Maharashtra Politics LIVE Updates : दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यावरून आता राज्यात संतापनाट्य सुरू झालं आहे. एकनाथ शिंदेंना शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून संजय राऊतांनी आगपाखड केली आहे. यावरून आता राज्यातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे राज्यात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून कलगीतुरा रंगला आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची नियुक्ती स्थगित करण्यात आली असून त्याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अजित पवारांनी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार उपस्थित नव्हते, यावरूनही राज्यात घमासान सुरू आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी त्यांची अस्वस्थता शिंदेंसमोर बोलून दाखवली आहे. मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने शिवसेना (एकनाथ शिंदे) मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. यासह राज्यातील विविध बातम्या पाहुयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Marathi News Live Update Today : राज्यातील लेटेस्ट बातम्या जाणून घ्या
नंदुरबार रेल्वे स्थानकातील तरुणाच्या हत्त्याप्रकरणी नऊ जणांना अटक
नाशिक : चेन्नई ते जोधपूर रेल्वेगाडीत बसण्याच्या जागेच्या वादातून दोन फेब्रुवारी रोजी नंदुरबार येथे रेल्वेत जमावाने दोघा तरुणांवर शस्त्रांनी वार करुन जबर जखमी केले होते. यातील एका २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वाढीव कलमान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांच्या शोधासाठी गती देण्यात आली होती.
अखेर ‘एमपीएससी’च्या टंकलेखन, कर सहायक संवर्गाचा निकाल जाहीर, या उमेदवारांनी मारली बाजी
नागपूर : अखेर मंगळवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, औरंगाबादने या याचिकेवरील आपला निर्णय दिला असून ‘एमपीएससी’ने सर्वसारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. ८१६ उमेदवारांची यादी असून यामध्ये तन्मय काटुले यांनी सर्वाधिक गुण घेतले आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे वेतन रोखण्याचे आदेश येताच तीन शिक्षकांचे थकीत वेतन जमा
तीन शिक्षकांचे वेतन जमा न केल्यामुळे त्याची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने थेट सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे एक महिन्याचे वेतन रोखण्याचा आदेश दिला. सविस्तर वाचा
हजारो घरे विक्रीवाचून धूळ खात असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या कोकण मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय, मागणी तपासूनच घरांची बांधणी
म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार-बोळींजमध्ये सर्वात मोठा गृहप्रकल्प बांधला असून या प्रकल्पातील हजारो घरे विक्रीविना धूळ खात पडून आहेत. तर कोकण मंडळाच्या इतर ठिकाणच्या घरांकडेही अर्जदारांनी पाठ फिरविली आहे. सविस्तर वाचा
कृत्रिम तलावांत विसर्जनाचा पर्याय; मोठ्या मूर्तींसाठी तलावांच्या खोलीत आणखी वाढ
महापालिकेने माघी गणेशोत्सवातील प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विसर्जनावर प्रतिबंध घातल्याने विसर्जनाचा मुद्दा चिघळला आहे. भाविकांकडून टीकेची झोड उठताच पालिकेने आता नवा मार्ग अवलंबित गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा
मुंबईत ऊन-थंडीचा खेळ, सकाळी उकाडा तर रात्री गारवा; हवामान बदलाविषयी विभागाने नेमकं काय सांगितलं?
किमान तापमानात अचानक झालेली घट आणि कमाल तापमानात सातत्याने होत असलेली वाढ यामुळे मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा अशा विषम हवामान बदलांचा सामना करावा लागत आहे. सविस्तर वाचा
निर्माणाधीन इमारतींतील धुळीचा कांजूरमार्गवासीयांना त्रास
कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून काही बांधकाम व्यावसायिक नियमांना हरताळ फासून रात्रीही बांधकाम करीत आहेत. कांजूरमार्ग परिसरातील रहिवाशांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ बांधकाम बंद करण्यात आले.
