Maharashtra Political Crisis News : केंद्रीय शिवसेनेचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. तर, ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ आणि शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे. मात्र, यावरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
Mumbai-Maharashtra Breaking News Today, 12 Oct 2022 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
पाचगणी गिरीस्थान पालिकेचे मुख्याधिकारी गिरीष दापकेकर यांच्यावर आज(बुधवार) एका व्यक्तीने शाई फेकली. यामुळे जिल्ह्यातील पालिकांच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली. आज जिल्ह्यातील सर्व पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत काम बंद आंदोलन केले.पाचगणी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…
शिंदे गटाच्या या कथित प्रयत्नानंतर लटके नेमकं कोणत्या गटाकडून निवडणूक लढवणार असा प्रश्न निर्माण झालेला असतानाच, पालिकेने कमर्चारीपदाचा राजीनामा मंजूर करावा यासाठी ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे याबाबतचे गूढ आणखी वाढले आहे. दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेते मंडळींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्वीटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करत, शिंदे गटावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी..
अंधेरी पोटनिवडणुकीवरून सुरू असलेल्या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(ए)चे अध्यक्ष आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी देखील या निवडणुकीबाबत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंची पेटलेली मशाल विझवण्याचं काम आम्ही करणार आहोत, असं आठवलेंनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी..
मावळ लोकसभेतील पाणी योजना; तसेच वनखात्याच्या परवानगीअभावी रखडलेली विकासकामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ‘जल जीवन मिशन’अंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबईत बैठक झाली. सविस्तर वाचा…
ऐरोली रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीजवळ मंगळवारी पहाटे १६ वर्षीय मुलावर तीन जणांनी चाकू हल्ला करून त्याचा मोबाईल खेचून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. सविस्तर वाचा…
सांगली : भक्ष्य असलेल्या मांजराची शिकार करण्यासाठी पाठी लागलेला बिबट्या थेट स्वयंपाकघरात शिरण्याचा प्रकार वाळवा तालुययातील मरळनाथपूर येथे मंगळवारी रात्री घडला. बातमी वाचा सविस्तर …
दिवाळीच्या आनंदोत्सवात आसमंत उजळून टाकणाऱ्या आतषबाजीला यंदा महागाईचे ‘फटाके’ बसले आहेत. विविध प्रकारच्या फटाक्यांच्या किंमतीमध्ये १० ते ४० टक्क्यांपर्यंतची मोठी वाढ झाली. त्यामुळे दिवाळीत फटाके खरेदी करताना सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. सविस्तर वाचा…
मंगळवारी बाळासाहेबांची शिवसेनाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्धाटन झाल्या नंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उपनेते विजय नाहाटा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका केली. याचे पडसाद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सेनेत उमटले असून विठ्ठल मोरे आणि द्वारकानाथ भोईर या दोन्ही मतदारसंघाच्या अध्यक्षांनी .विजय नाहाटा यांच्या आरोपाला उत्तर दिले. सविस्तर वाचा…
चुलते रिक्षाचालक आणि घरातील २३ वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला. सर्वत्र शोधाशोध केली मात्र मुलाचा शोध लागला नाही. दोन दिवसांनी बेपत्ता मुलाच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर लघुसंदेश आला आणि त्यामध्ये ५० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी अपहरणकर्त्यांनी केली होती. पोलीसांत गेल्यास मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. सविस्तर वाचा…
नवी मुंबई : वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात ‘शेती उत्पादक संघ व नवोदित शेती तंत्रज्ञान संस्थांना पूरक व्यावसायिक व्यासपीठ निर्मिती’ होईल या दृष्टीने किसान बीझ कृषी-व्यवसाय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. बातमी वाचा सविस्तर …
उरण : तालुक्यातील पश्चिम विभागात मोडणाऱ्या बोकडविरा, चाणजे , नागाव, पागोटे, रानवड व फुंडे या गावातील उर्वरित जमिनीही सिडको कडून संपादीत करण्यात येणार आहेत. त्याकरिता सिडकोच्या वतीने बुधवारी वृत्तपत्रातून अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. बातमी वाचा सविस्तर …
मुंबई तसेच ठाणे महापालिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा नदीवरील पिसे येथील बंधाऱ्यातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मुंबई महापालिकेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून या कामामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी करण्यात आल्याने ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात झाली आहे. सविस्तर वाचा…
भिवंडीतील भाविकांना दर्शनासाठी घेऊन निघालेल्या भाविकांच्या बसला बुधवारी सकाळी अचानक आग लागली. घोडेगाव- भीमाशंकर रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. बसमधील प्रवासी आणि चालक तत्परतेने बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. आगीत प्रवाशांचे साहित्य; तसेच बस भस्मसात झाली. सविस्तर वाचा…
म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची १५ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अजित दिनकर मोरे (वय ४२, रा. साईरत्न अपार्टमेंट, नवले पुलाजवळ, आंबेगाव बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलने पहिल्या सहा महिन्यात २०६ कोटींनी जास्त कर भरणा झाला आहे. तर थकबाकी वसुलीसाठी सहा महिन्यात १ हजार ५४६ मिळकती सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून देण्यात आली. सविस्तर वाचा…
विरार : वसईच्या विद्या विकासनी शाळेच्या खेळाचे सामान ठेवण्याच्या गोदामाला अचानक आग लागली. आग लागली त्यावेळेस शाळा सुरू होती. शाळेत परिक्षा सुरू असल्याने काही मुले पेपर देऊन घरी गेली होती. बातमी वाचा सविस्तर …
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा येथील जे. पी. पोस्टर मैदानावर मंगळवारी रात्री फूटबाॅल खेळणाऱ्या शालेय मुलांना गौरीपाडा, टावरीपाडा भागातील आठ तरुणांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाण झालेली मुले शालेय विद्यार्थी आहेत.मारहाण झालेल्या १७ वर्षाच्या एका अल्पवयीन मुलाने या मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.
