाने डोके वर काढले आहे. येथे १ जानेवारी ते १४ जुलैदरम्यान डेंग्यूचे ७५ नवीन रुग्ण आढळले. तर हिवतापाचेही १ जानेवारी २०२२ ते २१ जुलै २०२२ पर्यंत २ हजार १४ रुग्ण नोंदवले गेले. डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी ४१ रुग्ण गेल्या १४ दिवसांतील आहेत. सविस्तर बातमी

10:01 (IST) 1 Aug 2022
कोकणात सरासरीच्या तुलनेत ५७ टक्के पाऊस; दक्षिण कोकणाच्या तुलनेत यंदा उत्तर कोकणात सरासरी पावसाचे प्रमाण जास्त

अलिबाग-  कोकणाचे वार्षिक पर्जन्यमान २७५७ मिमी आहे. त्यातुलनेत पावसाळय़ाच्या पहिल्या दोन महिन्यात १५७६ मिमी पाऊस पडला आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा ५७ टक्के पावसाची नोंद झाली आहे.  दक्षिण कोकणाच्या तुलनेत यंदा उत्तर कोकणात पावसाची सरासरी अधिक आहे. कोकण विभागात सर्वाधिक पाऊस पालघर जिल्ह्यात पडला आहे. तर रत्नागिरीत कमी पावसाची नोंद झाली आहे. सविस्तर बातमी

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुमारे १५ तास चौकशी केल्यानंतर मध्यरात्री त्यांना अटक केली आहे.