पंतप्रधान मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात महावितरणमुळे अडचणी… मोफत वीज योजनेचे…
नागपूर : केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचे अर्ज भरताना मागील सात दिवसांपासून महावितरणच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत आहेत. तब्बल ८० टक्के ग्राहकांचे अर्जच भरले जात नसल्याने त्यामुळे महावितरणच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
… अखेर वाळू लिलावाला प्रतिसाद .. !! जिल्ह्यात चार रेतीगट सक्रिय, बांधकाम व्यवसायिकांकडून वाळूखरेदीला सुरुवात
ठाणे : जिल्ह्यातील नदी आणि खाडीपात्रातून प्रशासनाच्या माध्यमातून वाळू उपसा करून त्याचा लिलाव करण्यात येतो. मात्र मागील गेल्या काही वर्षांपासून वाळू लिलावाचे गोंधळलेले धोरण, रेतीचा विक्रीचा चढा दर यांमुळे जिल्ह्यात वाळू लिलावाला शून्य प्रतिसाद मिळत होता. मात्र मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात चार ठिकाणी अखेर रेती गट सक्रिय झाले असून येथून रेती विक्री केली जात आहे. शासनाच्या दरानुसार जिल्ह्यातून सुमारे १७ हजार ब्रास वाळूची विक्री करण्यात आली आहे.
संजय राऊतांना साहित्य संमेलन कळालं आहे का? मान्यवरांनी यांचा निषेध केला पाहिजे, त्यांना जोडे मारले पाहिजेत. एकनाथ शिंदे घरंदाज आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार पेलणारा नेता आहे. शरद पवारांनी त्यांच्याविषयी वक्तव्य करणं हा त्यांचा बहुमान आहे – संजय शिरसाट, आमदार
एकनाथ शिंदेना पुरस्कार मिळाल्याने विरोधकांना पोटदुखी – उदय सामंत
ज्या संस्थेने सत्कार केला, त्यांना हे सर्व योग्य वाटलं. त्यांना एकनाथ साहेबांचं नेतृत्व, कतृत्त्व योग्य वाटतंय. दिल्लीतच त्यांचा सत्कार झाला याचाही विचार विरोधकांनी केला पाहिजे. एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला विरोधकांच्या पोटदुखीचं कारण आहे. साहित्यसंमेलन आलं की वाद होतात. या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य काय तर साहित्यांनी वाद निर्माण केलेले नाहीत. कोणीतरी वाद घालणारं हवं, नाहीतर साहित्य संमेलन गाजणार कसं? – उदय सामंत
१२८ थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती, पालिकेच्या धडक कारवाईत ७ कोटींची वसुली
नवी मुंबई</strong> : मालमत्ताकराचे थकबाकीदार असलेल्या व्यक्ती, संस्था यांना आवाहन करूनही तसेच नोटीस बजावूनही त्यांच्यामार्फत प्रतिसाद न देणाऱ्या १२८ थकबाकीदारांवर नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता जप्तीची कारवाई केली. यामधील ३० थकबाकीदारांनी नोटीस मिळाल्यानंतर आपली थकबाकी व मालमत्ताकर जमा केला असून त्यापोटी महानगरपालिकेकडे ७ कोटी ४८ लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे.
उद्योजकांवरील वाढीव घरपट्टीचा भार हलका, अवास्तव करवाढ रद्द
नाशिक : महापालिकेने सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर सुमारे ११ पट दराने २०१८ पासून लागू केलेल्या घरपट्टीचा भार अखेरीस हलका झाला आहे. सात वर्षांपूर्वी लागू केलेली करवाढ रद्द करण्यात आली. आता पूर्वीच्या दरानुसार आकारणी होणार असल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळात हा निर्णय झाला होता.