म्हाडाच्या कोकण मंडळाने २०१८ मध्ये काढलेल्या सोडतीमधील खोणी आणि शिरढोणमधील घरांच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच वेळी सोडतीतील बाळकुम गृहप्रकल्पातील घराच्या किंमतीत १६ लाख रुपयांनी वाढ केली असून घरांची किंमत कमी करण्यास म्हाडाने स्पष्ट नकार दिला आहे. सविस्तर वाचा…
आतापर्यंत भूमाफिया सरकारी, पालिकेच्या आरक्षित भूखंडांवर बेकायदा इमारती बांधून तेथील सदनिकांची बेमालूमपणे विक्री करत होते. आता डोंबिवलीत भूमाफियांनी नवीनच प्रकार शोधून काढला आहे. इमारती बांधून झाल्यानंतर त्या इमारतीच्या गच्चीवर पाण्याच्या टाकी जवळ सदनिका बांधण्याचा नवा उद्योग माफियांनी सुरू केला आहे. सविस्तर वाचा…
गेल्या दोन वर्षात गडचिरोली पोलिसांनी राबवलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. बातमी वाचा सविस्तर …
दोन वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवल्यानंतर शारीरिक संबंधास नकार देणाऱ्या प्रेयसीला मारहाण करून प्रियकराने बलात्कार केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. बातमी वाचा सविस्तर …
कन्हान नदीमध्ये खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राची राख आल्याने कन्हान जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे उत्तर व पूर्व नागपुरातील २८ जलकुंभातून कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात आला. बातमी वाचा सविस्तर …
नवी मुबंई : नवी मुंबई महापालिकेत ज्येष्ठ नागरीकांचा आधार ठरणारी अनेक ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र तयार करण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरीकांना आधार देणारे व त्यांची सुश्रुषा करणारे सामाजिक व खासगी संस्थांचे हजारो वृध्दाश्रम देशभरात आहेत. बातमी वाचा सविस्तर …
मुलाचा अपघात घडवून खून करण्याची धमकी देऊन युवकाने मित्राच्या पत्नीचे अपहरण करून जंगलात नेेले. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिला घरी सोडले. तिने घरी जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : मागील १२ वर्षांपासून रखडलेल्या प्राध्यापक भरतीमुळे असलेल्या रिक्त पदांचा आणि उच्च शिक्षणाचा डोलारा आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळणाऱ्या तासिका प्राध्यापकांना मासिक वेतन द्यावे, असे निर्देश असतानाही प्राचार्यांनी केराची टोपली दाखवली आहे. ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केलेल्या बातमीची तत्काळ दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांचे मानधन दिवाळीपूर्वीच करावे, असे निर्देश आढावा बैठकीत दिले. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत महापालिकेतील मुख्यालयात तसेच सर्व झोन कार्यालयात दूरध्वनीवरील संवादाची सुरुवात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या अभिवादनाने केली जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेत परित्रक जारी करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर …
नागपूर : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे वामन मेश्राम हे नाव देशभरात चर्चेत आले. बातमी वाचा सविस्तर …
महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण करणे शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच भोवल्याचं दिसत आहे. कारण, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.
बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सौर कुंपण असतानाही बाहेरच्या बिबट्याने आत शिरुन प्राणीसंग्रहालयातील काळविटाची शिकार केली. बातमी वाचा सविस्तर …
उरण परिसरातून बेकायदा शस्त्र प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आले. त्याच्या चौकशीतून तो विकी देशमुख या टोळीसाठी काम करीत असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. विक्रांत भोईर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर …