Maharashtra Live News Updates, 20 February 2023: उद्धव ठाकरे वारंवार माझे वडील चोरले, वडील चोरले, अशी टीका करत आहेत. पण वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या एकट्याचे वडील नाहीत. ते जयदेव ठाकरे आणि बिंदू माधव यांचेही वडील आहेत. जयदेव ठाकरे आणि बिंदू माधव यांचे सुपुत्र निहार ठाकरे स्वतः कायदेशीर प्रक्रियेमध्ये मदत करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वडील चोरल्याची पोलिस स्थानकात जाऊन तक्रा करावी, अशी टीका किरण पावसकर यांनी केली.
राज्यातील दिवसभराच्या विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स मिळवा एका क्लिकवर…
Marathi News Live Updates : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट आक्रमक; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!
ठाण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि ठाण्यावरून थेट मुंबईत जाणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आणखी एक उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
निसर्गाशी नाते सांगणाऱ्या रंगाच्या संगतीने खादी कापडावर केलेली कलाकारी चित्रकलेचा नवाच आविष्कार ठरली. मगन संग्रहालयातील विशाल वटवृक्षाच्या छायेत ही रंगकारी कला आकारास आली.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लांबा यांनी ही माहिती दिली.
क्रिकेटवर सट्टेबाजी खेळण्याच्या व्यसनातून कर्जबाजारी झालेल्या एका व्यावसायिकाने चित्रफीत तयार केली व गळफास घेऊन आत्महत्या केली.अमित राजेंद्र महतो (३५, नरीमन सोसायटी, गणपतीनगर) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक सध्या प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे. याच पार्श्वभूमीवर आज भाजपा आणि महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत. मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने आपला उमेदवार मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि केंद्र सरकारची कंपनी इंजिनियर इंडिया लिमिटेड नागपुरात ‘पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स’च्या उभारणीसाठी संयुक्तपणे व्यवहार्यता अहवाल तयार करणार आहे.
सायंकाळच्या सुमारास एक भले मोठे अस्वल न्यायालय वसाहत परिसरात शिरले. परिसरात फेरफटका मारत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या दिशेने ते अस्वल धावू लागले. अगदी १५ फूट अंतरावर अस्वल आले तोच त्यांनी घराच्या दिशेने धूम ठोकली आणि कसाबसा जीव वाचवला.
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.