धोका पत्करून सोलर पॅनलसाठी चढला, पण गतप्राण झाला, कंपनी मात्र म्हणते…
वर्धा : सेलू तालुक्यातील जुवाडी येथे एका जिनिंग प्रेसिंग संस्थेत सोलर पॅनल लावण्याचे ठरले. मोठे युनिट असल्याने नागपूरच्या जेसीस ग्रीन एनर्जी कंपनीस काम देण्यात आले. या कामावर गरजू १८ युवकांना बोलवण्यात आले. त्यात अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरलगत असलेल्या गणेशपूर या गावचा आकाश संजय निंबाळकर हा पण २८ वर्षीय युवक होता. तीस फूट उंचीवरील छतावर तो व त्याचे सहकारी भारी वजनाचे सोलर पॅनल घेऊन चढत होते. पण वजन सांभाळता नं आल्याने तोल गेला व आकाश खाली कोसळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
संजय राऊतांच्या टीकेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 12, 2025
आंदोलनामुळे झालेली कचराकोंडी अथक प्रयत्नांनंतर दूर
कंत्राटी कामगारांनी बेकायदेशीर काम बंद आंदोलन करू नये असे आवाहन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केल्यानंतरही सोमवारी केलेल्या आंदोलनामुळे शहरात दिवसभर कचरा कोंडी पाहायला मिळाली होती. सविस्तर वाचा
पिंपरी- चिंचवड: एलआयसीच्या प्लॅनमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याचा आमिषाने आर्थिक फसवणूक
एलआयसीच्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याच अमिश दाखवून ५२ वर्षीय व्यक्तीची दोन लाखांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आठव्या मजल्यावरुन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील आठव्या मजल्यावरुन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात घडली. बांधकाम मजुरास सुरक्षाविषयक साधने न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बॉम्बस्फोटाचा पोलिसांना दूरध्वनी; संबंधित व्यक्तीकडून १४०० हून अधिक दूरध्वनी
मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचल्याची धमकी देण्यात आली. मोदी अमेरिकेला जात असलेल्या विमानात दहशतवादी बॉम्ब ठेवणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. सविस्तर वाचा
‘एमएमआर’मध्ये आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र; ग्रोथ हब आराखड्यांतर्गत नियोजन
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत एमएमआरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र बनविले जाणार आहे. यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. एमएमआरला आघाडीचे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक केंद्र बनविण्याचेही उद्दिष्ट ग्रोथ हबअंतर्गत ठेवण्यात आले आहे. सविस्तर वाचा
मुंबईत जीबीएसचा पहिला मृत्यू ; नायर रुग्णालयमध्ये ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
नायर रुग्णालयामध्ये ५३ वर्षीय व्यक्तीचा गुइलेन-बॅरे सिंड्रोमने (जीबीएस) मृत्यू झाला. मुंबईमधील जीबीएसचा हा पहिलाच मृत्यू आहे. ही व्यक्ती २८ जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. सविस्तर वाचा
नगरसेवक असताना बेकायदा बांधकामांचा मुद्दा उपस्थित का नाही?, उच्च न्यायालयाचा ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला सवाल
खार दांडा येथील बेकायदा बांधकामावर कारवाईची मागणी करणारे शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक श्रीकृष्ण (बाळा) चव्हाण यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी फटकारले. नगरसेवकपद गेल्यानंतर बेकायदा बांधकामावर कारवाई मागणी याचिकाकर्त्यातर्फे करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
पीएनबी बँक घोटाळा : मेहुल चोक्सी कर्करोगाने त्रस्त ? बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याची वकिलांची विशेष न्यायालयात माहिती
पंजाब अॅण्ड नॅशनल (पीएनबी) बॅंक घोटाळा प्रकरणातील फरारी हिऱे व्यापारी मेहुल चोक्सी याला कर्करोग झाला असून सध्या तो बेल्जियममध्ये उपचार घेत असल्याचे त्याच्या वकिलांनी मंगळवारी विशेष न्यायालयाला सांगितले. सविस्तर वाचा
तीन हजार वाहनांमधून धूर ध्वनि, वायू प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओची कारवाई
नवी मुंबई</strong> : वाहनांमधून निघणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनचालकांना वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र तरी देखील शहरात मोठ्या प्रमाणात पीयूसी प्रमाणपत्र नसलेली वाहने निदर्शनास आली असून यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
शिवसेना मंत्र्यांची नाराजी, अधिकारांवर गदा येत असल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने शिवसेना (एकनाथ शिंदे) मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या वेळी उपस्थित होते. याखेरीज नाशिक तसेच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला नाही. याबाबतच्या वार्षिक योजना मंजुरीच्या बैठकांना शिंदे गटाचे मंत्री गैरहजर राहिले.
Sanjay Raut : “शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला”, संजय राऊतांची आगपाखड!
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्तेत दिल्लीत हा पुरस्कार देण्यात आला. मात्र, या पुरस्कार सोहळ्यावरून आता महाराष्ट्रात राजकीय धुसफूस सुरू झाली आहे. शिवसेना फोडणाऱ्या व्यक्तीला शरद पवारांनी पुरस्कार दिल्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह
Marathi News Live Update Today : राज्यातील लेटेस्ट बातम्या जाणून घ्या