Marathi News Update: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेले मनोहर जोशी यांची प्राणज्योत पहाटे तीनच्या सुमारास मालवली. शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गट या सगळ्यांनीच त्यांना आदरांजली वाहिली आहे आणि त्यांच्या स्मृती जागवल्या आहेत. तर मराठा आरक्षण आंदोलनात फूट पडली आहे. संगीता वानखेडे यांनीही आता मनोज जरांगेंवर काही आरोप केले आहेत. या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असणार आहे.
Maharashtra Breaking News Live 23 February 2024| माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं निधन आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी
ठाणे : ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे.जोशी एंटरप्रायझेस कंपनीतून दोन भागीदारांना बाहेर काढण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून ती बँक आणि कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करून फसवणुक केल्याचा आरोप बांधकाम व्यावसायिक कौस्तुभ कळके यांच्यावर असून या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात नौपाडा पोलिसांनी कळके यांना शुक्रवारी अटक केली आहे.
चंद्रपूर : राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात निवडणुका न घेता कायमस्वरुपी प्रशासकाची नेमणूक करण्यात येणार आहे. राज्य सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आणणारा आहे.
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडल्यावर निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता देताना त्याचे चिन्हही बाहाल केले. त्यामुळे दुसरा गट म्हणजे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोग कोणते चिन्ह देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह दिले. त्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली.
अकोला : वंचित आघाडीने दिलेला मसुदा महाविकास आघाडीने मान्य केल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. त्याचे आम्ही स्वागत करतो. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी त्यांचा मसुदा आम्हाला द्यावा. त्यामुळे कुठल्या मुद्द्यावर आपले एक मत आहे हे कळेल, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे मांडली.
चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेचे पुरते तीन तेरा वाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर जीवती तालुक्यातील आसापूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक चक्क दारू ढोसून शाळेत प्रवेश केला.
सविस्तर वाचा…
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहारांच्या प्रकरणाने पुन्हा उचल घेतली आहे.
कोल्हापुर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या काळजीवाहू कार्यकारी मंडळाने मागील अडीच वर्षात केलेल्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करून दोन महिन्यात अहवाल सादर करावा असे आदेश धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी दिले आहेत.
नागपूर : घरी कुणी नसताना एका युवकाच्या आईचा प्रियकर भेटायला आला. आई व तिच्या प्रियकरात शाब्दिक वाद झाला. तेवढ्यात मुलगा घरी आला. त्याने आईच्या प्रियकराची यथेच्छ धुलाई केली.
अलिबाग : राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प रखडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या प्रकल्पाच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे. भूसंपादनासाठी वाढीव मोबदला द्या, अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
उरण : शुक्रवारपासून उरणला जोडणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेची ३१ व ३० क्रमांकाच्या एनएमएमटीची बससेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यामुळे या बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. उरणमध्ये कोपरखैरणे ते उरण ही ३१ तर कलंबोली ते उरण या मार्गावरील ३० या दोन क्रमांकाच्या बस सुरू आहेत.
उरण : नगरपरिषदेच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या सोयीसाठी व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शहरातील बोरी स्मशानभूमीत गॅसवर आधारित शवदहिनीचे काम पूर्ण झाले असून येत्या महिन्याभरात शवदाहिनी सुरू होणार असल्याची माहिती उरण नगर परिषदेने दिली आहे. यासाठी लागणार गॅसपुरवठा करणाऱ्या गॅस वाहिनीचे काम आठवडाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली आहे.
सरकारी गायरान जमिनी मागासवर्गीय भूमीहिनांना वाटप कराव्या, अशीही आपली मागणी असल्याचे कवाडे यांनी सांगितले.
पनवेल : कळंबोली येथील सेल कंपनीमध्ये कामगार आणि ठेकेदार यांच्यात मागील दोन महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. लोखंडी माल उचलण्यासाठी लोखंडी चुंबक (मायजॅक क्रेन) सेल कंपनीने आणल्याने माथाडी कामगारांचा याला विरोध आहे. मराठी कामगार सेनेच्या प्रतिनिधींसह या संघटनेच्या कामगारांनी बुधवारी सेल कंपनीतील मायजॅक क्रेनचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी हस्तक्षेप केला.

शहरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सेनापती बापट रोड ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मूक मोर्चा काढण्यात आला.
यवतमाळ : ‘वापरा आणि फेका’, हे भारतीय जनता पक्षाचे तत्व आहे. त्यामुळे मित्र पक्षांचा वापर करून भाजप त्यांना बाजूला सारतो. मोठी माणसं पक्षात आल्यानंतर छोट्या माणसांचीही भाजपला गरज उरत नाही, अशी टीका राष्ट्रीय समाजपक्षाचे अध्यक्ष तथा माजीमंत्री महादेव जानकर यांनी केली. ते आज शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे निधन झाले आहे.
