Maharashtra Live News Updates, 20 February 2023: उद्धव ठाकरे वारंवार माझे वडील चोरले, वडील चोरले, अशी टीका करत आहेत. पण वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या एकट्याचे वडील नाहीत. ते जयदेव ठाकरे आणि बिंदू माधव यांचेही वडील आहेत. जयदेव ठाकरे आणि बिंदू माधव यांचे सुपुत्र निहार ठाकरे स्वतः कायदेशीर प्रक्रियेमध्ये मदत करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वडील चोरल्याची पोलिस स्थानकात जाऊन तक्रा करावी, अशी टीका किरण पावसकर यांनी केली.
राज्यातील दिवसभराच्या विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स मिळवा एका क्लिकवर…
Marathi News Live Updates : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!
पुणे : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी प्राथमिक शाळांमध्ये राखीव असणाऱ्या २५ टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधारकार्ड नसल्यास प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, आधार कार्ड काढताना मिळणाऱ्या पावतीवर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल का, याबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवले आले आहे.
पुणे : “पहाटेची शपथ घेऊन अजित पवार यांनीच स्वार्थीपणा केला. आमच्यासोबत गणिते जुळली नाहीत म्हणून पुन्हा त्यांनी काँग्रेस आणि शिवसनेसोबत हातमिळवणी केली”, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
ठाणे : पोलीस असल्याची बतावणी करून खंडणी उकळणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. संजय म्हात्रे (४५). कैलास पतंगे (३०), निखील जोशी (२६), इम्रान शेख (४०) आणि सागर चिंचोळे (२६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून दोन मोटार, मुंबई पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र, पोलीस लिहिलेली पाटी, लाठ्या, पोलिसांच्या टोप्या, खंडणीतील रकमेपैकी ४० हजार ५०० रुपये, असा मुद्देमाल जप्त केला आहे.
विवाहासाठी तरुणीसह तिच्या बहिणीला धमकावून मोटारीतून अपहरण करण्यात आल्याची घटना स्वारगेट परिसरातील जेधे चौकात घडली. तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तिला डांबून ठेवले.
महिला चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या लतिका दिवाकर गोऱ्हे (वय ८७) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे या त्यांच्या कन्या होत.
नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिलांची क्रमांक व्हॉट्सॅपवरून मिळवून त्यांना अश्लील व्हिडिओ कॉल करणाऱ्या करणाऱ्या आरोपीला मालाड पोलिसांनी नुकतीच पुण्यातून अटक केली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह शिंदे यांचे असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाविरूध्द सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
“पक्षनिधीचा दावा ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. नाहीतर निवडणूक आयोगावर खटला भरला जाईल. आयोगाला फक्त चिन्ह आणि नाव ठरवण्याचा अधिकार नाही. देशात निवडणुका घेणं, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत ठेवणं हा त्यांचा अधिकार आहे”, असं म्हणत पक्षनिधीवर शिंदे गटाकडून दावा सांगितला जाऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं.
माझ्याकडून प्रत्येक गोष्ट चोरली गेली आहे. पक्ष, पक्षाचे नाव, चिन्ह माझ्याकडून चोरले गेले. पण माझे ठाकरे नाव कसे चोरणार? आम्ही सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या विरोधात जात आहोत. उद्यापासून याची सुनावणी सुरु होईल, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मंगळवापासून सुरुवात होणार आहे. नागपूर विभागातील ४८४ केंद्रांवरून १ लाख ५५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
माझे वडील तर एकनाथ शिंदे यांनी चोरलेले आहेतच. आता ते अमित शाह यांना वडीलांसारखे म्हणत आहेत. किती किती लोकांना ते वडील मानणार काय माहीत? उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
आज जी परिस्थिती भाजपाने शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, उद्या ही परिस्थिती ते देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर यांचा सामना केला गेला नाही, तर कदाचित आगामी २०२४ ची निवडणूक ठरू शकेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरू होऊ शकतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज पुढील वर्षीच्या शिवजयंतीपूर्वी लावला गेला नाही, तर राज्यव्यापी आंदोलन करू, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला. या मागणीसाठी शासकीय कार्यक्रमावर टाकलेला बहिष्कार हा भगवा जाणीव आंदोलनाचा एक ट्रेलर होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सविस्तर वाचा
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना धड शिकवण्यासाठी आता शिंदे गटाकडून राज्यभरात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून सर्व ५६ आमदारांना व्हिप बजावला जाणार आहे. हा व्हिप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना देखील लागू होईल, असे सुतोवाच प्रतोद भरत गोगावले यांनी केले आहे.
