Mumbai Maharashtra News Updates : लोकसभा निवडणूक पार पडली असून निकालही हाती आले आहेत. नवं सरकार स्थापन झालं असून मंत्रिमंडळही तयार झालंय. या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्यालासहा मंत्रिपदे आली आहेत. त्यापैकी नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोघांना त्यांना पूर्वीची केंद्रीय खाती दिली असून उर्वरित चौघांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद आणि आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आलाय. पुण्याचे भाजपा खासदार मुरलीधर मोहळ यांची पहिल्याच वेळी मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांच्या वाट्याला अत्यंत महत्त्वाचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. रक्षा खडसे यांना युवा आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले आहे. तर, रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही झाले आहे. आता महाराष्ट्रात वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाललेल्या महायुतीने आता विधानसभा लक्ष्य केली आहे. तसंच, विधानसभेच्या जागावाटपासाठी वाटाघाटीही सुरू झाल्याचे समजते. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.

Live Updates

Mumbai Maharashtra News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा

10:36 (IST) 11 Jun 2024
“चंद्राबाबू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मा, खातेवाटपात…”, संजय राऊतांची टीका

महाराष्ट्राच्या राजकारणात भटकती आत्म्याची गोष्ट सुरू होती. त्यावर ठाकरेंनीही उत्तर दिलं होतं. परंतु, आता केंद्रात दोन अतृप्त आत्मा आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार. या अतृप्त आत्म्यांचं समाधान करा. भटकती आत्मा कधी कोणाचा पाठलाग सोडत नाही, असं पवार म्हणाले आहेत. हे खरं आहे. नरेंद्र मोदींना जोपर्यंत त्यांच्या पदावरून उतरवत नाही तोवर आमची आत्मा शांत होणार आहे. नरेंद्र मोदींना दोन अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागणार आहे. ज्याप्रमाणे खातेवाटप झालं आहे त्यानुसार सर्वच आत्मा अतृप्त आहेत – संजय राऊत

Mumbai Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या वाचा