Mumbai Maharashtra News Updates : लोकसभा निवडणूक पार पडली असून निकालही हाती आले आहेत. नवं सरकार स्थापन झालं असून मंत्रिमंडळही तयार झालंय. या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्यालासहा मंत्रिपदे आली आहेत. त्यापैकी नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोघांना त्यांना पूर्वीची केंद्रीय खाती दिली असून उर्वरित चौघांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद आणि आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आलाय. पुण्याचे भाजपा खासदार मुरलीधर मोहळ यांची पहिल्याच वेळी मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांच्या वाट्याला अत्यंत महत्त्वाचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. रक्षा खडसे यांना युवा आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले आहे. तर, रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही झाले आहे. आता महाराष्ट्रात वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाललेल्या महायुतीने आता विधानसभा लक्ष्य केली आहे. तसंच, विधानसभेच्या जागावाटपासाठी वाटाघाटीही सुरू झाल्याचे समजते. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.
Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा
राज्यातील पात्र शाळांमधील पहिली ते आठवीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो.
भारतीय रेल्वेने रुळांचे वजन वाढवून रेल्वे मार्गाचे अद्यावतीकरण सुरू केले असून त्यामुळे भारतीय रेल्वे अधिक वेगवान होत आहे.
मनोज जरांगेंचं उपोषण आंतरवाली सराटीत सुरू आहे. राज्यातील आमदार-खासदारांनी तिथं जाऊन मराठा योद्धा जरांगे पाटलांना त्यांच्या लेटरहेडवर हमी द्यावी. त्यांचं आंदोलन स्थगित करण्यासाठी प्रयत्न करावे. राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांना घेऊन आंतरवाली सराटीत बैठक घेऊन मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाबाबत ज्या मागण्या आहेत त्या सोडवण्याचा पुढाकार घ्यावा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन आंदोलनासंदर्भात दाखवून हे आंदोलन स्थगित करावी. जर हे नेते त्या ठिकाणी गेले नाही तर पहिलं आंदोलन शरद पवारांच्या घरापासून या सर्व राजकीय नेत्यांच्या घरापासून केले जातील. या सर्वाचे जबाबदार हे नेतेच असतील. ४८ खासदार आणि आमदारांना मतदारसंघात सुखरूप फिरायचं असेल तर आंतरवाली सराटीत जाऊन आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करावा - करण गायकर, समन्वयक, सकल मराठा समाज
नैऋत्य मोसमी पाऊस अकोला, पुसद येथे पोहोचल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं असून आज चौथा दिवस आहे. आज त्यांची प्रकृती खालावली आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हे असंवेदनशील सरकार आहे. या राज्यातील नागरिक न्याय मागतोय तर सरकारची नैतिक जबाबदारी नाहीय का त्यांच्याशी जाऊन बोलणं, त्यांना विनंती करणं. हे घरं फोडणं, पक्ष फोडणंच सुरू आहे. ते म्हणत आहेत की २४० चा आकडा ३०० पार करणार. आता ६० चा आकडा कसा वाढवणार आहेत काय माहीत? - सुप्रिया सुळे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत आल्हाट आणि आरोपी राकेश गायकवाड नातेवाईक आहेत. ते शेजारी राहायला आहेत.
शरद पवार यांच्या तसेच इतर सर्व नेत्यांच्या घरासमोर उपोषणाला सुरुवात केली जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पुणे : नशेसाठी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरून खून करणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने गजाआड केले. याप्रकरणात चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वर्धा : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामदास तडस यांना मागे टाकत अमर काळे यांना तब्बल वीस हजारांचे मताधिक्य हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मिळाले. विद्यमान आमदार समीर कुणावार यांना यामुळे मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील दिघडी येथे रविवारी गावातील उसाच्या शेतात एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह आढळला. त्याचवेळी मृत मुलाच्या आजोबांनी गळफास घेत आत्महत्या केली. गौरव गजानन शिंदे (४) असे नातवाचे, तर अवधूत राजाराम शिंदे (६२) असे मृत आजोबांचे नाव आहे.
चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदार संघाचे तीन माजी आमदार मंचावर आहेत.या तिघांपैकी एकाला ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजयी करून “आजी आमदार” करायचे आहे असे प्रतिपादन करित शेतकरी संघटनेचे नेते ॲड.वामनराव चटप यांना निवडून आणण्याचा सूचक इशारा धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष ॲड.पुरूषोत्तम सातपुते यांनी केला.
गडचिरोली : सासऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेली गडचिरोली येथील नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना मनीष पुट्टेवार (पार्लेवार) हिने नियमात बसत नसलेल्या जिल्ह्यातील तब्बल २ हजार कोटी इतक्या किमतीच्या भूखंडांना परवानगी दिल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.