महापालिका सहायक आयुक्त महेश आहेर यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी पालिका मुख्यल्यासमोर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करत पक्ष कार्यलय ते ठाणे महापालिका भवन इथपर्यंत मोर्चा काढला.
ठाणे महापालिकेचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही पदाधिकाऱ्यांना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आम्हाला पूर्वसूचना न देता, तू सेल्फी का काढली, असा प्रश्न करुन आई आणि तिच्या मुलीला दोन महिलांनी रविवारी सकाळी बेदम मारहाण केली. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरा बाहेर हा प्रकार घडला
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शिंदे गटाने विधीमंडळातील पक्ष कार्यालयावर देखील हक्क सांगत कार्यालयाचा ताबा घेतला. त्यानंतर शिंदे गट शिवसेना भवन आणि पार्टी फंडवर देखील हक्का सांगणार का? अशी चर्चा सुरु झाली होती. त्यावर आता शिंदे गटाने मोठं विधान केलं आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याचे संकेत आहेत.
लष्कराने नागपूर आणि विदर्भातील तरुणांसाठी ‘अग्नीवीर’ भरतीसाठी अर्ज मागवले आहे. भरती प्रक्रियेत बदलासह ही भरती होण्याची शक्यता आहे. त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल.
कल्याण ते तळोजा मेट्रो मार्गासाठी निविदा प्रक्रिया जाहीर झाल्याबद्दल आणि हे काम लवकर पूर्ण होण्याचे गोडवे गायले जात असल्याबद्दल डोंबिवली २७ गावांमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तीन दिवसांपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मुक्कामी आहे. या तीन दिवसात सचिनला माया, तारा, बिजली या वाघिणींचे आणि ‘बघिरा’ अर्थात काळा बिबट्याचे दर्शन झाले. झुनाबाई या वाघिणीच्या दर्शनाची मात्र सचिनला प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्राच्या सीमेवरील, छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीच्या हद्दीत आज, सोमवारी सकाळी ८:३० वा. च्या सुमारास १२-१४ नक्षल्यांनी चहा पिण्याकरिता विनाशस्त्र आलेल्या पोलिसांवर गोळीबार केला.
ताडोबातील वाघांनी देशविदेशातील नामांकित व्यक्तिमत्वांना सहज दर्शन देऊन भुरळ घातली. म्हणूनच त्यांची पावले वारंवार या व्याघ्रप्रकल्पाकडे वळतात. या व्याघ्रप्रकल्पाच्या निमढेला प्रवेशद्वारावरील उत्तम व्यवस्थापनाने अलीकडच्या काही महिन्यात वाघांची संख्या वाढली.
ट्राय आणि खासगी वाहिन्यांच्या व्यवस्थापनाने त्यांच्या वाहिन्यांच्या प्रक्षेपण दरात वाढ केली आहे. त्याला अखिल भारतीय डिजिटल केबल फेडरेशनने विरोध केला असून दरवाढीच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. फेडरेशनचे सरचिटणीस मनोज छंगानी म्हणाले “वाहिन्यांनी केबल ऑपरेटर्सला ४८ तास आधी दरवाढीबाबत सूचना दिली.
अंबाझरी तलावालगतच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन पडणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक बचाव समिती आंदोलन करीत आहे.एमटीडीसीने अंबाझरी उद्यान आणि स्मारकाच्या ४४ एकर जागा गरुडा कंपनीला ३० वर्षासाठी लिजवर दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे चिन्हा शिंदे गटाला दिल्यानंतर आता मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरु केल्या होत्या. आज विधीमंडळात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला आहे.
नवले पुलावर रविवारी रात्री २४ वर्षीय तरुणी थांबली होती. ती जोरात ओरडत होती. तिचा आवाज नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी ऐकला. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी मिथून राठोड, अमर कोरडे, नागरिक राजू जगताप, सागर बर्दापुरे, प्रदीप जोरे, श्रेयस तांबे यांनी तरुणीला उडी मारु नको, असे सांगितले.
राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने स्पर्धा परीक्षार्थींसह पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक येथे आंदोलन सुरू केले आहे. आश्वासन नको अंमलबजावणी हवी, अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात येत आहे.
सध्या जगातील दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्च कमी करण्याच्या दृष्टीने आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. वाचा सविस्तर बातमी
‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.