Maharashtra Political Crisis Updates : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे २० जानेवारी रोजी होईल, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला.
दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी निवडणूक आयोगाने दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकूण घेतला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेलीच नाही. जी फूट पडल्याचं भासवलं जातं आहे कपोलकल्पित आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी यावेळी केला. तसेच ही फूट ग्राह्य धरू नये आणि सर्वोच न्यायालयाचा निर्णय येईल पर्यंत कोणतही निर्णय घेऊ नये, अशी मागणी सिब्बल यांनी केली. तर आमच्याकडे आमदार आणि खासदार यांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं महेश जेठमलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं. सर्वोच्च न्यायालयात अद्याप कोणाचंही निलंबन झालेलं नाही, त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार जेठमलानी यांनी केली. यासंदर्भात आता शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
Maharashtra Political Updates : शिवसेनेतील संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्या; ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी
शहरात कोयते उगारुन दहशत माजविण्याचे सत्र कायम आहे. शिवाजीनगर, हडपसर भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविल्याच्या घटना उघडकीस आल्या. सतीश भीमा काळे (वय ४१, रा. जुना तोफखाना, शिवाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तुषार काकडे, मोन्या कुचेकर, दीपू शर्मा , दाद्या बगाडे (सर्व रा. हडपसर ) यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रबाळे एमआयडीसी मधील एका बेब डिझायनिंग कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनीही पगारवाढीवरून कंपनी मालकांशी वाद घातले होते. रबाळे एमआयडीसी मध्ये खालिद अब्दुल वाहिद यांनी चार महिन्यापूर्वी साँफ्ट वेअर डेव्हलपिंगची कंपनी सुरु केली आहे. सविस्तर वाचा…
पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा या लावणीचे शब्द मनात रूंजी घालावेत या पध्दतीने सतारीवरती मोर नाचरा हवा या शब्दांची आठवण यावी अशी मयुरपंखी रंगातील सतार मिरजेच्या युवा तंतुवाद्य कारागिरांनी बनवली आहे. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा ही गदिमांनी लिहीलेली आणि सुलोचनादीदींच्या स्वरसाजाने मराठी मुलखात अजरामर केलेली लावणी. सविस्तर वाचा…
शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.
शिवसेनेकडून होणारा युक्तीवाद जनतेच्या मनातून आला आहे. उद्धव ठाकरेंच्या मागे शिवसैनिक आहेत. फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना होतं नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.
शिंदे गटाच्या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ओळखपरेड करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, असेही ते म्हणाले.
शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान केला होता. हा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी खोडून काढला आहे. शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रुटी नाहीत, असं ते म्हणाले.
निवडणूक आयोगापुढे ठाकरे गटाच्या युक्तीवादानंतर शिंदे गटाचा प्रतिवाद सुरू झाला आहे. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसचे या कागदपत्रांची छाणणी करण्यासाठी ओळखपरेड करावी, अशी मागणीही सिब्बल यांनी केली आहे. दरम्यान, सिब्बल यांचा युक्तवाद पूर्ण झाला आहे.
आमदारांच्या निलंबनाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून न्यायालयाचा निर्णयापर्यंत कोणताही निर्णय देऊ नका, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच शिंदे गटाने सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचेही सिब्बल म्हणाले.
सवलतीचे प्रलोभन, उंची भेटवस्तु, पर्यटनाच्या प्रलोभानापायी काही घाऊक औषध, किरकोळ औषध विक्रेते कल्याण शहरात टेल्मा एम या बनावट रक्तदाबाच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे या गोळ्यांच्या उत्पादक कंपनीच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आले होते. या अधिकाऱ्यांनी खात्री पटल्यावर यासंबंधी पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागाला ही माहिती दिली. सविस्तर वाचा…
उद्धव ठाकरेंची शिवसेनाही खरी शिवसेना आहे, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच शिवसेनेतील फूट म्हणजे कपोलकल्पितकल्पना आहे, त्यामुळे शिंदे गटातील फूट आयोगाने ग्राह्य धरू नये, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाचा युक्तीवाद सुरू झाला आहे. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेनाही खरी शिवसेना आहे, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला आहे.
गेल्या पावणे तीन वर्षांपासून रखडलेल्या कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी पुन्हा प्रचाराची तयारी सुरू केली असून मकर संक्रांत आणि हळदी कुंकू तसेच महिलांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. बदलापुरात काही इच्छुकांनी महिलांसाठी चक्क स्कुटी, सोन्याची अंगठी आणि गृहोपयोगी वस्तू ठेवल्या आहेत. सविस्तर वाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याविषयी कोकणवासीय म्हणून माझ्यासह खासदार राजन विचारे यांना त्यांच्याबद्दल आपुलकी होती. विचारे यांच्यासह मुंबईतील काही वरिष्ठ नेते मंडळींनी पक्षावर दबाब आणण्यासाठी कट रचून आमच्या खांद्यावर बंदूका ठेवल्या.
शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगापुढील सुनावणीला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक निर्णय देण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीच्या दृष्टीने ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. या सुनावणी दरम्यान दोन्ही गटाचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावतीच्या लाचलुचप प्रतिबंधक विभागाच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहे. यावेळी अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील आलेल्या ठाकरे गटातील शिवसेना कार्यकर्त्यांनी सरकारच्या तसेच बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सविस्तर वाचा…
काँग्रेसने अनेक दिवसांच्या मंथनानंतर अखेर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देत असल्याचे माजी मंत्री सुनील केदार यांनी आज जाहीर केले. त्यानंतर सुधाकर अडबाले यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले.
बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार महाविकास आघाडीच्या जागावाटपात नागपूर शिक्षक मतदासंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. येथे काँग्रेसतर्फे कोणीही उमेदवारी अर्ज केलेला नाही. त्यामुळे कोणत्यातरी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर करण्याशिवाय काँग्रेसकडे पर्याय नाही.
शिवाजीनगर भागात भरदिवसा कोयते उगारुन दहशत माजविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशत माजविणाऱ्या सराइतांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे केली आहे. आमदार शिरोळे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. सविस्तर वाचा…
मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना गोठ्यात बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे. भाईंदर पश्चिम येथील केशवसूष्टीमध्ये मोठ्या संख्येने जनावरे पाळण्यात आली आहेत. यातील आठ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. सविस्तर वाचा…
माजी आमदार आशीष देशमुख यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातील काँग्रेसची चिंताजनक परिस्थिती असल्याचे सांगून प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी केली. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने कॉंग्रेसची नामुष्की झाली. यात प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार आहेत. पटोलेंच्या कार्यकाळात पक्षाला सातत्याने नाचक्कीचा सामना करावा लागत आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेसची दाणादाण उडत आहे. सविस्तर वाचा…
डोंबिवलीतील कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित मार्गदर्शन करताना परिवहन अधिकारी कल्लुलरकर यांनी सांगितले, शाळेत गेल्यानंतर क्रमिक अभ्यासक्रमा बरोबर विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम काय असतात याचा अभ्यास केला पाहिजे. रस्त्यावर लावलेली चिन्हे काय सुचवितात याची माहिती घेतली पाहिजे.
येत्या सहा महिन्याच्या कालावधीत कल्याण डोंबिवली शहरे कचरामुक्त करण्यासाठीचे नियोजन कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने तयार केले आहे. मागील तीन वर्षापासून शहरे कचरामुक्त करण्यासाठी विविध उपाय प्रशासनाकडून केले जात आहेत. त्याच उपक्रमाचा हा एक भाग असल्याचे घनकचरा विभागाच्या एका वरिष्ठाने सांगितले.
देशामध्ये सर्वाधिक लोकांची बोली असलेल्या हिंदीला महाराष्ट्र सरकारकडून राष्ट्रभाषेचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. राज्य हिंदी साहित्य अकादमीची पुनर्रचना करण्यात आली असून त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या शासकीय अध्यादेशामध्ये हिंदी राष्ट्रभाषा असल्याचे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे.
संकेतस्थळावर घरातील जुने कपाट विक्रीची जाहिरात देणाऱ्या महिलेला सायबर चोरट्यांनी साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कपाट खरेदी करण्याचा बहाणा करणाऱ्या चोरट्याने महिलेला चुकून आठ लाख रुपये पाठविल्याचा बनावट स्क्रीन शाॅट पाठवून तिची फसवणूक केली.
महाराष्ट्रात पदवीधर निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. त्यात नाशिक मतदारसंघ हा सर्वात चर्चेत आला आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, अशी थेट लढत होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे. टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
वांद्रे कार्टर रोड येथील माउंट मेरी चर्चसमोरील समुद्रकिनाऱ्यावर सोमवारी डॉल्फिनचा मृतदेह आढळला. समुद्रीप्रेमींनी या घटनेची माहिती वन विभाग आणि कांदळवन विभागाला दिली. त्यानंतर घटनास्थळी वन विभागाच्या पथकाने मृत डॉल्फिनचा शोध घेण्यास सुरुवात केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण, नाशिकचे मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण, ऐनवेळी पक्षाचा आदेश झुगारून तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला. तर, दुसरीकडे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील, अशी थेट लढत होणार आहे. तसेच या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला असेल? याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. दरम्यान, यासंदर्भात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सविस्तर वाचा
ठाणे आणि अहमदनगर जिल्हे जोडणारा महत्वाच्या महामार्ग बांधणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मागील अनेक वर्षाचा हा रखडलेला रस्ता पूर्ण झाला तर मुंबईतून नाशिकमार्गे किंवा माळशेज घाटातून अहमदनगरला जाण्याऐवजी प्रवाशांना मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील शहापूर येथून धसई, शेणवे, डोळखांब ते अकोले मार्गे थेट अहमदनगर जिल्ह्यात जाता येणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाची मुदत २३ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे संघटनात्मक निवडणुकीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.