शिवसेना-भाजपचे 1995 मध्ये जेव्हा पहिल्यांदाच सरकार आले, त्यावेळी शिवाजी पार्कवर मनोहर जोशी यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. माझे वडील गोपीनाथ मुंडे यांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. निधनाची बातमी समजल्याने मला धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने एक ज्येष्ठ नेता हरपला आहे. असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : उपनगरी रेल्वेगाड्यांतील वाढत्या प्रवाशांचा भार कमी करून प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी मध्य रेल्वेवर दहा जलद उपनगरी गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. सर्वाधिक गर्दीच्या दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेने या फेऱ्या सुरू केल्या जातील.
मुंबई : देशभरातील रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत विकास करण्यात येत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ फेब्रुवारी रोजी या कामांचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी भारतीय रेल्वेमधील सर्व विभागीय जनसंपर्क कार्यालयांना निरनिराळ्या सूचना करण्यात आल्या आहेत.
उच्च शिक्षणात गुणवत्ता, सर्वदूर संधी व समानता येण्यासाठी केंद्राच्या शिक्षा अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालनालयाची स्थापना झाली आहे.
अकोला : अकोला जिल्ह्यात मनोहर जोशी यांचे अनेक दौरे झालेत. त्यापैकी १९९८ मध्ये त्यांच्या दौऱ्याच्या आठवणीला ज्येष्ठ छायाचित्रकार डॉ. माधव देशमुख यांनी उजाळा दिला.
बुलढाणा: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने आपला बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा अर्ध्यावर सोडून उद्धव ठाकरे हे आज मुंबईकडे रवाना झाले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त येताच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याचा दौरा स्थगित केला.
वर्धा : आधीच पोलीस आणि त्यात परत मद्य पिले असेल तर काय होईल, याचे धक्कादायक प्रत्यंतर वर्धेत आले आहे. खासगी कार चालवीत जाणाऱ्या महिला पोलीस शिपायाने एका दुचाकीस्वारास उडविले. त्यात रितिक कडू व पवन आदमने हे दोघे जखमी झाले. त्यांना त्याच अवस्थेत सोडण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. रात्री तशी तक्रार रामनगर पोलिसांकडे करण्यात आली आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अद्याप तरी मला ऑफर आलेली नाही, असे नमूद करत असतानाच श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी ती लवकरच येईल, असा निर्वाळा दिला.
उद्धव ठाकरेंशी मैत्री होऊ शकते का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरेंशी मैत्री होऊ शकते का?“उद्धव ठाकरे माझे मित्र होते. ते आत्ता मित्र आहेत की नाहीत हे त्यांना विचारलं पाहिजे. मित्र तो असतो जो फोन उचलून सांगतो की तू मागणी करतो आहेस पण हे शक्य नाही. ज्यावेळी युती म्हणून निवडून आलो. त्यावेळी त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं. पाच वर्षे जेव्हा आम्ही सत्तेत होतो तेव्हा मी कधीही त्यांना टाळलं नाही. त्यांचा फोन मी कायम घ्यायचो. मात्र २०१९ मध्ये मी निकालानंतर जेव्हा त्यांना फोन केले तेव्हा त्यांनी घेतलेच नाहीत. शिवाय मला त्यांनी फोन केलाच नाही. मला त्यांनी सांगितलंच नाही की आता आपण बरोबर नाही. मैत्रीचे दरवाजे त्यांनी बंद केले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तु्म्ही उद्धव ठाकरेंना विचारा. सगळे मार्ग त्यांनी बंद केले. त्यानंतर औपचारिक बोलणं कधीही झालेलं नाही. समोरासमोर भेट झाली तर कसे आहात विचारतो. तेवढी कर्टसी अजूनही महाराष्ट्रात आहे.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
हातउसने घेतलेले पैसे परत न केल्याने शिवीगाळ करून त्रास दिल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धनकवडी भागात घडली.
मुंबई : मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झालेले उपायुक्त उल्हास महाले यांचा सेवाकालावधी वाढविण्यासाठी पालिका प्रशासनाने राज्य सरकारला दुसऱ्यांदा पत्र पाठवले आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील या उपायुक्तांकडे महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी होती व ते सेवानिवृत्त होऊन २०-२२ दिवस झाले आहेत. एका वर्षांसाठी करार पद्धतीने त्यांना याच पदावर मुदत वाढवावी याकरीता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नगरविकास विभागाला पत्र पाठवले आहे.
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘पेहेल-२०२४’ या उपक्रमाअंतर्गत विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे.
धुळे : शहरातील पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रसेन लॉन्समध्ये विवाहासाठी वर आणि वधू पक्षाची सर्व तयारी झाली असताना एक संकट उभे ठाकले .वर पक्षाकडून वधूसाठी आणलेले दागिनेच सापडेनासे झाले.
नाशिक : नाशिक शहरावर पाणीटंचाईचे सावट दाटले असताना महापालिकेने पाणीपट्टी थकबाकी वसुली आणि अनधिकृत नळ जोडण्यांचा शोध सुरू केला आहे. या मोहिमेंतर्गत पहिल्याच दिवशी १५ ते २० नळजोडण्या खंडित करण्यात आल्या.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेले मनोहर जोशी यांची प्राणज्योत पहाटे तीनच्या सुमारास मालवली. शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गट या सगळ्यांनीच त्यांना आदरांजली वाहिली आहे आणि त्यांच्या स्मृती जागवल्या आहेत.