Marathi News Update: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेले मनोहर जोशी यांची प्राणज्योत पहाटे तीनच्या सुमारास मालवली. शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गट या सगळ्यांनीच त्यांना आदरांजली वाहिली आहे आणि त्यांच्या स्मृती जागवल्या आहेत. तर मराठा आरक्षण आंदोलनात फूट पडली आहे. संगीता वानखेडे यांनीही आता मनोज जरांगेंवर काही आरोप केले आहेत. या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असणार आहे.
Maharashtra Breaking News Live 23 February 2024| माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचं निधन आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी
मुंबई : राजकीय मंडळींचा वरचष्मा असलेल्या राज्यातील मजूर सहकारी संस्थांवर शासनाने मेहरनजर दाखवत विनानिविदा कामे देण्याची पूर्वी दहा लाख रुपये असलेली मर्यादा आता १५ लाख इतकी करताना, वर्षभरात एकऐवजी तीन कोटींची कामे देण्याची मुभा दिली आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना मात्र पूर्वीची ६० लाखांची मर्यादा कायम ठेवली आहे.
पिंपरी चिंचवड : मनोज जरांगे पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील वाद हा वैयक्तिक असून त्यामध्ये सरकारला खेचू नये. त्या दोघांमधील वाद हा वैयक्तिक असून त्यात सरकारचा काडीमात्र संबंध नाही. त्यात सरकारला पडण्याची गरज नाही. त्यांच्या या वादात नाहक सरकारला ओढू नये, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
सोलापूर : मुख्यमंत्री, लोकसभा सभापती आणि शिवसेना नेते म्हणून मनोहर जोशी यांनी मराठी माणूस, मराठी भाषा, हिंदुत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्य वेचले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली.
नाशिक : हरित लवादाने पेट्रोल पंप उभारताना निवासी क्षेत्रापासून ५० मीटर अंतर असणे बंधनकारक केले असताना शहर परिसरात नव्या पेट्रोल पंपाला परवानगी देताना या निकषाचे प्रशासनाकडून सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आक्षेप पेट्रोल पंप वितरकांच्या नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनने नोंदविला आहे.
राज्यातील अनुदानित, अंशत: अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारीभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्या आदिवासी मेळाव्यात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दोन मंत्री आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच भाजपचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या गटाविरोधात उघड नाराजी व्यक्त केली.
सध्याची मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या सुमारे ५५ हजार आहे. ही प्रवासी संख्या कमी असल्याने ती वाढविण्यासाठी महामेट्रोकडून सातत्याने पावले उचलली जात आहे.
बदलापूर : इयत्ता बारावीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहे. तर येणारा महिना, दीड महिना हा महत्वाच्या परीक्षांचा आहे. बहुतांश विद्यार्थी दूरवरच्या शाळा, महाविद्यालयात परीक्षांसाठी जात असतात. अशावेळी तरी मध्य रेल्वेवरील उपनगरीय लोकल नियमित वेळा पत्रकानुसार चालवाव्यात, असे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाला केले आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसीने) वांद्रे रेक्लेमशनचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नेपीयन्सी रोड येथील आपल्या कार्यालयाच्या जागेचाही विकास करण्याचा विचार सुरू केला आहे.
गेल्या १७ वर्षांपासून हबीबुल्लाह मुंबई शहरात वास्तव्यास असून त्याने भारतीय नागरिक असल्याची बनावट कागदपत्रे तयार केली आहेत.
कारंजा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालं आहे. ५९ वर्षीय राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. पाटणी यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2024
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला… pic.twitter.com/LsvH0n4upq
पिंपरी : उच्चदाब विद्युत वाहक तारांच्या एका मनोऱ्याच्या (टॉवर) अडथळ्यामुळे रखडलेल्या बोपखेल आणि खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे.
अलिबाग – गेल्या काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात माकडांचा नागरी वस्त्यांमधील उपद्रव वाढला आहे. अन्नाच्या शोधात माकडांच्या आणि वानरांच्या टोळ्या गावात शिरत असल्याचे दिसून येत आहे. या माकडांचा उपद्रव थांबवायचा कसा हा प्रश्न बागायतदारांना पडला होता. आता फटाक्यासारखा आवाज करणारे एक यंत्र काही शेतकऱ्यांनी विकसित केले आहे.
नागपूर: लोकसभेचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मैत्री राजकारणात सर्व परिचित होती. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात गडकरी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. जोशी यांच्या निधनामुळे जोशी – गडकरी यांच्या मैत्रीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी फलाट क्रमांक दोन लगत लोखंडी अडथळे उभारण्यात आलेले आहेत. परंतु या अडथळ्यांतील काही लोखंडी सळई कापण्यात आलेल्या असून तेथून प्रवासी रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीसमोर पेच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार असलेल्या मावळवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील दावा सांगितला आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत यावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने मावळवरून महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे. शिवसेनेचा सुवर्णकाळ पाहिलेले मनोहर जोशी यांची प्राणज्योत पहाटे तीनच्या सुमारास मालवली. शिवसेनेचे नेते, मनसेचे नेते राष्ट्रवादी शरद पवार गट या सगळ्यांनीच त्यांना आदरांजली वाहिली आहे आणि त्यांच्या स्मृती जागवल्या आहेत.