आधीही त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलो होतो. आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही मी त्यांच्या आशीर्वादाकरता आलो आहे. राज साहेबांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यालय आणि घरात भेट दिली होती. कल्याण लोकसभेकरता सभा घेतली होती. राज ठाकरेंचा कायम पाठिंबा असतो. विद्यार्थी सेनेचे काम सुरू केलं होतं तेव्हाही ते माझ्या पाठीशी होते - नरेश म्हस्के
गेली सुमारे साडेतीन वर्षे महानगरपालिकेत प्रशासकराज असताना आणि लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेत नसतानाही कोल्हापुरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे.
मयूर चव्हाण सांगलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता. काल रात्री तो हॉस्पिटलमधून काम आटपून बाहेर पडला.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले तर ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश धरणे कोरडीठाक झाली असून धरणसाठा आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
शाळांना कोणतीही मान्यता नसताना विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची फसवणूक केली जाते. अशा तक्रारी गेल्या काही वर्षात सातत्याने पुढे येत होत्या.
भिवंडी येथील गोवा नाका भागात मंगळवारी पहाटे कापड गोदामाला भीषण आग लागली आहे.
वाहिनी फुटल्याने शेकडो लीटर पाणी फुकट गेले. जलवाहिनी लगतचा परिसर जलमय झाला होता.
गेले काही दिवस विविध बांधकामे, दुरुस्त्या आणि अस्वच्छतेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाला बकाल रूप आले आहे.
"युगेंद्र दादांना आमदारकीची संधी द्यावी. गावपुढाऱ्यांपुढे आमचं काहीच चालत नाही. त्यांच्याशिवाय दुसरा उमेदवार कोणीच नाही. युगेंद्र पवारांना तुम्ही ताकद द्या, आम्ही त्यांच्यापाठीशी आहोत. आमचं दादांवर लक्ष आहे, तुमचं लक्ष ठेवा फक्त. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे", अशी मागणी आज कार्यकर्त्यांनी शरद पवारांना भेटून केली.
‘मानव सेवा हीच माधव सेवा' या भगवान श्री सत्यसाई बाबांच्या उपदेशाने प्रेरीत होऊन येथील डॉ. प्रकाश नंदूरकर गेल्या ३० वर्षांपासून सर्वधर्मीय गरीब, गरजू कुटुंबातील मुला-मुलींचे शाही विवाह लावून देत आहेत.
मध्य रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. रोज म.रे.(मध्य रेल्वे) त्याला कोण रडे? अशी आता लोकलने ऑफिस गाठणाऱ्यांची अवस्था झाली आहे. मागच्या आठवड्यात मध्य रेल्वेने जंबो ब्लॉक घेतला होता. त्यानंतर मध्य रेल्वेची लोकलसेवा रुळावर यायला पुढचे दोन ते तीन दिवस गेले होते. अशात आज पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.
मीरा रोड येथील फातिमा खातून या ३१ वर्षीय महिलेने ६ जून रोजी कोल्हापूर-मुंबई-महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये एका चिमुकलीला जन्म दिला. कोल्हापूर-मुंबई-महालक्ष्मी एक्स्प्रेसने लोणावळा स्थानक ओलांडल्यानंतर या महिलेची ट्रेनमध्येच प्रसुती झाली. त्यामुळे या महिलेच्या पतीने त्या मुलीचे नाव ट्रेनच्या नावावरून महालक्ष्मी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. ८ जून पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांनी डॉक्टरांचे उपचार घेण्यास नकार दिला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. ८ जून पासून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
"मंत्रीमंडळाचं वाटप करत असताना कोणालाही काही दिलं नाही. फक्त भाजपाच्या नेत्यांना मंत्रीपद दिली आहेत, त्यामुळे हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दुसऱ्यांच्या ताकदीला खूप घाबरतात. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची ताकद फक्त ईडी, सीबीआय, पोलीस, आयकर विभाग हीच असून तो त्यांचा आत्मा आहे", असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
लोकसभा निवडणुकीचे टप्पे १ जूनला संपले. त्यानंतर निकालही लागला. एनडीएची सत्ता आली आहे आणि मोदींनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची देशातल्या निवडणुकीवर, राजकारणावर आणि मणिपूरवरची प्रतिक्रिया समोर आली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग द्वीतीय या समारंभाला ते संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी मणिपूरबाबत भाष्य केलं आहे. वर्षभरापासून मणिपूर जळतंय त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असं मोहन भागवत म्हणाले आहेत.
वाचा सविस्तर बातमी
Mumbai Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा