Maharashtra Political Crisis Updates : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकूण घेतला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. तसेच ही फूट ग्राह्य धरू नये आणि सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईल पर्यंत कोणतही निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली. तर आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात अद्याप कोणाचंही निलंबन झालेलं नाही, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार जेठमलानी यांनी केली. यासंदर्भात आता शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

Live Updates

Maharashtra Political  Updates : शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्या; ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

12:10 (IST) 17 Jan 2023
Maharashtra News Live : लातूरच्या मुरुडमध्ये बस अपघात; ४० जण जखमी, १४ गंभीर

लातूरच्या मुरुडमध्ये भीषण बस अपघात झाला आहे. या अपघातात ४० जण जखमी झाले असून त्यापैकी १४ गंभीर आहेत. जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

11:42 (IST) 17 Jan 2023
ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा गौप्यस्फोट, म्हणाले “नरेश म्हस्केंचा काँग्रेस पक्ष प्रवेश…”

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे काँग्रेस पक्षात होते, त्यावेळेस त्यांच्या उपस्थितीत नरेश म्हस्के हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यांची मनधरणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडे दिली होती.

सविस्तर वाचा

11:28 (IST) 17 Jan 2023
मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड मोर्चा

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे कर्ज वसुलीसाठी जमिनी लिलाव करण्याच्या सुरु झालेल्या प्रक्रियेविरोधात येथे काढलेला शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर स्थगित करण्यात आला आहे. या संदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनास एक महिन्याची मुदत दिली आहे.

सविस्तर वाचा

11:20 (IST) 17 Jan 2023
“माझा विजय निश्चित होता” माघार घेणारे शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांचे विधान; म्हणाले “पक्षाच्या आदेशापुढे…”

विधान परिषद निवडणुकीवरून सध्या राज्यातले राजकारण तापले आहे. नाशिकमध्ये काँग्रेसच्या सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

10:54 (IST) 17 Jan 2023
“अडीच लाख कोटींची गुंतवणूक डोळ्यासमोरून निघून गेली, तेव्हा…”; डाव्होस दौऱ्यावरून संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्त्र

स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये सुरू असलेल्या गुंतवणूकदारांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान, यावरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत होणाऱ्या सुनावणीसंदर्भातही प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा

10:45 (IST) 17 Jan 2023
“शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा आयोगासमोर उपस्थित होऊ शकतो. मात्र, महाराष्ट्रात..”; निवडणूक आयोगातील सुनावणी पूर्वी संजय राऊतांची प्रतिक्रिया

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज निवडणूक आयोगसमोर सुनावणी होणार आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेना कोणाची हा तांत्रिक मुद्दा निवडणूक आयोगासमोर उपस्थित होऊ शकतो. मात्र, शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात उपस्थित होऊ शकत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी आहे. शिवसेना एकच आहे”, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा

10:44 (IST) 17 Jan 2023
लष्कर ए तोयबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की जागतिक दहशतावादी म्हणून घोषित

जगभरातील दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राने मोठा निर्णय घेतला आहे. संयुक्त राष्ट्राने लष्कर ए तोयब या दहशतवादी संघटनेचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. या निर्यासोबतच अब्दुल मक्कीची संपत्ती जप्त करण्यात येणार असून प्रवासबंदी तसेच शस्त्र बाळगण्यावर बंदी असे निर्बंद अब्दुल मक्कीवर लादण्यात आले आहेत. वाचा सविस्तर

10:38 (IST) 17 Jan 2023
‘समृद्धी’ महामार्ग उठला नागपूरकरांच्या जीवावर!, अठरा दिवसांत आणखी दोघांचा मृत्यू

२८ डिसेंबरला वाशीमजवळ झालेल्या अपघातात नागपूरकर माय-लेकींचा मृत्यू झाला. सोमवारी बुलढाणा जिल्ह्यानजीक झालेल्या अपघातात नागपूरच्या दोघांचा मृत्यू झाला. ते अवधूत नगरचे रहिवासी असून त्यांची नावे गौरव खरसान, अंकित खैरकर अशी आहेत.

सविस्तर वाचा

10:33 (IST) 17 Jan 2023
VIDEO : “ए, गई बोला ना…काय पो छो..” म्हणत येवल्यातील पतंगबाजीचा आतषबाजीने समारोप

पारंपरिक हलगी वाद्यावर ताल धरत गच्चीवर उत्साह पसरलेला असतो. सोबतीला फाफडा, जिलेबी, वडापाव, मिठाई अशा वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर ताव मारला जातो. मुख्य म्हणजे हा पतंगोत्सव तीन दिवस चालतो. मकरसंक्रांतीच्या आधी आणि नंतर हा उत्सव सुरू राहतो. पतंगबाजी करणाऱ्यांचे गाव ही येवल्याची ओळख. यंदाही या उत्सवाची धुम कायम राहिली.

सविस्तर वाचा

10:24 (IST) 17 Jan 2023
धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कोथरुड पोलिसांकडून एकाला अटक

धावत्या पीएमपी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी एकाला कोथरुड पोलिसांनी अटक केली. त्याच्या विरोधात विनयभंग, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रेम चंदू पवार (वय २९, रा. घोटावडे फाटा, पिरगुंट ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक करण्यात आली. तक्रारदार मुलगी पीएमपी बसने प्रवास करत होती.

सविस्तर वाचा

10:07 (IST) 17 Jan 2023
नागपूर : नायलॉन मांजाने छाटले एकाच दिवशी दहा पक्ष्यांचे पंख

नायलॉन मांजावर अंकुश लावण्यात प्रशासनाला आलेले अपयश माणसांचाच नाही तर पक्ष्यांचा देखील बळी घेत आहे. मकरसंक्रांतीच्या सुरुवातीलाच उपराजधानीत दोन बळी गेले आणि काही जखमी देखील झाले. तीच पुनरावृत्ती पक्ष्यांबाबतही झाली असून मकरसंक्रांतीच्या पहिल्याच दिवशी सेमिनरी हिल्सवरील ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट’ केंद्रात कबूतर, होरी, घुबड, वटवाघूळ, बगळा, रात ढोकरी, वेडा राघूसह सुमारे दहा जखमी पक्ष्यांना उपचारासाठी आणण्यात आले.

सविस्तर बातमी

10:01 (IST) 17 Jan 2023
Video : ती कुत्र्यांना खायला देत होती अन्..; चंदीगढमधील अपघाताचं थरकाप उडवणारं CCTV फूटेज आलं समोर

चंदिगढमध्ये भटक्या कुत्र्यांना खायला देणाऱ्या तरुणीला कारने धडक दिल्याची धक्कादायक घटना १६ जानेवारी रोजी समोर आली . या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. अपघातग्रस्त तरुणीचे नाव तेजस्विता असून सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेसंदर्भात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र तेजस्विताच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. वाचा सविस्तर

09:59 (IST) 17 Jan 2023
ललित मोदींनी मागितली मुकुल रोहतगींची जाहीर माफी, म्हणाले; “रागाच्या भरात…”

आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेले ललित मोदी यांनी ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांना इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून धमकी दिली. मला फरार म्हणू नका. तुमच्यासारख्या लोकांना लाखोवेळा खरेदी करून विकू शकतो. तुम्ही माझ्यासाठी मुंगीसारखे आहात, अशी धमकीच ललित मोदी यांनी दिली होती. मोदी यांच्या या पोस्टमुळे चांगलाच वाद निर्माण झाला. असे असतानाच आता मोदी यांनी इन्स्टाग्रामार्फतच मुकुल रोहतगी यांची माफी मागितली आहे. वाचा सविस्तर

09:55 (IST) 17 Jan 2023
नागपूर : गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात मादी बिबटं मृतावस्थेत

बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्रशासनाचा हलगर्जीपणा तेथील वन्यप्राण्यांच्या जीवावर उठला आहे. सोमवारी सायंकाळी पिंजऱ्यातच ‘चांदणी’ नावाच्या मादी बिबट्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे पुन्हा एकदा प्राणिसंग्रहालय प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर टीकेची झोड उठली आहे.

सविस्तर वाचा

09:53 (IST) 17 Jan 2023
पुण्यात ‘पडद्या’विना नाटकाचा प्रयोग करण्याची रंगकर्मींवर वेळ, नेहरू सांस्कृतिक भवनमधील यंत्रणा निकामी

सारे प्रेक्षकांसमोर सादर व्हावे, अशीच मानसिकता असलेल्या पुणे महापालिकेच्या पारदर्शी कारभाराचे वास्तव समोर आले आहे. नाटक सुरू होण्याचे आणि संपण्याचे सूचन करण्यासाठी वापरला जाणारा पडदा नादुरुस्त झाल्यामुळे घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये ‘पडद्या’विना नाटकाचा प्रयोग करण्याची वेळ रंगकर्मींवर आली आहे.

सविस्तर वाचा

09:50 (IST) 17 Jan 2023
पुणे : यंदा घरांच्या किमतींमध्ये वाढ?, सर्वेक्षणातील निष्कर्ष

यंदाच्या वर्षभरात घरांसाठीची मागणी आणि कच्च्या मालाच्या खर्चातील वाढीमुळे देशभरातील घरांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची अपेक्षा बांधकाम क्षेत्रातील ५८ टक्के विकासकांना आहे. तसेच संभाव्य मंदीचा परिणाम व्यवसायावर होण्याची शक्यता ५० टक्के विकासकांना वाटत असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले.

सविस्तर वाचा

09:49 (IST) 17 Jan 2023
नागपूर शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; २२ उमेदवार रिंगणात, पाच उमेदवारांचे अर्ज मागे

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. २७ पैकी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने २२ उमेदवार रिंगणात असून बहूरंगी लढत होणार आहे. यात भाजप समर्थित शिक्षक परिषदेचे नागो गाणार, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले, आम आदमी पक्षाचे डॉ. देवेंद्र वानखेडे, बहुजन समाज पक्षाच्या निमा रंगारी आदी प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे. ३० जानेवारीला मतदान होणार आहे.

सविस्तर बातमी

09:49 (IST) 17 Jan 2023
पुणे : रिअल इस्टेट मध्यस्थ कायद्याच्या चौकटीत, रेराकडून प्रमाणपत्र अनिवार्य

मालमत्ता खरेदी-विक्री मध्यस्थ (रिअल इस्टेट एजंट) आता कायद्याच्या चौकटीत येणार आहेत. या मध्यस्थांना महारेराकडे नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी करणाऱ्या मध्यस्थांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक टाळता येणार असून या मध्यस्थांविरोधात रेराकडे दादही मागता येणार आहे.

सविस्तर वाचा

09:48 (IST) 17 Jan 2023
पुणे : नवजात बालकांसाठी मानवी दुग्धपेढी, मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना आईचे दूध मिळणे होणार सोपे

शहरातील स्तनपान करू न शकणाऱ्या माता आणि मुदतपूर्व जन्माला आलेली बालके किंवा ज्यांना आई नाही अशी बालके यांना आईचे दूध मिळणे आता सहज शक्य होणार आहे. वाकड येथील सूर्या हॉस्पिटलने नुकतीच मानवी दुग्धपेढी (ह्यूमन मिल्कबँक) सुरू केली असून शहरातील ही सातवी मानवी दुग्धपेढी ठरली आहे.

सविस्तर वाचा

09:45 (IST) 17 Jan 2023
दुपारी ४ वाजता होणार सुनावणी

शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगापुढे दुपारीच ४ वाजता सुनावणी होणार आहे. यासाठी दोन्ही गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

09:43 (IST) 17 Jan 2023
शिवसेना पक्षनाव आणि धनु्ष्यबाण चिन्हाबाबत आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.

उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.